संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 6
- कानात बुगडी, गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
- काळ्या दगडावरची रेघ – न बदलणारी गोष्ट
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच – कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
- कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी – कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
- कोल्हा काकडीला राजी – क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
- केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
- कोळसा उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
- कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी – चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
- कोरड्याबरोबर ओले ही जळते – निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
- कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
- काखेत कळसा नि गावाला वळसा – हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
- काप गेले नी भोके राहिले – वैभव गेले नी फक्त त्याच्या खुणा राहिले
- कोल्ह्याला द्राक्ष आंबट – आपल्याला न मिळणार्या गोष्टीला कमी लेखने
- कसायला गाय धार्जिणी – दृष्ट व कठोर माणसाशी सर्व लोक नम्रतेने वागतात
- करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय – प्रत्येक गोष्टीच्या वाढीला मर्यादा असतेच
- कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर असते – ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते
- काळीचोर तो माळीचोर – जो लहानपणी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याचेवर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात
- काकडीची चोरी फाशीची शिक्षा – लहान अपराधाला मोठी शिक्षा
- काने कोपरे विसरू नका पायली पसा भुलू नका – शेताचा काना कोपरा पेरला गेला पाहिजे नाहीतर पीक कमी येते
- कुळास कान ठेवी ध्यान – भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्यात म्हणजे बाहेर फुटतात
- कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामबट्टाची तट्टानी – एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र
- केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी – अत्यंत गरिबीची अवस्था
- कंबरेचे सोडलं डोक्याला बांधलं – लाज लज्जा पार सोडून देणे
- कालच्या वाणी भलभल पाणी – सारखे दिवस सारखे असणे
- काम नाही कवडीच फुरसत नाही घडीची – काम करीत असणे पण ते दिसत नाही
- कोंबड्यापुढे मोती – मूर्खापुढे पैशाचा ढीग
- कानाला ठणका व नाकाला औषध – रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे
- केर डोळ्यात फुंकर कानात – भलत्या जागी भलताच उपाय
- कुचेष्टेवाचून प्रतिष्ठा नाही – प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आधी त्रास घ्यावा लागतो
- काल मेला आणि आज पितर झाला – हातात थोडासा अधिकार येताच सत्ता गाजविणे
Free Job Alert App