संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17
- मनात मनोरे बाहेर ताट कोरे – मनात पुष्कळ इच्छा असते पण दारिद्र्या मुळे कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही
- मनाला पटले पण कृतीत उमटले पाहिजे – मनात आले तर घडले पाहिजे मनगटात जोर कोठे मनुष्याहून थोर – स्वतः चा दृढ निश्चय असला तर कोटी मनुष्यापेक्षाही अधिक बळ येते
- मरणा धारी आणि तोरणा दारी – मृत्यू समयी आणि विवाह प्रसंगी हजर असणे
- मनसुभे केले अन् दिवस निघून गेले – अति विचारात काळ निघून गेल्यामुळे कार्य न होणे
- माकडाच्या हाती कोलीत – मूर्ख माणसाच्या हाती सत्ता
- माणकीस बोललं, झुणकीस लागलं – एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे
- मामुजी मेला अन् गांव गोळा झाला -क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे
- माझा होऊन राहा पण भीक मागून खा – एखादा मुलगा आपण आश्रित आहे असा मोठेपणा आपल्याकडे घ्यावयाचा पण त्याच्यासाठी स्वतःच्या पदराला मात्र खार लागू द्यायची नाही
- माझे घोडे आणि जाऊ द्या पुढे – जिथे तिथे आपला बडे जाव
- माझे मन नित्यराजा , खाते भाकर भाजी – जे आपल्याजवळ आहे त्याचा उपभोग घेऊन समाधानी राहणे
- मान सांगावा जना , अपमान सांगावा मना – काही फायद्याचे विशेष घडले तर लोकांना सांगावे पण कुठे अपमान झाला तर मनातच ठेवावा
- मनाचा मोठेपणा दैवाला करावा अर्पण – मनाने उदार होऊन परमेश्वरा वर श्रध्दा ठेऊन कार्य करीत रहावे
- मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही – आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते
- मांजरी मांजर गेली लुटी आणल्या तीन मुठी – खूप श्रम करणे व अत्यल्प फलप्राप्ती
- मांजर कावरते खांबाले कोरवाळते – रागाचे निरर्थक प्रदर्शन करणे
- मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधावी – पाहायला सोपे पण करायला कठीण अशाप्रसंगी कोणी पुढाकार घ्यावा
- मांजराने दूध पाहिले बडगा कुठे पहिला – प्रत्येकाला लोभ तेवढा दिसतो प्रत्यक्ष परिश्रम दिसत नाही
- मानेवर गळू आणि पायाला जळू – रोग एकीकडे उपाय भलतीकडे
- मारुतीची शेपूट – लांबत जाणारे काम
- माकडाला काकडी गोड – छोट्याशा लाभावर समाधान मानणे
- मायचा हात जगन्नाथ – जे आईने केले ते फारच उत्तम
- मार शेजारचा साप मी मुलाबाळांचा बापर – दुसर्या कडून धोक्याचे काम करून घेणे
- माळी तशा बागा, कोळी तसा धागा – कुशल माणसाप्रमाणे कुशल काम
- मिळकत तीन टक्के खर्च झाले सात टक्के – मिळकती पेक्षा खर्च अधिक
- मिळेल व्यक्ता पण दुर्मिळ श्रोता – आजकाल वक्ते मिळतात पण श्रोतेच नाहीत
- मी मरेन तुला रंडकी करेन – स्वतःचे ही नुकसान आणि दुसर्याचेही नुकसान
- मीठ मिळेना आणि पीठ गिळेना – अर्धवट तुटपुंजी साधनसामुग्री असली म्हणजे चांगले काम होत नाही
- मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू – छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे
- मुंगीला मुताचा पूर – लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते
- मुंगे पानोपान ,माश्या घाणीघाण – पानाजवळ मुंग्यां , घाणीजवळ माश्या
- मुंगूस पहिला अन् साप पळाला – जबरदस्त शत्रू पाहिला की दुष्ट मनुष्य पळ काढतो
- मूळचाच शहाणा त्याला फुटला पान्हा – मूर्ख मनुष्य अधिक मूर्खपणाची गोष्ट करतो
- मृगाचे पाणी शेतकर्याला सोन्यावाणी – मृग नक्षत्राचे पाणी आल्यास शेताची पेरणी केल्यास भरपूर पीक येते
- मेलेले कोंबडे आगीला भीत नाही – ज्याच्या भावना मेल्या तो इतरांची पर्वा करत नाही
- मोर नाचतो म्हणून लांडोर ही नाचतो – दुसर्याचे मूर्खपणाचे अनुकरण करणे
- मना एवढा ग्वाही त्रिभुवनात नाही- आपल्या वागण्या बोलण्याची खरी साक्ष सगळ्या त्रिभुवनात केवळ मनच देऊ शकते कारण आपल्या मनापासून आपणाला काही लपवता येत नाही
- मायेवाचून रड नाही आगीवाचून कढ नाही – आईच्या ममतेची बरोबरी दुसरे कोणी करू शकत नाही
- मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते- मूर्खांचे भांडअन् तिसऱ्याचा लाभ
- मूर्ख ओकती, शहाणा गिळती – मूर्ख मनुष्य बडबड करतो, शहाणा मनुष्य आपल्या मनात लपवून ठेवतो
- म्हशीला मणभर दूध – मेल्यावर गुणगान करणे
- म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही – निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते
- मोठ्याचा आला गाडा, गरिबाच्या झोपड्या मोडा – श्रीमंताच्या हौसे पुढे गरिबाच्या नुकसानीची कोणीही पर्वा करीत नाही
- म्हशीची शिंगे म्हशीला जड होत नाहीत – आई वडील गरीब असले तरी त्यांची मुले त्यांना जड होत नाहीत
- मानणार्या चा हात धरवतो पण बोलणार्याचे तोंड धरवत नाही – दांडग्या माणसाला आवरणे सोपे पन बोलणार्याला आवार घालता येत नाही
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा