संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 17

  • मनात मनोरे बाहेर ताट कोरे  – मनात पुष्कळ इच्छा असते पण दारिद्र्या मुळे कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही 
  • मनाला पटले पण कृतीत उमटले पाहिजे  – मनात आले तर घडले पाहिजे मनगटात जोर कोठे मनुष्याहून थोर  – स्वतः चा दृढ निश्चय असला तर कोटी मनुष्यापेक्षाही अधिक बळ येते 
  • मरणा धारी आणि तोरणा दारी  – मृत्यू समयी आणि विवाह प्रसंगी हजर असणे 
  • मनसुभे केले अन् दिवस निघून गेले  – अति विचारात काळ निघून गेल्यामुळे कार्य न होणे 
  • माकडाच्या हाती कोलीत  – मूर्ख माणसाच्या हाती सत्ता 
  • माणकीस बोललं, झुणकीस लागलं – एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे
  • मामुजी मेला अन् गांव गोळा झाला -क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे
  • माझा होऊन राहा पण भीक मागून खा  – एखादा मुलगा आपण आश्रित आहे असा मोठेपणा आपल्याकडे घ्यावयाचा पण त्याच्यासाठी स्वतःच्या पदराला मात्र खार लागू द्यायची नाही 
  • माझे घोडे आणि जाऊ द्या पुढे  – जिथे तिथे आपला बडे जाव 
  • माझे मन नित्यराजा  , खाते भाकर भाजी  – जे आपल्याजवळ आहे त्याचा उपभोग घेऊन समाधानी राहणे 
  • मान सांगावा जना  , अपमान सांगावा मना  – काही फायद्याचे विशेष घडले तर लोकांना सांगावे पण कुठे अपमान झाला तर मनातच ठेवावा
  • मनाचा मोठेपणा दैवाला करावा अर्पण  – मनाने उदार होऊन परमेश्वरा वर श्रध्दा ठेऊन कार्य करीत रहावे 
  • मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही – आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते
  • मांजरी मांजर गेली लुटी आणल्या तीन मुठी  – खूप श्रम करणे व अत्यल्प फलप्राप्ती 
  • मांजर कावरते खांबाले कोरवाळते  – रागाचे निरर्थक प्रदर्शन करणे 
  • मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधावी  – पाहायला सोपे पण करायला कठीण अशाप्रसंगी कोणी पुढाकार घ्यावा 
  • मांजराने दूध पाहिले बडगा कुठे पहिला  – प्रत्येकाला लोभ तेवढा दिसतो प्रत्यक्ष परिश्रम दिसत नाही 
  • मानेवर गळू आणि पायाला जळू – रोग एकीकडे उपाय भलतीकडे
  • मारुतीची शेपूट – लांबत जाणारे काम
  • माकडाला काकडी गोड  – छोट्याशा लाभावर समाधान मानणे 
  • मायचा हात जगन्नाथ  – जे आईने केले ते फारच उत्तम 
  • मार शेजारचा साप मी मुलाबाळांचा बापर – दुसर्‍या कडून धोक्याचे काम करून घेणे 
  • माळी तशा बागा,  कोळी तसा धागा  – कुशल माणसाप्रमाणे कुशल काम 
  • मिळकत तीन टक्के खर्च झाले सात टक्के  – मिळकती पेक्षा खर्च अधिक 
  • मिळेल व्यक्ता पण दुर्मिळ श्रोता  – आजकाल वक्ते मिळतात पण श्रोतेच नाहीत 
  • मी मरेन तुला रंडकी करेन  – स्वतःचे ही नुकसान आणि दुसर्‍याचेही नुकसान 
  • मीठ मिळेना आणि पीठ गिळेना  – अर्धवट तुटपुंजी साधनसामुग्री असली म्हणजे चांगले काम होत नाही 
  • मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू – छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे
  • मुंगीला मुताचा पूर – लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते
  • मुंगे पानोपान ,माश्या घाणीघाण  – पानाजवळ मुंग्यां  , घाणीजवळ माश्या 
  • मुंगूस पहिला अन् साप पळाला  – जबरदस्त शत्रू पाहिला की दुष्ट मनुष्य पळ काढतो 
  • मूळचाच शहाणा त्याला फुटला पान्हा  – मूर्ख मनुष्य अधिक मूर्खपणाची गोष्ट करतो 
  • मृगाचे पाणी शेतकर्‍याला सोन्यावाणी – मृग नक्षत्राचे पाणी आल्यास शेताची पेरणी केल्यास भरपूर पीक येते 
  • मेलेले कोंबडे आगीला भीत नाही  – ज्याच्या भावना मेल्या तो इतरांची पर्वा करत नाही 
  • मोर नाचतो म्हणून लांडोर ही नाचतो  – दुसर्‍याचे मूर्खपणाचे अनुकरण करणे 
  • मना एवढा ग्वाही त्रिभुवनात नाही- आपल्या वागण्या बोलण्याची खरी साक्ष सगळ्या त्रिभुवनात केवळ मनच देऊ शकते कारण आपल्या मनापासून आपणाला काही लपवता येत नाही 
  • मायेवाचून रड नाही आगीवाचून कढ नाही  – आईच्या ममतेची बरोबरी दुसरे कोणी करू शकत नाही  
  • मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते- मूर्खांचे भांडअन् तिसऱ्याचा लाभ
  • मूर्ख ओकती, शहाणा गिळती  – मूर्ख मनुष्य बडबड करतो, शहाणा मनुष्य आपल्या मनात लपवून ठेवतो 
  • म्हशीला मणभर दूध – मेल्यावर गुणगान करणे
  • म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही       – निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते
  • मोठ्याचा आला गाडा, गरिबाच्या झोपड्या मोडा  – श्रीमंताच्या हौसे पुढे गरिबाच्या नुकसानीची कोणीही पर्वा करीत नाही 
  • म्हशीची शिंगे म्हशीला जड होत नाहीत  – आई वडील गरीब असले तरी त्यांची मुले त्यांना जड होत नाहीत 
  • मानणार्‍या चा हात धरवतो पण बोलणार्‍याचे तोंड धरवत नाही  – दांडग्या माणसाला आवरणे सोपे पन बोलणार्‍याला आवार घालता येत नाही 

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply