संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 10 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 10
- जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
- ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे – एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी – ज्याच्याजवळ खावयास प्यावयास आहे त्याला काम करण्याची गरज नसते
- जी खोड बाळ ती जन्मकळा – लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
- ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
- जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही – मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
- जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी – मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
- जे न देखे रवि ते देखे कवी – जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो
- जे चकाकते ते सोने नसते- ज्या वस्तू वरुन चकाकतात त्या सर्व सोन्याच्या केलेल्या असतात असे नाही
- जे पिंडी ते ब्रम्हांडी- जी गोष्ट आपल्याकडे आहे तेसगळीकडे आहे
- जे फार भुंकते ते चावरे नसते – जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या हातून काहीच होत नाही
- जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी – कार्य आहे तेथे कारण असतेच
- ज्याचे दळ त्याचे बळ – ज्या राष्ट्राजवळ सक्षम सैन्य असते ते राष्ट्री दुसर्यावर वर्चस्व गाजवते
- ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.
- जलात राहुन माशांशी वैर करू नये – ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
- जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला – निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
- जशास तसे – एकाने केले त्या प्रमाणे दुसर्याने वागणे जसा भाव तसा देव – ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्या प्रमाणे फळ मिळते
- जशी कामना तशी भावना – जशी मनात इच्छा असते तशीच भावना असते
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी – ज्याच्याकडून लाभ होत असतो, त्याचीच लोक खुशामत करतात
- जुने ते सोने – जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात
- ज्याच्या मनगटात जोर तो बळी – ज्याच्या जवळ अधिकार आहे, संपत्ती आहे तो श्रेष्ठ
- जगाच्या कल्याणा संताच्या विभूती – जे साधूपुरुष असतात ते जगाच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात
- जंगलात नाही वावर आणि वावरात नाही घर – ज्याच्या जवळ घरदार नाही असा मनुष्य
- जसा गुरू तसा चेला – गुरू प्रमाणेच शिष्य
- जशी नियत तशी बरकत – ज्याप्रमाणे आपली वागणूक असेल त्याच प्रमाणे आपल्याला फळ मिळते
- जाती करता खावी माती – जातीसाठी जे करायचे ते करणे प्रसंगी खालच्या थरावर ही येणे
- जात्यावर बसले म्हणजे ओवी सुचते – काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात
- जखम भरून येते पण व्रण कायम राहतात – आपल्यावर बेतलेल्या वाईट प्रसंगाची वाईट आठवण विसरत नाही
- ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याच्या हातात सत्ता असते तो स्वतः चा फायदा करून घेतो
- ज्याला नाही अक्कल त्याची बरोबर नक्कल – मूर्ख किंवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो
- जिकडे सुई तिकडे दोरा – प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात
- झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते
- झाड जावो पण घड ना जावो – नुकसान सोसावे पण धर्म त्याग करू नये
- झोपला धोंडा भुकेला कोंडा – भूक लागली की कण्या कोयंडाही चालतो थकल्यावर कुठेही झोप येते
- झूटा न बोले तो पेट फुले- खोटे बोलले नाही तर पोट फुगते
- झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी – ज्या शक्य नाही अशा गोष्टी करणे
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
- टिटवी देखील समुद्र आटविते – सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
- टक्के टोणपे खाल्ल्या वाचून मोठेपण येत नाही – अनुभव आल्याशिवाय व्यवहारात पडून काही ठेचा खाल्ल्याशिवाय माणसाला थोरपण प्राप्त होत नाही
- डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एक आणि उपचार दुसराच
- डोंगर पोखरून उंदीर काढणे – प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
- डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही- अत्यंत दारिद्र्याची स्थिती असता चोचले करणे
- डोक्यावर पदर दिलावर नजर – विनयाचा मोठा आव आणायचा त्याचवेळी अनीतीमय गुप्त कारस्थाने करीत असायचे
- डोळ्यात आसू तोंडावर हसू – एखाद्या गोष्टीबद्दल दुःख परंतु त्याच गोष्टीबद्दल दुसर्या दृष्टीने आनंद
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा