संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 11

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 11 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 11

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 11

  • डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा  – व्यभिचारी स्त्रीचा डाग आता पुराणा झाला म्हणून ती आपल्याला लोकांनी पतिव्रता म्हणावे असा आग्रह धरते 
  • डोंगराएवढी हाव तिळाएवढी धाव  – महत्त्वाकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्यास कुवत नसणे 
  • ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला-  वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
  • ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा – वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
  • ढोरात ढोर पोरात पोर  – वाटेल तेथे सामावणारा मनुष्य 
  • ढोंग धतोरा, हाती कटोरा  – ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास नुकसानच होते 
  • तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला – भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
  • तळे राखील तो पाणी चाखील – आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
  • ताकापुरती आजीबाई – आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
  • ताकापुरते रामायण  – आपले काम साधण्या पुरते आर्जव दुसर्‍याच्या पूर्ण अधीन असणे 
  • तोंड दाबून बुक्यांचा मार – एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
  • तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले – फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
  • तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे – अगदी उलट गुणधर्म दिसणे.
  • तट्टाला टूमणी, तेजीला इशारत – जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
  • तीन दगडात त्रिभुवन आठवते – संसार केल्यावरच खरे मर्म कळते.
  • तीर्थ आहे तर भट नाही, भट आहे तर तीर्थ नाही – चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
  • तेरड्याचा रंग तीन दिवस – कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.
  • तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे – खायला पुढे कामाला मागे.
  • ताटाखालचे मांजर  – दुसर्‍याच्या पूर्ण अधीन असणे 
  • तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे  – योग्य संधी मिळताच आपले काम करून घेतले पाहिजे 
  • तण खाई धन  – शेतात तणकट असेल तर पीक वाढत नाही 
  • तिळगूळ घ्या गोड गोड बोला  – गोड गोड बोलून वैरभाव नष्ट करणे 
  • तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना  – एकमेकांशी झगडत जाणे पण एकमेकां खेरीज न करमणे 
  • तू मला अन् मी तुला  – आपलाच एकमेकाला आधार 
  • तहान लागल्यावर विहीर खोदणे  – एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर त्यावर उपाय शोधणे 
  • ताकाला जावे आणि भांडे का लपवावे- कमी पणा वाटणारी एखादी गोष्ट जर तुम्ही करीत असाल तर ती लपविण्यात भोंदू पणा करण्यात अर्थ नाही 
  • तोफेच्या तोंडी देणे  – संकटात लोटणे 
  • तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो  – एकाचे कार्य दुसर्‍या करिता हानिकारक ठरते 
  • तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे – आपले काम सोडून दुसर्‍याचे काम करण्यास जाणे 
  • तूप खाऊन रूप येत नाही  – कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसत नाही 
  • थेंबे थेंबे तळे साचे – दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
  • थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान – मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.
  • थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते  – थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी  पाय फुटतात 
  • थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे – आपल्या ऐपतीप्रमाणे 
  • खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे 
  • थोडे बोलणे बहुत करणे  – बोलावे थोडे पण कृतीच पुष्कळ करावी 
  • थोराचे दुखणे आणि मनभर कुंथणे  – मोठ्यांच्या आजाराची सर्वत्र चर्चा होत असते 
  • दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते
  • दहा गेले, पाच उरले – आयुष्य कमी उरणे.
  • दात कोरून पोट भरत नाही – मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
  • दाम करी काम, बिवी करी सलाम – पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.
  • दाखविलं सोनं हसे मुल तान्हं – पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
  • दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत – एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.
  • दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
  • दिल्ली तो बहुत दूर है – झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
  • दिवस बुडाला मजूर उडाला – रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.
  • दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
  • दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो
  • दुष्काळात तेरावा महिना  – आधीच्या संकटात आणखी भर 
  • दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही – दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.
  • दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते – एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply