संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 3-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 3
- ऊत येणे – अतिरेक होणे, चेव येणे.
- ऊन खाली येणे – सायंकाळ होणे.
- ऊर दडपणे – अतिशय भीती वाटणे.
- ऊर भरून येणे – भावना दाटून येणे.
- ऊर बडवून घेणे – आक्रोश करणे.
- ऊर फाटणे – अतिशय दुःख होणे.
- ऊस मळे फुलणे – ऊसमळे चांगले वाढीस लागणे.
- ऊहापोह करणे – चर्चा करणे (उहापोह करणे).
- एक घाव दोन तुकडे करणे – ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात आणणे.
- एकजीव होणे – पूर्णपणे मिसळून जाणे.
- एकटक पाहणे – स्थिर नजरेने पाहणे.
- एकमत होणे – सर्वांचा सारखा विचार असणे.
- एका पायावर तयार असणे – फार उत्कंठीत होणे.
- एकाग्र चित्त होणे – मन केंद्रित करणे.
- एकेरीवर येणे – भांडायला तयार होणे.
- एखाद्या वस्तूवर डोळा असणे – एखादी वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा असणे.
- एकाचे एक असणे- रक्त संबंध असणे
- एक नंबरचा कच्चा असणे- फारच कंजूष असणे
- एकत्र गिल्ला करणे- टीकेची झोड उडवणे
- एकाच माळेचे मणी- सगळे एकसारखे
- एखाद्याच्या उरावर धोंडा ठेवणे- अतिशय अवघड काम करावयास सांगणे
- एखाद्याच्या उरावर बसणे- जबरदस्तीने काम करून घेणे
- एखाद्याची कणीक तिंबवणे- खूप मार देणे
- एरंडाचे गुऱ्हाळ- व्यर्थ बडबड
- एकांडा शिलेदार- इतरांची मदत न घेता स्वबळावर कार्य करणारा
- एकताटी जेवणे – एकोप्याने राहणे
- एका पट्ट्यात बोलणे- एका दमात बोलणे
- एका नावेत असणे- सारख्याच परिस्थितीत असणे
- ओस होणे – रिकामे होणे.
- ओढ घेणे – आकर्षण वाटणे.
- ओढून चंद्रबळ आणणे – राशीत चंद्राची अनुकूलता आणणे
- ओढून काढणे- सक्तीने बाहेर काढणे
- ओली सुकी करणे – नाणे फेक करून निर्णय घेणे.
- ओले कोरडे खाणे- कसाबसा निर्वाह करणे
- ओनामा- प्रारंभ
- ओटीत घालणे – संगोपनासाठी दुस-यांच्या हवाली करणे.
- ओवाळून टाकणे – तुच्छ समजून फेकून देणे.
- ओक्शा बोक्शी रडणे – खूप रडणे.
- ओघात पडणे – मार्गात येणे
- ओटी पसरणे- पदर पसरणे
- ओठांचा भार न वाळणे – बाल्यावस्था न संपणे
- ओठा बाहेर काढणे – बोलून दाखविणे
- ओठ न उचलणे- काहीच न बोलणे
- ओठ सुकणे – निराश होणे
- ओठ न उलणे – काहीच न बोलणे
- ओठ पिळला तर दूध निघेल- अल्पवय असणे
- औषध नसणे – उपाय नसणे.
- औषधालाही नसणे – अजिबात नसणे, मुळीच नसणे.
- ओढ लागणे – तीव्र इच्छा होणे.
- कणीक तिंबणे – खूप मारणे.
- कंठ दाटून येणे – गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.
- कंठस्नान घालणे – ठार मारणे, शिरच्छेद करणे.
- कच खाणे – माघार घेणे.
- कणीक मऊ होणे – मार बसणे.
- कट करणे – कारस्थान करणे.
- कडुसे पडणे – सायंकाळ होणे.
- कटाक्ष टाकणे – एक नजर टाकणे, नजर फिरविणे.
- कंठशोष करणे – ओरडून गळा सुकविणे, उगाच घसाफोड करणे.
- कणव येणे – दया येणे.