संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
वाक्यप्रचार व अर्थ
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ
- आठवण ठेवणे – ध्यानात ठेवणे.
- आठवणींना उजाळा देणे – जुन्या आठवणी पुन्हा येणे.
- आहारी जाणे – पूर्णपणे स्वाधीन होणे.
- आवृत्ती करणे – पुन्हा पुन्हा नाचणे, नाव झळकणे.
- आडव्यात बोलणे – कोणतीही गोष्ट सरळपणे न बोलणे.
- आंधळ्याची माळ लावणे – विचार न करता जुन्या परंपरेनुसार वागणे.
- आठवणींचा खंदक असणे – स्मरण शक्तीचा अभाव असणे.
- आढेवेढे घेणे – एकदम तयार न होणे.
- आण घेणे – शपथ घेणे.
- आनंदाला पारावार न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
- आनंद गगनात न मावणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
- आनंदाला सीमा न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
- आनंदाला उधाण येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
- आनंदाचे भरते येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
- आधार देणे – सांभाळ करणे.
- आनंदाने डोळे डबडबणे – डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे.
- आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
- आडवे होणे – निजणे.
- आडून गोळी मारणे – स्वतः पुढाकार न घेता दुस-यांच्या हातून हवे ते काम करवून घेणे.
- आत्मसात करणे – पूर्णपणे माहीत करून घेणे.
- आत्मा जळणे – खूप दुःख होणे.
- आदर सत्कार करणे – मान सन्मान करणे.
- आभाळ पेलणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
- आपुलकी वाटणे – प्रेम व आस्था वाटणे.
- आपत्याच पायावर घाव घालणे – स्वतःच आपले नुकसान करून घेणे.
- आबाळ होणे – दुर्लक्ष होणे, हाल होणे.
- आयत्या पिठावर रेषा (रेघोट्या) ओढणे – आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.
- आयुष्य वेचणे – एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटणे.
- आवळा देऊन कोहळा काढणे – स्वल्प (लहानशी) देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुस-यांकडून मोठे कार्य करून घेणे.
- आश्रय घेणे – मदत घेणे.
- आश्चर्यचकित होणे – आश्चर्याने थक्क होणे.
- आश्चर्याने तोंडात बोट घालणे – फार आश्चर्य वाटणे.
- आवाज लागणे – प्रसंगाला साजेल असा आवाज गळ्यातून येणे.
- आश्वासन देणे – कबूल करणे.
- आमूलाग्र बदलणे – संपूर्णपणे बदलणे.
- आडवे येणे – अडवणे.
- आवाज चढविणे – रागावून खूप मोठ्याने बोलणे.
- आड येणे – अडथळा निर्माण करणे.
- आहुती देणे – प्राण अर्पण करणे.
- आस्वाद घेणे – आनंद लुटणे.
- आव आणणे – खोटा अविर्भाव करणे, उसने अवसात आणणे.
- आसमान ठेंगणे होणे – ताठ्याचा कळस होणे (स्वर्ग दोन बोटे उरणे).
- आळा घालणे – नियम लावून देणे, नियंत्रण ठेवणे.
- आ वासणे – आश्चर्याने तोंड उघडणे.
- आळोखे पिळोखे देणे – आळस झाडणे.
- आळ घालणे – आरोप करणे.
- इंगा जिरणे – गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.
- इंगा दाखविणे – धाक बसविणे, जरब बसविणे.
- इकडचा डोंगर तिकडे करणे – फार मोठे कार्य पार पाडणे.
- इरेला पेटणे – इर्षेने खेळू लागणे.
- इशारा देणे – सावधगिरीची सूचना देणे.
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा