संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 2

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

वाक्यप्रचार व अर्थ

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ

  • आठवण ठेवणे – ध्यानात ठेवणे.
  • आठवणींना उजाळा देणे – जुन्या आठवणी पुन्हा येणे.
  • आहारी जाणे – पूर्णपणे स्वाधीन होणे.
  • आवृत्ती करणे – पुन्हा पुन्हा नाचणे, नाव झळकणे.
  • आडव्यात बोलणे – कोणतीही गोष्ट सरळपणे न बोलणे.
  • आंधळ्याची माळ लावणे – विचार न करता जुन्या परंपरेनुसार वागणे.
  • आठवणींचा खंदक असणे – स्मरण शक्तीचा अभाव असणे.
  • आढेवेढे घेणे – एकदम तयार न होणे.
  • आण घेणे – शपथ घेणे.
  • आनंदाला पारावार न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
  • आनंद गगनात न मावणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
  • आनंदाला सीमा न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
  • आनंदाला उधाण येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
  • आनंदाचे भरते येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
  • आधार देणे – सांभाळ करणे.
  • आनंदाने डोळे डबडबणे – डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे.
  • आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
  • आडवे होणे – निजणे.
  • आडून गोळी मारणे – स्वतः पुढाकार न घेता दुस-यांच्या हातून हवे ते काम करवून घेणे.
  • आत्मसात करणे – पूर्णपणे माहीत करून घेणे.
  • आत्मा जळणे – खूप दुःख होणे.
  • आदर सत्कार करणे – मान सन्मान करणे.
  • आभाळ पेलणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
  • आपुलकी वाटणे – प्रेम व आस्था वाटणे.
  • आपत्याच पायावर घाव घालणे – स्वतःच आपले नुकसान करून घेणे.
  • आबाळ होणे – दुर्लक्ष होणे, हाल होणे.
  • आयत्या पिठावर रेषा (रेघोट्या) ओढणे – आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.
  • आयुष्य वेचणे – एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटणे.
  • आवळा देऊन कोहळा काढणे – स्वल्प (लहानशी) देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुस-यांकडून मोठे कार्य करून घेणे.
  • आश्रय घेणे – मदत घेणे.
  • आश्चर्यचकित होणे – आश्चर्याने थक्क होणे.
  • आश्चर्याने तोंडात बोट घालणे – फार आश्चर्य वाटणे.
  • आवाज लागणे – प्रसंगाला साजेल असा आवाज गळ्यातून येणे.
  • आश्वासन देणे – कबूल करणे.
  • आमूलाग्र बदलणे – संपूर्णपणे बदलणे.
  • आडवे येणे – अडवणे.
  • आवाज चढविणे – रागावून खूप मोठ्याने बोलणे.
  • आड येणे – अडथळा निर्माण करणे.
  • आहुती देणे – प्राण अर्पण करणे.
  • आस्वाद घेणे – आनंद लुटणे.
  • आव आणणे – खोटा अविर्भाव करणे, उसने अवसात आणणे.
  • आसमान ठेंगणे होणे – ताठ्याचा कळस होणे (स्वर्ग दोन बोटे उरणे).
  • आळा घालणे – नियम लावून देणे, नियंत्रण ठेवणे.
  • आ वासणे – आश्चर्याने तोंड उघडणे.
  • आळोखे पिळोखे देणे – आळस झाडणे.
  • आळ घालणे – आरोप करणे.
  • इंगा जिरणे – गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.
  • इंगा दाखविणे – धाक बसविणे, जरब बसविणे.
  • इकडचा डोंगर तिकडे करणे – फार मोठे कार्य पार पाडणे.
  • इरेला पेटणे – इर्षेने खेळू लागणे.
  • इशारा देणे – सावधगिरीची सूचना देणे.

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply