संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 1 2021

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

वाक्यप्रचार व अर्थ

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021
  • अवलंब करणे – स्वीकार करणे, आधार घेणे.
  • अकांड तांडव करणे (आकांड तांडव करणे) – रागाने आदळआपट करणे.
  • अंग चोरणे – अंग रारवून काम करणे.
  • अंग टाकणे – शरीराने कृश होणे, रोडावणे.
  • अक्कल पुढे करणे – बुद्धीचा भलताच उपयोग करणे.
  • अंगावर शेकणे – मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.
  • अंगाचा तीळपापड होणे – अतिशय संताप येणे.
  • अंगाची लाही लाही होणे – क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.
  • अंगावर मूठभर मांस चढणे – धन्यता वाटणे.
  • अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) -भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
  • अग्निदिव्य करणे – कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.
  • अंगवळणी पडणे – सवय होणे.
  • अंगावर मास नसणे – कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.
  • अंग शहारून टाकणे – अंगावर रोमांच उभे राहणे.
  • अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) – अवघडून बसणे.
  • अंगीकारणे – स्वीकारणे.
  • अंगाचा खुर्दा होणे – शरीराला त्रास होणे.
  • अंगावर घेणे – एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.
  • अंगाचे पाणी पाणी होणे – घाम येणे.
  • अंग मोडून काम करणे – खूप मेहनत करणे.
  • अंग काढून घेणे (अंग काढणे) – अलिप्त राहणे, संबंध तोडणे.
  • अंगाचा भडका उडणे – क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.
  • अंतर देणे – सोडून देणे, त्याग करणे.
  • अंग झाडून मोकळे होणे – संबंध तोडणे.
  • अंगात त्राण नसणे – अंगातील शक्ती नाहीशी होणे.
  • अंगाने चांगला आडवा असणे – सशक्त असणे.
  • अंगात कापरे सुटणे – भीतीने थरथरणे.
  • अंगावर धावून येणे – मारावयास येणे.
  • अंगावर तुटून पडणे – जोराचा हल्ला करणे.
  • अटकेपार झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम गाजविणे.
  • अटीतटीने खेळणे – चुरशीने खेळणे.
  • अठरा विश्वे दारिद्र्य असणे – अतिशय गरिबी असणे.
  • अडकित्त्यात सापडणे – पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.
  • अडचणींचा डोंगर असणे – अनेक अडचणी येणे.
  • अवाक्षर न काढणे – एकही अक्षर न बोलणे.
  • अंतःकरण भरून येणे – हृदयात भावना दाटून येणे, भावनानी गहिवरून येणे.
  • अनुमती विचारणे – परवानगी मागणे.
  • अंतःकरणाला पाझर फुटणे (अंतःकरण विरघळणे) – दया येणे.
  • अंतःकरण तीळतीळ तुटणे – अतिशय वाईट वाटणे.
  • अंतःकरण विदीर्ण होणे – अतिशय दुःख होणे.
  • अंतःकरणाचा कोठा साफ असणे – मन स्वच्छ असणे.
  • अंतरीचा तळीराम गार होणे – इच्छा तृप्त होणे.
  • अंतर्मुख होणे – खोलवर विचार करणे.
  • अंतर्धान पावणे – नाहीसे होणे.
  • अंकित राहणे – गुलाम होणे, वश होणे.
  • अंत पाहणे – अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे.
  • अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीच्या मानाने खर्च करणे.
  • अत्तराचे दिवे जाळणे – भरपूर उधळपट्टी करणे.
  • अद्वा तद्वा बोलणे – एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे.
  • अन्नास जागणे – उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.
  • अनर्थ गुदरणे (ओढवणे) – भयंकर संकट येणे.
  • अनावर होणे – भावविवश होणे.
  • अन्नास मोताद होणे – उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.
  • अवगत असणे – ठाऊक असणे.
  • अन्नावर तुटून पडणे – खूप भूक लागल्याने भराभर जेवणे.
  • अन्नास लावणे – उपजीविकेचे साधन मिळवून देणे.
  • अदृश्य होणे – लुप्त होणे, नाहीसे होणे.
  • अनुमताने चालणे – संमतीने वागणे.
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे – थोड्याशा यशानेच गर्व करणे.
  • अवदसा आठवणे – वाईट बुद्धी सुचणे.
  • अवगत होणे – प्राप्त होणे.
  • अवहेलना करणे – दुर्लक्ष करणे, अपमान करणे.
  • अवाक् होणे – स्तब्ध होणे.
  • अळम टळम करणे – टाळाटाळ करणे.
  • अपराध पोटात घालणे – क्षमा करणे.
  • अपाय करणे – नुकसान करणे.
  • अभंग राहणे – भंग न होणे.
  • अंमल बनावणी करणे – अंमलात आणणे.
  • अभय देणे – सुरक्षितपणाची हमी देणे.
  • अभिवादन करणे – वंदन करणे.
  • अर्पण करणे – वाहणे.
  • अवसान चढणे – स्फुरण चढणे.
  • अनुग्रह करणे – उपकार करणे, कृपा करणे.
  • अधःपात होणे – विनाश होणे.
  • अवलोकन करणे – निरीक्षण करणे, पाहणे.
  • अवकळा येणे – वाईट अवस्था येणे.
  • अडकित्यात धरणे – अडचणीत टाकणे.
  • अद्दल घडणे – शिक्षा मिळणे.
  • अक्षत देणे – बोलावणे.
  • अक्षता पडणे – विवाह उरकणे.
  • अन्न अन्न करणे – अन्नासाठी फिरणे.
  • अवतार संपणे – मारणे, स्थित्यंतर होणे.
  • अळवावरचे पाणी – क्षणभंगूर.
  • अमर होणे – कायमची कीर्ती प्राप्त होणे.
  • अनिमिषपणे पाहणे – टक लावून पाहणे.
  • अस्वस्थता शिगेला जाणे – अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे.
  • अग्निदिव्य करणे – प्राणांतिक संकटातून जाणे.
  • अति परिचयात अवज्ञा – एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे.
  • अरेरावी करणे – मग्रुरीने वागणे.
  • अनुलक्षून असणे – एखाद्याला उद्देशून असणे.
  • अगतिक होणे – उपाय न चालणे, निरुपाय होणे.
  • अतिप्रसंग करणे – अयोग्य वर्तन करणे.
  • अति तेथे माती होणे – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे.
  • आकाश कोसळणे – (आभाळ कोसळणे) फार मोठे संकट येणे.
  • आकाश ठेंगणे होणे – अतिशय गर्व होणे, गर्वाने फार फुगून जाणे.
  • आकाश पाताळ एक करणे – आरडाओरड करुन गोंधळ घालणे.
  • आकाश फाटणे – चारही बाजूंनी संकटे येणे.
  • आक्रोश करणे – शोक करणे.
  • आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
  • आकर्षक असणे – मोह असणे.
  • आकृष्ट होणे – आकर्षित होणे.
  • आकाशमातीचे संवाद होणे – श्रेष्ठ कनिष्ठ एकत्र येणे.
  • आखाड्यात उतरणे – विरोधकांशी सामना देण्यास तयार होणे.
  • आगीत तेल ओतणे – अगोदर झालेल्या भांडणात भर घालणे, भांडण विकोपाला जाईल असे करणे.
  • आगीतून निघून फोफाट्यात जाणे – लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.
  • आघाडीवर असणे – मुख्य व महत्त्वाचे असे गणले जाणे, पुढे असणे.
  • आच लागणे – झळ लागणे.
  • आचरणात आणणे – अमलात आणणे.
  • आक्रमण करणे – हल्ला करणे.
  • आकांत करणे – आरडाओरड करणे.
  • आकाशाचा ठाव घेणे – असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करणे.
  • आर्जवे करणे – पुन्हा पुन्हा विनविणे.
  • आग पाडणे – चहाड्या सांगून नाशास कारण होणे.

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply