MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 11-संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 11- संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
MPSC संपूर्ण मराठी वाक्यप्रचार व अर्थ 11
जिवावर येणे – नकोसे वाटणे.
जिवात जीव असणे – जिवंत असणे, शरीरात प्राण असणे.
जिवावर उड्या मारणे – दुस-यावर अवलंबून राहून चैन करणे.
जीव अधीर होणे – उतावीळ होणे.
जिवाचा हिय्या करणे – हिम्मत बांधणे.
जीव की प्राण असणे – प्राणाइतके प्रिय असणे.
जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे.
जीव खालीवर होणे – अतिशय काळजी वाटणे, अत्यंत अस्वस्थ वाटणे.
जीव गहाण ठेवणे – कोणत्याही त्यागास तयार असणे, सर्वस्व अर्पण करणे.
जीव घेऊन पळणे – प्राणाच्या रक्षणासाठी पळणे.
जीव टांगणीला लागणे – चिंताग्रस्त होणे, अतिशय काळजी वाटणे.
जीव तीळतीळ तुरणे – एखाद्या गोष्टीसाठी तळमळणे, खूप हळहळ वाटणे.
जीव धोक्यात घालणे – संकटात उडी घेणे.
जीव थोडा थोडा होणे – अतिशय काळजी वाटणे.
जीव असणे – प्रेम असणे.
जीव मेटाकुटीस येणे – त्रासाने अगदी कंटाळून जाणे.
जीव भांड्यात पडणे – काळजी दूर होणे.
जीवदान देणे – वाचविणे.
जीवनज्योत विझणे – मरण पावणे, आयुष्य संपणे.
जीव पाण्यात पडणे – शांत होणे.
जीव ओतणे – मनापासून एखादे काम करणे.
जीव कासावीस होणे – जीव तळमळणे.
जीव लावणे – लळा लावणे.
जीवन सर्वस्व देणे – संपूर्ण आयुष्य अर्पण करणे.
जीव अर्धा होणे – भयभीत होणे.
जीव झाडामाडात असणे – झाडामाडाविषयी विलक्षण जिव्हाळा वाटणे.
जीव कानात गोळा करणे – सर्व शक्ती कानात केंद्रित करून ऐकणे.
जीव अधीर होणे – उतावीळ होणे.
जीव ओवाळून टाळणे – अतिशय प्रेम करणे.
जीव गोळा होणे – कासावीस होणे.
जीव नकोसा होणे – त्रासणे, कंटाळून जाणे.
जीव मुठीत घेणे – अंतःकरण धडधडत असणे.
जीभ लांब करून बोलणे – वरिष्ठांशी मर्यादेच्या बाहेर बोलणे.
जीभ चावणे (पाघळणे) – एखादी गोष्ट बोलायची नसताना बोलून जाणे.
जेरीस आणणे – शरण यायला भाग पाडणे.
जेवणावर हात मारणे – भरपूर जेवणे.
जोडे फाटणे – खेटे घालणे.
जेर करणे – कैद करणे.
जो जो करणे – निजविणे.
जोखडात बांधणे – बंधनात बांधणे.
जोम येणे – शक्ती येणे.
जोपासना करणे – काळजीपूर्वक संगोपन करणे.
ज्योत पेटवणे – भावना चेतावणे.
ज्योतीसम जीवन जगणे – हुतात्मे स्वतः नष्ट होतात व दुस-यांचे कल्याण साधतात तसे करणे.
झडप घालणे – अचानक उडी मारणे.
झळ लागणे (पोहोचणे) – एखाद्या गोष्टीचा थोडाफार परिणाम भोगावा लागणे.
झटापट करणे – झगडणे.
झाडून नेणे – जवळ असलेले सर्व नेणे.
झाडा घेणे- बारकाईने तपासणे
झाडा देणे – परिणाम भोगणे
झील चढणे- मोठेपणा येणे
झील ओढणे – साथ करणे
झिंग चढणे – नशा चढणे.
झक मारणे – मूर्खपणा करणे.
झक मारीत करणे – इच्छा असो नसो करणे.
झुलत ठेवणे – काही निर्णय न घेता अडकवून ठेवणे.
झुंजूमुंजू होणे – उजाडणे.