संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 6-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 6
- काडीने औषध लावणे – दुरून दुरून दुस-याचे उपयोगी पडणे.
- काहूर माजणे – विचारांचा गोंधळ होणे.
- किमया करणे – जादू करणे.
- कित्ता गिरविणे – अनुकरण करणे.
- किळस वाटणे – शिसारी वाटणे.
- किल्ली फिरविणे – युक्तीने मन बदलणे.
- किडून घोळ होणे – कीड लागल्यामुळे खराब होणे.
- किंतु येणे – संशय वाटणे.
- कीस काढणे – बारकाईने चर्चा करणे.
- कुंपणाने शेत खाणे – विश्वासातील माणसाने फसविणे, रक्षणकर्त्याने भक्षण करणे.
- कुत्र्याच्या मोलाने मरणे – मरताना माणूस म्हणून काहीही किंमत न राहणे.
- कुर्बानी करणे – बलिदान करणे.
- कुजत पडणे – आहे त्या स्थितिपेक्षा अधिक वाईट अवस्था प्राप्त होणे.
- कुजबूज करणे – आपापसात हळूहळू बोलणे.
- कुकारा घालणे – मोठ्याने हाक मारणे.
- कुत्रा हाल न खाणे – अतिशय वाईट स्थिती येणे.
- कुत्र्यासारखे मळा धरून पडणे – घरातील कटकटींना कंटाळून सारखे घराबाहेर राहणे.
- कुरघोडी करणे – वर्चस्व स्थापित करणे.
- कुंद होणे – उदास होणे.
- कुरुक्षेत्र माजविणे – भांडण तंटे करणे.
- कुणकुण लागणे – चाहूल लागणे.
- कुरापत काढणे – भांडण उकरून काढणे.
- कुस धन्य करणे – जन्म दिल्याबद्दल सार्थक वाटणे.
- कूच करणे – पुढे जाणे, कामगिरीवर निघणे.
- केसाने गळा कापणे – विश्वासघात करणे.
- केसालाही धक्का न लावणे – अजिबात त्रास न होणे.
- केसांच्या अंबाड्या होणे – वृद्धावस्था येणे.
- क्लेश पडणे – यातना सहन कराव्या लागणे.
- कोणाच्या अध्यांत मध्यांत नसणे – कोणाच्या कामात विनाकारण भाग न घेणे.
- कोंडीत पकडणे – पेचात सापडणे.
- कोड पुरविणे – कौतुकाने हौस पुरविणे.
- कोरड पडणे – सुकून जाणे.
- कोंड्याचा मांडा करणे – काटकसरीने संसार करणे.
- कोलाहल माजणे – आरडाओरड होणे.
- कोप-यापासून हात जोडणे – संबंध न यावा अशी इच्छा करणे.
- कोंडी फोडणे – वेढा तोडून बाहेर जाणे.
- कोपर्याने खणणे – एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे.
- कोंडमारा होणे – मन अस्वस्थ होणे.
- कोंबडे झुंजविणे – दुस-यांचे भांडण लावून आपण मजा बघणे.
- कोप-यात घेणे – एका टोकाला घेऊन कोंडी करणे.
- कोणाचा पायपोस कोणाचे पायात नसणे – मोठा गोंधळ होणे.
- कौशल्य पणास लावणे – अतिशय चतुराईने काम करणे.
- कौतुक करणे – तारीफ करणे.
- खच्चून जाणे – धीर सुटणे.
- खर्ची पडणे – वापरावी लागणे.
- खच्चून भरणे – पूर्णपणे भरणे.
- खनपटीस बसणे – सारखे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.
- खटू होणे – नाराज होणे.
- खटपट करणे – प्रयत्न करणे.
- खजील होणे – लाज वाटणे.
- खडा पहारा होणे – काळजीपूर्वक करणे.
- खडसून विचारणे – ताकीद देऊन विचारणे.
- खंड नसणे – सतत चालू राहणे.
- खंड पडणे – मध्येच काही काळ बंद असणे.
- खंत वाटणे – खेद वा दुःख वाटणे.
- खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे.
- खटाटोप चालविणे – प्रयत्न करणे.
- खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे, पराभव करणे.
- खल करणे – खोलवर चर्चा करणे.
- खबर नसणे – माहिम नसणे.
- खस्ता स्थाणे – खूप कष्ट करणे.
- खड्यासारखा बाहेर पडणे – निरूपयोगी ठरून वगळला जाणे.
- खसखस पिकणे – खूप हसणे.
- खडे फोडणे – दूषण देणे.
- खर्ची पडणे – लढाईत मृत्युमुखी पडणे.
- खळखळ करणे – हट्ट करणे.
- खरवड काढणे – कान उघडणी करणे.
- खरपूस ताकीद करणे – निक्षून सांगणे.
- खडी ताजीम देणे – उभे राहून शिस्तीने मानवंदना देणे.
- खरडपट्टी काढणे – रागावून बोलणे.
- खाल्ल्या मिठाला जागणे – उपकाराची जाणीव ठेवणे.
- खाजवून खरुज काढणे – मुद्दाम भांडण उकरून काढणे.
- खांदा देऊन काम करणे – झटून काम करणे.
- खापर फोडणे – दोष देणे.
- खायला काळ अन् भुईत्या भार असणे – स्वतः काही ही काम नकरता दुस-यावर भार होऊन राहणे.
- खायला उठणे – असह्य होणे.
- खूणगाठ बांधणे – पक्के ध्यानात ठेवणे.
- खो घालणे – अडचण आणणे, विघ्न निर्माण करणे.
- ख्याली-खुशाली विचारणे – हालहवाल विचारणे.
- खो खो हसणे – हसू न आवरणे, जोर जोराने हसणे.
- खोर्याने पैसे ओढणे – पुष्कळ पैसे मिळविणे.
- खोड मोडणे – एखाद्याची वाईट सवय तीव्र उपायाने घालविणे.
- खोड ठेवणे – दोष ठेवणे.
- ‘ग’ ची बाधा होणे – गर्व होणे.
- गजर करणे – एकाच तालात सर्वांनी एकदम जयजयकार करणे.
- गणना करणे – समाविष्ट करणे.
- गढून जाणे – रंगून जाणे.
- गंगार्पण करणे – कायमचे विसरणे.
- गाणित पक्के बसणे – ठाम समजूत होणे.
- गतप्राण होणे – मरणे.
- गर्क असणे – गुंग असणे.
- गर्क होणे – गढून जाणे.
- गळ घालणे – आग्रह करणे.
- गळ्यात पडणे – अतिशय आग्रह करणे.
- गंगेत घोडे न्हाणे – एखादे मोठे काम पूर्ण होणे.
- गहिवरून जाणे – दुःखाने कंठ दाटून येणे.
- गयावया करणे – दीनवाणी प्रार्थना करणे, विनवणी करणे.
- गडप होणे – नाहीसे होणे.
- गटांगळ्या खाणे – नाकातोंडात पाणी जाऊन जीव घाबरा होणे.