संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 19

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 19 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 19

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 19

  • लहानाचे लहान सोयरे  – प्रत्येकाची मिळकत त्याच्या कुवतीप्रमाणे असते 
  • लाखोश्री आणि भिकेश्री एकच  – मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच 
  • लांडगा आला भेटीला कुत्रा गेला गावाला  – पाहुण्यांची परस्पर बोळवण करणे 
  • लाभ ना नफा,  रिकामा थका – ज्यात लाभ नाही अशी व्यर्थ खटपट 
  • लेकरू व बाळ वाजवितो टाळ – ज्याच्या घरी मुलेबाळे असतात त्यांना फुरसत मिळत असते 
  • लेक असली तरी परघरी जाणारी  – स्वतःची असून स्वतःच्या कामी न पडणारी वस्तू 
  • लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार  – लीनताधरली तर सारे मिळते. दंडेलीने काय मिळणारे 
  • लोकांचे तट्टू किती मी नटू  – उठण्या वस्तूवर ऐट करणे 
  • लोकांचे शिकले वडगाव विकले  – लोकांच्या नादी लागून भलतीच गोष्ट करणे 
  • लोभ लचकला नी डोळा पिचकला  – कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागतात 
  • लोभी धनी सज्जनाला अवमानी  – लोभी माणसाला स्वतःच्या स्वार्था शिवाय  काहीच दिसत नाही 
  • लष्कराच्या भाकरी भाजणे  – बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे 
  • वळणाचे पाणी वळणावर जाणे – निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार
  • वरातीमागून घोडे -योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे
  • वारा पाहून पाठ फिरविणे -परिस्थिती पाहून वर्तन करणे
  • वाहत्या गंगेत हात  धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे – सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे
  • वासरात लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो
  • वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच – वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर –      गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे
  • विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो
  • विचाराची तूट तेथे भाषणाला उत – मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते
  • विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी –   विश्वासघात करणे
  • वडाची साल पिंपळाला  –  ज्यांचा एकमेकांशी संबंध नाही, अशा गोष्टी एकत्र जुळविणे.
  • विनाशकाले विपरीत बुद्धी  – संकटकाळात बुद्धीही भलत्याच गोष्टीकडे वळणे
  • वाघाच्या घरी शेळी पाहुनी  – चांगली व्यक्ति वाईट माणसाच्या तावडीत सापडणे 
  • वड्याचे तेल वांग्यावर  – एकाचा राग दुसर्‍या वर काढणे 
  • वेसन घालणे  – मर्यादा घालणे 
  • वरच्यास हात खालच्यास हात – वरिष्ठांपुढे नम्र पण कनिष्टां पुढे कठोर 
  • वरच्या देवाची तुटली दोरी खालचे देव बोंबा मारी  – जेथे मोठमोठ्या लोकांचे चालत नाही तेथे गरिबांची काय दाद लागणार 
  • वरवर माया उपाशी नीज बया – केवळ वरवर प्रेम 
  • वाकडे मेंढीस वाकडेच नेम  – जशास तसे 
  • वार्‍याला बांधून ठेवता येत नाही  – भटके लोक एका ठिकाणी स्थिर होत नाही 
  • वाटेला नाही फाटा, तर वाटे हेलपाटा  – सरळ रस्ता कंटाळवाणा वाटत असतो 
  • वारा गेला, पाऊस गेला – एकामुळे दुसरी गोष्ट घडली 
  • वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ  – कोणत्याही वेळी मंगल दायक वस्तू 
  • वाहील त्याची शेती  – कष्ट करेल त्याचाच उद्योग 
  • वाकळाची दोरी शिक्षा झाली दरबारी  – क्षुल्लक अपराधाला मोठी शिक्षा 
  • विद्या सर्वत्र पूज्यते  – विद्येस सर्वत्र मान मिळतो 
  • विनाशकाले  विपरीत बुद्धी- वाईट होण्याची वेळ आली म्हणजे त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी आपोआपच होते 
  • विळ्याविणे हाता, जाऊ नका शेता – हाती विळा घेतल्याशिवाय शेतात जाऊ नये 
  • वेताळाच्या मागे भुतावळ  – जसा पुढारी तसा अनुयायी 
  • वेळ ना वखत,  गाढव गेले भुंकत- मनुष्य वेळी, अवेळी ओरडत असतो 
  • वेळ ना वारी गाढव आले घरी  – मूर्ख मनुष्यास योग्य अयोग्य प्रसंग कळत नाही 
  • व्यक्ति तितक्या प्रवृत्ती  – जितकी माणसे तितके त्यांचे स्वाभाव
  • वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही  – सरळ मार्गाने काम होत नाही म्हणून तरी वाकड्या मार्गाचा अवलंब करावाच लागतो 
  • व्याप तितका संताप  – कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी जास्त असते 
  • वाघ म्हटले तर खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच  – वाघाला वाघ म्हटले काय वाघोबा म्हटले काय किंवा वाघ्या म्हटले काय तो आपल्या गुणधर्माप्रमाणे वागणार 
  • शहाण्याला शब्दाचा मार – शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते
  • शितावरून भाताची परीक्षा-      वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती
  • शेरास सव्वाशेर -चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे
  • शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? -शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही
  • शेजीबाईची कढी, धावधाव वाढी – एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे
  • शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी -चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात
  • शक्तीपेक्षा युक्ती बरी – शक्तीने काम करण्यापेक्षा युक्तीने काम करणे अधिक चांगले.
  • शेंबूड आपल्या नाकाला नाव पाडू लोकाला- दोष आपल्या अंगी असून दुसर्‍याला दोष देणे 
  • शेंडी तुटो की पारंबी तुटो  – पक्का निश्चय करणे 
  • शक्ती तेथे भक्ती  – थोर लोकांच्या भजनी लोक लागतात 
  • शब्दांचा सिंधू व एकलेचा एक बिंदू  – अर्थहीन वाचाळपणा 
  • शंभर नंबरी सोने  – पूर्ण गुण असलेली व्यक्ती 
  • शरम करी नरम आणि भरम करी गरम – मनुष्य लज्जेने नम्र होतो व भ्रमाने रागावतो 

शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेढे  – शहाण्या कडून झालेला अपमान पत्करावा पण मूर्खां कडून होणारा सन्मान नको 

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply