संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18

  • यथा राजा तथा प्रजा – सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात
  • या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे – बनवाबनवी करणे
  • येरे माझ्या मागल्या – ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे
  • ये रे कुत्र्या खा माझा पाय – आपण होऊन संकट ओढवून घेणे
  • यथाअनुष्ठान, तथा सिद्धी – जशी खटपट तसे फळ 
  • यथा गुरू तथा शिष्य  – गुरू तसा चेला 
  • याचि देही याचि डोळा  – आपल्या हयातीतच 
  • याची पागोटी त्याच्या डोक्यावर  – एखादी वस्तू दुसर्‍यास देऊन व्यवहार चालविणे 
  • याचे दार, त्याचे दार, उठ मेल्या खेटर मार- दुसर्‍याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे 
  • येगे कळा बस माझ्या नळा – भांडण उकरून काढणे 
  • येरे गोट्या पड माझ्या पाया  – जाणूनबुजून एखादे संकट ओढवून घेणे 
  • येरे उंबरा पड तोंडात  – दैवावर विसंबून राहणे 
  • येथे कोणाची डाळ शिजत नाही  – येथे कोणाचे काही चालत नाही 
  • यत्न तो देव जाणावा  – प्रयत्न करणे श्रेष्ठत्वाचे असते 
  • रंग जाणे रंगारी- ज्याची विद्या त्यालाच माहीत
  • रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर पण वेळ थोडा असणे
  • रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार      – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे
  • रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत – मुख्य गोष्टीचा अभाव
  • राईचा पर्वत करणे- मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे
  • राज्याचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची
  • रोज मरे त्याला कोण रडे – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही
  • रिकामे मन सैतानाचे घर –  मन रिकामे असले, की कुविचार त्यात थैमान घालतात.
  • रंग झाला काळा अजून नाही गेला चाळा  – म्हातारपण आले तरी रंगेलपणा गेला नाही 
  • रडत राऊत, काय चालवित औत- ज्या माणसाला दुसर्‍याच्या आधाराशिवाय चालता येत नाही तो शेती कसा करेल 
  • राजाला दिवाळी काय माहीत  – रोजच्या गोष्टीचे नावीन्य वाटत नाही 
  • रक्ताचे पाणी सुखाची कहाणी  – कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही 
  • रत्नापोटी गारगोटी – उत्तम मनुष्याची कूलक्षणी संतती 
  • रवी अरुण न्याय   – सूर्याच्या आधी अरुणोदय होतो 
  • रस्ता चुकले की दुप्पट चालावे लागते  – सरळ मार्गाने काम न केल्यास फार त्रास होतो 
  • राईचा पर्वत केला,संतोष झाला मूर्खाला  – मूर्ख मनुष्यास गोष्टी फुगवून सांगण्यात नेहमी आनंद वाटतो 
  • राईचा भाव रात्री गेला  – नेहमी सारखीच परिस्थिती नसते 
  • राखशील ओज तर होईल चीज- काहो तेज दाखविल्यासच कौतुक होते 
  • राखेल त्याचे घर, खनेल त्याचे शेत  – जो काळजीपूर्वक श्रम करतो त्यालाच लाभ होतो 
  • रागाची स्वारी आश्वाच्या पाठीवर  – राग फार काळ टिकत नाही 
  • राजापासून रंकापर्यंत – श्रीमंतापासून गरिबापर्यंत 
  • राजा बोले दळ हाले  – राजाच्या हुकमा प्रमाणे कारभार चालतो 
  • रात्री खाती तूप सकाळी पाहते रूप  – अतिशय उतावीळपणा 
  • रांधवे तसे जेवावे  – जशी कृती तसे फळ 
  • रानडुक्करासारखी मुसंडी  – सरळ सरळ हल्ला 
  • राव राबतात, देव कापतात  – जो श्रम करतो त्याला देव सुद्धा भितो 
  • राव गेले रणी आणि भागूबाईची पर्वणी  – मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत शूद्र माणसे आपली शान दाखवतात 
  • राहायला सावली,खायला पायली  – राहण्यास चांगले घर, खायला चांगली भाकर 
  • रिकामा काम करी, सांज सकाळ फेरी  – काम नसेल की माणूस विनाकारण खेपा घालतो 
  • रुचेल ते बोलावे पचेल ते खावे  – योग्य तेच बोलावे व अपचन होणार नाही तेवढेच खावे
  • रोम एका दिवसात बांधले गेले नाही- कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो एकदमच काही होत नाही 
  • लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस – मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्‍या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे
  • लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही
  • लग्नाला गेली आणि बारशाला आली      – अतिशय उशिराने पोहोचणे
  • लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो
  • लाज नाही मला कोणी काही म्हणा –       निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही
  • लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
  • लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण – लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही
  • लहान तोंडी मोठा घास  – आपल्या योग्यतेपेक्षा अवघड काम हाती घेणे.
  • लाथ मारीन तेथे पाणी काढीन  – स्वतः च्या क्षमतेवर विश्वास असणे 
  • लवण तेथे जीवन  – जेथे मीठ तेथे पाणी 
  • लहान मूर्ती पण थोर कीर्ती  – शारीरिक दृष्टीने कित्येक लहान दिसतात परंतु त्यांची कर्तृत्वशक्ती महान असते  

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply