संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 9 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 9
घरात नाही तीळ पण माशांना देतो पीळ – ऐपत नसताना ऐट मारणे
घराला नाही कौल, रिकामा डौल – घरात गरिबी पण रिकामीच ऐट
घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे – स्वतः चा खर्च कमी करून इतरांची कामे करणे
घरासारखा गुण सासू तशी सून – लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात
घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी – भलेही ईश्वर आमच्यापासून दूर असेल;परंतु त्याचे लक्ष आमच्यावर आहे
घोडी मेली ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाट्याने – आई काम करून थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरून फिरून थकून जाते
घोड्यावर हौदा ,हत्तीवर खोगीर – एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग
घडाईत परीस मढाईच जास्त – बनवण्यापेक्षा दुरुस्तीचाच खर्च
चढेल तो पडेल – गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही- लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ – मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
चिंती परा येई घरा – दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
चोर सोडून संन्याशाला फाशी – खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
चोराच्या उलटया बोंबा – स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे.
चोराच्या मनात चांदणे – वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे.
चोराच्या हातची लंगोटी – ज्यांच्याकडून काही मिळण्याची आशा असते त्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे
चोराची पाउले चोरालाच ठाऊक- वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात
चोरीचा मामला हळू हळू बोंबला – पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायच
चोराला सुटका आणि सावाला फटका – चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे
चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालेल – ज्याच्याजवळ सर्वकाही आहे त्याला मदत करायला कोणीही तयार असते
जळत्या घराचा पोळता वासा – प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला – निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
जळत घर भाड्याने कोण घेणार – नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे – दुसर्याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे.
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट – जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा