संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 8

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 8 Marathi Mhani ani Wakprachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shbdsangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 8

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 8

  • गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
  • गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता – मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
  • गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
  • गाढवाच्या पाठीवर गोणी – एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
  • गाढवाला गुळाची चव काय  – मठ्ठ पारख्याला रत्नाची परीक्षा कशी काय करता येईल 
  • गुरुची विद्या गुरूला फळली – एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
  • गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य – ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
  • गोगलगाय नि पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
  • गोरागोमटा कपाळ करंटा – दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
  • गोष्ट लहान सांगन महान  – क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो  करणे 
  • गोष्टी गोष्टी अन् मेला कोष्टी  – लांबलचक गोष्ट करत बसला तर मूळ कामधंदा बाजूला राहतो व नुकसान होते 
  • गरिबी हरिबी काही हातची नाही  – काळ काही आपल्या हातचा नाही 
  • गरिबांनं खपावं धनिकानं खावं  – गरिबांने कष्टा करावे आणि श्रीमंतान माल खावा 
  • गोफन गेली तिकडे,  गोटा पडला इकडे  – कोणत्याही कामात ताळमेळ नसणे 
  • गरिबाच्या दाराला सवकाराची कडी  – गरीबां वर सवकाराचा अंमल 
  • गवत्या बसला जेवया आणि ताकासंगे शेवया  – अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा उपयोग करू शकत नाही 
  • गळी नाही सरी ,सुखी निद्रा करी  – ज्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतात तिला सुखाने झोप लागते 
  • गळ्यातले तुटले ओटीत पडले  – कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ ठेवणे 
  • गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य  – अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते 
  • घर ना दार देवळी बिर्‍हाड – बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
  • घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
  • घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे – स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.
  • घर पहावे बांधून लग्न पहावे करून – अनुभवाने माणूस शहाणा होतो.
  • घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते – आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
  • घरोघरी मातीच्याच चुली – सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
  • घोडे खाई भाडे – धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
  • घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
  • घर साकड आणि बाईल भाकड  – घर भिकार आणि बायको कुरूप 
  • घराची ओळख आंगण सांगते  – घरात किती टापटीप आहे हे त्याच्या अंगणावरुनच समजते 
  • घे सुरी आणि घाल उरी  – फाजील उत्सुकता दाखविणे 
  • घुगर्‍या मूठभर सारी रात भरभर – कमाई थोडी पण खर्चच फार 

Free Job Alert App

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply