संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ
- इन्कार करणे – नकार देणे.
- इरेस पडणे – एखादी गोष्ट करण्याची जिद्द असणे.
- इरेस चढणे- चुरस लागून पुढे सरसावणे
- इतिश्री करणे – शेवट करणे.
- इमानास जागणे – इमान कायम ठेवणे.
- इकडचे तोंड तिकडे करून टाकणे – अतिशय जोराने थोबाडात मारणे.
- इंगळ्या डसणे – मनाला झोंबणे, वेदना होणे.
- इहलोक सोडणे – मरणे.
- इनमीन साडेतीन – थोडेसे, नगण्य.
- इकडचा तिकडचा- नाना ठिकाणचा
- इजा बिजा तिजा – एकामागून एक असे तीनवेळा
- उकळी फुटणे – खूप आनंद होणे.
- उखळ पांढरे होणे – खूप द्रव्य मिळणे.
- उखाळ्या पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे.
- उघडा पडणे – खरे स्वरूप प्रकट होणे.
- उचल खाणे – एखादी गोष्ट करण्याची अनिवार इच्छा होणे.
- उचल बांगडी करणे – जबरदस्तीने हलविणे.
- उच्चाटन करणे – घालवून देणे, नष्ट करणे.
- उच्छाद मांडणे – उपद्रव देणे.
- उचंबळून येणे – भावना तीव्र होणे.
- उजाड माळरान – ओसाड जमीन.
- उजेड पडणे – मोठे कृत्य करणे.
- उल्लेख करणे – उच्चार करणे, सांगणे.
- उंटावरून शेळ्या हाकणे – मनापासून काम न करणे.
- उठून दिसणे – शोभून दिसणे, नजरेत भरणे.
- उत्तेजन देणे – पाठिंबा देणे.
- उतराई होणे – उपकार फेडणे.
- उत्तीर्ण होणे – यशस्वी होणे.
- उत्कंठा असणे – उत्सुक असणे.
- उदक सोडणे – त्याग करणे.
- उदरी शनी येणे – संपत्तीचा लाभ होणे.
- उदास वाटणे – फार खिन्न वाटणे.
- उद्धार करणे – प्रगती करणे.
- उधाण येणे – चेव येणे, ओसंडून वाहणे, भरती येणे.
- उध्वस्त होणे – नाश पावणे.
- उधळून देणे – पसरून देणे.
- उन्मळून पडणे – मुळासकट कोसळून पडणे.
- उन्हाची लाही फुटणे (उन्हाचा जाळ पेटणे) – अतिशय कडक ऊन पडणे.
- उद्योगात चूर होणे – कामात गुंग असणे, मग्न असणे.
- उतू जाणे – कल्पनेपेक्षाही अधिक असणे.
- उपासना करणे – पूजा करणे, आराधना करणे.
- उपसर्ग होणे – त्रास होणे.
- उपपादन करणे – बाजू मांडणे.
- उपद्व्याप करणे – खूप त्रास सहन करणे.
- उपदेशाचा डोस पाजणे – उपदेश करणे.
- उंबरठा चढणे – प्रवेश करणे.
- उबगणे – कंटाळा येणे.
- उमाळा येणे – तीव्र इच्छा होणे.
- उमज पडणे – समजणे.
- उभ्या उभ्या चक्कर टाकणे – सहज जाऊन पाहून येणे.
- उरकून घेणे – पार पाडणे.
- उराशी बाळगणे – अंतःकरणात जतन करून ठेवणे.
- उरापोटावर बाळगणे – सांभाळ करणे.
- उरस्फोड करणे – काळीज फाटेपर्यंत कष्ट करणे.
- उरी फुटणे – अतिशय दुःख होणे.
- उरकून घेणे – आटोपणे, संपवणे.
- उलगडा होणे – अगदी स्पष्टपणे समजणे.
- उलटी अंबारी हाती येणे – भीक मागण्याची पाळी येणे.
- उष्ट्या हाताने कावळा न हाकणे – कधी कोणाला काहीही मदत न करणे.
- उसळी घेणे – जोराने वर येणे.
- उसासा सोडणे – विश्वास सोडणे.