स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-15 2022- स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-15 2022 -MPSC स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha (Mpsc) vakyaprachar va tyanche artha 2022-Spardha pariksha marathi vkyakran 2022
तोंड करणे – रागावणे.
तोंडघशी पाडणे – फशी पडणे, जाळ्यात अडकणे, विश्वासघात करणे.
तोंड उतरणे – तोंड निस्तेज दिसणे.
तोंड उजळ करणे – कलंक काढून टाकणे, कीर्ती मिळविणे.
तोंड आंबट करणे – निराशेमुळे तोंड वाईट करणे.
तोंड पसरणे – याचना करणे.
तोंड पूजा करणे – खोटी स्तुती करणे.
थयथय नाचणे – अधीरपणे नाचणे.
थक्क होणे – आश्चर्य वाटणे, चकित होणे.
थंडा फराळ करणे – काही न खाता राहणे.
थांग न लागणे – कल्पना न येणे.
थुंकी झेलणे – हांजी हांजी करणे, सुशामत करणे.
थेर करणे – वाईट गोष्ट करणे.
थैमान घालणे – आरडाओरड करणे.
थोपवून धरणे – थांबवून ठेवणे.
थोबाड रंगविणे – तोंडात मारणे.
थोतांड निर्माण करणे – लबाडीने खोट्या गोष्टी करणे.
थोबाड फोडणे – तोंडात मारणे.
दंडवत घालणे – नमस्कार घालणे.
दरारा वाटणे – जरब वाटणे.
दगा देणे – फसविणे.
दबा धरून बसणे – एखादी गोष्ट अनपक्षित रीतीने पार पाडण्यासाठी टपून बसणे, आड लपून बसणे.
दरबार बरखास्त करणे – दरबार संपविणे.
दणाणून जाणे – व्यापून जाणे, भरून जाणे.
दृष्ट लागणे – नजर लागणे.
दृग्गोचर होणे – दिसणे.
दवंडी पिटणे – जाहीर करणे.
दृष्टीआड होणे – नजरे आड होणे, दुर्लक्षित होणे.
दृष्टीभेट होणे – एकमेकाकडे पाहणे.
दगाबाजी करणे – विश्वासघात करणे.
दृष्टीच्या टप्प्याय येणे – दिसू शकेल इतके जवळ येणे.
दत्त म्हणून उभे राहणे – एकाएकी हजर होणे, अचानक उपस्थित होणे.
दम न निघणे – अतिशय आतुर होणे.
दशा होणे – स्थिती होणे.
दृष्टीत न मावणे – अपेक्षेपेक्षा खूप मोठे जाणवणे.
दृष्टीला दृष्टी भिडविणे – टक लावून पाहणे.
दडी मारणे – लपून बसणे.
दम धरणे – धीर धरणे.
दम मारणे – झुरका घेणे, एखाद्यावर रागावणे.
दृष्टी खिळून राहणे – नजर स्थिर होणे.
दगडाखाली हात सापडणे – अडचणीत सापडणे.
दाद न देणे – पूर्णपणे दुर्लक्ष करणे, न जुमानणे.
दाद लागणे – न्याय मिळणे.
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-15 2022
दाद लावून घेणे – न्याय मिळविणे.
दाद मागणे – तक्रार करून किंवा गा-हाणे सांगून न्याय मागणे.
दातखिळी (दातखीळ) बसणे – बेशुध्ध होणे, तोंड उघडता न येणे, गप्प राहणे, स्तूप घाबरणे.
दात धरणे – वैर बाळगणे, व्देश करणे.
दाढी धरणे – विनवणी करणे.
दात कोरून पोट भरणे – मोठ्या व्यवहारात कृपणपणाने थोडीशी काटकसर करणे.
दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी बसणे.
दाताच्या कण्या करणे – अनेकवेळा विनंती करून सांगणे.
दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे, अभिमान सोडून शरण जाणे.
द्राविडी प्राणायाम करणे – सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे.
दातओठ खाणे – रागाने चरफडने.
दादाबाबा करणे – गोड बोलून मन वळविणे.
दाणे टाकून कोंबडे झुंजविणे – पदरचे खचून भांडण लावून देणे.
दाद देणे – प्रतिसाद देणे.
दात काढणे – हसणे.
दातावर मांस नसणे – द्रव्यानुकूलता नसणे.
दाताच्या घुगया होणे – फार बोलावे लागणे.
दाताच्या कण्या होणे – एखाद्या गोष्टीमुळे त्रास होणे.
दात विचकणे – याचना करणे.
दात वासून पडणे – दुखण्याने अंथरूणाला खिळून राहणे.
दात खाणे – द्वेषाचा अविर्भाव दाखविणे.
दात पाडणे – वादात पराजय करणे.
दावणीला बांधणे – ताब्यात ठेवणे.
दामटी भरणे – दुखवस्ता होणे.
दिवस फिरणे – वाईट दिवस येणे.
दिवस पालटणे – चांगले दिवस येणे.
दिग्विजय करणे – स्वतःच्या पराक्रमाने चारी दिशातील लोकांना जिंकणे.
दिङ्मूढ होणे – काय करावे ते न सुचणे.
दिरंगाई करणे – उशीर करणे.
दिवे लावणे – दुलौकिक संपादन करणे.
दिवसा मशाल लावणे – पैशाची उधळपट्टी करणे.
दिवे ओवाळणे – कमी किमतीचा समजणे.
दिव्यत्वचा साक्षत्कार होणे – देवी अनुभव येणे.
दिव्य करणे – लोकोत्तर गोष्ट करणे.
दीनवाणे होणे – काकुळतीला येणे.
दीक्षा घेणे – एखादी आचार पद्धती स्वीकरणे.
दुधात साखर पडणे – अधिक चांगले घडणे.
दुःखावर डागण्या देणे – दुःखी माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखीन दुःख देणे.
दुकान काढणे – दुकान सुरू करणे.
दुस-यांच्या ओंजळीने पाणी पिणे – दुस-यांच्या तंत्राने चालणे.
दुःखाची छाया पसरणे – सगळीकडे दुःखी वातावरण निर्माण होणे.
दुवा देणे – एखाद्याचे भले व्हावे असे मनापासून चिंतणे.
दुसरी गती नसणे – दुसरा उपाय नसणे.
दुर्दशा होणे – अत्यंत वाईट अवस्था होणे.
दुस-यांच्या तोंडाकडे बघणे – दुस-यांच्या आश्रयाची अपेक्षा करणे.
दुःख वेशीला टांगणे – सर्वांना कळेल असे वागणे.
दुधाचे बळ पणाला लावणे – आईला धन्य वाटणे.
दुरावा निर्माण करणे – अंतर निर्माण करणे.
दुधाचे दात जाऊन पक्के दात येणे – बालपण संपून कुमार अवस्था येणे.
दुरान्वघे संबंध नसणे – कुठत्याही अर्थाने संबंध नसणे.
दुखणे विकोपास जाणे – आजार खूप वाढणे.
दूर लाथाडणे – तिरस्कार करणे.
देवाघरी निघून जाणे – निधन पावणे.
देखभाल करणे – काळजी घेणे.
देश पेटणे – एखादी चळवळ देशभर पसरणे.
देव्हा-यात बसविणे – एखाद्या व्यक्तीस देव समजून पूजा करणे.
देव देव-यात नसणे – जो मालक तो स्थानावर नसणे, फिकिरीत असणे.
देहभान विसरणे – स्वतःची जाणीव न राहणे.
दैना उडणे – दुर्दशा होणे.
दोन हात करणे – सामना देणे, मारामारी करणे.
दोन हातांचे चार हात होणे – विवाह होणे.
धारातीर्थी पडणे – रणांगणावर मृत्यू येणे
धाबे दणाणणे – खूप घाबरणेे
धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे
धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे
धज देणे- धीर देणे
धाक घालणे- भीती दाखवणे
धज मारणे- मार्ग काढणे, गर्दीतून पुढे येणे
धरण धरणे- हट्ट धरून बसणे
धार पडणे – वर्षाव होणे
धन करणे – दुसर्याचा फायदा करून घेणे
धारेवर धरणे – जोरदार टीका करणे
धावत जाणे आणि पळत येणे – अगदी लवकर जाऊन येणे
धड कट्यावर घालणे – आत्मघात करणे
धिंडवडे निघणे – धीर निघणे
धर्माच्या वाट्याला निघणे – सदाचाराने वागणे
धुऱ्यावर ठेवणे – वगळणे
धुतल्या तांदळासारखे असणे -मन स्वच्छ असणे
धूळ खाणे- मातीस मिळणे
धूळखात पडणे – तसेच पडून राहणे
धुरळा घालणे- भुरळ घालणे
धूळ फेकणे- फसवणे
धोंडा घालणे- आरोप करणे
ध्यानी मनी असणे- मनात सारखे घोकत राहणे
धूळभेट – उभ्या उभ्या झालेली भेट
धुतल्या पाण्याची असणे – स्वच्छतेची असणे
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Exam Syllabus PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Exam Syllabus PDF Download
- PMC Bharti JE (Civil) Exam Syllabus PDF Download