PSI/STI/ASO Combine Test No. 01, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 01
1) भारताच्या संविधान सभेची प्रथम बैठक सोमवार दि. ९ डिसेंबर १९४६ रोजी अकरा वाजता “संविधान सभागृह, नवी दिल्ली” येथे भरली होती. त्याबाबत…………
A) आचार्य जे.बी. कृपलानी यांनी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांना स्थायी अध्यक्ष म्हणून स्थान ग्रहन करण्याची विनंती केली.
B) त्यानंतर अध्यक्षांनी भाषण केले व भाषणानंतर श्री. फ्रँड अॅन्थोनी यांना उपाध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आले.
वरील विधानांपैकी कोणते / ती विधान /ने योग्य आहे / त ?
१) ‘A’ बरोबर आहे २) A व B दोन्ही बरोबर
३) ‘B’ बरोबर ४) A व B दोन्ही चूक
उत्तर : ३) ‘B’ बरोबर
स्पष्टीकरण : भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला 296 सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या 299 झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. 11 डिसेंबरला डॉ. राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. 13 डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटनासमितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा/प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली.
2) राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याच्या अधिकाराबाबत काय खरे आहे ?
A) राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेला कायदेविषयक अधिकाराच्या समांतर आहे.
B) संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समविस्ताराचा आहे.
C) कुपर खटला (१९७०) हा राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) B व C बरोबर २) A व C बरोबर
३) A, B, C बरोबर ४) A व B बरोबर
उत्तर : 1) B व C बरोबर राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेला कायदेविषयक अधिकाराच्या समांतर नाही.
3) खालीलपैकी कोणत्या समितीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केलेले नाही ?
१) मूलभूत अधिकार उपसमिती २) संघ संविधान समिती
३) अल्पसंख्याक उपसमिती ४) यापैकी नाही.
उत्तर : ४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. व त्या समितीचे काम आंबेडकर यांनी केले.. मसुदा समितीचे म्हणून संविधानसभेत हा मसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की, संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते.
4) महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद नियमातील नियम २०८ अन्वये ‘अंदाज समिती’ बाबत काय खरे आहे ?
A) या समितीत जास्तीत जास्त ३० सदस्य असतात.
B) सर्वच्या सर्व सदस्य राज्य विधानसभेतून निवडले जातात.
C) या समितीत विधानपरिषदेचे सदस्य असतात.
योग्य विधान / ने निवडा.
१) A, B, C बरोबर २) फक्त A बरोबर
३) फक्त B बरोबर ४) यापैकी एकही नाही
उत्तर : ४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण : महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद नियमातील नियम २०८ मधील तरतुदीनुसार ही समिती 29 पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळुन होईल, त्यामध्ये विधानसभेचे 23 आणि विधानपरिषदेचे 6 सदस्य असतील. ही समिती दरवर्षी पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष / सभापती यांच्याकडुन नामनिर्देशनाद्वारे घटीत करण्यात येईल. समिती घटीत झाल्यानंतर ताबडतोब समिती सदस्यांची नावे अंतर्भुत असलेले एक परिपत्रक निर्गमित करण्यात करण्यात येते. हे परिपत्रक पुढील व्यक्तींना निर्गमित करण्यात येते. समितीचे सदस्य, महाराष्ट्रचे महालेखापाल, सर्व मंत्रालयीन विभाग, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व कक्ष व अधिकरी, व्यवस्थापक, आमदार निवास, इ. प्रासंगिक रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्यात येतात.
5) खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीत येत नाही ?
A) गुप्तधन B) सार्वजनिक सुव्यवस्था
C) विमा D) खाणी आणि खनिज विकासाचे नियमन
पर्याय –
१) A २) B
३) C ४) D
उत्तर : ३) C) विमा
स्पष्टीकरण :
राज्य सूची मध्ये मूळ घटनेत 66 विषय होते सध्या 61 विषय आहेत. राज्यसुचित काही प्रमुख विषयांमध्ये पोलीस, सार्वजनिक आरोग्य, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्यव्यवसाय, सिनेमावर, बाजार पेठ, वन (Forest) इत्यादींचा समावेश होतो.
6) पंछी आयोगाबाबत काय खरे आहे ?
A) केंद्र – राज्य संबंधाच्या पुन: परीक्षणासाठी २७ एप्रिल २००४ रोजी पंछी आयोग स्थापन करण्यात आला.
B) हा आयोग ५ सदस्यीय होता.
C) आयोगाने आपला अहवाल १९ एप्रिल २०१० रोजी सात खंडामध्ये सादर केला.
योग्य विधान / ने निवडा.
१) A व C बरोबर २) A व B बरोबर
३) B व C बरोबर ४) A, B, C बरोबर
उत्तर : ३) B व C बरोबर
स्पष्टीकरण : मदन मोहन पूंछी हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते 18 जानेवारी, इ.स. 1998 पासून 9 ऑक्टोबर, इ.स. 1998 या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्यानंतर त्यांना पूंछी कमिशन म्हणून ओळखले गेले, जे भारतातील केंद्र-राज्य संबंधांशी संबंधित विषयांचे व्यवहार करतात. त्याची स्थापना एप्रिल २००७ मध्ये झाली.
7) कलम – १४ ‘कायद्यासमोर समानता’ या तत्वाला अपवाद असणारी खालीलपैकी कोणती कलमे आहेत ?
A) कलम – १०५ B) कलम – १९४
C) कलम – ३६१ अ D) कलम – ३६१
E) कलम – ३१ क
योग्य पर्याय निवडा.
१) C, D & E २) A, E, C, D
३) फक्त D ४) A, B, C, D & E
उत्तर : ४) A, B, C, D & E
स्पष्टीकरण :
कलम 14:- यामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण दिलेले आहे. अपवाद भारताचे राष्ट्रपती, गव्हर्नर, विदेशी राजदूत यांना या अधिकाऱ्यांच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहे.
कलम 105 : संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषधिकार इत्यादी.
कलम 361 अ : संसद आणि राज्य विधीमंडळाच्या कार्यपद्धतीच्या प्रकाशनाचे संरक्षण.
कलम 361 : राष्ट्रपती, राज्यपाल आणि राज्यप्रमुखांचे संरक्षण. कलम 31 क : काही मार्गदर्शक तत्वांना परिणामकारकता देणारे कायदे.
8) राज्यपालांची सत्ता व अधिकार मर्यादित व नाममात्र असल्यामुळे राज्यप्रशासनात त्यांची स्थिती शोभेच्या अलंकारासारखी आहे असे उद्गार ——– यांनी घटना समितीत काढले ?
१) डॉ. राजेंद्र प्रसाद २) पं. जवाहरलाल नेहरू
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४) सरदार वल्लभाभाई पटेल
उत्तर : ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण : घटक राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यपालाचे अधिकार हे राज्यापुरतेच मर्यादित आसतात. राज्याचा घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री, इतर मंत्री, राज्याच्या लोकसेवा आयोगाचे सभासद इत्यादींची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये हे सर्व अधिकार राज्य मंत्रिमंडळाच्या सल्यानुसारच राज्यपालांना वापरता येतात.
9) लोकसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत काय खरे आहे ?
A) लोकसभा अध्यक्षाची निवड विशेष बहुमताने होते.
B) प्रोटेम अध्यक्षामार्फत ही निवडणूक पार पाडली जाते.
C) निवडणुकीची तारीख प्रो.टेम अध्यक्षामार्फत निश्चित केली जाते.
D) प्रोटेम अध्यक्षांना राष्ट्रपती स्वत: लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ देतात.
योग्य विधान / ने निवडा.
१) A, B, C बरोबर २) B, C, D बरोबर
३) A & D बरोबर ४) B & D बरोबर
उत्तर : ४) B & D बरोबर
स्पष्टीकरण : प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. निवडणुकीची तारीख निवडणूक अध्यक्षामार्फत निश्चित केली जाते.
10) खालील दोन विधाने विचारात घ्या.
A) सार्वजनिक विधेयक सभागृहात मांडण्यासाठी 14 दिवसांची पूर्व सूचना सभागृहाला देणे गरजेचे असते.
B) खाजगी विधेयक सभागृहात मांडण्यासाठी १५ दिवसांची पूर्व – सूचना देणे गरजेचे आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) A & B दोन्ही बरोबर ४) A & B दोन्ही चूक
उत्तर : १) A बरोबर
स्पष्टीकरण : खाजगी विधेयक सभागृहात मांडण्यासाठी १४ दिवसांची पूर्व – सूचना देणे गरजेचे आहे.
11) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार त्रिपुरातील स्वायत्त जिहा परिषदेला घटनात्मक मान्यता दिली ?
१) ५१ वी घटनादुरुस्ती २) ४७ वी घटनादुरुस्ती
३) ४९ वी घटनादुरुस्ती ४) यापैकी नाही
उत्तर : ३) ४९ वी घटनादुरुस्ती
स्पष्टीकरण :
49 वी घटनादुरूस्ती 1984 साली करण्यात आली. त्रिपुरा सरकारच्या सुचनेनुसार घटनेच्या सहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा वापर त्रिपुरा राज्यातील आदिवासी प्रदेशांच्या विकासासाठी करावा याकरिता घटनेत तसे बदल करण्यात आले. त्यानुसार स्वायत्त जिल्हामंडळे निर्माण करण्यात आली.
12) खालीलपैकी कोणत्या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त आहे ?
A. राज्य लोकसेवा आयोग B. संयुक्त लोकसेवा आयोग
C. केंद्रीय लोकसेवा आयोग
पर्याय –
१) A,B, C २) A & C ३) B & C ४) Only C
उत्तर : २) A & C
स्पष्टीकरण : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 ते ३२३ अन्वये राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
13) खालील विधाने विचारात घ्या :
A) मद्रास महानगरपालिका ही जगातील पहिली महानगरपालिका आहे.
B) स्वातंत्र प्राप्तीच्या वेळी भारतात ६ ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात होत्या.
C) त्यातील एक दिल्ली महानगरपालिका होय.
योग्य विधाने निवडा.
१) A & C बरोबर २) A, B, C बरोबर
३) B & C बरोबर ४) यापैकी नाही.
उत्तर : ४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण : लंडन महानगरपालिका ही जगातील पहिली महानगरपालिका आहे. स्वातंत्र प्राप्तीच्या वेळी भारतात ४ ठिकाणी म्हणजेच मद्रास, कलकत्ता, मुंबई, त्रिवेंद्रम येथे महानगरपालिका अस्तित्वात होत्या.
14) केंद्र सरकारने 1983 मध्ये केंद्र-राज्य संबंधांवर पुढीलपैकी कोणते आयोग नेमले होते?
A) सरकारिया कमिशन B) दत्त कमिशन
C) सेटलवाड कमिशन D) राजामन्नर कमिशन
उत्तर : A
स्पष्टीकरण : सरकारच्या कमिशनची स्थापना १ 1983 मध्ये भारत सरकारच्या केंद्र सरकारने विविध विभागांवरील केंद्र-राज्य संबंधांची तपासणी करण्यासाठी केली होती. न्यायमूर्ती रणजितसिंग सरकारिया (आयोगाचे अध्यक्ष) हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश होते
15) उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी ———
A) Gini coefficient B) Income Quintile Ratio
C) Palma Ratio
पर्यायी उत्तरे –
१) Only A २) A & C
३) A & B ४) A, B, C
उत्तर : ४) A, B, C
स्पष्टीकरण : गिनी गुणांक : देशातील किंवा इतर कोणत्याही गटाच्या उत्पन्नातील असमानता किंवा संपत्तीची असमानता दर्शविण्याच्या उद्देशाने सांख्यिकीय फैलावांचे एक उपाय आहे. हे इटालियन सांख्यिकी आणि समाजशास्त्रज्ञ कोराडो गिनी यांनी विकसित केले आहे.
16) राज्य सरकारने खालीलपैकी कोणता कर लावला आणि वसूल केला आहे?
A) मालमत्ता कर्तव्य B ) विक्री कर
C) जमीन महसूल D) वरील सर्व
उत्तर : D स्पष्टीकरण:
राज्य सरकारने लादलेला कर आहे; विक्री कर आणि व्हॅट, व्यावसायिक कर, लक्झरी कर, करमणूक कर, मोटार वाहन कर, राज्यात प्रवेश करणार्या वाहनांवर कर, कृषी उत्पन्नावरील कर, जमीन व इमारतींवर कर आणि खनिज हक्कांवर कर.
17) मानव विकास निर्देशांक – २०१५ नुसार भारताचा १३० क्रमांक आहे त्याचा निर्देशांक ०.६०९ आहे तर सर्वाधिक एच.डी.आय. असणार्या ४ थ्या क्रमांकाचा देश कोणता आहे ?
१) अमेरिका २) स्वित्झरलँड
३) डेन्मार्क ४) ऑस्ट्रेलिया
उत्तर : ३) डेन्मार्क
स्पष्टीकरण : मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात. इ.स. 1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते. 1990 पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला. 1990 मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला
18) सी. रंगराजन पॅनलनुसार शहरी लोकसंख्याच्या प्रमाणात सर्वाधिक दारिद्राचे प्रमाण कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आहे ?
१) दादर नगर हवेली २) छत्तीसगड
३) मणिपूर ४) बिहार
उत्तर : ३) मणिपूर
स्पष्टीकरण : 2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्येक्षतेखाली स्थापन. समितीचा मुख्ये उद्देश तेंडुलकर पद्धतीचे परीक्षण करणे व पर्यायी पद्धत सुचवणे. दारिद्रय मापणासाठी लकडवाला पद्धतीचा स्वीकार केला. समितीच्या आधारे 2011/12 भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5% इतके होते. ग्रामीण भाग–30.9%, शहरी भाग–26.4%.
19) कोणत्या लेखात केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणार्या अनुदानाची माहिती दिली गेली आहे ?
१) अनुच्छेद 270 २) अनुच्छेद 280
3) अनुच्छेद 275 ४) अनुच्छेद 265
उत्तर : ३) अनुच्छेद 275
स्पष्टीकरण:
अनुच्छेद २७५ आवश्यकतेच्या वेळी काही राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणार्या अनुदानाशी संबंधित आहे. या निधीचे वाटप केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यावर भारतीय एकत्रित निधीवर शुल्क आकारले जाईल.
20) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत काय खरे आहे ?
A) या कायद्यात महिलांसाठी ३३ % आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
B) नरेगा योजना एकाच टप्यात संपूर्ण भारतात लागू करण्यात आली.
C) या योजनेच्या कायद्याची नोंदणी २ फेब्रु. २००६ मध्ये झाली.
D) ग्रामीण कुटुंबातील अकुशल अंगमेहनतीचे काम करू इच्छितात अशा प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा मजूरी रोजगार पुरवण्याची हमी राज्यसरकारांनी घेतली आहे.
पर्यायी उत्तरे :
१) A, B, C बरोबर २) A & C बरोबर
३) फक्त A बरोबर ४) A, B, C, D बरोबर
उत्तर : ३) फक्त A बरोबर
स्पष्टीकरण : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही वेगवेगळ्या टप्प्यात संपूर्ण भारतात लागू झाली. या योजनेच्या कायद्याची नोंदणी २००५ मध्ये झाली. ग्रामीण कुटुंबातील कुशल अंगमेहनतीचे काम करू इच्छितात अशा प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा मजूरी रोजगार पुरवण्याची हमी राज्यसरकारांनी घेतली आहे.
21) जोड्या जुळवा.
A. भांडवलाची शोषक क्षमता 1. ए. ओ. हिर्चमन
B. तंत्रज्ञान द्वैतवाद 2. एम. कालेकी
C. परवानगी आणि अनुक्रम 3. बि. हिग्गिंस
D. जीवनशैलीची भौतिक गुणवत्ता 4. डि. मॉरिस
पर्यायी उत्तरे :
१) 2 3 4 1 २) 2 3 1 4
३) 3 2 1 4 ४) 3 2 4 1
उत्तर : २) 2 3 1 4
22) १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एकूण महसूल उत्पन्नापैकी किती टक्के महसूल राज्यशासनांना वितरीत करण्याची शिफारस केंद्राने स्विकारली आहे ?
A) ३२ % B) ४२ % C) ४८ % D) ४९ %
योग्य पर्याय निवडा –
१) B २) A ३) C ४) D
उत्तर : ४) D
स्पष्टीकरण :१४ व्या वित्त आयोग डॉ. वाय. वि. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली २०१५- २०२० या कलावधीत लागू होता.
23) भारतातील पहिली भू – तारण बँक कोणत्या राज्यात स्थापन झाली ?
१) महाराष्ट्र २) मद्रास
३) पंजाब ४) म्हैसूर
उत्तर : ३) पंजाब
स्पष्टीकरण : भारतातील पहिली सहकारी तत्वावरील भूविकास बँक (भूतारण बँक) 1920 रोजी पंजाब मध्ये झांब येथे स्थापन झाली. 1919 च्या मद्रास येथील “मध्यवर्ती भू-तारण बँकेच्या स्थापनेनंतर भू-तारण बँकांचा खरा विकास सुरु झाला.
1959 मध्ये भूतारण बँकेचे नामांतर भूविकास बँक असे करण्यात आले. भारतात संधानुवर्ती व एकात्मिक अशा दोन प्रकारच्या भू-विकास बँका दिसतात.
24) जोड्या जुळवा.
A. आर्थिक वाढ आणि रचना 1.फेलणर
B. उत्पन्न वितरण सिद्धांत वाचत आहे 2.कुझनर्स
C. एक निबंध मार्क्सियन अर्थशास्त्र 3. वि. एच. डिन
D. आर्थिक क्रियाकलाप भौगोलिक स्थान सिद्धांत 4. जॉन रॉबिन्सन
पर्यायी उत्तरे :
२) 2 1 4 3 २) 2 1 3 4
३) 1 2 3 4 ४) 1 2 4 3
उत्तर : ४) 1 2 4 3
25) केंद्र सरकारने २०१७ पासून रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे व रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलिन होणार आहे, ही विलिनीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली आहे ?
१) विवेक देबरॉय समिती २) सुब्रम्हण्यम समिती
३) अॅकवर्थ समिती ४) विमल जालन समिती
उत्तर : १) विवेक देबरॉय समिती
स्पष्टीकरण :
12 जून 2015 रोजी, डॉ विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखाली गठित रेल्वेच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला.
समितीच्या प्रमुख शिफारसी
रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी वेगळी कंपनी तयार करणे.
खाजगी लोकांना रेल्वे ऑपरेशन उघडणे.
भारतीय रेल्वेने जटिल लेखा पद्धत वगळता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानक स्वीकारले पाहिजेत.
भारतीय रेल्वेमध्ये भरतीची विविध साधने सुव्यवस्थित केली पाहिजेत.
रेल्वेमध्ये खालच्या पातळीवर विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे.
खासगी क्षेत्राला माल आणि प्रवासी गाड्या चालवण्यास परवानगी देण्यात यावी. रेल्वेने नवीन मार्गाच्या बांधकामात राज्य सरकारांशी जवळून काम केले पाहिजे.
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download