PSI/STI/ASO Combine Test No. 09

PSI/STI/ASO Combine Test No. 09

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 09
PSI/STI/ASO Combine Test No. 09

PSI/STI/ASO Combine Test No. 09

  1. खालीलपैकी कोणते विधान असत्य नाही ते निवडा.
    अ) घटनेतील कलम 34 मधील तरदूती मार्शल – लॉ शी संबंधित आहे.
    ब) राष्ट्रीय आणीबाणीत व मार्शल – लॉ मध्ये शासन व सामान्य न्यायालये तहकूब होतात.
    क) घटनेतील कमल 28 नुसार एखाद्या विशिष्ठ धर्माच्या प्रसारासाठी सक्तीने कराची वसूली करता येत नाही.
    ड) घटनेतील कलम 32 अंतर्गत परमादेश फक्त एखाद्या विशिष्ठ शासकीय अधिकार्‍याच्या विरोधात काढता येतो.

पर्यायी उत्तरे :
1) अ, क, ड 2) अ व ड
3) अ, क व ड 4) अ, ब व ड

उत्तर : 2) अ, व ड
स्पष्टीकरण :
कलम 34 अनुसार घोषित केलेला मार्शल लॉ (लष्करी कायदा) हा कलम 352 अनुसार घोषित केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीपेक्षा भिन्न आहे. एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना सरकारी कर्मचाऱ्याच्या किंवा इतर व्यक्तीच्या कामाला संरक्षण देणे. देशाच्या एखाद्या भागात लष्करी कायदा अस्तित्वात असेल तर, या भागात दिलेल्या मुलभुत अधिकारांवर काही प्रमाणात संसद कायद्याने नियंत्रण टाकू शकते. तसेच राज्याशी संबंधीत कृती करणाऱ्या व्यक्तीस त्याने पार पाडलेल्या शासकीय किंवा राज्याशी संबंधीत जबाबदारीबद्दल दोषमुक्त करण्यासाठी संसद तरतूद करु शकेल.
परमादेश(रिट् ऑफ मँडामस) याचा शब्दशःअर्थ ‘आम्ही आज्ञा देतो’ असा आहे. ज्यावेळी शासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यास चुकतो किंवा नकार देतो त्यावेळी न्यायालय अशा अधिकाऱ्याला ते कर्तव्य करण्याचे आदेश देते. या कारणासाठीच हा आदेश सार्वजनिक संस्था, निगम, कनिष्ठ न्यायालय, न्ययाधिकरण किंवा सरकार यांच्या विरुध्दही देता येतो.

  1. राज्यघटनेतील कलम 19 अंतर्गत येणार्‍या भारतभर मुक्त संचार स्वातंत्र्य व वास्तव यांच्यावर खालीलपैकी कोणत्या आधारे बंधने घालण्यात येतात.
    अ) देशाचे सार्वभौमत्व व अखंडत्व टिकवून ठेवणे.
    बं) सामान्य जनतेचे हित
    क) अनुसूचीत जमातींचे हितांचे रक्षण
    ड) मागासवर्गीय जातींच्या हिताचे रक्षण
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, बं व क फक्त 2) ब, क व ड फक्त
    3) अ, ब, क व ड 4) ब, व क, फक्त

उत्तर : 4) ब, व क, फक्त
स्पष्टीकरण :
कलम 19 ने सर्व नागरिकांना खालील सहा हक्कांची हमी दिली आहे-

  1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क.
  2. शांततापूर्वक आणि निःशस्त्र सभा भरविण्याचा हक्क.
  3. संस्था, संघटना, किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क.
  4. भारतीय प्रदेशात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचा हक्क.
  5. भारतीय प्रदेशात कोठेही राहण्याचा किंवा स्थायीक होण्याचा हक्क.
  6. कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क.
    सुरुवातीला कलम 19 मध्ये सात अधिकार होते परंतु 44 वा घटनादुरुस्ती कायदा, 1978 अन्वये मालमत्ता मिळविणे, धारण करणे किंवा विकणे हा हक्क काढून टाकण्यात आला. कलम 19 मध्ये उल्लेख केलेल्या कारणांसाठीच राज्य या सहा हक्कांच्या उपभोगावर वाजवी बंधने घालू शकते, इतर कोणत्याही कारणांसाठी नाहीत.


3.
अ) घटनासमितीचे उपाध्यक्ष (कायमस्वरूपी) अनंतसमयनम अय्यंगार होते.
ब) संसदेचे पहिले उपाध्यक्ष फ्रँक अॅंथनी हे होते.
पर्यायी उत्तरे :
1) विधान (अ) योग्य 2) विधान (अ) व (ब) योग्य
3) विधान (ब) योग्य 4) विधान (अ) व (ब) अयोग्य

उत्तर : 4) विधान (अ) व (ब) अयोग्य
स्पष्टीकरण :
घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. फ्रांसमधील प्रथचे अनुकरण करुन वयाने सर्वात ज्येष्ठ असलेले सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद आणि एच. सी. मुखर्जी हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

  1. लोकसभा व राज्यांच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती व जमातींच्या प्रतिंनिधीत्वासाठी आरक्षणाची वाढवलेली मुदत यासंबंधी घटनादुरुस्ती ओळखा.
    अ) 8 वी घटनादुरुस्ती ब) 24 वी घटनादुरुस्ती
    क) 45 वी घटनादुरुस्ती ड) 62 वी घटनादुरुस्ती

पर्यायी उत्तरे :
1) (अ) व (क) व (ड) 2) (ब) व (क) व (ड)
3) (क) व (ड) फक्त 4) (ब) व (ड) फक्त

उत्तर : 1) (अ) (क) व (ड)
स्पष्टीकरण :
लोकसभा आणि राज्य विधानसभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागांचे आरक्षण व अँग्लो इंडियन लोकांना विशेष प्रतिनिधित्व यांचा कालावधी दहा वर्षांनी म्हणजे 8 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1960 अन्वये 1970 पर्यंत वाढविण्यात आला. तसेच 45 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1980 अन्वये 1990 पर्यंत वाढविण्यात आला. तसेच 62 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1989 अन्वये 2000 पर्यंत वाढविण्यात आला. 95 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 2009 अन्वये 2020 पर्यंत वाढविण्यात आला. (कलम 334 अन्वये राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व 70 वर्षांनी संपणार.)

  1. खालील कोणत्या कलमांचा अंमल 26 नोव्हे. 1949 रोजीच चालू झाला.
    1) कलम 5 2) कलम 326
    3) कलम 368 4) कलम 393

पर्यायी उत्तरे :
1) 1, 2 व 3 2) 1, 2 व 3
3) 2 व 4 फक्त 4) 1 व 4

उत्तर : 4) 1 व 4
स्पष्टीकरण :
26 नोव्हेंबर, 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्यात ठराव संमत करण्यात आला, असे घोषित करण्यात आले आणि सदस्यांनी व अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यादिवशी 299 सदस्यांपैकी फक्त 284 सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. हाच दिनांक सरनाम्यात नमुद केला आहे. त्या दिवशी घटना समितीने ‘ही घटना स्वीकृत करुन, अधिनियमित करुन स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, असे म्हटले आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेतील कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392, 393 आणि 394 इत्यादी कलमे लागू झाली. उर्वरित राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली.

  1. स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी खालील पात्रतांचा विचार करा व अयोग्य विधान कोणते नाही ते निवडा.
    अ) अर्ज केलेला व्यक्ती भारत सरकारच्या सेवेत असावा किंवा त्याने भारतात सलग 5 वर्षे वास्तव्य केलेले असावे.
    ब) त्याला इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
    क) अश्या प्रकारे नागरीकत्व प्राप्त करणार्‍या व्यक्तीला संविधानाप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते.

पर्यायी उत्तरे :
1) फक्त (अ) 2) फक्त (क)
3) (अ) व (ब) 4) (अ) व (क)

उत्तर : 2) फक्त (क)
स्पष्टीकरण :
नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये नागरिकत्व मिळविण्याचे पाच मार्ग सांगितले आहेत. जन्माने, वंशपरंपरेने, नोंदणीने, स्वीकृतीने आणि प्रदेश विलिनीकरणाने मिळणारे नागरिकत्व. खालील अटींची पूर्तता करणारी बेकायदेशीर स्थलांतर सोडुन इतर व्यक्तीच्या अर्जावर विचार करुन केंद्र सरकार स्वीकृतीने वास्तव्याचा दाखला देऊ शकते.

1.ज्या देशात वास्तव्याने भारतीय नागरिकांना त्या देशाचे नागरिकत्व किंवा प्रजाजन होण्यास बंदी आहे अशा देशाचा तो नागरिक किंवा प्रजाजन असता कामा नये.

2.जर ती व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक असेल तर भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज मंजूर झाल्यास ती दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करील, असे हमीपत्र तिने द्यावयास हवे.

3.अर्ज करण्यापुर्वीच्या लगेचच्या संपुर्ण बारा महिन्यांच्या कालावधीत ती भारतात वास्तव्य करीत असवयास हवी किंवा भारत सरकारच्या सेवेत असावयास हवी किंवा काही काळ वास्तव्य व काही काळ सेवा करीत असावयास हवी.

4.वर उल्लेख केलेल्या बारा महिन्यांच्या कालावधीपुर्वीच्या लगेचच्या 14 वर्षात ती व्यक्ती 11 वर्षापेक्षा जास्त काळ भारतात वास्तव्य करीत असावयास हवी किंवा भारत सरकारच्या सेवेत असावयास हवी किंवा काही काळ वास्तव्य व काही काळ सेवा करीत असावयास हवी.

5.त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असावयास हवे.

6.त्या व्यक्तीला घटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये नमुद केलेल्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावयास हवे.

7.जर तिला वास्तव्याने नागरिकत्वाचा दाखला मिळाला तर भारतात वास्तव्य करण्याचा किंवा भारत सरकारच्या सेवेमध्ये किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सेवेमध्ये किंवा भारतात स्थापन झालेली संस्था, कंपनी किंवा संघटनेच्या सेवेमध्ये भारतात येण्याचा वा पुढे चालू राहण्याचा त्या व्यक्तीचा मनोदय असावयास हवा.
परंतु विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव विकास यांमध्ये अतुलनीय काम केलेल्या व्यक्तीसाठी भारत सरकार वरीलपैकी काही किंवा सर्व अटी शिथिल करु शकते.
वास्तव्याने नागरिकत्व मिळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे अगत्याचे असते.

  1. उपजिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी व केव्हा केली ?
    1) वॉरन हेस्टिंग 1773 2) वॉरन हेस्टिंग 1781
    3) विल्यम बेंन्टींग 1833 4) विल्यम बेंन्टींग 1781

उत्तर : 3) विल्यम बेंन्टींग 1833
स्पष्टीकरण : बेंन्टींग हा इ.स 1828 ते 1835 या काळात भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याच्या काळात भारतात बऱ्याच सुधारणा झाल्या. सती प्रथा बंदी कायदा, बालहत्या व नरबळी बंदी, शिक्षण सुधारणा, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, इत्यादि. याच काळात काही प्रशासकीय सुधारणा झाल्या त्यात त्याने उपजिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.

  1. योग्य जोड्या जुळवा.
    मार्गदर्शक तत्वावरील टिका टिकाकार
    अ) नववर्षाचा निश्र्वय 1) टी.टी. कृष्णम्माचारी
    ब) केराची टोपली 2) के. संथानम
    क) घटनात्मक संघर्ष 3) नसिरुद्दीन
    ड) अतार्किकपणे रचना 4) एन. श्रीनिवासन

पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) 3 1 2 4
2) 4 3 1 2
3) 3 2 1 2
4) 4 1 2 3

उत्तर : 1) 3 1 2 4
स्पष्टीकरण :
नववर्षाचा निश्र्वय = नसिरुद्दीन
केराची टोपली = टी.टी. कृष्णम्माचारी
घटनात्मक संघर्ष = के. संथानम
अतार्किकपणे रचना = एन. श्रीनिवासन

  1. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते निवडा.
    अ) 1925 मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय व निर्वाचित अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे होते.
    ब) जर लोकसभेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या जागा रिक्त असेल तर अध्यक्षीय पॅनलमधील एकाची नियुक्ती अध्यक्षपदी केली जाते.
    क) श्रेष्ठत्व क्रमानुसार लोकसभेच्या अध्यक्षांचा दर्जा भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या बरोबरीचा आहे.
    ड) 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतून अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष ग.वा. मावळनकर हे 1956 पर्यंत अध्यक्षपदावर होते.

पर्यायी उत्तरे :
1) (अ), (ब), (क) 2) (अ), (ब), (ड)
3) (ब), (क), (ड) 4) (अ), (क), (ड)

उत्तर : 1) (अ), (ब), (क)


  1. अ) संसदेचे अधिवेशनाची तहकुबी (Adjioumment of the sitting) सभागृहाचे पीठासीन अधिकारी करतात तर अनिश्चित काळासाठी तहकुबी (Adjoumment by Sine Die) राष्ट्रपती करतात.
    ब) सत्र समाप्तीमुळे (अधिवेशनाच्या) प्रलंबित विधेयके व्यपगत (lapse) होतात.
    वरीलपैकी कोणते विधान सत्य नाही ते ओळखा.

पर्यायी उत्तरे :
1) (अ) फक्त 2) (ब) फक्त
3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 3) (अ) व (ब)
स्पष्टीकरण :
संसदेच्या अधिवेशनाची तहकुबी तसेच अनिश्चित काळासाठी तहकुबी सभागृहाचे पीठासीन अधिकारी(अध्यक्ष) करतात. सत्र समाप्तीमुळे प्रलंबित असलेल्या विधेयकांवर किंवा इतर कामकाजावर परिणाम होत नाही. तथापी, विधेयक मांडण्याच्या सुचना सोडुन इतर सुचना लोप पावतात व्यपगत होतात.

  1. स्थगन प्रस्तावाबद्दल (Adjoumment Motion) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा.
    अ) हा प्रस्ताव लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडला जातो.
    ब) या प्रस्तावाची नोटीस महासचिवांच्या नावाने द्यावी लागते परंतू तिची स्वीकृती अध्यक्ष ठरवतात (लोकसभेत)
    क) हा प्रस्ताव स्विकारला जाण्यासाठी किमान 50 सदस्यांची संमती आवश्यक असतो.
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ), (ब) व (क) 2) (ब) व (ड)
    3) (अ) व (ड) 4) (ब) व (क)

उत्तर : 4) (ब) व (क)
स्पष्टीकरण :
तातडीच्या, सार्वजनिकदृष्टया महत्वाच्या विशिष्ट बाबींकडे गृहाचे लक्ष वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव संसदेत मांडला जातो. तो मांडण्यासाठी 50 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. यामुळे गृहाचे नेहमीचे कामकाज थांबत असल्यामूळे हे एक अपवादात्मक साधन मानले जाते. यामध्ये टीकेचा अंश असतो, त्यामुळे राज्यसभेत याचा वापर केला जात नाही.

  1. केंद्र व राज्यांच्या कर्जउभारणीबद्दल खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान कोणते नाही ते ओळखा.
    अ) केंद्र शासन व राज्य शासन संसदेने केलेल्या कायद्यांच्या मर्यादेत राहून अंतर्गत कर्ज उभारू शकतात व परदेशातून कर्ज घेऊ शकतात.

    ब) केंद्राने राज्यांना दिलेल्या कर्जाच्या कोणताही हिस्सा थकीत असेल तर राज्यांना कर्ज घेण्यासाठी केंद्राची संमती घ्यावीच लागते.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधान (अ) फक्त 2) विधान (ब) फक्त
    3) विधान (अ) व (ब) फक्त 4) विधान (अ) व (ब) पैकी नाही.

उत्तर : 2) विधान (ब) फक्त
स्पष्टीकरण :
1.केंद्र शासन भारताच्या संचित निधीचे तारण देऊन किंवा हमी देऊन देशातुन किंवा देशाबाहेरुन कर्ज घेऊ शकते. मात्र दोन्ही प्रकारे घेतलेले कर्ज संसदेने निश्चित केलेल्या मर्यादेतच असले पाहिजे. आतापर्यंत संसदेने असा कोणताही कायदा केलेला नाही.
2.राज्य शासन राज्याच्या संचित निधीचे तारण देऊन किंवा हमी देऊन देशातुन (मात्र देशाबाहेरुन नाही) कर्ज घेऊ शकते. मात्र दोन्ही प्रकारे घेतलेले कर्ज त्या राज्याच्या विधीमंडळाने निश्चित केलेल्या मर्यादेतच असले पाहिजे.
3.केंद्र सरकार कोणत्याही राज्य सरकारला कर्ज देऊ शकते किंवा राज्याने उभारलेल्या कर्जासाठी हमी देऊ शकते. असे कर्ज देण्यासाठी लागणारा निधी भारताच्या संचित निधीतून दिला जातो.
4.केंद्राने दिलेल्या कर्जापैकी किंवा ज्या कर्जासाठी केंद्राने हमी दिली आहे, अशा कर्जापैकी काही थकबाकी असेल तर केंद्राच्या संमतीशिवाय राज्य कर्ज उभारु शकत नाही.

  1. जम्मू व काश्मीरच्या घटनेबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य विधान कोणते नाही ते निवडा.
    अ) 17 नोव्हे. 1951 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
    ब) 26 जाने. 1952 पासून घटनेचा अंमल सुरू करण्यात आला.
    क) द्विगृही विधानमंडळाची तरतूद केलेली असून त्यापैकी वरीष्ठ सभागृहात 8 नामनिर्देशित सदस्य असतात.
    ड) या घटनेत राज्याचे भारतीय संघराज्याशी असलेल्या संबंधामध्ये बदल घडून आणणारे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी विशेष बहुमताच्या गरजेची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यायी उत्तरे :
1) (अ), (ब) व (ड) फक्त 2) (अ) व (ब) फक्त
3) (ब) व (क) फक्त 4) यापैकी नाही

उत्तर : 1) (अ), (ब) व (ड) फक्त
स्पष्टीकरण :
कलम 370 व कलम 35A अन्वये जम्मू व काश्मिरला विशेष अधिकार प्राप्त झालेले होते. 17 नोव्हेंबर 1957 रोजी जम्मू व काश्मिरची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली व 26 जानेवारी 1957 ला अंमलात आली.

  1. खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामसभेचे महत्व अधोरेखित करून त्यांचा उल्लेख ‘प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप’ (Embodiment of direct democracy) असा केला.
    1) जी.व्ही.के. राव समिती (1985) 2) एल.एम. सिंघवी समिती (1986)
    3) अशोक मेहता समिती (1977) 4) वसंतराव नाईक समिती (1960)

उत्तर : 2) एल. एम. सिंघवी समिती (1986)
स्पष्टीकरण :
ही समिती लोकशाही व विकास प्रक्रियेसाठी पंचायतराज संस्थांचे पुनरुज्जीवन या उद्देशाने तयार करण्यात आली. या समितीने पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा, वित्तीय अधिकार जास्त प्रमाणात असावे, खेड्यांची पुनर्रचना करण्यात यावी, गावात ग्रामसभा निर्माण करावी व ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकशाही कार्यान्वीत करावी, विवादांच्या सोडवणुकीसाठी स्वतंत्र न्यायिक लवादाची स्थापना करावी यांसारख्या तरतूदी दिल्या.

  1. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही ते निवडा.
    अ) स्पायरोगायरा ही थॅलोफायटा वर्गातील संवहनी वनस्पती आहे.
    ब) स्पायरोगायराची पेशी भित्तिका 3 स्तरीय असते.
    क) स्पायरोगायराचे प्रजनन शाकिय किंवा लैंगिक पद्धतीने होते.
    ड) स्पायरोगायरा हे हरित शेवाळ आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ) (ब) व (ड) 2) (ड) फक्त
    3) (ब) व (क) व (ड) 4) (ब) व (ड) फक्त

उत्तर : 4) (ब) व (ड) फक्त
स्पष्टीकरण :
स्पायरोगायरा हे एक सूक्ष्म तंतू असलेले एक हिरवे शैवाल आहे जे डबक्यात, तलावात आणि इतर गोड्या पाण्यात सापडते. याला पाण्यातले रेशिम म्हणतात. ह्याची रुंदी सुमारे 10 ते 100 mm असते आणि लांबी अनेक सेंटीमीटर असु शकते. कुठल्याही तंतूमध्ये शाखा नसतात आणि अंडाकृती पेशी एकामागे एक अशा रचनेत असतात. या पेशिंमध्ये एक किंवा अधिक सुंदर सर्पिल आकारात हरितलवक असतात, म्हणून हे गडद हिरवे दिसतात. पेशी भित्ती मध्ये दोन थर असतात आणि त्या सेल्युलोस आणि पेक्टीनच्या बनलेल्या असतात. पेक्टिन पाण्यात विरघळते आणि म्हणुन तंतु हाताला बुळबुळीत लागतात. पेशीच्या कडेने कोशिकाद्रव्य असते आणि मध्यात एक बिंदुक रिक्तिका असते. पेशीच्या मध्यात केंद्रक असते आणि पेशीच्या कडेला असलेल्या कोशिकाद्रव्यापासुन तंतुंनी लटकते.

  1. अनावृत्तबिजी वनस्पती (Jimnosperm) बद्दल खालील विधानांचे विचार करा.
    अ) या प्रकारातील वनस्पतींची फुले उभयलिंगी असतात.
    ब) मार्शिलिया, सेकोया ही या प्रकारातील वनस्पतींची काही उदाहरणे आहेत.
    वरीलपैकी कोणती विधाने असत्य नाही ते ओळखा.
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ) फक्त 2) (ब) फक्त
    3) विधान (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर: 4) ना (अ) ना (ब)
स्पष्टीकरण :
या वनस्पती सर्वसाधरण बहुवर्षीय वृक्ष असुन समशितोष्ण कटिबंधातील जंगलात आढळतात. या वनस्पतीची फुले एकलिंगी असतात. त्यांना निदलपुंज व दलपुंज ही संरक्षक मंडले नसतात. जगातील सर्वात उंच वनस्पती या गटात मोडतात. या वनस्पतीच्या लघू बीजाणू पत्रांवर परागकोष तयार होतात. तर काही बीजाणूपत्रांच्या कडांवर बिजांडे तयार होतात. बिजांडे अंडाशयात समाविष्ट नसल्याने या वनस्पतींना अनावृत्तबीजी वनस्पती म्हणतात. या वनस्पतींच्या अणकुचीदार पानांमुळे व झाडांच्या शंकू आकारामुळे यांना सुचीपर्णी वृक्ष ही म्हणतात.

  1. खालीलपैकी कोणता प्राणी (Heamichordata) अर्थसमपृष्ठवंशीय प्राणी वर्गात येत नाही.
    1) Saccoglonas सॅकोग्लोनास 2) Balenoglonas बॅलेनोग्लोनास
    3) Wuchereria Bancrofti व्हुचेरीया बॅकक्रॉफ्टी 4) यापैकी नाही

उत्तर : 3) Wucheria Bancrofti व्हुचेरीय बँकक्रॉफ्टी
स्पष्टीकरण :
हे सर्व सागर निवासी प्राणी आहेत. शरीराचे प्रमुख भाग शुंडा, गळपट्टी आणि प्रकांड असे असतात. श्वासासाठी कल्ल्यांच्या पुष्कळ जोडया असतात. हे कृमी सारखे असुन एकटेच बीळ करुन राहतात.

  1. (Pisces) पायसेस वर्गाबद्दल खालील विधानांचा विचार करा.
    अ) ह्रदय दोन कप्प्याचे असते.
    ब) RBCs मध्ये केंद्रक नसते. (लोहीत रक्तकणीकांमध्ये)
    वरीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधान (अ) 2) विधान (ब)
    3) विधान (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 1) विधान (अ)
स्पष्टीकरण :
यात सर्व प्रकारच्या माशांचा समावेश होतो. शरीरावर शलकांचे आवरण असते. त्वचेतील ग्रंथीतून श्लेषमल श्रवतो, त्यामुळे सभोवतालच्या पाण्याचे शरीराशी घर्षण होत नाही. शरीरावर परांच्या दोन जोडया असतात. दिशा बदलणे, पोहणे व तोल सांभाळणे यासाठी परांचा उपयोग होतो. डोळ्यांना पापण्या नसतात. डोळ्यावर पारदर्शक निमेषक पटल असते. फक्त अंतर्कर्ण असतो. लोहित रक्तकणिका अंडाकृती असुन त्यात केंद्रक असते.

  1. अ) नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सीटोसीन विकर लागते.
    ब) नैसर्गिक प्रसूतीसाठी व्हासोप्रिसीन विकर लागतो.
    वरीलपैकी योग्य विधान निवडा.
    1) (अ) फक्त 2) (ब) फक्त
    3) विधान (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 4) ना (अ) ना (ब)
स्पष्टीकरण :
ऑक्सीटॉसिन हे दुध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संप्रेरक आहे.

20.पिवळ्या तापासाठी कारणीभूत असलेला “आर बो” खालीलपैकी काय आहे ?
1) जीवाणू 2) विषाणू
3) आदिजीव 4) यापैकी नाही.

उत्तर : 2) विषाणू
स्पष्टीकरण :
हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो मच्छर, एडिस इजिप्तीमुळे होतो. हा प्रामुख्याने आफ्रिका आणि मध्य व दक्षिण अमेरिकामध्ये आढळतो. याला येलो जॅक किंवा येलो प्लेग म्हणून देखील ओळखले जाते. पिवळ्या तापाचा संसर्ग झालेल्या डासांच्या चावण्याने पिवळा ताप येऊ शकतो. काही व्यक्तींमध्ये काविळीची चिन्हे दिसतात. त्वचेचा रंग आणि डोळ्याच्या पांढऱ्या भागाचा रंग पिवळा होतो, म्हणून याला ‘पिवळा’ म्हटले जाते.

.21. Golden Rise मध्ये खालीलपैकी कोणते vitamin (जीवनसत्व) असते.
1) Vit A 2) Vit B
3) Vit B – 12 4) Vit E

उत्तर : 1) Vit A
स्पष्टीकरण :
जगाच्या अनेक भागांमध्ये आढळणारी अ जीवनसत्व कमतरता दुर करण्यासाठी 1982 सालामध्ये अमेरिकेमधील रॉकफेलर फाऊंडेशनद्वारे गोल्डन राईस प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यासाठी केलेल्या काही प्राथमिक प्रयोगांमध्ये शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, तांदळाच्या वनस्पतीमध्ये बीटा-केरोटीन तयार करण्यासाठीचे चयापचय मार्ग व संबंधीत जनुके उपलब्ध असतात आणि त्यांद्वारे तांदळाच्या पानांमध्ये बीटा-केरोटीन बनते. मात्र तांदळाच्या दाण्यांमध्ये ही जनुके क्रियाहीन झाल्यामुळे बीटा-केरोटीन तयार होऊ शकत नाही. या माहितीच्या आधारे असे गृहीतक मांडण्यात आले की, तांदळाच्या दाण्यांमध्ये जी जनुके क्रियाहीन आहेत त्यांसारखी कार्यक्षम जनुके इतर जिवांमधून तांदळाच्या दाण्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, तर अशा तांदळामध्ये बीटा-केरोटीनच तयार होऊ शकते. आहारामध्ये अशा तांदळाचा समावेश केल्यास अ जीवनसत्वाची कमतरता दुर केली जाऊ शकते. या गृहीतकाच्या आधारे शास्त्रज्ञांनी जनुकीय अभियांत्रिकीच्या आधारे तांदळाच्या दाण्यामध्ये दोन विकरे (एंझाइमे) बनविणारी नवी जनुके समाविष्ट केली. यातील एक जनुक जीवाणुंमधुन तर दुसरे डॅफोडिल नावाच्या वनस्पतीमधून घेण्यात आले. या प्रयोगानंतर तयार झालेल्या तांदळाच्या तयार झालेल्या तांदळाच्या वनस्पतीमधील दाण्यांमध्ये बीटा-केरोटीन तयार झाले व त्यामुळे दाण्यांचा रंग पिवळा झाल. 2005 सालामध्ये गोल्डन राईस-2 तयार करण्यात आला, त्यामध्ये डॅफोडिलऐवजी मक्यातील जनुक वापरण्यात आले. या बदलामुळे अशा तांदळामध्ये बीटा-केरोटीनचे प्रमाण मुळ गोल्डन राईसपेक्षा 23 पटीने वाढले. यानंतर झालेल्या अनेक प्रयोगांमधून असे आढळून आले की, गोल्डन राईसमधील बीटा-केरोटीन मनुष्याच्या शरीरात अ जीवनसत्वामध्ये रुपांतरीत होऊ शकते.

  1. मेंडोलिव्हने भाकित केलेल्या इका – सिलिकॉन या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणत्या मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जुळतात ?
    1) स्कॅन्डिअम 2) गॅलीअम
    3) जर्मेंनिअम 4) अल्युमिनिअम

उत्तर : 3) जर्मेनिअम
स्पष्टीकरण :
सिलिकॉनचा उपयोग सिमेंट उत्पादनात तसेच सौर उपकरणात होतो. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, तांबे व इतर धातूंचे बल वाढविण्याकरिता सिलिकॉन आणि तिची आंतरधातवीय संयुगे यांचा मिश्रधातू घटक म्हणून उपयोग करतात. ९८-९९% शुद्घता असलेल्या सिलिकॉनाचा वापर ऑर्‌गॅनोसिलिकॉन संयुगे व सिलिकोन रेझिने, इलॅस्टोमरे आणि तेले यांच्या निर्मितीमध्ये आरंभक द्रव्य म्हणून होतो.

  1. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्याचे हँडल कशापासून बनवतात ?
    1) फार्मलडिहाईड 2) बेकालाईट
    3) व्हिनील क्लोराईड 4) निओप्रिन

उत्तर : 2) बेकालाईट
स्पष्टीकरण :
1907 मध्ये लिओ हेंड्रिक्स बेकलॅंड ( Leo Henricus Baekeland ) हा रसायनशास्त्रातील तज्ञ योन्कार्स, न्यू यॉर्क येथील आपल्या खासगी रासायनिक प्रयोगशाळेत काम करत होता. त्या काळात विद्युत उद्योग अगदी जोरदार चालला होता. त्यात शेलॅक (shellak) हे विद्युत निरोधक (insulating) मटेरीअल वापरले जात असे. त्याला पर्यायी मटेरीअल शोधून काढण्यात लिओ मग्न होता. शेलॅक हे मटेरीअल बनवण्यासाठी दक्षिण मध्य आशियातील झाडांवर परोपजीवी म्हणून राहणा-या कीटकांच्या स्रावावर प्रक्रिया करावी लागे. आणि अमेरिकन लोक वर्षाकाठी पाच कोटी पौंड शेलॅक आयात करत असत. बेकलॅंड या संशोधनात पुरता बुडून गेला होता. त्याने त्यासाठी एक उच्च दाबाचे द्रव पदार्थ ठेवण्याचे पात्र बनवले होते. त्यात तो फिनॉल (C6H5OH) व फॉर्मलडिहाइड (CH2O) यांचे मिश्रण गरम करत होता. त्यातून, त्याला हवा तसा आकार देता येईल, असा एक कृत्रिम द्रवपदार्थ तयार झाला होता., तसेच त्याचे तपमान वाढवले आणि विशिष्ट दाब दिला तर तो कायम स्वरूपाचा कठीण असा पदार्थ बनू शकत होता. हे सापडलेले संयुग असे प्लॅस्टिक (Polyoxybenzylmethylenglycolanhydride) होते, की ते मोल्डिंग करण्यास अत्यंत सुलभ होते.आणि त्याचा विशेष गुणधर्म असा होता, की अति उच्च तपमानातही त्याचा आकार तसाच्या तसा टिकून राहत असे. ते वितळत नसे, किंवा त्याचा आकार बदलत नसे.

  1. Rancidity (रॅन्सीडिटी) कशामुळे होते/ कोणत्या क्रियेमुळे प्राप्त होते ?
    1) क्षपण क्रिया 2) उदासिनिकरण क्रिया
    3) ऑक्सीडीकरण क्रिया 4) Redox अभिक्रिया

उत्तर : 3) ऑक्सीडीकरण क्रिया
स्पष्टीकरण :
रॅन्सिडीटी हे मूलत: पदार्थांमध्ये तेलांचे आणि चरबींचे ऑक्सिडेशन असते.
त्यापासून बचाव करण्याच्या पध्दतीमध्ये (अ) ऑक्सिडेशनपासून बचाव करण्यासाठी हवेतील ऑक्सिजनपासून दूर अन्न सील करणे आणि (ब) रासायनिक अभिक्रिया कमी करण्यासाठी रेफ्रिजरेटरचा समावेश आहे.

  1. खालीला मूलद्रव्यांमधून डोबेरायनरच्या त्रिकांची योग्य जोडी ओळखा.
    अ) सेलेनिअम ब) टेल्युरीअम
    क) स्ट्रान्शिअम ड) सल्फर
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ), (क), (ड) 2) (अ), (ब), (क)
    3) (ब), (क), (ड) 4) (अ), (ब), (ड)

उत्तर : 4) (अ), (ब), (ड)
स्पष्टीकरण :
मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा पहिला प्रयत्न 1829 मध्ये डोबेरायनरने केला. त्याने समान गुणधर्माचा तीन तीन मूलद्रव्याचे गट तयार केले व त्या गटांना त्रिके असे संबोधले. प्रत्येक त्रीकात मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अनुवस्तुमानाप्रमाणे मांडल्यावर त्याच्या असे लक्षात आले कि मधल्या मूलद्रव्याचे अनुवस्तुमान हे साधारणतः दोन अन्य मूलद्रव्यांच्या अनुवस्तूमानाच्या सरासरी इतके असते
मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्तनसारणीतील आवर्तनाची माहिती :
मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्तसारणीत सात आवर्तने आहेत.

  1. पहिले आवर्तन सर्वात लहान असून त्यात फक्त दोन मूलद्रव्ये आहेत.
    2.दुसर्या आणी तिसर्या आवर्तनांना लघु आवर्तने म्हणतात. आणी प्रत्येक आवर्तनात 8 मूलद्रव्ये असतात.
    3.चौथ्या व पाचव्या आवर्तनात प्रत्येकी 18 मूलद्रव्ये असतात त्यांना दीर्घ आवर्तने म्हणतात.
    4.सहावे आवर्तन सर्वात दीर्घ असून त्यात एकूण 32 मूलद्रव्ये असतात यात 14 अंतरसंक्रामक मुलद्रव्यांची श्रेणी आहे. अनुक्रमांक 58 ते 71 (Ce ते Lu) अशा 14 मूलद्रव्यांना म्हणतात.
    5.सातवे आवर्तन अपूर्ण आहे यात 14 अंतरसंक्रामक मुलद्रव्यांची श्रेणी आहे. अनुक्रमांक 90 ते 103 (Th ते Lr) अशा 14 मूलद्रव्यांना म्हणतात.
    6.प्रत्येक आवर्तनाची सुरुवात अल्कली धातू ने होते व निष्क्रिय वायुने संपते.
Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply