PSI/STI/ASO Combine Test No. 05

PSI/STI/ASO Combine Test No. 05, combine test series, combine, mock test online.

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 05
PSI/STI/ASO Combine Test No. 05

PSI/STI/ASO Combine Test No. 05

1.
अ) ओझोन वायुमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो.
ब) ओझोन वायु रंगहीन असतो.

1) ‘अ’ बरोबर ‘ब’ चूक 2) ‘अ’ चूक ‘ब’ बरोबर

3) ‘अ’ आणि ‘ब’ चूक 4) ‘अ’ आणि ‘ब’ बरोबर

उत्तर : 4) ‘अ’ आणि ‘ब’ बरोबर

स्पष्टीकरण :
ओझोन हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या 3 अणूं पासून बनलेला असून त्याचे रेणुसुत्र O3 असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो. ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असून, पाण्यात किंचीत विरघळतो. कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो. -112० तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे, कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो. -193० तापमानावर, त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते. बहुतेक लोकं 0.01 पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायु ओळखु शकतात कारण त्यास असलेला क्लोरीन सदृष्य तिव्र वास हा होय. त्याच्या 0.1 ते 1 पी.पी.एम. एवढ्या हवेतील तिव्रतेने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ इत्यादी विकार उदभवु शकतात. कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा, प्लॅस्टिक,फुप्फुस इत्यादिंवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ओझोन हा वायु चुंबकिय क्षेत्रास विरोध करणारा आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.

2.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 1952 साली संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कोणी चालू केले ?

1) आचार्य अत्रे 2) के. व्ही. देशपांडे

3) शाहीर अमर शेख 4) एस. एम. जोशी

उत्तर : 2) के. व्ही. देशपांडे

स्पष्टीकरण :

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

  1. जोड्या लावा.

‘अ’ गट (खाड्या) ‘ब’ गट (नदी)

अ) वसई I) पाताळगंगा

ब) धरमतर II) शुक

क) जैतापूर III) उल्हास

ड) विजयादुर्ग IV) काजवी

अ ब क ड

1) III I IV II

2) I II III IV

3) IV III II I

4) II I IV III

उत्तर : 1) III I IV II

खाड्या नदी

वसई = उल्हास

धरमतर = पाताळगंगा

जैतापूर = काजवी

विजयादुर्ग = शुक

  1. चुकीची जोडी ओळखा.

1) सिंधुदुर्ग – कच्चे लोखंड

2) लेंडी – मांजरा नदीची उपनदी

3) बीड – एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर

4) बल्लारपूर – जलविद्युत प्रकल्प

उत्तर : 4) बल्लारपूर – जलविद्युत प्रकल्प

स्पष्टीकरण :

बल्लारपूर हा चंद्रपूर महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प : तुर्भे – मुंबई, खापरखेडा – नागपूर, बल्लारपूर – चंद्रपूर, चोला – ठाणे, परळी बैजनाथ – बीड, पारस – अकोला, एकलहरे – नाशिक, फेकरी – जळगाव.

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प : खोपोली – रायगड, भिरा अवजल प्रवाह – रायगड, कोयना – सातारा, तिल्लारी – कोल्हापूर, पेंच – नागपूर, जायकवाडी – औरंगाबाद

महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प : तारापुर – ठाणे, जैतापुर – रत्नागिरी, उमरेड – नागपूर

महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प : जमसांडे – सिंधुदुर्ग, चाळकेवाडी – सातारा, ठोसेघर – सातारा, वनकुसवडे – सातारा, ब्रह्मनवेल – धुळे, शाहजापूर – अहमदनगर

  1. योग्य पर्याय निवडा.

अ) लॉर्ड बर्कनहेड या हुजूर पक्षीय भारतमंत्र्याने सायमन आयोगाची नियुक्ती केली होती.

ब) ‘सायमन परत जा’ अशा घोषणा छापलेले पतंग आकाशात सोडण्याची कल्पना खलील उझामान यांची होती.

1) ‘अ’ बरोबर ‘ब’ चूक 2) ‘ब’ बरोबर ‘अ’ चूक

3) दोन्ही बरोबर 4) दोन्ही चूक

उत्तर : 3) दोन्ही बरोबर

स्पष्टीकरण :

ब्रिटिशांनी नेमलेला शासकीय आयोग. 1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यामध्ये त्या कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी व पुढील कृती ठरविण्यासाठी दहा वर्षांनंतर एका शासकीय आयोगाची नियुक्ती करण्याची तरतूद होती पण दोन वर्षे अगोदरच असा आयोग नेमण्यात येत असल्याची घोषणा ब्रिटिश पंतप्रधान बॉल्डविन यांनी 8 नोव्हेंबर 1927 रोजी केली. मुदतीच्या अगोदर आयोग स्थापन करण्याच्या घोषणेमागे इंग्लंडमधील सत्तारूढ काँझर्व्हेटिव्ह पक्षाचा कुटिल डाव होता. हा आयोग 1929 साली स्थापन व्हावयाचा होता पण त्या वर्षी इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून तीत मजूर पक्ष विजयी होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता आणि त्या पक्षाला भारताबाबत सहानुभूती होती. तेव्हा हा पक्ष सत्तेवर आला तर भारताच्या राजकीय भवितव्याचा विचार करणारी संकल्पित समिती तो पक्ष नियुक्त करेल व भारताला अवास्तव अधिकार देण्याची ती समिती शिफारस करेल, हा संभाव्य धोका टाळण्यासाठी बॉल्डविनच्या मंत्रिमंडळाने हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या आयोगाचे अध्यक्षपद सर जॉन सायमन ह्या लिबरल पक्षाच्या नेत्याला देण्यात आले. आयोगामध्ये चार काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे, दोन मजूर पक्षाचे व एक लिबरल पक्षाचा असे सात सदस्य होते. ह्या आयोगाने भारताला भेट देताना कोणती कार्यपद्घती अवलंबावी, याबद्दल स्पष्ट सूचना या आयोगाला दिल्या होत्या. केंद्रीय कायदे मंडळातील लोकनिर्वाचित भारतीय सदस्यांनी आपली एक प्रतिनिधी समिती गठित करावी, तशाच समित्या प्रांतिक कायदेमंडळांनीही बनवाव्यात व ह्या प्रतिनिधिमंडळांनी अस्तित्वात असलेल्या शासनपद्घतीबद्दलची आपली मते आणि राजकीय अधिकारांच्या मागण्या सायमन आयोगापुढे मांडाव्यात असे ठरविण्यात आले.

  1. पुढीलपैकी सत्य विधान कोणते ?

अ) लाव्हा मृदेचे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अर्धा भाग व्यापला आहे.

ब) या मृदेचे सर्वाधिक क्षेत्रफळ तुलनेने दक्षिण कोकण प्रदेशात आहे.

क) लाव्हा मृदेतून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कापसास अयोग्य आहे.

1) ‘अ’, ‘ब’ व ‘क’ 2) ‘ब’ व ‘क’

3) ‘अ’ व ‘क’ 4) यापैकी नाही

उत्तर : 4) यापैकी नाही

स्पष्टीकरण :

लाव्हा मृदेला काळी मृदा असेही म्हणतात. दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे. महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते. कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो. आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते. या मातीत लोह, अ‍ॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते. तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे. उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात.

पिके : काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते. कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे पिकवली जातात. या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते.

महाराष्ट्रातील काळी मृदा : सहय़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळय़ा मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते.

पिके : महाराष्ट्रातील सर्वोत्तम मृदेत काळी मृदा प्रसिद्ध आहे. कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस तसेच कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या उत्तम सोयी उपलब्ध झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. तसेच काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. विशेषत: गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील ऊस, कापूस, तंबाखू, भुईमूग वगरेंसारखी नगदी पिके, विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. खानदेशमध्ये तापी नदीच्या खोऱ्यात कापसाच्या खालोखाल केळीच्याही बागा व इतर पिकेही आहेत

  1. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली आहे.

ब) ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर ठरतील.

क) डेप्युटी गव्हर्नर पदावरून गव्हर्नरपदी नियुक्त होणारे ते आठवे डेप्युटी गव्हर्नर आहेत.

ड) भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर रघुराम राजन

1) ‘अ’ 2) ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’

3) ‘अ’, ‘ब’ आणि ‘ड’ 4) वरील सर्व

उत्तर : 4) वरील सर्व

स्पष्टीकरण :

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम 1771 मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती, 1926 च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी संसदेत 6 मार्च 1934 ला आर बी आय कायदा 1934 संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

सध्या शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत. 11 डिसेंबर, 2018 रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली.

  1. खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय निवडणूक आयोगाने अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे.

ब) सध्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची संख्या 7 झाली आहे.

क) तृणमूल कॉंग्रेस पक्षाला पश्चिम बंगालबरोबरच, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

1) अ आणि ब 2) अ आणि क

3) ब आणि क 4) अ, ब आणि क

उत्तर : 4) अ, ब आणि क

स्पष्टीकरण :

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. 1993 पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्त – अशोक लवासा.

15 मार्च 2019 रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण 2,334 राजकीय पक्ष असून, त्यापैकी 8 राष्ट्रीय पक्ष, 26 राज्यस्तरीय पक्ष आणि इतर 2,301 नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण 145 नोंदणीकृत पक्ष आणि 2 राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत.

8) भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील रेडिओ केद्रांच्या बंगाली कार्यक्रमांसाठी एकसमान मंच म्हणून कोणत्या वाहिनीची सुरुवात करण्यात आली ?

1) एकता वाहिनी 2) मैत्री वाहिनी

3) दोस्ती वाहिनी 4) समझोता वाहिनी

उत्तर : 1) एकता वाहिनी

स्पष्टीकरण :

बांगलादेशाची वार्षिक 8% दराने वाढणारी अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे, भारत-बांगलादेश मैत्री महत्त्वाची आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2019 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांच्या आताच हा दौरा झाला. भारत आणि बांगलादेश मित्र आहेत. त्यामुळे, या दोन देशांमधील विशेष नाते अधोरेखित करण्यावर या दौऱ्यात भर दिसून आला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ तर्फे ‘इंडिया इकॉनॉमिक फोरम’ नावाची परिषद 3 व 4 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भरवण्यात आली होती. त्यातही शेख हसीना यांनी भाग घेतला. त्यांना या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहाण्याचे निमंत्रण ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने दिले होते.

9) पॅरिस हवामानविषयक कराराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

अ) या करारानुसार चीनने आपले कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत जीडीपीच्या 60 ते 65 टक्क्यांनी कमी करण्याचे मान्य केले आहे.

ब) या कराराद्वारे अमेरिकेने 2025 पर्यंत आपल्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 2005 च्या पातळीच्या 26 ते 28 टक्के कमी करण्याचे मान्य केले आहे.

क) या करारानुसार सध्याचे पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणाच्या अगोदरच्या पृथ्वीच्या तापमानाशी तुलना करता 2 अंश सेल्सिअसने कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

1) अ आणि ब 2) ब आणि क

3) अ आणि ब 4) अ, ब आणि क

उत्तर : 4) अ, ब आणि क

स्पष्टीकरण :

पॅरिस करार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील (यु एन एफ सी सी सी) एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे. 195 देशांच्या प्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या 21व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला व 12 डिसेंबर 2015 रोजी या कराराला एकमताने मान्यता दिली. सर्व देशांनी आपापल्या संसदेची मान्यता मिळवून करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी 12 एप्रिल 2016 (पृथ्वी दिवस) पासून पुढे एक वर्ष कालावधी देण्यात आलेला होता. सध्या जगभरातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी किमान 55 टक्के उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या 55 देशांनी अधिकृत सह्या केल्या की हा करार सर्व जगाला लागू झाला असे मानण्याला सर्व देशांनी मान्यता दिलेली होती. 4 ऑक्टोबर 2016 रोजी या अटीची पूर्तता झाली, आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून हा करार अधिकृतरित्या लागू झाला असे जाहीर करण्यात आले. या कराराची अंमलबजावणी 2021 साली सुरु होणार आहे. तोपर्यंत कराराच्या अंमलबजावणीसाठी व अंमलबजावणीच्या पडताळणीसाठीचे सर्व नियम व अटी निश्चित केल्या जात आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणाऱ्या वातावरण बदलाच्या सभेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये यांवर वाटाघाटी होतात. पॅरिस कराराचे मुख्य उद्दिष्ट जागतिक वातावरण बदलाचा धोका नियंत्रित करणे हे आहे. त्यासाठी या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ औद्योगिक क्रांती पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसपेक्षा शक्य तितकी कमी होऊ देणे, हे ध्येय करारात ठेवण्यात आलेले आहे. अर्थातच हा करार 202 पासून 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी आहे. पण अंमलबजावणीच्या सोयीसाठी सध्याच्या करारात 2021 ते 2025 पर्यंत करायच्या प्रयत्नांची नोंद करण्यात आलेली आहे. प्रत्येक देशाने करारात द्यायचे योगदान त्या त्या देशातील शासनांनी देशांतर्गत विचारविनिमय करून स्वतः ठरवलेले आहे. 2020च्या अखेरपर्यंत सर्व देशांनी 2021 ते 2025 दरम्यान करण्याच्या कृतींचा वचननामा अंतिम स्वरूपात संयुक्त राष्ट्रसंघाच्या वातावरण बदल सभेला सादर करायचा आहे. 2025 पर्यंत प्रत्येक देशाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक वातावरण बदल सभा देखरेख ठेवेल. दरम्यानच्या काळात 2025 सालानंतरच्या प्रयत्नांसाठीही देशांनी स्वतः स्वेच्छेने पुढील कार्यक्रम तयार करून 2023 सालापर्यंत सभेला सादर करायचा आहे. सध्या सर्व देशांनी मिळून सादर केलेले कार्यक्रम कराराचे दीर्घकालीन ध्येय गाठण्यासाठी पुरेसे नाहीत. पण दर पाच वर्षांनी सर्व राष्ट्रे अधिकाधिक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ठरवतील, व या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करता येईल, आणि पुढे जाऊन ध्येयही 2 अंश सेल्सिअसवरून जगासाठी अधिक सुरक्षित अशा 1.5 अंश सेल्सिअस या मर्यादेपर्यंत खाली आणता येईल असा विश्वास करार करताना व्यक्त केला गेला आहे. औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांनी करारात अधिक जबाबदारी उचलणे अपेक्षित आहे. स्वतःच्या देशांतर्गत प्रयत्नांबरोबरच विकसनशील देशांना व विशेषतः गरीब देशांना हवामान बदलातील वाटा कमी करण्यासाठी किंवा कमी ठेवण्यासाठी, तसेच आत्तापर्यंत झालेल्या वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची जबाबदारी विकसित देशांवर टाकलेली आहे.

10) खालील विधाने विचारात घ्या.

अ) मदर टेरेसा यांना पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी येथे 4 सप्टेंबर, 2016 रोजी संतपद बहाल केले.

ब) मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट, 1910 रोजी कोलकाता येथे झाला होता.

क) त्यांना 1979 साली शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

ड) संतपद बहाल केल्यामुळे त्यांना आता ‘सेंट टेरेसा ऑफ कॅलकटा’ असे संबोधले जाणार आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) ब, क आणि ड 2) अ, क आणि ड

3) अ, ब आणि ड 4) अ, ब आणि ड

उत्तर : 2) अ, क आणि ड

स्पष्टीकरण :

मदर तेरेसा : (26 ऑगस्ट 1910 – 5 सप्टेंबर 1997) एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्‍याची मुलगी. तिचे बालपण सुखात गेले. स्कॉपये येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (1929).

11) भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) कोणत्या सहकारी बँकेला ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस यंत्रणा’ (युपीआय) वापरण्याची परवानगी दिली आहे ?

1) ठाणे जनता सहकारी बँक 2) नगर जनता सहकारी बँक

3) पुणे जनता सहकारी बँक 4) सोलापूर जनता सहकारी बँक

उत्तर : 1) ठाणे जनता सहकारी बँक

स्पष्टीकरण :

युनिफाईड पेमेंट इंटरफेस (स्थापना इ.स. 2016) Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. 11 एप्रिल 2016 पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. 50 व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.

12) जागतिक नावीन्यता निर्देशांक 2016 अनुसार –

अ) या क्रमवारीत स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे.

ब) या निर्देशांकानुसार एकूण 128 देशांमध्ये भारत 66 व्या स्थानी राहिला.

क) सन 2015 मध्ये भारत 81 व्या स्थानी होता.

ड) मध्य उत्पन्न गटात असणारा चीन हा सर्वोच्च 25 देशांमध्ये समाविष्ट होणारा एकमेव देश ठरला आहे.

1) अ, ब आणि ड 2) अ, ब आणि क

3) अ, ब, क आणि ड 4) यापैकी कोणतेही नाही.

उत्तर : 3) अ, ब, क आणि ड

स्पष्टीकरण :

जागतिक नावीन्यता निर्देशांक हा वार्षिक निर्देशांक त्या देशांचा जाहिर होतो ज्यांनी काहीतरी नावीन्य केले आहे. हा निर्देशांक कॉर्नेल विद्यापीठ , इनसेड आणि जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटनेने इतर संस्था आणि संस्था यांच्या कडुन प्रकाशित केले जातो.

13) खालील विधानांचा विचार करा.

अ) 1000 ते 3000 मि.मी. पर्जन्य होणार्‍या प्रदेशात सर्वसाधारणत: निम सदाहरित वने आढळतात .

ब) सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागांत ही वने आढळतात.

क) येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी इ. वृक्ष प्रमुख आहेत.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत ?

1) फक्त अ 2) फक्त ब

3) अ आणि ब दोन्ही 4) अ, ब आणि क

उत्तर : 4) अ, ब आणि क

स्पष्टीकरण :

सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्ण तापमान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो. सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिक दृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.

14) भारतीय मान्सूनबाबत खालीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत.

अ) नैर्ॠत्य मान्सूनचे आगमन बंगालच्या उपसागरातील अंदमान – निकोबार बेटांवर 25 मे च्या दरम्यान होते. पुढे 1 जून रोजी ते केरळच्या किनार्‍यावर पोहोचतात.

ब) अरबी समुद्रावरून येणारी मान्सून वार्‍यांची शाखा 10 जूनपर्यंत मुंबई, 15 जूनपर्यंत मध्य भारत, 1 जुलैपर्यंत पंजाब – हरियाणामध्ये तर 15 जुलै रोजी राजस्थानच्या पश्चिम भागात पोहोचते.

क) बंगालच्या उपसागरावरील मान्सून वार्‍यांची शाखा 7 जूनपर्यंत कोलकात्यास पोहोचते.

1) अ आणि ब 2) अ आणि क

3) ब आणि क 4) वरीलपैकी सर्व

उत्तर : 4) वरीलपैकी सर्व

स्पष्टीकरण :

विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यानांच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात. या वाऱ्यांपासून भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नैर्ऋत्येकडून येणारे वारे समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेशतात. मान्सून म्हणजे दुसरे तिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. भारताची भौगोलिक रचना द्विपकल्पीय आहे. तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमीन. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते, आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे समुद्राकडून कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात, हे वाऱ्यांत बाष्प मोठ्या प्रमाणात असते. हे बाषपयुक्त वारे जमिनीवरील समुद्रसपाटी पासून उंचावर असलेल्या भागात जातात व तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने परत फिरतात आणि एक चक्र पूर्ण होते. याच काळात जेव्हा हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरुन वाहात असते, तेव्हा ती हवा थंड होते. यामुळे वाऱ्याची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, आणि ते पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर बरसतात. यालाच मान्सूनचा पाऊस असे म्हटले जाते. भारतीय उपखंडात ही क्रिया साधारणपणे मे च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरंतर सुरू असते. त्यामुळेच भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या काळ नैर्ऋत्य मोसमी पावसाचा म्हणून ओळखला जातो. या उलट हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हे वाऱ्याचे चक्र उलटे फिरते. या काळात जमिनीवरचे तापमान समुद्रावरील तापमानापेक्षा तुलनेत कमी असते. त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात. भारतीय उपखंडावरील मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यामुळे भारतात सर्वत्र सारख्याच प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यात दर 5 ते 10 किलोमीटरवर फरक पडतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अनेक वर्षांच्या निरीक्षणावरून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम 20 मे च्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत 1 जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो 5 जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. नंतर प्रवास करत तो 10 जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. मान्सूनला दाखल होण्याला ऑनसेट ऑफ मान्सून असे संबोधतात. दरवर्षी मान्सून या ठरावीक तारखेलाच येतो असे होत नाही. काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस अगोदर किवा पाच ते सहा दिवस विलंबाने दाखल होतो. यालाच मान्सून यंदा लवकर आला किंवा उशिरा आला असे म्हटले जाते.

15) जगातील प्रमुख द्वीपसमूह क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.

अ) न्यूगिनी ब) जपान

क) कॅनेडियन आर्क्टिक ड) मलेशिया

1) अ) मलेशिया, ब) कॅनेडियन आर्क्टिक, क) न्यूगिनी, ड) जपान

2) अ) जपान, ब) मलेशिया, क) कॅनेडियन आर्क्टिक, ड) न्यूगिनी

3) अ) न्यूगिनी, ब) जपान, क) कॅनेडियन आर्क्टिक, ड) मलेशिया

4) अ) कॅनेडियन आर्क्टिक, ब) न्यूगिनी, क) मलेशिया, ड) जपान

उत्तर : 1) अ) मलेशिया, ब) कॅनेडियन आर्क्टिक, क) न्यूगिनी, ड) जपान

स्पष्टीकरण :

मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. 3,29,847 वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. जपान देश पूर्णपणे बेटांवर वसला असून त्याची कोणत्याही इतर देशासोबत जमिनीवरील सीमा नाही. पूर्व आशियाच्या पॅसिफिक किनारपट्टीवर जपानकडे एकूण 6,852 बेटे आहेत. मुख्य बेटे, उत्तर ते दक्षिणेस, होक्काइदो, होन्शु, शिकोकू आणि क्युशू आहेत. रायुकू द्वीपसमूह, ज्यात ओकिनावाचा समावेश आहे, ते क्युशूच्या दक्षिणेला एक शृंखलेत आहेत. एकत्रितपणे ते बर्याचदा जपानी द्वीपसमूह म्हणून ओळखले जातात. जपान बेटे प्रशांत महासागरतील रिंग ऑफ फायरवरील ज्वालामुखीच्या झोनमध्ये स्थित आहेत. जपान मूलतः युरियन खंडाच्या पूर्व किनारपट्टीशी संलग्न होता सुमारे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी उपनगमन करणाऱ्या पट्ट्या जपानच्या पूर्वेकडे नेली.

16) खालील प्रश्नांमध्ये सुरूवातीस एक घडी न घातलेला कागद दिलेला आहे. त्यावर विशिष्ट नक्षी काढलेली आहे. त्या कागदाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदू रेषेवर घडी घातल्यास तो कसा दिसेल, ते पर्यायतून शोधा.

1) 2) 3) 4)

उत्तर : 4)

स्पष्टीकरण :

कागदाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदू रेषेवर घडी घातल्या वर कागदाच्या दोन्ही बाजुला मधोमध असलेली नक्षी पर्याय 4 मध्ये दाखविल्याप्रमाणे एकमेकांवर येईल.

17) पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे ?

अ) काशीनाथ विष्णू फडके यांनी ‘नेटिव्ह ओपिनियन’ हे वृत्तपत्र केले.

ब) इ.स. 1861 पासून या वृत्तपत्रात उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत.

क) या वृत्तपत्राने इ.स. 1885 ते 1888 या काळात रखमाबाई खटल्यात सनातनी विचारसरणीस पाठिंबा दिला होता.

1) केवळ ‘अ’ 2) केवळ ‘अ’ आणि ‘क’

3) ‘ब’ आणि ‘क’ 4) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’

उत्तर : 3) ‘ब’ आणि ‘क’

स्पष्टीकरण :

अरुणोदय हे ठाणे शहरातून प्रसिद्ध होणारे पहिले मराठी दैनिक होते. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. 22 जुलै 1866 रोजी अरुणोदयचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुंबईतील पहिल्या वर्तमानपत्रानंतर 34 वर्षानंतर ठाण्यात वर्तमान पत्र सुरू झाले. ठाणे हे मुंबईच्या जवळ असून व रेल्वे सुविधा असूनही ठाण्यात वर्तमान पत्र निघण्यास खूप वर्षाचा काळ लोटला. जहाल मतप्रणालीच्या पुरस्काराप्रमाणे अरुणोदयाचे काही नवीन उपक्रमही उलेखनीय आहेत. ठिकठिकाणी बातमीदार नेमून त्यांच्या करवी बातम्या मिळविण्याच्या सध्याच्या बातमीसंस्थांच्या अभावी त्याकाळची वर्तमानपत्रे ही इंग्लिश वृतपत्रांतील वा समकालीन इतर वृत्तपत्रांतील बातम्यांवर आधारित वृतसार देत असत. अरुणोदय स्वतंत्र बातमीदारांकरवी बातम्या मिळवित असे. याशिवाय नव्या वर्षांच्या पहिल्या अंकात मागील वर्षातील लेखांची आद्याक्षरनुसार यादी अरुणोदयमध्ये देण्यात येत असे.

18)कॉंग्रेसच्या ध्येयधोरणावर टीका करताना ‘प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसांचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे’, असे कोणी म्हटले ?
1) लाला लजपत राय 2) अरविंद घोष

3) अश्विनीकुमार दत्त 4) सुभाषचंद्र बोस

उत्तर : 3) अश्विनीकुमार दत्त

स्पष्टीकरण :

अश्विनी कुमार दत्त हे भारताचे एक प्रसिद्ध राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि देशभक्त होते. शिक्षक म्हणून त्यांनी व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. ते काँग्रेसच्या 1886 च्या अधिवेशनास प्रतिनिधि म्हणून उपस्थित होते. बंगालच्या फाळणीने अश्विनीकुमार दत्त यांचे विचार बदलले. नरम विचारांच्या राजकारण्याऐवजी ते एक मजबूत मनाचे राजकारणी झाले. ते लोकांच्या मूलगामी विचारांचे प्रतीक बनले. त्यांच्या या शब्दांचे पालन बरीसालच्या लोकांनी कायदा म्हणून केले.

19) संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील ‘अकोला कराराबाबत’ खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ) संयुक्त महाराष्ट्राच्या एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.

ब) संपूर्ण प्रांतासाठी दोन लोकसेवा आयोग असावे.

क) संपूर्ण प्रांतासाठी एक राज्यपाल व दुय्यम राज्यपाल असावेत.

1) अ आणि ब 2) ब आणि क

3) अ आणि क 4) वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर : 3) अ आणि क

स्पष्टीकरण :

1947 चा अकोला करार हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रांत आणि बेरार मधील कॉंग्रेस नेत्यांमधील करार होता. महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत करण्यासाठीचा हा करार होता. धर कमिशनपुढे मराठी भाषिक प्रान्तरचनेची मागणी एकमुखाने स्पस्ट व नेमके पनाने मॉंडन्यासाठी निवड कार्यकर्त्यांची अकोलायेथे बैठक झाली. त्यामधे शंकरराव देव, मा.सां. कन्नमवार, रामराव देशमुख, धनंजय गाडगीळ, पूनमचंद राका, प्रमिलताई ओक, पंढरीनाथ पाटिल इ. मान्यवरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली विचार विनिमया नंतर 8 ऑगस्ट 1947 रोजी “अकोला करार ” संमत झाला.

या करारातील कलमे पुढील प्रमाणे – संयुक्त महाराट्र असा एक प्रांत असावा त्यामध्ये मध्य प्रांत वरह्राड मधील मराठी भाषिकांचा व महाराष्ट्राचा असे उपप्रांत ठेवावे. प्रत्येक उपप्रांताला अलग कायदे मंडळ व मंत्रिमंडळ असावे. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्र घ्याव्यात. कायदेमंडळामध्ये लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधी असावेत. उपप्रांताची उच्च न्यायालये स्वतंत्र असतील. प्रांतासाठी एक पब्लिक सर्विस कमीशन असावे. अकोला बैठकीत वरील ठरल्याप्रमाणे असे ठरले की, संयुक्त महारास्ट्राची निर्मिती करने अश्यक्य झाल्यास “महाविदर्भ” हा स्वतंत्र प्रांत निर्माण करावा.

20) भारत आणि महाराष्ट्र यांच्या लोकसंख्येचा विचार करता पुढीलपैकी कोणत्या बाबीमध्ये महाराष्ट्र हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे आहे ?

अ) लोकसंख्या घनता ब) लिंग – गुणोत्तर

क) नागरिकीकरणाचे प्रमाण ड) दशवार्षिक वाढीचा दर
1) क आणि ड 2) अ आणि ब
3) फक्त क 4) फक्त ड

उत्तर : 3) फक्त क
स्पष्टीकरण :
शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया. 20,000 अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस ‘नागरी’ (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे परंतु जनगणना करणारी सर्वंच राष्ट्रे ही शिफारस अंमलात आणतातच असे दिसत नाही. विसाव्या शतकात वाहतूक व दळणवळण क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे शहरांतील लोकसंख्या आणि कारखाने शहरांबाहेर पसरू लागले शहरांची महानगरे बनू लागली व अमेरिकेसारख्या देशांत काही विशालनगरेही अस्तित्वात आली. विकसित देशांमध्ये मोटारगाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्याने शहरांची महानगरे होण्यास विशेष मदत झाली. त्याच महानगरांत आता मोटारींची संख्या अतोनात वाढल्यामुळे वाहतुकीत अडथळे व प्रदूषणाचे दुष्परिणाम वाढत्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका यांमधील राष्ट्रांत नागरीकरण झपाट्याने होत असल्याने त्याचा दृश्य परिणाम म्हणजे गलिच्छ वस्त्या व झोपडपट्ट्या यांचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. तेथे घर, पाणी, सफाई व वाहने यांच्या सोयी अपुऱ्या पडत आहेत व नागरी जीवन निकृष्ट दर्जाचे होत आहे. आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांमध्ये शासनातर्फे गृहनिवसन, शहरांचे नूतनीकरण, नगररचना इ. क्षेत्रांत प्रगतीचे प्रयत्न सुरू झाले असल्याने शहरांची सुधारणा होऊ लागली आहे. विकसनशील देशांत मात्र शासनांना असे प्रयत्न पुरेशा प्रमाणावर करण्यासाठी पैशाचा व साधनांचा पुरवठा अपुरा पडत आहे. उपलब्ध साधनसंपत्ती इतर अधिक आवश्यक अशा आर्थिक विकासाच्या कार्यक्रमासाठी वापरावी लागत आहे. नागरीकरणामुळे नागरी व्यक्तीचा संबंध फक्त थोड्या लोकांशीच न येता कितीतरी नागरिकांशी येतो. लहानशा गावात किंवा खेड्यात व्यक्तिव्यक्तींचे अन्योन्यसंबंध अतिशय निकटचे व भावनाप्रधान असतात. शहरांत मात्र हे संबंध केवळ उपयोगितेवर आधारित असल्याने त्यांच्यामध्ये भावनांचा ओलावा नसतो. शहरवासीयांचे आचार व विचार परंपरेवर अवलंबून राहण्याऐवजी व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेले असतात. त्यांच्यावरील अनौपचारिक समाजबंधनांची पकड नाहीशी झाल्यामुळे शहरांमध्ये बाल-अपचारिता, गुन्हेगारी, दारूबाजी, वेश्याव्यवसाय, आत्महत्या, मनोवैफल्य, सामाजिक अशांतता व राजकीय अस्थिरता यांचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकरणामुळे समाजातील विविध स्तरांच्या महत्त्वातही बदल झाला आहे. व्यापारी शहरांच्या उदयामुळे व्यापारी लोकांची सत्ता वाढली व जमीनदारांची त्या मानाने कमी झाली. औद्योगिक शहरांतून उद्योगपती, वित्तदाते व व्यवस्थापक यांच्या संपत्तीत भर पडून त्यांची सत्ता वाढली. बुद्धिमंतांना व व्यवसाय करणाऱ्यांनाही समाजात विशेष दर्जा प्राप्त झाला.

‘लोकसंख्या घनता’ हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील लोकसंख्येचे वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे. लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

लिंग गुणोत्तर हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण 1:1 असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.

21) पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे ?

अ) ‘अग्रणी बँक योजना’ सन 1969 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) वित्तपुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन ‘अग्रणी बँक योजना’ सुरू करण्यात आली.

1) केवळ अ 2) केवळ ब

3) अ आणि ब दोन्ही 4) अ व ब अयोग्य

उत्तर : 3) अ आणि ब दोन्ही

स्पष्टीकरण :

14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा’ ने राष्ट्रीयीकृत बँकांना ‘क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण’ लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.) 1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली “बँक व्यावसायिकांची समिती” (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा “क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण” मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व “अग्रणी बँक योजना” तयार केली. 1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले. मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही. अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची “अग्रणी बँक” म्हणून दर्जा देण्यात आला. असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच, जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

22) लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिणामांचा समावेश होतो. ती म्हणजे
1) जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रमबाजारातील सहभाग

2) सरासरी आयुर्मान, शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पन्न / मिळकत

3) शिक्षण, आर्थिक सहभाग अनिओ आर्थिक संसाधनांची मालकी

4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर : 1) जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रमबाजारातील सहभाग

स्पष्टीकरण :

हा निर्देशांक सन 2006 पासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. विविध क्षेत्रांतील लिंगभावसापेक्ष असमानता आणि तिच्यामध्ये होणारी प्रगती दरवर्षी मोजणे या हेतूने केलेल्या अभ्यासातून हा निर्देशांक तयार होतो. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांच्या सहभागाबाबत वेगवेगळ्या पलूंची तुलना करून चार उपनिर्देशांक तयार करण्यात आले आहेत व त्यांच्या आधारे देशांना 0 ते 1 दरम्यान गुण देण्यात येतात. यामध्ये 0 गुणाचा अर्थ संपूर्ण असमानता तर 1 गुणाचा अर्थ संपूर्ण समानता असा होतो.

23) पंचवार्षिक योजनांबाबत खालील विधानांचा विचार करा.

अ) 6 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धीदर साध्य होण्यास 7 व्या योजनेपासून सुरुवात झाली.

ब) आतापर्यंतच्या सर्वाधिक विकास दर 10 व्या योजनेत दिसून आला.

क) आतापर्यंतच्या योजनांपैकी केवळ पाच योजनांमध्येच आर्थिक वृद्धीचा साध्यदर लक्ष्य दरापेक्षा जास्त आला आहे.

1) अ आणि ब बरोबर 2) फक्त क बरोबर

3) अ आणि क बरोबर 4) सर्व चूक

उत्तर : 3) अ आणि क बरोबर

स्पष्टीकरण :

पंचवार्षिक योजना (एफवायपी) केंद्रीयकृत आणि एकात्मिक राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहेत. जोसेफ स्टालिन यांनी 1928 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबविली. बहुतेक कम्युनिस्ट राज्यांनी आणि अनेक भांडवलदार देशांनी त्यानंतर त्यांना स्वीकारले. चीनने 2006 ते 2010 पर्यंत एफआयपी वापरणे चालू ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी योजना (जीहुआ) ऐवजी मार्गदर्शक (गुइहुआ) नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ताबडतोब भारताने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली 1951 मध्ये भारताने पहिले एफवायपी सुरू केले. पहिली पंचवार्षिक योजना ही सर्वात महत्वाची होती, कारण स्वातंत्र्यानंतर भारतीय विकासाच्या प्रारंभामध्ये त्याची मोठी भूमिका होती. अशा प्रकारे, त्यांनी कृषी उत्पादनास जोरदार पाठिंबा दर्शविला आणि देशाचे औद्योगिकीकरण देखील सुरू केले (परंतु जड उद्योगांवर लक्ष केंद्रित करणार्‍या दुसर्‍या योजनेपेक्षा कमी). सार्वजनिक क्षेत्रातील (उदयोन्मुख कल्याणकारी राज्यासह) तसेच वाढत्या खाजगी क्षेत्रासाठी (बॉम्बे प्लॅन प्रकाशित करणाऱ्या काही व्यक्तींनी प्रतिनिधित्व केलेले) ही एक उत्तम भूमिका असलेल्या मिश्र मिश्रित अर्थव्यवस्थेची विशिष्ट व्यवस्था निर्माण केली.

24) सेवाकराबाबतीत पुढील विधानांचा विचार करा.

अ) राष्ट्रीय उत्पन्नात सेवाकराचा 50% पेक्षा अधिक वाटा आहे.

ब) सेवाकराला घटनात्मक दर्जा 83 व्या घटनादुरुस्तीनुसार मिळाला.

क) त्यानुसार घटनेत 268 A या नवीन कलमाचा समावेश झाला.

ड) सेवाकराची आकारणी केंद्र सरकार मार्फत होते तर वसुली राज्य व केंद्र सरक मार्फत होते.

योग्य विधान निवडा.

1) अ आणि ब 2) अ, क, ड

3) फक्त क 4) सर्व योग्य आहेत.

उत्तर : 2) अ, क, ड

स्पष्टीकरण :

एखाद्या व्यक्तीस प्रदान केलेल्या सेवांवर सेवा कर आकारला जातो आणि हा कर भरणे ही सेवा प्रदात्याची जबाबदारी आहे. हा अप्रत्यक्ष कर आहे कारण सेवा देणार्‍याकडून त्याच्या व्यवसाय व्यवहाराच्या कालावधीत सेवा प्राप्तकर्त्याकडून शुल्क आकारले जाते. भारतात सेवा कर वित्त अधिनियम, 1994 मध्ये लागू केले गेले. हा कर सुरुवातीला 1994 मध्ये सेवांच्या तीन संचावर आकारण्यात आला होता आणि त्यानंतरच्या अर्थ कायद्यांद्वारे सेवा कर क्षेत्रात सतत वाढविण्यात येत आहे. वित्त कायद्यांतर्गत जम्मू-काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतभर सेवा कर आकारला जात आहे.

25) खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य प्रकारे जुळविल्या आहेत ?

अ) मादक औषधी पदार्थ – कॅनाबीस अफू

ब) कीटकनाशके – एन्ड्रीन, रोगोर

क) स्फोटके – आर. डी. एक्स, टी. एन. टी.

1) अ, ब व क बरोबर आहेत. 2) ब व क बरोबर आहेत.

3) अ व क बरोबर आहेत. 4) अ व ब बरोबर आहेत.

उत्तर : 1) अ, ब व क बरोबर आहेत.

स्पष्टीकरण :

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व तीपासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा , चरस (हशिश), विविध प्रकारची मद्ये वगैरे पदार्थाचा मादक पदार्थांत समावेश केला जातो. या पदार्थांचे दीर्घ काळ सेवन करीत राहिल्यास प्रथम त्यांची सवय जडते व नंतर व्यसन लागते. इंग्रजीत वापरण्यात येणाऱ्या Narcotics या संज्ञेत मोडणारे पदार्थ मुख्यत्वे वेदनाशामक आहेत पण त्याचबरोबर त्यांमुळे एक प्रकारची गुंगी वा निद्रेची अवस्था, आसक्ती (व्यसनाधीनता) आणि आनुषंगिक परिणाम उद्‌भवतात. या पदार्थांना मादक वेदनाशामके अशीही संज्ञा वापरली जाते. या पदार्थांत अफू व तीपासून मिळणारे विविध पदार्थ, तसेच त्यांसारखे अर्धसंश्लेषित (नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेले उदा., हेरॉईन) व संश्लेषित (घटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार केलेले) पदार्थ यांचा समावेश करण्यात येतो. मादक पदार्थ हे शुद्धीत असलेल्या माणसाच्या वेदनाशमनासाठी उपलब्ध असलेल्या औषधांपैकी सर्वांत प्रभावी आहेत. इतर वेदनांपेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या वेदनांवर (उदा., जठरांत्र मार्गातील – म्हणजे जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनणाऱ्या अन्नमार्गातील -अथवा मूत्रवाहिनीतील) ॲ‌स्पिरीन, ॲ‌सिटामिनोफेन व तत्सम मादक नसलेल्या औषधांपेक्षा मादक पदार्थांचा उपचार अधिक उपयुक्त ठरलेला आहे.

मानव व प्राणी यांना होणाऱ्या काही रोगांच्या जंतूंचा प्रसार करणाऱ्या तसेच शेतातील पिके, साठविलेले अन्नधान्य, कपडे, लाकूड इ. जीवनावश्यक साहित्याचा नाश करणाऱ्या कीटकांचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांना कीटकनाशके असे म्हणतात. उपद्रवी कीटकांचा नाश करण्याच्या पद्धती फार प्राचीन काळापासून माहीत आहेत, पण मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करून कीटकांचा नाश करण्याचे प्रयत्न हे अलीकडच्या काळातील आहेत. आर्सेनिकाचा कीटकनाशक म्हणून उपयोग करीत असत, असा उल्लेख प्लिनी (इ.स.70) यांनी आपल्या लिखाणात केलेला आहे. गंधक जाळून त्याच्या धुराने कीटक नाहीसे होतात असा उल्लेख होमर यांच्या ग्रंथात सापडतो. रोमन लोक कीटकनाशासाठी हेलेबोअर (व्हेराट्रम, वंश हेलेबोरस) या वनस्पतीच्या मूलक्षोडाचे (हळदीच्या गड्ड्यासारख्या खोडाचे) चूर्ण वापरत. सोळाव्या शतकाच्या अखेरीस चिनी लोकांनी आर्सेनिक सल्फाइडाचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला. त्याच सुमारास अमेरिकेत स्पॅनिश लोक सबदिल्ला या रसायनाचा उपयोग उवानाशक म्हणून करीत असत, असा उल्लेख आढळतो. भारतात. प्राचीन काळी प्राणी व कीटक यांच्या नाशासाठी विषाचा उपयोग करीत असत असे उल्लेख मनुस्मृति, कौटिलीय अर्थशास्त्र, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन ग्रंथांत मिळतात. ऊद, धूप इत्यादींच्या धुरामुळे कीटकांचा त्रास कमी होतो असे आढळून आल्याने धार्मिक बाबींइतकाच कीटकनाशासाठीही त्यांचा उपयोग करीत असत.

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply