संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 12

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 12 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 12

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 12

  • दैव देते आणि कर्म नेते – नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.
  • दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी – नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.
  • दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला – नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे
  • दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई -नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
  • दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी – दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.
  • दृष्टीआड सृष्टी – आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
  • दही खाऊ की मही खाऊ  – हे करू की ते करू 
  • दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला  – क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च 
  • दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती  – जेथे दया ,क्षमा ,शांतीआहे तेथे परमेश्वर वास करतो 
  • दक्षिणा तशी प्रदक्षिणा  – जशी दक्षिणा देतात तसाच भाव देतात
  • दये सारखा धर्म नाही  – दुसर्‍या वर दया करणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे 
  • दाम तसे काम  – जशी मजुरी तसे काम 
  • दाट पेरा देई नुसता चारा  – खूप दाट पेरणी केल्यास केवळ चारच होतो 
  • दिल्या भाताचा हलक्या हाताचा  – सांगकाम्या मनुष्य 
  • दिवसा चूल आणि रात्री मूल  – एवढे काम की मुळीच वेळ नसणे 
  • दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा – दुसर्‍याची भाकरी पत्करून मिळेल ते अन्न खाऊन जगणे 
  • दिसते तसे नसते म्हणून जग फसते  – बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून त्या तशा नसतात 
  • दिसायला काम नाही बसायला वेळ नाही  – सतत कामात असणे पण काम दिसून न येणे 
  • दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा  – दिसायला भोळा पण मतलबाचा पक्का 
  • दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना – दुःख स्वतःच पचवावे , सुख मात्र सर्वाना सांगावे
  • दुसर्‍याच्या माथे तुळजापूरला जाते  – दुसर्‍याच्या जीवावर मौजमजा करणे 
  • दुहेरी बोलाची कवडी मोलाची  – दोन्हीं कडून बोलणाऱ्यांची किंमत कमी करणे 
  • देव तारी त्याला कोण मारी  – देवाची कृपा असल्यावर कोण वाईट करू शकेल 
  • देवाची करणी नारळात पाणी  – परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही 
  • देवाला फूल घराला मूल  – ज्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर फूल शोभून दिसते त्याप्रमाणे घरात मुलाने शोभा येते 
  • दहा मरावे पण दहांचा पोशिंदा मरू नये  – शेकडो सामान्य माणसे मेली तरी इतके वाईट वाटत नाही पण ज्यावर शेकडो लोक अवलंबून असतात तो जर मरण पावला तर अतिशय वाईट वाटते 
  • दादा राम राम  – फक्त कामापुरता संबंध 
  • दानधर्म किल्ली स्वर्गदार उघडवी  – दानधर्म केल्याने स्वर्गाची प्राप्ती होत असते 
  • दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो  – थोडे थोडे काम केल्यास बरेच मोठे काम होते 
  • दारू चढते अक्कल जाते  – दारूची नशा  आली म्हणजे बुद्धी नष्ट होते 
  • दिवस जातो पण बोल उरतो  – काळ निघून जातो पण वाईट शब्द कायम राहतात 
  • दिवस सर्व सारखे नसतात  – मनुष्याचा काळ नेहमी सारखा नसतो 
  • दिसताच पूर सगळे गिळे – थोडासुद्धा धीर नसणे 
  • दीड हळकुंडात दिपवाळी  – थोडेसे मोठेपण मिळाले की बिथरणे 
  • दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा  – दुष्ट मनुष्यासोबत संगत केल्यापेक्षा एकटे बसणे बरे 
  • दुष्ट मेला, विटाळा गेला  – दुष्ट माणूस मेला तर लोकांना वाटते बरी बला गेली 
  • देवळात दाटी अंगारा साठी  – क्षुल्लक गोष्टीसाठी धडपड 
  • दो बोला साख झेली – तोंड चोपडी 
  • दोन्ही हाती पुर्‍या नवसाबाई खऱ्या  – फायदा होत असेल तर स्तुती करणे 
  • दसकी लकडी एकका बोजा – प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावल्यास सहकार्याने मोठे काम पूर्ण होते 
  • दुनिया झुकती है। झुकानेवाला चाहिये  – लोकांना मूर्ख बनवणारा अगर फसविणारा एखादा ठकसेन असला तरी फसले जाणारे अनेकजण या जगात आहेत 
  • धर्म करता कर्म उभे राहते – एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
  • धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी – कोणत्याच कामाचे नसणे.
  • धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या – गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.
  • धड तुला न मला घाल कुत्र्याला  – काही माणस कशी असतात की त्यांचा स्वतः चा लाभ होत नसेल तर दुसर्‍या चाही लाभ होऊ नये म्हणून नासधूस करतात 

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply