संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 18
- यथा राजा तथा प्रजा – सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात
- या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे – बनवाबनवी करणे
- येरे माझ्या मागल्या – ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे
- ये रे कुत्र्या खा माझा पाय – आपण होऊन संकट ओढवून घेणे
- यथाअनुष्ठान, तथा सिद्धी – जशी खटपट तसे फळ
- यथा गुरू तथा शिष्य – गुरू तसा चेला
- याचि देही याचि डोळा – आपल्या हयातीतच
- याची पागोटी त्याच्या डोक्यावर – एखादी वस्तू दुसर्यास देऊन व्यवहार चालविणे
- याचे दार, त्याचे दार, उठ मेल्या खेटर मार- दुसर्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे
- येगे कळा बस माझ्या नळा – भांडण उकरून काढणे
- येरे गोट्या पड माझ्या पाया – जाणूनबुजून एखादे संकट ओढवून घेणे
- येरे उंबरा पड तोंडात – दैवावर विसंबून राहणे
- येथे कोणाची डाळ शिजत नाही – येथे कोणाचे काही चालत नाही
- यत्न तो देव जाणावा – प्रयत्न करणे श्रेष्ठत्वाचे असते
- रंग जाणे रंगारी- ज्याची विद्या त्यालाच माहीत
- रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर पण वेळ थोडा असणे
- रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे
- रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत – मुख्य गोष्टीचा अभाव
- राईचा पर्वत करणे- मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे
- राज्याचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची
- रोज मरे त्याला कोण रडे – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही
- रिकामे मन सैतानाचे घर – मन रिकामे असले, की कुविचार त्यात थैमान घालतात.
- रंग झाला काळा अजून नाही गेला चाळा – म्हातारपण आले तरी रंगेलपणा गेला नाही
- रडत राऊत, काय चालवित औत- ज्या माणसाला दुसर्याच्या आधाराशिवाय चालता येत नाही तो शेती कसा करेल
- राजाला दिवाळी काय माहीत – रोजच्या गोष्टीचे नावीन्य वाटत नाही
- रक्ताचे पाणी सुखाची कहाणी – कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही
- रत्नापोटी गारगोटी – उत्तम मनुष्याची कूलक्षणी संतती
- रवी अरुण न्याय – सूर्याच्या आधी अरुणोदय होतो
- रस्ता चुकले की दुप्पट चालावे लागते – सरळ मार्गाने काम न केल्यास फार त्रास होतो
- राईचा पर्वत केला,संतोष झाला मूर्खाला – मूर्ख मनुष्यास गोष्टी फुगवून सांगण्यात नेहमी आनंद वाटतो
- राईचा भाव रात्री गेला – नेहमी सारखीच परिस्थिती नसते
- राखशील ओज तर होईल चीज- काहो तेज दाखविल्यासच कौतुक होते
- राखेल त्याचे घर, खनेल त्याचे शेत – जो काळजीपूर्वक श्रम करतो त्यालाच लाभ होतो
- रागाची स्वारी आश्वाच्या पाठीवर – राग फार काळ टिकत नाही
- राजापासून रंकापर्यंत – श्रीमंतापासून गरिबापर्यंत
- राजा बोले दळ हाले – राजाच्या हुकमा प्रमाणे कारभार चालतो
- रात्री खाती तूप सकाळी पाहते रूप – अतिशय उतावीळपणा
- रांधवे तसे जेवावे – जशी कृती तसे फळ
- रानडुक्करासारखी मुसंडी – सरळ सरळ हल्ला
- राव राबतात, देव कापतात – जो श्रम करतो त्याला देव सुद्धा भितो
- राव गेले रणी आणि भागूबाईची पर्वणी – मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत शूद्र माणसे आपली शान दाखवतात
- राहायला सावली,खायला पायली – राहण्यास चांगले घर, खायला चांगली भाकर
- रिकामा काम करी, सांज सकाळ फेरी – काम नसेल की माणूस विनाकारण खेपा घालतो
- रुचेल ते बोलावे पचेल ते खावे – योग्य तेच बोलावे व अपचन होणार नाही तेवढेच खावे
- रोम एका दिवसात बांधले गेले नाही- कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो एकदमच काही होत नाही
- लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस – मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे
- लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही
- लग्नाला गेली आणि बारशाला आली – अतिशय उशिराने पोहोचणे
- लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो
- लाज नाही मला कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही
- लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
- लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण – लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही
- लहान तोंडी मोठा घास – आपल्या योग्यतेपेक्षा अवघड काम हाती घेणे.
- लाथ मारीन तेथे पाणी काढीन – स्वतः च्या क्षमतेवर विश्वास असणे
- लवण तेथे जीवन – जेथे मीठ तेथे पाणी
- लहान मूर्ती पण थोर कीर्ती – शारीरिक दृष्टीने कित्येक लहान दिसतात परंतु त्यांची कर्तृत्वशक्ती महान असते
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा