संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 5

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 5-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 5

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 5

  • कान फुकणे (कान भरणे) – चुकली (चुगली) करणे, चहाड्या करणे, मनात किल्मिश निर्माण करणे.
  • कान उघाडणी करणे – खरमरीत उपदेश करणे, कडक शब्दात चूक दाखवून देणे.
  • कानठळ्या बसणे – मोठा आवाज ऐकल्याने काही काळ काहीच ऐकू न येणे.
  • काना डोळा करणे – दुर्लक्ष करणे.
  • कानावर पडणे – सहजगत्या माहीत होणे, ऐकण्याचा योग येणे.
  • कानावर येणे – माहीत असणे, ऐकणे, कळणे.
  • काळे करणे – देशांतरास जाणे.
  • कानावर हात ठेवणे – नाकबूल करणे, नकारात्मक भूमिका घेणे.
  • कानोसा घेणे – दूरवरचे लक्षपूर्वक ऐकणे, चाहूल घेणे.
  • कानीकपाळी ओरडणे – वारंवार बजावून सांगणे.
  • कास धरणे – आश्रय घेणे.
  • कानाशी लागणे – चहाड्या करणे.
  • कानाला खडा लावणे – पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे, धडा शिकणे.
  • कान टवकारणे – ऐकण्यास उत्सुक होणे.
  • काडी मोडून घेणे – विवाहसंबंध तोडून टाकणे.
  • कामगिरी पार पाडणे – सोपविण्यात आलेले काम पूर्ण करणे.
  • कामगिरी बजावणे – काम पार पडणे.
  • कानशील रंगविणे – मारणे.
  • कानशिलात देणे – मारणे.
  • कालवा कालव होणे – मनाची चलबिचल होणे.
  • काळीमा लागणे – कलंक लागणे, अपकीर्ती होणे.
  • कान फुटणे – ऐकू न येणे.
  • काट्याचा नायटा करणे – साधी गोष्ट वाईट थराला जाणे.
  • काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.
  • कामाला भिडणे – जोरात काम करू लागणे.
  • कानात घुमून राहणे – आठवणीत पक्के रुजून राहणे.
  • कायापालट होणे – पूर्णपणे स्वरूप बदलणे.
  • कावरा बावरा होणे – बावरणे, घाबरणे.
  • काळजाचे पाणी पाणी होणे – दुःखी होऊन धैर्य व उत्साह नाहीसा होणे, अतिशय घाबरणे.
  • काळाची पावले ओळखणे – बदलत्या परिस्थितीची भान असणे.
  • काळजाचा ठेवा असणे – अत्यंत आवडती गोष्ट असणे.
  • काळाच्या उदरात गडप होणे – नष्ट होणे.
  • कानामागे टाकणे – दुर्लक्ष करणे.
  • कानात मंत्र सांगणे – गुप्त रीतीने सल्लामसलत करणे.
  • कान टोचणे – एखादी गोष्ट समजावून सांगणे.
  • कानाने आवाज टिपणे – लक्षपूर्वक ऐकणे.
  • काळजाचा लचका तुटणे – अत्यंत दुःख होणे.
  • कानाचा चावा घेणे – कानात सांगणे.
  • कानी घालणे – सांगणे, लक्षात आणून देणे.
  • कान लांब होणे – ऐकण्यासाठी उत्सुक असणे, अक्कल कमी होणे (गाढवाचे कान?)
  • काखा वर करणे – आपल्या जवळ काही नाही असे दाखविणे, ऐनवेळी अंग काढून घेणे.
  • काळजाचे कोळसे होणे – मनाला अतिशय वेदना होणे.
  • काळीज फत्तराचे होणे – अंतःकरणातील दया, माया इ. कोमल भावना नाहीशा होणे.
  • काकण भर सरस ठरणे – थोडेसे जास्त वा अधिक असणे.
  • कागाळी करणे – तक्रार किंवा गा-हाणे करणे.
  • कागदी घोडे नाचविणे – ज्याच्या पासून काही लाभ होण्याजोगे नाही अशा लेखनाचा खटाटोप करणे.
  • काळे करणे – निघून जाणे.
  • कान किटणे – तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून कंटाळा आणणे.
  • कामास येणे – उपयोगी पडणे, लढाईत मारले जाणे.
  • काकदृष्टीने पाहणे – अतिशय बारकाईने पाहणे.
  • कासावीस होणे – व्याकूळ होणे.
  • कालवश होणे – मरण पावणे.

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply