संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 वाक्यप्रचार व अर्थ 4-संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण
संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021
- कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे, मोठी आपत्ती कोसळणे.
- कपाळमोक्ष होणे – मरणे, नाश पावणे, डोके फुटून मृत्यू येणे.
- कपाळ उठणे – कपाळ दुखू लागणे.
- कपाळ ठरणे – नशिबात लिहिण्यासारखी एकादी गोष्ट घडणे.
- कपाळ पांढरे होणे – वैधव्य येणे.
- कपाळी येणे – नशीबी येणे.
- कपाळाला आठ्या पडणे – नाराजी दिसणे.
- कपाळी (भाळी) लिहिलेले नसणे – नशिबात नसणे.
- कंबर कसणे (कंबर बांधणे) – हिंमत दाखविणे, तयार होणे.
- कष्टाने विद्या करणे – परिश्रम करून विद्या संपादन करणे.
- कपाळावर हात मारणे – दुःख होणे, निराश होणे.
- कपाळावर हात लावणे – निराश होणे.
- कःपदार्थ असणे – क्षुल्लक वाटणे.
- कपोतवृत्तीने वागणे – काटकसरीने वागणे.
- कपाळाचे कातडे नेणे – सगळया जन्माचे मातेरे करणे.
- कसोटीस उतरणे – अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखविणे.
- करुणा भाकणे – विनविणे.
- कबूल करणे – मान्य करणे.
- कसाला लागणे – कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.
- कसास लावणे – कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.
- कंबर खचणे – धीर संपणे, धीर खचणे.
- कळसास पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे, पूर्णत्वाला पोहोचणे.
- कळी उमलणे – चेहरा प्रफुल्लीत होणे.
- कमाल करणे – मर्यादा वा सीमा गाठणे.
- करणी करणे – चेटूक करणे.
- कलुषित करणे – मलीन बनविणे, गढूळ करणे, एखाद्या विषयी वाईट मत करणे.
- कळ लावणे – भांडण लावणे.
- करकर दात चावणे – क्रोधाचा अविर्भाव करणे.
- कलम होणे – पकडणे.
- कसूर न करणे – आळस न करणे, चूक न करणे.
- कब्जा घेणे – ताब्यात घेणे.
- कळस होणे – चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.
- कस धरणे – सत्व निर्माण होणे.
- करार मदार करणे – लेखी स्वरुपात निर्णय घेणे.
- कळा पालटणे – स्वरूप बदलणे.
- कढी पातळ होणे – दुखण्यामुळे जर्जर होणे.
- कल्पांत करणे – मोठा कल्लोळ करणे.
- कल्ला फाडणे – गोंगाट करणे.
- कसर काढणे – एकीकडे झालेली कमतरता दुसरीकडे भरून काढणे.
- कष्टी होणे – खिन्न होणे, दुःखी होणे.
- कवडीही हातास न लागणे – एका पैशाचीही प्राप्ती न होणे.
- करंट येणे – झटका येणे, आवेश येणे.
- , काम करण्यास टाळाटाळ करणे.
- काटा काढणे – दुःख देणारी गोष्ट काढून टाकणे, समूळ नाहीसे होणे.
- काडीमोड करणे (देणे) – संबंध तोडणे.
- काळझोप घेणे – मृत्यू येणे.
- काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुस-या शत्रूचा पराभव करणे.
- काथ्याकूट करणे – व्यर्थ चर्चा करणे.
- कापूस महाग होणे – कृश होणे.
- कान उपटणे – चुकीबद्दल शिक्षा करणे.
- काढण्या लावणे – दोरीने बांधणे.
- कान टवकारून ऐकणे – अगदी लक्षपूर्वक ऐकणे.
- कान देणे – लक्षपूर्वक ऐकणे.
कान धरणे – शासन करणे.