संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 7

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 7 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण 

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 7

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 7

  • काशीस जावे नित्य वदावे  – चांगल्या गोष्टींचा नेहमी संकल्प करावा 
  • कोळी खाता हरखले, हिशेब देता टरकले- पैसा असेपर्यंत काही वाटले नाही, पैसा संपताच मात्र दुःख वाटले 
  • केळ्याचा लोंगर देई पैशाचा डोंगर  – केळीचे पीक भरपूर पैसा देते 
  • कोंबडी लावगारली, म्हैस आवाळली  – शूद्र वस्तूसाठी किमती वस्तूचा नाश होणे 
  • कोळशाच्या दलालीत हात काळे  – वाईट कृत्याचा परिणाम वाईट असतो 
  • करीन ती पूर्व  – मी करेन ते योग्य, बरोबर अशा रीतीने वागणे 
  • कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी  – सर्वांचेच दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही 
  • काट्याचा नायटा करणे  – एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे कुसंतानापेक्षा निसंतान बरे  – दुर्वर्तनीय  अपत्यापेक्षा अपत्य नसलेले बरे 
  • खाण तशी माती – आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
  • खर्‍याला मरण नाही – खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
  • खाऊ जाणे ते पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
  • खाऊन माजवे टाकून माजू नये – पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
  • खोट्याच्या कपाळी गोटा – वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
  • खायला काळ भुईला भार – निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
  • खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते
  • खतावीण शेती करी सोन्याची माती  – शेतात खत घातले नाही तर पीक चांगले येत नाही  
  • खिशात नाही कवडी बदलली कोंबडी  – आपली कुवत नसताना व्यवहार करणे  
  • खुट्याची सोडली आणि झाडाला बांधली  – कुठेही शेवटी बंधनात असणे 
  • खाता दोन आन्याच अंगात सतरा आन्याच – केवढ्या बढाया मारणे
  • खिळ्यासाठी नाल गेला ,नालासाठी घोडा गेला  – लहानशा गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम होत असतात 
  • खत कसदार तर पीक भरदार   – चांगले खत घातले तर पीक चांगले येते 
  • खरा मोती गागर्‍यात लपला  – खऱ्याची पारख नसणे 
  • गरजवंताला अक्कल नसते – गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
  • गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
  • ग ची बाधा झाली -गर्व चढणे
  • गरज सरो नि वैध मरो – आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
  • गर्जेल तो पडेल – काय केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
  • गाढवाला गुळाची चव काय – मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
  • गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ – मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
  • गाव करी ते राव ना करी  – श्रीमंतव्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.

Free Jobs Alert App

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply