स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 2022- स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 2022 -MPSC स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-MPSC Spardha pariksha marathi vkyakran 2022
यजमान करणे – नवरा करणे
यमपुरी लागणे – त्रास होणे
यमाच्या दाढेत घालणे – मोठ्या संकटात घालणे
यश लाभास येणे – श्रमाचा मोबदला मिळणे
येल पाडणे – आगाऊपणा करणे
यशाचा विडा उचलणे – यश मिळवून देईल अशी प्रतिज्ञा करणे
यादवी माजणे- कलह माजणे
येणे जाणे असणे – संबंध असणे
रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे
रकमेस येणे – किमतीला चढणे
रक्ताने तोंड धुणे – शप्पथ घेणे
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-17 2022
रजा देणे – निरोप देणे
रजाचा गज करणे – राईचा पर्वत करणे
रमारमी होणे – शिल्लक न राहणे
रसातळास नेणे – पूर्ण नाश करणे
राईचा पर्वत करणे- शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे
राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे
राम नसणे – अर्थ नसणे
राम म्हणणे – शेवट होणे मृत्यू येणे
रागाच्या हाती जाणे – लवकर रागावणे
रक्ताचे पाणी होणे – फार मेहनत घेणे
रागाने लाल होणे- भयंकर रागावणे
रान बदलणे – आपले मन बदलणे
राम म्हणणे – मरणे
रामराम ठोकणे – संबंध तोडणे
राम नसणे – अर्थहीन असणे
राजाचा रंक होणे – श्रीमंतीचा गरीब होणे
राळ करणे – फजिती करणे
रामायण सांगणे – कंटाळवाणे कथन करणे
रंग जिरणे – मस्ती क्षमणे
रंग जिरवणे – खोड मोडणे
रंग करणे – मौजमजा करणे
रंग भरणे – जोमात येणे
रंग मारणे – बाजी मारून येणे
लष्कराच्या भाकर्या भाजणे – दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे
लहान तोंडी मोठा घास घेणे – आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे
लक्ष वेधून घेणे – लक्ष ओढून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणे – लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे
लकडा लावणे – तगादा लावणे
लागून असणे – मर्जी धरून राहणे
लंका लुटणे – अतिशय द्रव्य मिळवणे
लाज झाकणे – अब्रू सांभाळणे
लगट करणे – अंगाशी अंग लावणे
लालूच दाखविणे – आमिष दाखविणे
लगाम घालणे – आळा घालणे
लांबणीवर पडणे – पुढे ढकलत जाणे
लाल बनणे – गब्बर होणे
लावालावी करणे – कलागत करणे
लाही लाही होणे – अतिशय संताप येणे
लाल उठणे – तोंडास पाणी सुटणे
लाळ गाळने – फाजील स्तुती करणे
लोथी पाडणे – समूळ नाश करणे
लेंड्या टाकणे – भीतीने गडबडून जाणे
लोथ जडणे – प्रेम उद्भवणे
लोणी लावणे – खुशामत करणे
लौकिक मिळवणे सर्वत्र मान मिळवणे
वकील पत्र घेणे – एखाद्याची बाजू घेणे
वठणीवर आणणे- ताळ्यावर आणणेे
वणवण भटकणे – एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे
वड्याचे तेल वांग्यावर काढणे – एकाचा राग दुस-यावर काढणे
वचन गुंतणे- शब्दात गुंतणे
वचन हातावर धरणे – शब्द झेलणे
वर विस्तव ठेवणे – नाश करणे
वरात काढणे – धिंड काढणे
वर्दळीवर येणे – एकेरीवर येणे
वसाहत करणे – वस्ती करणे
वनवास भोगणे – हालअपेष्टा सहन करणे
वजा करणे – उणे करणे
वजन असणे- किंमत असणे
वाचा बसणे – एक शब्द येईल बोलता न येणे
वाट लावणे – विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे
वाटाण्याच्या अक्षता लावणे – स्पष्टपणे नाकारले
वाटोळे होणे – नाश होणे
वाद घालणे – भांडण करणे
वार्याला न उभा राहणे – संबंध न ठेवणे
वारा न घेणे – अगदी अलिप्त राहणे
वाऱ्यावर सोडणे – पूर्ण त्याग करणे
वाखे होणे – पूर्ण हाल होणे
वार्ता नसणे- काहीच माहीत नसणे
वावडी करणे – फजिती करणे
वास काढणे – पत्ता लावणे
वास मारणे – दुर्गंधी येणे
वास सुटणे – वास दरवळणे
वाचा फुटणे – बोल लागणे
वाळत राहणे – उपाशी राहणे
विचलित होणे- मनाची चलबिचल होणे
विसंवाद असणे – एकमेकांशी न जमणे
विडा उचलणे – निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे
वेड घेऊन पेडगावला जाणे- मुद्दाम ढोंग करणे
विचरणे – भटकणे
विषाची परीक्षा घेणे – भयंकर धाडस करणे
विचार विनिमय करणे- सल्लामसलत करणे
विमा उतरवणे- हमी घेणे
विटून जाणे – त्रासून जाणे
विटाळ कालवणे- शिवाशिव करणे
वेड लागणे- ध्यास लागणे