संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 20
- शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी पुरत नाही – उसनी अक्कल वेळेवर उपयोगी पडत नाही
- शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती – जगात दुर्जनांच्या घरी वैभव आढळते पण सज्जनाला दारिद्र्यातच दिवस काढावे लागतात
- शिष्य पडला गुरू अडला – दुसर्याच्या चुकीवरुन शहाणपण शिकणे
- शीर सलामत तो पगडी पचास – मनुष्य खंबीर असला तर अनेक पराक्रम करेल
- शेजी चा भात अन् आईचा हात – दुसर्याने कितीही केले तरी आईची बरोबरी कधीच होत नाही
- शेंडा ना बुडखा – ना आरंभ ना शेवट
- शेताचे फुल, चालवी जगाची चूल – सर्व जग शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असते
- शेरास सव्वाशेर- जगात एकापेक्षा एक वरचढ आहेत
- श्रींच्या मागोमाग ग येतो – श्रीमंतांच्या सोबत अभिमान येतो
- श्रीखंडाचा बेत दह्याला त्रास – भलत्याच मनुष्याची कुरकुर श्रीमंताची वारी गरिबाला नरोटी – पात्रते प्रमाणे सत्कार होत असतो
- शिक्याचे तुटले नि बोक्याचे फावले – एकाचे नुकसान हेच दुसर्याचा फायदा असणे
- सगळेच मुसळ केरात- मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे
- सरड्याची धाव कुंपणापर्यंतच- प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते
- समर्था घरचे श्वान त्याला सर्व देती मान – मोठाच्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो
- संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात – एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे
- संग तसा रंग – संगती प्रमाणे वर्तन असणे
- सारा गांव मामाचा एक नाही कामाचा – जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे
- साप साप म्हणून भुई धोपटणे – संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे
- सात हात लाकुड नऊ हात ढलपी – एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे
- सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी – एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
- सुरुवातीलाच माशी शिंकली – आरंभालाच अपशकून
- सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – वैभव गेले तरी ताठा जात नाही
- स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे – वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही
- साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला कशाशीच उणीव पडत नाही
- सुंठावाचून खोकला गेला – उपचाराशिवाय दोष निवारण होणे
- स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही
- स्वतः मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो – उथळ पाण्याला खळखळाट फार
- सर्पाला दूध पाजले तरी विषच ओकणरा – दुष्ट मनुष्यास कितीही चांगली वागणूक दिली तरी त्याच्यातील दुष्ट पणा जात नाही
- संसार पाण्याचा बुडबुडा – संसार क्षणभंगुर आहे
- संसाराच्या बारा वाटा – संसारात अनेक भानगडी असतात
- साखर हातावर, कातर मानेवर – गोड बोलून गळा कापणे
- साखरेला मुंग्या लागणारच – जेथे लोभ लाभ तेथे माणसे जमणारच
- सांग पाटला काय लिहू – दुसर्याच्या मताने वागणे
- सारवा भिंती म्हणे कोनाड किती – नुसती चौकशी करणे
- सारा चोरांचा बाजार – सारेजण लबाड
- सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा – दुसर्या वर पूर्णपणे अवलंबित व्यक्ती
- साठी बुद्धी नाटी- म्हातारपण आले की बुद्धी ठळते
- सातासमुद्राच्या पलीकडे – अतिशय दूर
- सासू मेली उन्हाळ्यात आसू आले पावसाळ्यात – एखाद्या गोष्टीचा संबंध भलतीकडेच लावणे
- सुरतेला भला , कंबरेचा ढिला – दिसायला सुंदर पण अशक्त
- सोन्याहून पिवळे – अतिशय उत्तम
- सोने नाही गुंजभर न बायको मागे रत्नहार – जवळ काही नसताना मोठमोठे बेत करणे
- सोन्याची मेख तमाशा देख – पैशाने सर्व काही करता येते
- सोंगे केले सजून दिवटी गेली विझून- ऐन वेळे वर काही अडचण येऊन काम बिघडते
- सोनाराकडून कान टोचला म्हणून दुखत नाही – योग्य व्यक्तीकडून केलेले काम चांगले होते
- सोन्याचा काही गुण सोनाराचा काही गुण – कामासाठी निरनिराळ्या गुणांची आवश्यकता असते
- स्मशानी बसावे पण एकटे नसावे – माणसाने नेहमी संगती करावे
- स्वार्थी आले अन् शास्त्री गेले – चांगले जाऊन वाईट येणे
- संख्या झाली फार अन् देशाला झाला भार – अतिरेक झाला तर नुकसानच होते
- संसाराच कोड जे करीन ते थोड – कितीही केले तरी कमीच पडते
- सत्तेपुढे शहाणपण येत नाही – ज्याच्याकडे अधिकाराचे बळ आहे तो वाटेल ते करू शकतो
- सारी सोंगे करता येतात पण पैश्याचे सोंग करता येत नाही – जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते
- सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही – क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये
- हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते – आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात
- हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा- खोटे अश्रू ढाळणे
- हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा – मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे
- हत्ती गेला पण शेपूट राहिले – कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला
- हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
- हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते – जेथे भलेभले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात
- हात ओला तर मित्र भला – म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात
- हात फिरे तिथे लक्ष्मी वसे – उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते
- हातच्या काकणाला आरसा कशाला – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको
मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा