पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सुधारित परीक्षा योजना 2022 pdf download-Police upnirikshak pariksha sudharit pariksha yojna 2022
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेचे टप्पे
२.१ प्रस्तुत परीक्षा आता खालील तीन टप्प्यात घेण्यात येते: (एक) पूर्व परीक्षा – १०० गुण (दोन) मुख्य परीक्षा- ३०० गुण (तीन) शारीरिक चाचणी- १०० गुण.
२.२ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.
२.३ मुख्य परीक्षेमधून शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्यासाठी आयोगाने निश्चित केलेली गुणांची किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरतात.
२.४ पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत.
पात्रता
३.१ महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.
३.२ शैक्षणिक अर्हतेसह सेवा:- शासन परिपत्रक जाहिरातीमध्ये नमूद विहित दिनांकास सहायक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे:
३.२.१ मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ४ वर्षे नियमित सेवा.
३.२.२ महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे नियमित सेवा,
३.२.३ महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. अशा उमेदवारांच्या बाबतीत ६ वर्षे नियमित सेवा.