स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022 -स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-Spardha pariksha marathi vkyakran 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022

  • झुंबड उडणे – खूप गर्दी व रेटारेटी होणे.
  • झुलू लागणे – लयीत तालावर डोलणे.
  • झेप घेणे – काही अंतरावरून उडी टाकणे.
  • झेंडा फडकविणे – विजय मिळविणे.
  • झेंडा नाचविणे – मोठे कृत्य केले असे जाहीर करणे.
  • झोप उडविणे – अस्वस्थ करुन सोडणे.
  • झोट धरणी होणे – मारामारी होणे.
  • झोप उडणे – अतिशय भयभीत होणे.
  • टक लावून पाहणे – बारीक नजरेने न्याहाळणे, एकसारखे रोखून पाहणे.
  • टकामका (टकमका) पाहणे – चकित होऊन पाहणे.
  • टंगळमंगळ करणे – काम टाळणे, कामचुकारपणा करणे.
  • टक्केटोणपे खाणे – ठेचा खाणे, चांगल्या वाईट अनुभवाने शहाणपण येणे.
  • ट, फ करणे – अक्षर ओळख होणे.
  • ट ला ट जुळविणे – अक्षराला अक्षर जुळविणे.
  • टकाटका पाहणे – एकासारखे लक्ष देऊन पाहणे.
  • टाहो फोडणे – मोठ्याने आकांत करणे.
  • टाके ढिले होणे – अतोनात श्रमामुळे कोणतेही काम करण्याची अंगी ताकद न राहणे.
  • टाकीचे घाव सोसणे – त्रास सहन करणे.
  • टाकून बोलणे – लागेल असे बोलणे.
  • टाळूवर मिया वाटणे – अंमल गाजविणे.
  • टाचा घासणे – चरफडणे.
  • टाप असणे – हिंमत असणे.
  • टिवल्या बावल्या करणे – कसातरी वेळ घालविणे.
  • टुरटुर लावणे – थोडा वेळ कर्तृत्वाची ऐट मिरविणे.
  • टेकू देणे – पाठिंबा देणे.
  • टेकीला येणे – दमणे, थकणे, त्रासून जाणे.
  • टेंभा पाजळणे – डौल मारणे.
  • टेंभा मिरविणे – दिमाख दाखविणे, ऐट दाखविणे.
  • टोमणा मारणे – मनाला लागेल असे बोलणे.
  • ठपका देणे – दोष देणे.
  • ठाण मांडणे – निर्धाराने उभे राहणे, निश्चयपूर्वक स्थिर राहणे.
  • ठाव घेणे – मनाची परीक्षा करणे.
  • ठाणबंद करणे – एका जागेवर उभे करणे.

  • ठिय्या देणे – (एका जागेवरून) मुळीच न हलणे.
  • ठिकाणी लावणे  – ठार मारणे 
  • ठिकाणावर आणणे- पूर्व स्थितीवर आणणे 
  • ठो ठो करणे  – बोंब मारणे 
  • ठोका लावून देणे  – आपले वर्चस्व दुसर्‍या वर लादणे 
  • ठोकर बसणे- नुकसान होणे 
  • ठोकून देणे  – गप्पा मारणे 
  • डबघाईला येणे – वाईट अवस्था येणे.
  • डल्ला मारणे – लुटणे.
  • डांगोरा पिटणे – जाहीर करणे.
  • डाव साधणे – संधीचा फायदा घेऊन इच्छित कार्य साधणे, योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.
  • डाळ शिजणे – दाद लागणे.
  • डाळ शिजू देणे – चालू देणे.
  • डागडुजी करणे – दुरुस्ती करणे.
  • डावे उजवे करणे – व्यवहार ज्ञान कळणे.
  • डुलत डुलत चालणे – आळसावलेल्या मनःस्थितीत हळूहळू चालणे.
  • डुबी देणे – पाण्यात खाली क्षणभर बुडविणे.
  • डोळे वटारणे (करणे) – डोळे मोठे करून रागाने पाहणे.
  • डोळे पांढरे होणे – अत्यंत घाबरणे, मरायला टेकणे.
  • डोळयात प्राण आणणे – एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.
  • डोळे फाडून बघणे – तीक्ष्ण नजरेने पाहणे, टक लावून पाहणे.
  • डोळे चढवून बोलणे – संतापाने बोलणे.
  • डोळे निवणे – समाधान होणे.
  • डोळ्याचे पारणे फिटणे – एखादे दृश्य पाहून मनाचे समाधान होणे.
  • डोळा चुकविणे – भेट घेण्याचे टाळणे, हातोहात फसविणे.
  • डोळ्यात धूळ फेकणे – सहजा सहजी फसविणे.
  • डोळ्यात स्तुपणे (सलणे) – सहन न होणे.
  • डोळ्यास डोळा लागणे – झोप येणे.
  • डोळ्यात खून चढणे – त्वेश येणे.
  • डोळे फाटणे – आश्चर्यचकित होणे.

  • डोळे आनंदाने डबडबून जाणे – डोळयात आनंदाश्रू येणे.
  • डोळ्यात प्राण ठेवणे – अंतसमयी आतुरतेने वाट पाहणे.
  • डोळ्यावर कातडे ओढणे – जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.
  • डोळे सिळून राहणे – एकसारखे एखाद्या गोष्टीकडे बघत राहणे.
  • डोळे दिपविणे (दिपणे) – थक्क करून सोडणे, आश्चर्यचकित होणे.
  • डोळे पाणावणे – डोळ्यात पाणी येणे, डोळ्यात आनंदाश्रू येणे.
  • डोळ्यात प्राण येणे – मरायला टेकणे, अतिशय आतूर होणे.
  • डोळा लागणे – डुलकी लागणे, झोप लागणे.
  • डोळे उघडणे – अनुभवाने शहाणे होणे, सावध होणे, पश्चात्ताप होणे.
  • डोळे खडकन उघडणे – ताबडतोब खरे काय ते समजणे, जागे होणे.
  • डोळे भरून येणे – भावना दाटून आल्यामुळे डोळ्यात पाणी येणे.
  • डोळे भरून पाहणे – समाधान होईपर्यंत पाहणे.
  • डोळे झाक करणे – दुर्लक्ष करणे.
  • डोळ्यात भरणे – पसंत पडणे.
  • डोळे फुटणे – आंधळे होणे.
  • डोळे ताणून पाहणे – लक्षपूर्वक पाहणे.
  • डोळे फिरणे – गर्वाने ताठणे.
  • डोळे विस्फारून बघणे – आश्चर्याने बघणे.
  • डोळ्यात तेल घालून जपणे – अतिशय काळजी घेणे, दक्ष राहणे.
  • डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडणे – अतिशय राग येणे.
  • डोळे थंड होणे – समाधान होणे.
  • डोळे घालणे – खुणेने सुचविणे.
  • डोळ्यांत साठविणे – चौकशी करणे.
  • डोळे वाटेकडे लागणे – आतुरतेने वाट पाहणे.
  • डोळे मिटणे – मृत्यू येणे.
  • डोळ्यांच्या खाचा होणे – आंधळे होणे.
  • डोळ्यात गंगा यमुना येणे – रडू येणे, अश्रू ओघळणे.
  • डोळ्यात प्राण उरणे – अगदी मृत्यू पंथाला लागणे

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply