PSI/STI/ASO Combine Test No. 02

PSI/STI/ASO Combine Test No. 02 , combine test series.

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 02
PSI/STI/ASO Combine Test No. 02

PSI/STI/ASO Combine Test No. 02

26) WTO च्या मंत्रीस्तरीय परिषद आतापर्यंत (२०२०पर्यंत) १० झाल्या आहेत त्यापैकि WTO च्या मुख्यालयाच्या ठिकाणी किती वेळेस भरली आहे ?
१) ४ २) २
३) ३ ४) १

उत्तर : ३) ३
स्पष्टीकरण :
जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत. त्याच मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. १९९८, २००९, २०११ या तीन वर्षी परिषद झाली.

27)
A) परकीय चलनसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ.
B) याच वर्षी भांडवली खात्यावरील शेष महत्तम स्तरावर पोहचला होता.
C) प्राथमिक तूट, महसूली तूट व राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात कमी झाल्या होत्या.
वरील तीन वाक्यात जे वर्णन केलेले आहे; ते खालीलपैकी कोणत्यावर्षाशी संबंधित आहे ?
१) २००७ -०८ २) २००९ – १०
३) २००८ – ०९ ४) १९९० – ९१

उत्तर : १) २००७ -०८
स्पष्टीकरण :
परकीय चलन विनिमय कायदा हा 1999 साली लागू झालेला भारतीय कायदा आहे. हा कायदा पूर्वीच्या परकीय चलन नियमन अधिनियम (फेरा) या कायद्याच्या ऐवजी लागू झाला. भांडवली खाते म्हणजे भांडवलाच्या खात्यात भांडवली पावती आणि खर्चाच्या परिणामी रोख प्रवाह समाविष्ट असतो. ही खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांनी केलेली गुंतवणूक आहे.

28) खालील पैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / त ?
A) GST बिलाला मान्यता देणारे महाराष्ट्र १० वे राज्य आहे.
B) एकूण २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी GST बिलाला मान्यता दिली.
C) राष्ट्रपतीनी ८ सप्टेंबर २०१६ रोजी मान्यता दिली.
D) GST council ची बैठक ३ नोव्हेंबर २०१६ रोजी भरण्यात आली त्यात ४ दर ठरवण्यात आले आहेत. ते म्हणजे ५ %, १२ %, १८ %, २८ % होय.
E) GST साठी उत्पन्न मर्यादा सर्वसाधारण राज्यासाठी २५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
१) B, C, D बरोबर २) A, C, D बरोबर
३) A, B, C, D बरोबर ४) वरील सर्वच बरोबर

उत्तर : ३) A, B, C, D बरोबर
स्पष्टीकरण :
संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आले वस्तू व सेवा कर भारतात 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत 122 घटनादुरुस्ती दुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले. आसाम हे जीएसटी लागू करणारे पहिले राज्य आले.

29) रिओ ऑलिम्पिक बाबत काही विधाने दिली आहेत त्याबाबत अयोग्य विधान निवडा.
A) द. अमेरिका खंडामध्ये ऑलिम्पिक आयोजनाची ही पहिलीच वेळ होती.
B) कोसावो, द. सुदान आणि निर्वासित ऑलिम्पिक खेळाडू या तीन संघांनी प्रथमच भाग घेतला.
C) रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक १२१ पदकांसह प्रथम क्रमांक नोंदविला.
D) रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीमलिक हिने 58 किलो वजनी गटांतून कुस्तीसाठी कांस्यपदक मिळविले.
E) या ऑलिम्पिकमध्ये भारताचा पदक मिळवण्यात ६७ वा क्रमांक होता.
पर्यायी उत्तरे :
१) A २) B ३) D ४) E

उत्तर : ३) D
स्पष्टीकरण :
2016 उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची 31वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट 2016 मध्ये खेळवण्यात येईल. 2 ऑक्टोबर 2009 रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या 121व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीमलिक हिने ५८ किलो वजनी गटांतून कुस्तीसाठी कांस्यपदक मिळविले.

30) रॉकेल वितरणासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करणारे देशातील प्रथम राज्य कोणते ?
१) झारखंड २) महाराष्ट्र
३) गुजरात ४) केरळ

उत्तर : १) झारखंड
स्पष्टीकरण :
कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना लाभ, अनुदान आणि सेवा पुरविण्यासाठी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) विकसित केले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आधार पेमेंट ब्रिजद्वारे लाभ, अनुदान आणि सेवा थेट प्राप्त होतील. त्यात रॉकेल वितरणाचा देखील समावेश आहे.

31) नूकतेच पनवेल महानगरपालिकेला मान्यता देण्यात आली त्याबाबत ————
A) पनवेल ही महाराष्ट्रातील २७ वी मनपा आहे.
B) पनवेल तालुक्यात ६८ गावांचा समावेश होतो.
C) पनवेल मनपा मध्ये ३२ गावांचा समावेश होतो.
D) आता कोकणात पनवेल मनपाला धरून ९ मनपा झाले आहेत.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहेत.
१) A, C, D बरोबर २) A & D बरोबर
३) A, B, C बरोबर ४) A, B, C, D बरोबर

उत्तर : ४) A, B, C, D बरोबर
स्पष्टीकरण :
पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात.

32) पॅरिस कराराला मान्यता देणारा भारत ———– वा. देश आहे.
१) ७२ २) ६२
३) ५२ ४) ८२

उत्तर : २) ६२
स्पष्टीकरण :
पॅरिस करार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील (यु एन एफ सी सी सी) एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे. 195 देशांच्या प्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या 21व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला. 4 ऑक्टोबर 2016 रोजी या अटीची पूर्तता झाली, आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून हा करार अधिकृतरित्या लागू झाला असे जाहीर करण्यात आले. या कराराची अंमलबजावणी 2021 साली सुरु होणार आहे.

33) २०२० चा शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
१) WTO २) WFP
३) WLO ४) WHO

उत्तर : २) WFP
स्पष्टीकरण :
जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) ही संयुक्त राष्ट्रांची अन्न-सहाय्य शाखा आहे. ही जगातील सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे जी सर्वात मोठी उपासमार आणि अन्न सुरक्षा यावर केंद्रित आहे आणि शाळा जेवण पुरवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. हे १९६१ मध्ये स्थापित, त्याचे मुख्यालय रोम येथे आहे आणि ८० देशांमध्ये त्याची कार्यालये आहेत. २०१९ पर्यंत त्याने 88 देशांमधील 97 दशलक्ष लोकांची सेवा केली, हे २०१२ नंतरचे सर्वात मोठे आहे.

34) अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक पार पडली. निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी कडून डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पार्टीकडून जो बायडन यांना उमेदवारी मिळाली होती. त्याच्या निवडणूकीबाबत काय खरे आहे ?
A) या निवडणूकीत जो बायडन निवडून येवून अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
B) अमेरिकेच्या इलेक्टोरेल कॉलेजीयम मध्ये ५३८ सदस्य असतात.
C) रिपब्लिकन पार्टीचे निवडणूक चिन्ह ‘जिराफ’ आहे.
D) डेमोक्रॅटिक पार्टी चे निवडणूक चिन्ह ‘गाढव’ आहे.
पर्यायी उत्तरे :
१) A, B & D बरोबर २) B & D बरोबर
३) B, C, D बरोबर ४) A, B, C, D बरोबर

उत्तर : १) A,B & D बरोबर
स्पष्टीकरण :
रिपब्लिकन पार्टीचे निवडणूक चिन्ह ‘हत्ती’ आहे.

35) ‘ब्रिक्स’ ची १२ वी शिखर सेंट पिटर्सबर्ग या ठिकाणी पार पडली. खाली काही विधाने BRICS बाबत दिलेली आहेत ?
A) या अगोदर भारतात नवी दिल्ली या ठिकाणी ४ थी BRICS परिषद पार पडली.
B) यातील ५ ही सदस्य जी – २० गटाने सदस्य आहेत.
C) येणारी १3 वी BRICS परिषद इंडिया मध्ये होणार आहे.
D) पहिली परिषद २००९ मध्ये रशिया या देशात भरली होती.
योग्य विधान / ने निवडा :
१) A, B, C बरोबर २) A & C बरोबर
३) A, B, D बरोबर ४) A, B, C & D बरोबर

उत्तर : ४) A, B, C & D बरोबर
स्पष्टीकरण :
ब्रिक्स (BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि “ब्रिक” या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे, इत्यादी या संघटनेची उद्दिष्ट व कार्ये आहेत.

36) ‘फिडेल कॅस्ट्रो’ बाबत कोणती विधान / ने योग्य आहे / त ?
A) १९५९ साली क्युबाचे तत्कालिक अध्यक्ष बॅटिस्टा यांची राजवट उलथून साम्यवादी राजवट कॅस्ट्रो ने प्रस्थापित केले.
B) भारताने क्युबाला अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात मदत केली.
C) कॅस्ट्रो यांनी १९७३ आणि १९८३ साली भारताला भेट दिली दोन्ही वेळेस भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.
D) जगातील तिसरा सत्ताधीश आहे. ज्याने सर्वाधिक काळ सत्तेवर राहिले.
E) टाइम मासिकाने २०१५ साली जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तीमध्ये यांचा समावेश केला होता ?
१) A, B, C, D बरोबर २) A, C, D & E बरोबर
३) A, B, D & E बरोबर ४) A, B, C, E बरोबर

उत्तर : १) A, B, C, D बरोबर
स्पष्टीकरण :
फिदेल कास्त्रो हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण 47 वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते. 1959 ते 1976 साली फिडेल यांनी पंतप्रधान आणि 1976 ते 2008 या काळात राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला.

37) खालील विधाने विचारात घ्या.
A) संयुक्त राष्ट्र संघाचे ८ वे सरचिटणीस म्हणून पोर्तुगालचे अॅटोनिओ गटेरिस यांची नेमणूक झाली आहे.
B) एखाद्या देशाचे माजी प्रमुख राष्ट्रसंघाच्या प्रमुखपदी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
C) गटेरिस हे १९९५ – २००२ या काळात पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
योग्य पर्याय निवडा :
१) A & C बरोबर २) B & C बरोबर
३) A, B, C बरोबर ४) फक्त A बरोबर

उत्तर : १) B & C बरोबर
स्पष्टीकरण :
अॅटोनिओ गटेरिस हा एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पोर्तुगालचा 14 वा पंतप्रधान आहे. ऑक्टोबर 1995 ते एप्रिल 2002 दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेला गुतेरेस 2005 सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. संयुक्त राष्ट्र संघाचे ९ वे सरचिटणीस म्हणून पोर्तुगालचे अॅटोनिओ गटेरिस यांची नेमणूक झाली आहे.

38) खालील विधाने विचारात घ्या.
A) ममता बॅनर्जी यांच्या ‘तृणमूल कॉंग्रेस’ पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली.
B) या निर्णयामुळे भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाची संख्या ७ झाली आहे.
C) तृणमूल कॉंग्रेस पक्षाला पं. बंगाल, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) A & B बरोबर २) A & C बरोबर
३) A, B, C बरोबर ४) यापैकी एकही नाही

उत्तर : २) A & B बरोबर
स्पष्टीकरण :
तृणमूल कॉंग्रेस पक्षाला पं. बंगाल, मणिपूर या राज्यांत राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे.

39) कावेरी पाणीवाटप तंटा कोण – कोणत्या राज्यांशी संबंधित आहे ?
A) केरळ B) तमिळनाडू
C) कर्नाटक D) पुदुच्चरी
योग्य पर्याय निवडा.
१) B, C, D बरोबर २) A, B, C फक्त
३) B, C, D फक्त ४) A, B, C, D सर्वच

उत्तर : ४) A, B, C, D सर्वच
स्पष्टीकरण :
कावेरी नदीच्या खोर्यातील 81,155 हेक्टर क्षेत्रापैकी 43,868 हेक्टर (54.1 टक्के क्षेत्र) तामिळनाडूत येते तर 34,234 हेक्टर (42.2 टक्के क्षेत्र) कर्नाटकात येते. याशिवाय केरळ आणि पॉंडिचेरीतही थोडे क्षेत्र आहे. यानुसार कावेरीच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी वेळोवेळी अनेक करार, निर्णय घेण्यात आलेले आहेत. १८९२ आणि १९२४ या साली मद्रास आणि म्हैसुर यांच्यामध्ये करार झाला.

40) नुकतेच जागतिक भूक निर्देशांक २०२० प्रकाशित झाले आहे त्याबाबत —————-
A) यात भारताचा ९४ वा क्रमांक आहे.
B) भारताचे GHI मूल्य २९.५ इतके आहे.
C) भारतातील उपासमार ही गंभीर उपासमार दर्शवते.
D) भारतासमोर चीन, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, बांग्लादेशही आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) A, C & D बरोबर २) B, C, D बरोबर
३) A & C बरोबर ४) A, B, C & D बरोबर

उत्तर : १) A, C & D बरोबर
स्पष्टीकरण :
107 देशांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारत जागतिक भूक (Global Hunger Index) निर्देशांकात 94 वा आहे. 2020 मध्ये सर्वेक्षणात 0 ते 100 निर्देशांक बिंदू प्रमाणात भारताचे कमी 27.2 गुण आहेत.

41) केंद्र सरकार खालीलपैकी कोणती कर्तव्य आकारली जाते आणि वसूल करते?
1) कस्टम ड्युटी २) उत्पादन शुल्क
३) मालमत्ता कर्तव्य ४) वरील सर्व

उत्तर : ४) वरील सर्व
स्पष्टीकरण :
सर्व थेट कर केंद्र सरकार लादतात. थेट कर आहेत; आयकर, संपत्ती कर, महानगरपालिका कर. अबकारी आणि कस्टम ड्युटी अप्रत्यक्ष कर होते पण जीएसटीमध्ये विलीन झाली.

42) ‘मातृत्व लाभ दुरुस्ती विधेयक – २०१६’ याबाबत काय खरे आहे.
A) या विधेयकाद्वारा १९६१ च्या ‘मातृत्व लाभ कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
B) पगारी रजेचा कालावधी हा १२ आठवड्यावरून २६ आठवडे करण्यात येणार आहे.
C) आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेनुसार कमीतकमी १२ आठवडे प्रसूती रजा असावी.
D) १६ आठवड्यांचा मातृत्व रजा लाभ हा दोन पेक्षा अधिक अपत्यांसाठी मिळणार आहे.
पर्यायी उत्तरे :
१) A, B, C बरोबर २) B & C बरोबर
३) B, C & D बरोबर ४) A, B, C, D बरोबर

उत्तर : २) A, B & C बरोबर
स्पष्टीकरण :
मातृत्व लाभ कायदा, १२ आठवड्यांचा मातृत्व रजा लाभ हा दोन पेक्षा अधिक अपत्यांसाठी मिळणार आहे.

43) लॉर्ड कंनिंग बद्दल कोणते विधान योग्य आहे ?
A. त्याच्या काळात १८५८ मध्ये इंग्लंडची राणी विक्टोरिया हिने एक जाहीरनामा पास केला.
B. १८६० इंडियन पिनल कोड लागू करण्यात आले.
C. त्याच्या काळात १८५७ चा उठाव सुरू झाला.
D. लॉर्ड कंनिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
1) A & B 2) A, B & C
3) A 4) वरील सर्व

उत्तर : 2 ) A, B & C
स्पष्टीकरण : लॉर्ड कंनिंग हा भारताचा पहिला व्हइसरॉय होता . त्याचा कार्यकाळ १८५८ ते १८६२ असा होता.

44) “असहकारीता ही गोष्ट नवीन नाही विष्णूशास्त्री चिपळूनकरांनीच ही गोष्ट महाराष्ट्राला शिकविली आहे” असे उदगार कोणी काढले होते ?
१) लोकमान्य टिळक २) गोपाळ गणेश आगरकर
३) पं. जवाहरलाल नेहरू ४) महात्मा गांधी

उत्तर : ४) महात्मा गांधी
स्पष्टीकरण :
विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता.त्यांनी निबंधमाला हे मासिक सुरू केले होते. ते 7 वर्षे अखंड चालले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. 1874 साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. 1874 सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे 8 वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. त्यांच्या कार्यामुळे महात्मा गांधी यांनी असे उद्गारले.

45) “सायमन कमिशनवर हिन्दी तिजोरीतून एकही पैसा खर्च केला जाऊ नये” असा ठराव लाहोर विधिमंडळात कोणी मांडला होता ?
१) अरविंद घोष २) लाला हरदयाळ
३) पं. जवाहरलाल नेहरू ४) लाला लजपत राय

उत्तर : ४) लाला लजपत राय
स्पष्टीकरण :
1928 मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. 30 ऑक्टोबर 1928 रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले.

46) खालील दोन विधाने विचारात घ्या.
A) होमरुल प्रचारास अटकाव करण्यासाठी इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांवर अहमदनगर येथे केलेल्या एका भाषणाबद्दल राजदोहाचा खटला भरला.
B) इ.स. १९१७ साली या खटल्याचे कोर्टातील कामकाज बघणारे वकिल महमंद अली जीना हे होते.
योग्य विधान / ने निवडा.
१) A & B बरोबर २) A बरोबर
३) B बरोबर ४) A & B दोन्ही चूक

उत्तर : १) A & B बरोबर
स्पष्टीकरण :
होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना 1915 साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (1916) अड्यार (मद्रास) येथे डॉ.ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. 1916 ते 1918 पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली.

47) खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळत नाही ? (प्रतिसरकार व ठिकाण)
‘A’ ‘B’
A) बंगाल – मिदणापुर

B) बिहार – बलिया

C) उत्तरप्रदेश – अझमगड

D) महाराष्ट्र – सातारा
१) A २) B ३) C ४) यापैकी नाही.

उत्तर : २) B
स्पष्टीकरण :
देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकार केली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.

48) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला नाही ?
A) बिळाशी B) कळवण
C) चिरनेर D) पुसद
E) संगमनेर
१) B २) E ३) C ४) यापैकी एकही नाही

उत्तर : ४) यापैकी एकही नाही
स्पष्टीकरण :

49) खालील विधाने विचारात घ्या.
A) बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तरप्रदेशातील शेतकर्‍यांनी ‘किसान सभा’ ही संघटना स्थापन केली.
B) १९३० साली – एन.जी. रंगा यांनी अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली पण स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते.
योग्य विधान / ने निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) A & B दोन्ही बरोबर ४) A & B दोन्ही चूक

उत्तर : १) A बरोबर
स्पष्टीकरण :
१९२९ साली बिहार येथे स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली व एन.जी. रंगा हे या सभेचे अध्यक्ष होते. जमीनदरी प्रथे विरुद्ध ही सभा स्थापन करण्यात आली .

50) १९४५ मध्ये टी.बी. कुन्हा यांनी गोवा युथ लिंग संघटना ————– ला स्थापन केली.
१) बाणावली २) पणजी
३) गोवा ४) मुंबई

उत्तर : ४) मुंबई
स्पष्टीकरण : पोतुगीजांचे वर्चस्व असल्यामुळे गोवा लीग संघटना स्थापन करण्यात आली. त्यांना त्यासाठी ८ वर्षाची शिक्षा झाली.

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-15

Current affair November 2021 online test-15-Current affair 2021 test Question paper-15-Current affair test Question paper …

PSI/STI/ASO Combine Test No. 37

PSI/STI/ASO Combine Test No. 37, Combine online test series. सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न …

PSI/STI/ASO Combine Test No. 36

PSI/STI/ASO Combine Test No. 36, Combine online test series. सूचना सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न …

Contact Us / Leave a Reply