स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-13 2022 -स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-Spardha pariksha marathi vkyakran 2022
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-13 2022
- डोळ्यावर धूर येणे – संपत्ती वगैरे गोष्टीनी उन्माद येणे.
- डोळ्याशी डोळा भिडविणे – नजर भिडविणे.
- डोळा असणे – एखादी वस्तू मिळावी अशी इच्छा असणे.
- डोक्यात घोळणे – एक सारखे मनात येणे.
- डोक्यावर खापर फोडणे – एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.
- डोक्यावर मिरी वाटणे – वरचढ होणे.
- डोके वाजविणे – विचार करणे.
- डोक्याला हात लावून बसणे – चिंताग्रस्त होऊन बसणे.
- डोक्यावर बसविणे – लायकीपेक्षा अधिक मान देणे.
- डोक्यावरचे खांद्यावर येणे – ओझे, कर्ज इ. हलके होणे.
- डोके टेकणे – हताश होणे.
- डोके सुन्न होणे – काही एक विचार न सुचणे.
- डोक्यात थैमान घालणे – एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येऊन मन अस्वस्थ होणे.
- डोके वर काढणे – उदयास येणे.
- डोके मारणे – शिरच्छेद करणे.
- डोके बधीर होणे – काय करावे ते न सुचणे.
- डोक्यावरून पाणी फिरणे – एखाद्या गोष्टीचा कळस होणे, परमावधी होणे.
- डोईजड वाटणे – शिरजोर होणे, भारी असणे.
- डोईवर हात ठेवणे – आशीर्वाद देणे.
- डोक्यावरून पाणी जाणे – व्यर्थ जाणे.
- डोक्यावर बसणे – वरचढ होणे.
- डोईवर हात फिरविणे – फसविणे.
- डोईवर शेकणे – नुकसान पोचणे.
- डोंगर पोखरून उंदीर काढणे – मोठे प्रयास करून थोडी कार्यनिष्पत्ती होणे.
- ढवळाढवळ करणे – हस्तक्षेप करणे.
- ढसढसा रडणे – खूप रडणे.
- ढुंकून पाहणे – मुद्दाम डोके वळवून पाहणे.
- ढोर कष्ट करणे – खूप कष्ट करणे.
- ढोलके पिटणे- स्तोम माजवणे
- तळपायाची आग मस्तकात जाणे – अतिशय संताप होणे.
- तहान लागली की विहीर खणणे – गरज लागली की धावाधाव करणे.
- तळहातावर शीर घेणे – जिवाची पर्वा न करता लढणे, जिवावर उदार होणे.
- तंबी देणे – धाक घालणे, दटावणे.
- तटस्थ राहणे – अलिप्त राहणे, आश्चर्याने स्तब्ध होणे.
- तडीस नेणे (जाणे) – यशस्वी रीतीने एखादे काम पूर्ण करणे.
- तहान भूक विसरणे – तन्मय होणे, तल्लीन होणे.
- तळ देऊन बसणे – सैन्याचा मुक्काम देणे.
- तडाखा देणे – प्रहार करणे, आघात करणे.
- तळ देणे – मुक्काम करणे.
- तलवार गाजवणे – पराक्रम करणे.
- तळहाताच्या फोडासारखे वागविणे – काळजीपूर्वक सांभाळणे.
- तळीराम गार करणे – जवळ द्रव्य जमवून मनाची तृप्ती करणे.
- तरातरा चालणे – भरभर चालणे.
- तडास्थ्यापासून सुटणे – तावडीतून सुटणे.
- तत्वज्ञान लंगडे पडणे – कोणताही विचार लंगडा (अपुरा) वाटणे.
- तळी भरणे – मदत करणे.
- तमा न वाटणे – पर्वा न वाटणे. (तमा नसणे)
- तळी उचलणे – अनेकजण मिळून एखाद्याला अधिकारच्युत करणे.
- तदाकार होणे – एकरुप होणे.
- तारांबळ उडणे – अतिशय घाई होणे, गडबड उडणे.
- ताणून देणे – निवांत झोपणे.
- तावडीत सापडणे – कचाट्यात सापडणे.
- तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे – मिळालेल्या संधीचा फायदा उठविणे.
- ताकाला जाऊन भांडे लपविणे – एखाद्या गोष्टीबद्दल इच्छा असूनही लज्जेने ती इच्छा नाही असे दाखविणे.
- ताव चढणे – जोर चढणे, राग येणे.
- तावडीतून सुटणे – कचाट्यातून सुटणे.
- ताळमेळ नसणे – एका गोष्टीचा दुस-या गोष्टीशी काहीही संबंध नसणे.
- ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे.
- ताटाखालचे मांजर होणे – अंकित जाणे, लाचार होणे.
- ताल (ताळ) सोडणे – घरबंद नसणे.
- तारे तोडणे – वेड्यासारखे भाषण करणे.
- तार छेडली जाणे – भावना उत्कटपणे जागृत होणे.
- तांडवनृत्य करणे – थयथयाट करणे. ताप देणे – त्रास देणे.
- ताबूत थंडे होणे – आवेश ओसरणे.
- तिष्ठत बसणे – वाट पहात बसणे.
- तिलांजली देणे – वस्तूवरचा हक्क सोडणे.
- तिखटमीठ लावून सांगणे – अतिशयोक्ती करून सांगणे.
- तिरपीट उडणे – गोंधळून जाणे.
- तिळपापड होणे – अंगाचा संताप होणे.
- तुटून पडणे – निकाराचा हल्ला करणे, जोराने कामास लागणे.
- तुणतुणे वाजवणे – क्षुल्लक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत सुटणे.
- तुच्छ लेखणे – हलके मानणे, कमी मानणे.
- तुच्छतेने पाहणे – तिरस्काराने पाहणे.
- तूट येणे – नुकसान होणे.
- तेळपट येणे – नाश होणे.
- त्रेधा तिरपीट उडणे – धांदल उडणे.
- त्रेधा उडणे – हाल होणे.
- तोरा मिरविणे – दिमाख दाखविणे.
- तोलास तोल देणे – बरोबरी करणे.
- तोफ डागणे – रागावून खूप बोलणे, तोफेतून गोळे सोडणे.
- तोल सुटणे – ताबा सुटणे.
- तोफेच्या तोंडी देणे – संकाटात लोटणे.
- तोड नसणे – उपाय नसणे.
- तोडगा काढणे – मार्ग शोधून काढणे. (तोड काढणे)
- तोंड टाकणे – वाटेल ते बोलणे.
- तोंड गोड करणे – आनंद व्यक्त करण्यासाठी गोड पदार्थ खायला देणे.
- तोंड शिवणे (मूग गिळून गप्प) – गप्प राहणे, काही न बोलणे.
- तोंड देणे – सामना करणे, झुंजणे.
- तोंडात काही न राहणे – माहीत असलेली गोष्ट मनात ठेवता न येणे.
- तोंडाचा पट्टा सुरु करणे – एक सारखे बोलत राहणे.
- तोंडचे पाणी पळणे – अतिशय घाबरणे, भयभीत होणे.
- तोंडाची वाफ दवडणे – निष्फळ बोलणे.
- तोंडात बोट घालणे – आश्चर्य वाटणे, अश्चर्यचकित होणे.
- तोंडाला पाने पुसणे – चांगलेच फसविणे, दगा देणे.
- तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लोभ उत्पन्न होणे.
- तोंडावाटे ब्र न काढणे – एक ही शब्द न उच्चारणे.
- तोंड लागणे – युद्धास सुरुवात होणे.
- तोंड सोडणे – अपशब्द बोलणे, वाटेल तसे बोलणे.
- तोंडाला कुलूप लावणे – एकदम गप्प बसणे.
- तोंडात शेण घालणे – समाजात छिःथू होणे, फजिती होणे.
- तोंडावर येणे – अगदी जवळ येणे.
- तोंड काळे करणे – दृष्टीआड होणे, नाहीसे होणे.
- तोंडाला मिठी बसणे – वीट येणे, कंटाळा येणे.
- तोंड गोरेमोरे होणे – ओशाळणे.
- तोंड चुकविणे – तोंड लपविणे.
- तोंड रंगविणे – मारणे.
- तोंडी लागणे – उलट उत्तर देणे.
- तोंडी खीळ पडणे – तोंड बंद होणे.
- तोंडास तोंड लागणे – भांडणाला सुरवात करणे.
- तोंड फिरविणे – नाराजी प्रकट करणे.
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार – मुकाय्याने दुःख सहन करणे.
- तोंड आवरणे – गप्प बसणे.
- तोंडावाटे ब्र काढण्याची चोरी असणे – एकही शब्द उच्चारण्याची सोय नसणे.
- तोंडावर सांगणे – समक्ष सांगणे.
- तोंडास तोंड देणे – प्रत्युत्तर करून भांडण वाढविणे.
- तोंड सुख घेणे – यथेच्छ बोलणे.
- तोंड सुरु होणे – बोलणे सुरू होणे.
- तोंड सांडणे – अमर्याद बोलणे.
- तोंडाचे बोळके होणे – तोंडातले दात पडणे.
- तोंडावर तुकडा टाकणे – गप्प बसावे म्हणून थोडेसे काही देणे.
- तोंडावर हात फिरविणे – गोड बोलून फसविणे.
- तोंड धरणे – बोलण्याची मनाई करणे.
- तोंड दिसणे – बोलणारा वाईट ठरणे.
- तोंड दाबणे – उलट बोलू न देणे.
- तोंड घालणे – दोघांच्या संभाषणात तिस-याने बोलू लागणे.
- तोंड पहात बसणे – विवंचनेत पडणे.
- तोंड वाजविणे – बडबडणे.