PSI/STI/ASO Combine Test No. 03, combine test series.
PSI/STI/ASO Combine Test No. 03
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 03
51) भारत सेवक समाजांचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट्ये आहेत ?
A) लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे.
B) धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे.
C) शिक्षणाचा प्रसार करणे.
योग्य विधान / ने निवडा.
१) फक्त A बरोबर २) A & C बरोबर
३) A & B बरोबर ४) A, B, C बरोबर
उत्तर : ४) A, B, C बरोबर
स्पष्टीकरण :
भारत सेवक समाज ही एक भारतीय संस्था आहे. इ.स. 1905 साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. याची एक शाखा अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार या गावी होती. देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थत्यागाची शिकवण देणे, धर्म व जाति यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे,शिक्षणाचा प्रसार करणे हा हेतू होता.
52) विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी खालीलपैकी कोण – कोण विशेष प्रयत्न केले आहेत ?
A) वि.रा. शिंदे B) ईश्वरचंद्र विद्यासागर
C) विष्णूशास्त्री पंडित D) विरेश लिंगम पतंलू
योग्य पर्याय निवडा.
१) B, D व E बरोबर २) B, C, D बरोबर
३) A, C, B बरोबर ४) C, B, E बरोबर
उत्तर : १) B, C व D बरोबर
स्पष्टीकरण :
वि.रा. शिंदे यांनी प्रार्थना समाजासाठी कार्य केले. प्रार्थना समाजाच्या वतीने १८ ऑक्टोबर १९०६ रोजी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ची स्थापना केली गेली. विठ्ठल रामजी शिंदे हे सरचिटणीस होते.
53) वेल्बी कमिशन समोर साक्ष कोणी दिले ?
A) सुरेंद्रनाथ बॅनर्जी B) दिनशा वाच्छा
C) सुब्रम्हण्यम अय्यर D) गोखले
योग्य पर्याय निवडा.
१) D बरोबर २) B, C & D बरोबर
३) A & D बरोबर ४) A, B, C, D बरोबर
उत्तर : १) B, बरोबर
स्पष्टीकरण :
वेलबी कमिशन हा ब्रिटिश सरकारने भारतात उधळलेल्या व्यर्थ खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमलेला एक गट होता. 1895 मध्ये स्थापित, त्याचे अधिकृत नाव Royal Commission on the Administration of Expenditure of India होते. असा दावा केला जातो की आयोगाने जास्त खर्च कमी करून भारताची आर्थिक स्थिती सुधारली. 1900 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वेलबी कमिशनच्या अहवालात भारत सरकारने अत्यधिक किंवा अन्यायकारक पैसे भरल्याची अनेक प्रकरणे दर्शविली गेली. त्याचे एक उदाहरण लाल समुद्र व इंडिया टेलीग्राफ कंपनीचे होते.
54) महाराष्ट्रातील बर्याच नेत्यानी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते त्यापैकि पुण्यातील कोणत्या नेत्याचा त्यात समावेश होतो ?
A) शिवराम हरी साठे
B) रामचंद्र साने
C) आगरकर
१) A & B २) B & C ३) A & C ४) A, B, C
उत्तर : ४) A, B, C
स्पष्टीकरण : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी ए. ओ हयुम याने केली. पहिल्या अधिवेशनास ७२ प्रतिनिधी उपस्थित होते.
55) ‘मराठा राष्ट्रीय संघ’ स्थापनेत खालीलपैकी कुणा – कुणाचा समावेश होता ?
A) सखारामपंत जेधे B) काशीनाथ जाधव
C) मुकुंदराव पाटील D) नारायण एरवंडे
पर्यायी उत्तरे :
१) A, B & D २) B, C, D
३) A, B, C ४) A, B, C & D
उत्तर : १) A, B & D
स्पष्टीकरण :
1917 सालच्या ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजातील मोठमोठ्या संस्थानिकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत फारसा कोणी हिंदुस्थानच्या राजकारणात भाग घेतलेला नव्हता. जो भाग घेतलेला होता तो शिक्षणाच्या बाबतच. शिक्षणाशिवाय राजकीय व इतर बाबतीतही मराठा समाजाने भाग घेणे आवश्यक वाटल्यावरून मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना करण्याचा विचार करण्यात आला.
56) वेव्हेल योजने विषयी चुकीचे विधान निवडा ?
A) १४ जून १९४६ ल योजना जाहीर झाली.
B) नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
C) पक्षनेते, प्रांताचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलवतील.
योग्य पर्याय निवडा.
१) A २) A, B & C
३) A & B ४) सगळे योग्य.
उत्तर : १) A
स्पष्टीकरण :
वेव्हेल योजना 14 जून 1945 ला जाहीर झाली व या योजनेनुसार भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करेल.
57) सर सय्यद अहमद खान बाबत काय खरे आहे.
A) ते पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झाले होते.
B) १८७५ मध्ये त्यांनी अलीगड येथे ‘मुहॉमेडन अॅग्लोओरिएंटल स्कूल’ ची स्थापना केली.
C) १८८८ मध्ये ब्रिटिश सरकारने ‘सर’ ही उपाधी बहाल केली.
D) हिंदू व मुसलमान दोघेही पवित्र गंगा – यमुनेच्या पाण्यावर जगतात.
E) त्यांनी मुसलमानांना कॉंग्रेसपासून दूर राहाण्यास पटवून दिले होते.
योग्य विधान / ने निवड.
१) A, B, C बरोबर २) A, B, C & E बरोबर
३) A, B, & E बरोबर ४) A, B, C, D & E बरोबर
उत्तर : ४) A, B, C, D & E बरोबर
स्पष्टीकरण :
सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती. सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. 1870 मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. 1877 मध्ये त्यांची Imperial विधीमंडळात निवड करण्यात आली
58) खालीलपैकी कोणती नदी खंबायतच्या आखातास जाऊन मिळत नाही ?
A) मही B) साबरमती C) नर्मदा D) तापी
पर्यायी उत्तरे :
१) A २) C ३) D ४) यापैकी नाही
उत्तर : ४) यापैकी नाही
स्पष्टीकरण :
सौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात.
59) खालील विधाने विचारात घ्या :
A) वार्षिक सरासरी पर्जन्यापेक्षा जास्त किंवा कमी पर्जन्य होणे यास पावसाची चलक्षमता म्हणतात.
B) पावसाच्या घटत्या प्रमाणाबरोबर चलक्षमता कमी होत जाते.
C) भारताच्या पावसाची चलक्षमता कमी आहे.
योग्य पर्याय निवडा.
१) A & C बरोबर २) फक्त A बरोबर
३) B & C बरोबर ४) A, B, C बरोबर
उत्तर : २) फक्त A बरोबर
स्पष्टीकरण :
पावसाच्या घटत्या प्रमाणाबरोबर चलक्षमतेत वाढ होत जाते. भारताच्या पावसाची चलक्षमता जास्त आहे.
60) काळ्या मृदेबाबत खाली काही विधाने दिली आहेत.
A) या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता अधिक असते.
B) ही मृदा गंगा व ब्रम्हपुत्रा खोर्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
C) जवळपास भारतात या मृदेचे प्रमाण २९ % आहे.
D) नदीजवळ फिकट काळी व नदीपासून दूर वर गडद काळी मृदा आढळते.
योग्य विधान / ने निवडा.
१) A & C बरोबर २) A, B, C बरोबर
३) A, C, D बरोबर ४) वरील सर्व
उत्तर : १) A & C बरोबर
स्पष्टीकरण :
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते. या मातीत लोह, अॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते. तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे. नदीजवळ गडद काळी व नदीपासून दूर वर फिकट काळी मृदा आढळते.
61) खालील दोन विधानांचा विचार करा.
A) २००१ च्या जणगणनेनुसार सर्वाधिक घनता प.बंगाल राज्यात होती.
B) २०११ च्या जणगणनेनुसार सर्वाधिक घनता बिहार राज्यात आहे.
योग्य पर्याय निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) A & B दोन्ही बरोबर ४) A & B दोन्ही चूक
उत्तर : ३) A & B दोन्ही बरोबर
स्पष्टीकरण :
लोकसंख्या घनता’ हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील लोकसंख्येचे वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे. लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्या लोकांची सरासरी संख्या. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.
62) महाराष्ट्रातील वीज वापर मोठ्या प्रमाणात कोणत्या क्षेत्रात आहे. त्यानुसार उतरता क्रम लावा.
A) औद्योगिक क्षेत्रात B) कृषी वापर C) घरगुती वापर
१) B, A, C २) A, C, B
३) A, B, C ४) C, A, B
उत्तर : २) A, C, B
स्पष्टीकरण :
महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या 15 टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.
63) योग्य जोड्या लावा. (खडक समूह व त्याचे महाराष्ट्रातील प्रमाण)
A B
A) ‘कडाप्पा प्रणाली’ १) ८१.३ %
B) कॅब्रियन समूह २) ४.७ %
C) डेक्कन ट्रॅप ३) १०.५ %
D) गाळाची जमिन व जांभा खडक ४) २ %
A B C D
१) 2 4 1 3
२) 4 3 1 2
३) 4 2 1 3
४) 2 3 1 4
उत्तर : २) 4 3 1 2
स्पष्टीकरण :
कडाप्पा प्रणाली – २ %
कॅब्रियन समूह – १०.५ %
डेक्कन ट्रॅप – ८१.३ %
गाळाची जमिन व जांभा खडक – ४.७ %
64) खालील दोन विधाने विचारात घ्या :
A) कर्जत, खापोली, रत्नागिरी येथे नारळ संशोधन केंद्र स्थापन केली आहेत.
B) पुण्याजवळ ‘उरळी कांचन’ येथे द्राक्षे संशोधन केंद्र आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) A & B बरोबर २) A बरोबर
३) B बरोबर ४) A & B दोन्ही चूक
उत्तर : ३) B बरोबर
स्पष्टीकरण :
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र – पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र – पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र – भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र – यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र – डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज – केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र – राजगुरूनगर (पुणे)
65) अयोग्य जोडी निवडा .
धबधबा नदी
अ) जोग धबधबा १.शरावती नदी
ब) शिवसमुद्रम धबधबा २.कावेरी नदी
क) धुवाधार धबधबा ३.नर्मदा नदी
ड) गिरसप्पा धबधबा ४.शरावती नदी
पर्यायी उत्तरे:
a) फक्त अ आणि ड b) फक्त ब
c) फक्त ब आणि क d) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर : d) वरीलपैकी एकही नाही.
66)
A) शेकडो किलोमीटर पर्यंत एकाच प्रकारचे वनस्पती आढळतात.
B) या वनक्षेत्रातून जागतिक लाकूड उत्पादनाच्या सुमारे ६० % लाकडाचे उत्पादन होते.
C) मृदा आम्लधर्मिय असते.
D) मृदेत पोषकद्रव्ये कमी प्रमाणात असतात.
वरील वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारात आढळतात ?
१) मोसमी वने २) तैगा वने
३) विषुववृत्तीय वने ४) भूमध्य सागरी वने
उत्तर : २) तैगा वने
स्पष्टीकरण :
तैगा हा तुर्की – रशियन शब्द असून त्याचा अर्थ पाणथळ जागेतील सूचिपर्णी अरण्ये असा होतो. चिलीचा अगदी दक्षिणेकडील भाग व न्यूझीलंडच्या दक्षिण बेटातील अपवाद वगळता तैगा प्रदेश फक्त उत्तर गोलार्धात आढळून येतात. उत्तर अमेरिकेत तैगाचा विस्तार सु. 55° उ. ते 66° 30′ उ. अक्षांशापर्यंत आढळतो. यामध्ये अलास्का, कॅनडाचा सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापर्यंतचा व त्यापलीकडे लॅब्रॅडॉर व न्यू फाउंडलंडपर्यंतचा प्रदेश येतो, तर युरोप खंडात तैगाचा विस्तार 60° उ. ते 66° 30′ उ. असून त्यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश व युरेशियाचा काही भाग येतो. आशियाच्या उ. भागात 50°उ. अक्षांशापासूनच तैगा प्रदेशाला सुरूवात होऊन आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस तो पसरलेला आढळतो. यात कॅमचॅटका द्वीपकल्पाचा समावेश होतो.
67) योग्य जोड्या लावा.
पठार खंड
अ. ॲपलेशियन पठार १. युरोप
ब. एटीप्लँनो पठार २. आशिया
क. मेसेटा पठार ३. दक्षिण अमेरिका
ड. युनान पठार ४. उत्तर अमेरिका
पर्यायी उत्तरे;
अ ब क ड
a) ४ ३ १ २
b) ३ ४ १ २
c) ३ ४ २ १
d) ४ १ २ ३
उत्तर : a) ४ ३ १ २
68) खालील विधाने विचारात घ्या :
A) अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरुशिखर असून त्याची उंची १७२२ एम. आहे.
B) सह्याद्रीपर्वतातील सर्वोच्च शिखर अनैमुडी असून त्याची उंची २६९५ एम. आहे.
C) सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर ‘अस्तंभा’ असून त्याची उंची १३२५ एम. आहे.
योग्य विधान / ने निवडा.
१) A & B बरोबर २) B & C बरोबर
३) A & C बरोबर ४) A, B, C बरोबर
उत्तर : १) A & B बरोबर
स्पष्टीकरण :
अस्तंभा डोंगर (तोरणमाळची डोंगररांग) – 1325 मीटर, जिल्हा नंदुरबार
69) महाराष्ट्रातील नद्यांच्या क्षेत्रानुसार योग्य क्रम लावा.
१) गोदावरी – भीमा – तापी – कृष्णा – कोकणातील नद्या
२) गोदावरी – भीमा – तापी – कोकणातील नद्या – कृष्णा
३) गोदावरी – भीमा – कोकणातील नद्या – तापी – कृष्णा
४) गोदावरी – भीमा – कृष्णा – कोकणातील नद्या – तापी
उत्तर : २) गोदावरी – भीमा – तापी – कोकणातील नद्या – कृष्णा
स्पष्टीकरण :
गोदावरी नदी – हिची एकूण लांबी 1450 कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह 668 कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा 9 जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते.
भीमा खोरे – भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात किचा प्रवाह 451 कि.मी. असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते.
तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.
तापी व पूर्णा संगम – चांगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे
कोकणातील नद्या –
सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – 49 ते 155 कि.मी.
कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (130 कि.मी.)
कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (124 कि.मी.)
कृष्णा नदी खोरे – कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात 282 कि.मी. चा प्रवास क्रुन ती आंध्रप्रदेशात जाते. तिची एकूण लांबी 1280 कि.मी. आहे.
70) भारत सरकारने पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम केव्हा सुरू केली होती ?
१) १९९३ २) १९९४
३) १९९५ ४) १९९२
उत्तर : २) १९९४
स्पष्टीकरण :
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन म्हणजे मज्जारज्जू, तर आयटिस (itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या 90% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात.
71)
A) सामान्यत: लहान बाळात आढळतो.
B) यामुळे बाळाचे अवयव कमजोर होतात.
C) ज्या बाळांना आईचे दुध मिळत नाही अशा बाळांना हा रोग होतो.
वरील लक्षणे खालीलपैकी कोणत्या रोगाची आहेत ?
१) पोलिओ २) स्कर्व्ही
३) घटसर्प ४) मुडदूस
उत्तर : २) स्कर्व्ही
स्पष्टीकरण :
क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे. शरीरात विटामिन सी अनेक प्रकार च्या रासायनिक क्रियांमध्ये सहायक असतो जसे की तंत्रिका पर्यंत संदेश पोहचवने आणि सेल पर्यंत ऊर्जा प्रवाहित करने इत्यादी. क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते
72) खालील दोन विधानांचा विचार करा.
A) पोटॅशियम क्लोरेटपासून ऑक्सिजन तयार करतात मॅगनीज ऑक्साइड हे उत्प्रेरकाचे कार्य करते.
B) वनस्पती तेलापासून वनस्पती तूप बनवताना रेनीनिकेल उत्प्रेरकाचे कार्य करते.
योग्य पर्याय निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) A & B दोन्ही बरोबर ४) A & B दोन्ही चूक
उत्तर : ३) A & B दोन्ही बरोबर
स्पष्टीकरण :
उत्प्रेरके हे विविध पध्दतींमध्ये प्रतिक्रियांची गती वाढवतात, ज्यापैकी सर्व सक्रियकरण ऊर्जा कमी करतात. संक्रमण स्थितीला स्थिर करून त्याच्या ऊर्जा कमी करण्यासाठी संक्रमण राज्यातील एक पूरक वितरण प्रभारी वातावरण तयार करणे. पर्यायी प्रतिक्रिया मार्ग प्रदान करून कमी ऊर्जा संक्रमण राज्य प्रदान करण्यासाठी एक सहकारिता मध्यवर्ती स्थापन करणे.
73) खालील जोड्या जुळवा.
श्वसन रंगदृव्य पशु / पशुसमूह
अ हिमोग्लोबिन I. अन्नेलिड्स
ब क्लोरोकुओरीन II. पृष्ठवंशीय
क हेमेरिथरीन III. लिंगुला
ड हिमोसायनिन IV. मोल्लुस्कस
पर्यायी उत्तर :
१) II , III, I , IV
२) II, I, III, IV
३) III, II, IV, I
४) IV, III, I , II
उत्तर : 2) II, I, III, IV
74) एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगाची लस शोधून काढली त्यांना ही प्रेरणा ———-
१) लहान बाळाचा तोंडावर आलेल्या पुरळावरून मिळाली.
२) ख्रिस्ती धर्मगुरुच्या हातावर आलेल्या पुरळावरून…….
३) आपल्याच पत्नीच्या अंगावर आलेल्या पुरळावरून………
४) गवळणीच्या हातावर आलेल्या पुरळावरून
उत्तर : ४) गवळणीच्या हातावर आलेल्या पुरळावरून
स्पष्टीकरण :
देवी रोग हा एक रोग आहे.हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो.या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे – ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुयां मध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात.
75) खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे.
A) लोखंड – यावर ऑक्सिजन क्रिया होते.
B) तांबे – यावर कार्बनडायऑक्साइड ची क्रिया होते.
C) चांदी – यावर हॅड्रोजन सल्फाइटची क्रिया होते.
१) A २) B
३) C ४) यापैकी नाही
उत्तर : ४) यापैकी नाही
स्पष्टीकरण :
लोखंड (Fe) हे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. लोखंड किंवा लोह पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे धातुस्वरूपातले मूलद्रव्य आहे. लोखंड निसर्गात सहसा मुक्तरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात असते. तांबे हा निसर्गात आढळणारा विद्युतसुवाहक धातू आहे. तांबे धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत व उष्णतेचा सुवाहक आहे. तांब्याचा उपयोग विद्युतवाहिन्यांमधे, उष्णतावाहकांमधे, आभूषण व अलंकारांमधे आणि घरगुती भांड्यांसाठी होतो. तांबे निसर्गतः मुक्त स्वरूपात आढळत असलेल्या मोजक्या धातूंपैकी एक आहे. त्यामुळे मनुष्याकडून तांब्याचा वापर खूप पूर्वीपासून (इ.स.पू. 8000 पासून) होत आहे. चांदी हा एक खूप मौल्यवान धातू आहे. (Ag) (अणुक्रमांक 47) रासायनिक पदार्थ. इंग्लिश नाव सिल्व्हर. शास्त्रीय नाव आर्जेन्टिनम. चांदी एक चमकणारी आणि बहुमूल्य धातु आहे. याचे परमाणु क्रमांक 47 आणि परमाणु द्रव्यमान 107.9 आहे. हे एक तन्य धातु असल्याने याचे उपयोग तार आणि आभूषण बनविण्यासाठी होतो. चांदी सर्वोत्तम विद्युतचालक आणि ऊष्माचालक धातु आहे
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download