PSI/STI/ASO Combine Test No. 04

PSI/STI/ASO Combine Test No. 04, combine test Series.

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 04
PSI/STI/ASO Combine Test No. 04

PSI/STI/ASO Combine Test No. 04

76) अणुमधील खालीलपैकी कोणता घटक उदासिन असतो म्हणजेच त्याच्यावर कोणताच प्रभार असतो ?
१) प्रोटॉन २) इलेक्ट्रॉन
३) न्युट्रॉन ४) यापैकी नाही.

उत्तर : ३) न्युट्रॉन
स्पष्टीकरण :
न्युट्रॉन अणूमधील एक मूलभूत कण. याचा विद्युत प्रभार 0 (शून्य) मानला जातो. सर्व प्राणु यांना एकत्र ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो.

77) खालील विधाने विचारात घ्या.
A) पेशीभित्तिका अजैविक असते.
B) पेशीभित्तिका वनस्पतीपेशी, कवकांत व जीवांणूत आढळते.
C) पेशीभित्तिका जैविक असते.
योग्य पर्याय निवडा.
१) A & C बरोबर २) B & C बरोबर
३) A & B बरोबर ४) A, B, C तिन्ही चूक

उत्तर : ३) A & B बरोबर
स्पष्टीकरण :
पेशीभित्तिका फक्त वनस्पतिपेशीतच असतात. पेशीच्या बाहेरचे आवरण म्हणजे पेशीभित्तिका. ही सेल्यूलोजची बनलेली असते. पेशींना आकार आणि पेशींच्या आतील भागाचे संरक्षण पेशीपटलामुळे होते. पेशीभित्तिकेच्या खाली पेशीपटल हे पातळ आवरण असून ते नाजूक व लवचिक असते. पेशीपटल हे प्राणिपेशीचे सर्वांत बाहेरचे आवरण असते.

78) पुढीलपैकी काचेचा कोणता प्रकार अतिनील किरण कापू / थांबवू शकतो ?

A) सोडा काच B) पायरेक्स काच
C) जेना काच D) क्रूक्स काच
१) A २) B
३) C ४) D

उत्तर : ४) D
स्पष्टीकरण :
क्रूक्स काच – याचा वापर सनग्लासेस लेन्सच्या उत्पादनात केला जातो. या ग्लासमध्ये सिरियम ऑक्साईड (सीओ 2) असते, जे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेते. या कारणास्तव, त्यातून चष्मा लेन्स बनविले जातात.

79) खालील दोन विधाने विचारात घ्या.
A) स्थूलकोन ऊती मधील पेशी जीवंत असतात.
B) दृढ ऊती ह्या मृत पेशीपासून बनलेल्या असतात.
योग्य विधान / ने निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) A & B दोन्ही बरोबर ४) A & B दोन्ही चूक

उत्तर : ३) A & B दोन्ही बरोबर
स्पष्टीकरण :
एक विशिष्ट कार्य करणार्‍या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. ऊती ही पेशी व सजीव यांमधील पायरी आहे. शरीरामधे विविध कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या ऊती असतात. ऊतींचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:-
१)सरल ऊती- या ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. उदा.अभिस्तर ऊती,मुल ऊती ई.
२)जटिल ऊती- या ऊती अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. उदा.रक्त,प्राणी व वनस्पतींमधील रक्तवाहिन्या आणि जलवाहिन्या ई.

80) HNO3 चे रेणूवस्तुमानांक काढा ?
१) 63 २) 65
३) 630 ४) 650

उत्तर : १) 63
स्पष्टीकरण :
H चे अणुवस्तुमानांक = 1u
N चे अणुवस्तुमानांक = 14 u
O चे अणुवस्तुमानांक = 16u
HNO3 चे रेणूवस्तुमानांक
(1 × 1) + (1 × 14) + (16 × 3) = 63 u.

81) ———— या शास्त्रज्ञाने १९८३ मध्ये वनस्पती सृष्टीचे अबीजपत्री व बीजपत्री या दोन उपसृष्टीत वर्गीकरण केले.
१) ऑरिस्टॉल २) थिओफ्रॅट्स
३) व्हिटाकर ४) एचर

उत्तर : २) थिओफ्रॅट्स
स्पष्टीकरण :
अबीजपत्री (अपुष्प) वनस्पती

  • थॅलोफायटा: स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम इ.
  • ब्रायोफायटा: मॉस (फ्युनारिया), मर्केंशिया, अॅन्थासिरॉस, रिक्सिया इ.
  • टेरिडोफायटा: फर्न्स – नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरिस, एडीअॅटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम इ.
    बीजपत्री (सपुष्प) वनस्पती
  • अनावृत्तबीजी: सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इ.
  • आवृत्तबीजी: द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती

82) ‘ऑक्टोपस’ हा प्राणी कोणत्या गटात मोडतो ?
१) अॅनिलीडा २) आर्थोपोडा
३) मोलूस्का ४) हेमिकॉर्डटा

उत्तर : ३) मोलूस्का
स्पष्टीकरण :
ऑक्टोपस हा एक आठ बाहू असणारा जलचर प्राणी आहे. याला इंग्लिशमध्ये ऑक्टोपस म्हणतात. ऑक्टोपस वंशाच्या लहानमोठ्या 50 जाती आहेत. लहानात लहान 2.5 सेंमी. व मोठ्यात मोठी 9.7 मी. असते. ऑक्टोपस उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही राहातो. हा प्राणी स्वताला वाचवण्यासाठी शाई सारका एक द्रव्य बाहेर टाकतो.

83) खालील विधाने विचारात घ्या.
A) मानवातील Y हे लांब तर X हे गुणसुत्र आखूड असते.
B) मानवातील X हे लांब तर Y हे गुणसुत्र आखूड असते.
C) मानवातील X व Y ही दोन्ही गुणसूत्रे समान असतात.
योग्य विधान निवडा.
१) A बरोबर २) B बरोबर
३) C बरोबर ४) यापैकी एकही नाही

उत्तर : २) B बरोबर
स्पष्टीकरण :
गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए (Deoxyribonucleic Acid) आणि प्रथिनांची संघटित संरचना होय.

84) पुढीलपैकी कोणी लेझरचा शोध लावला ?
१) थिओडोर मैमन २) डेनिस पॉपिन
२) विल्यम मार्टन ४) फ्रान्सिस क्रिक

उत्तर : १) थिओडोर मैमन
स्पष्टीकरण :
थियोडोर हॅरोल्ड मैमान हे एक अमेरिकन अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते आणि लेझरच्या शोधाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर दिले जाते. माइमनच्या लेझरने इतर अनेक प्रकारच्या लेसरच्या त्यानंतरच्या विकासास कारणीभूत ठरले.

85) प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.
4, 7, 12, 21, 38, 71, ?
१) 175 २) 145
३) 136 ४) 146

उत्तर : ३) 136
स्पष्टीकरण :
4 × 2 = 8 – 1 = 7
7 × 2 = 14 – 2 = 12
12 × 2 = 24 – 3 = 21
21 × 2 = 42 – 4 = 38
38 × 2 = 76 – 5 = 71
71 × 2 = 142 – 6 = 136

86) प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य निवडा.
6 : 222 : : 7 : ?
१) 310 २) 333
३) 350 ४) 343

उत्तर : ३) 350
स्पष्टीकरण :
6 : 222 (6^3 = 216, 216+6 = 222)
7 : 350 (7^3 = 343, 343+7 = 350)

87) एका सांकेतिक भाषेत OMNIPRESENT हा QJONPTSMDRD असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत CREDIBILITY हा शब्द कसा लिहिला जाईल ?
1) DSFESODXSHKH 2) JEFSDCXSHKH
3) JEFSDDXSHKH 4) JEFSDDZUJMJ

उत्तर : 3) JEFSDDXSHKH
स्पष्टीकरण :

88) (1.23)3 + 3 x (1.23)3 x (2.27) + 3x (2.27)2 x (1.23) + (2.27)3 = ?
1) 36.825 2) 40.625
3) 42.875 4) 44.415

उत्तर : 3) 42.875
स्पष्टीकरण :
(a + b)3 = a3 + 2a2b +2ab2 + b3
(1.23 + 2.27)3 = (3.5)3 (3.5 x 3.5 x 3.5) = 42.875

89) एकव्यक्ती 10 फुट पूर्वेकडे चालत गेला आणि उजवीकडे वळाला व तिथून तो 10 फूट चालत गेला आणि तिथून उजवीकडे 15 फूट चालत गेला. नंतर तो डावीकडे वळून 10 फूट चालत गेला. पुन्हा डावीकडे वळून 17 फूट चालत गेला आणि शेवटी डावीकडे 5 फूट चालला. तर तो व्यक्ती सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे.
१) पूर्वेकडे २) पश्चिमेकडे
३) उत्तरेकडे ४) दक्षिणेकडे

उत्तर : ३) उत्तरेकडे
स्पष्टीकरण : 10 फुट

91) एका शब्द व अंक व्यवस्थापन यंत्रास जेव्हा शब्द व अंकांची एक ओळ इनपुट म्हणून दिली. त्यावेळी त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार संयोजित करते.

इनपुट       : by now 23 70 sight 35 13 home 

Step –I     : sight by now 23 70 35 13 home 

         II     : Sight 13 by now 23 70 35 home 

         III    : Sight 13 by 23 70 35 home

         IV     : Sight 13 now 23 by 70 35 home 

         V  : Sight 13 now 23 home by 70 35 

        VI  : Sight 13 now 23 home 35 by 70 

वरील पायर्‍यांचे नियम ओळखून त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे द्या. जर,
इनपुट : ask four my 49 32 64 and 24
तर वरील इनपुटची III पायरी काय असेल.
My ask four 49 32 64 and 24
My 24 four ask 49 32 64 and
My 24 four and ask 49 32 64
My 24 ask four 49 32 64 and

उत्तर : 2) My 24 four ask 49 32 64 and
स्पष्टीकरण :
सर्वप्रथम इंग्रजी मुळाक्षरे उलट क्रमाने लावले आहेत. त्यानंतर सर्वात लहान अंक आधी व सर्वात मोठा नंतर या क्रमाने पुढच्या पायरी आहेत.
इनपुट : ask four my 49 32 64 and 24
Step –
I : My ask four 49 32 64 and 24
II : My 24 ask four 49 32 64 and
III : My 24 four ask 49 32 64 and

92) इनपुट : group north apple cast 72 34 57 25
तर वरील इनपुटची शेवटचा पायरी क्रमांक कितवा असेल ?
1) चार 2) पाच
3) सहा 4) सात

उत्तर : 2) पाच
स्पष्टीकरण :
सर्वप्रथम इंग्रजी मुळाक्षरे उलट क्रमाने लावले आहेत. त्यानंतर सर्वात लहान अंक आधी व सर्वात मोठा नंतर या क्रमाने पुढच्या पायरी आहेत.
इनपुट : group north apple cast 72 34 57 25
Step –I : north group apple cast 72 34 57 25

         II     : north 25 group apple cast 72 34 57

         III    : north 25 group 34 apple cast 72 57

         IV     : north 25 group 34 cast apple 72 57 

         V  : north 25 group 34 cast 57 apple 72

93) प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ? याचा योग्य तर्क लावून योग्य पर्याय निवडा.
पर्याय :

            2)          3)          4) 

उत्तर : 1)

स्पष्टीकरण :
पहिल्या ओळीत बाणांची संख्या 4, 3, 2 अशी आहे.
दुसऱ्या ओळीत बाणांची संख्या 3, 2, 4 अशी आहे.
तिसऱ्या ओळीत बाणांची संख्या 2, 4, 3 अशी असेल.
म्हणुन पर्यायातील आकृती 1) बरोबर आहे.

94)

वरील आकृतीमध्ये चारही अवस्था ह्या एकाच घनांच्या आहेत. तर वरील ४ या अंकाच्या विरुध्द कोणता अंक येईल.

1                               2) 2 

3) 3 4) 5

उत्तर : 1) 1

स्पष्टीकरण :

4 या अंकाच्या विरुध्द 1 हा अंक येईल. कारण आकृती 2) व 3) चे व्यवस्थित निरिक्षण केले असता 4 ह्या अंकाच्या विरुध्द 1 हा अंक येतो.

95) अ आणि ब दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात ब व क दोघे मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. अ व क दोघे मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून तेच काम करायला किती दिवस लागतील.

10 दिवस                             2) 12 दिवस 

3) 15 दिवस 4) 8 दिवस

उत्तर : 4) 8 दिवस

स्पष्टीकरण :

अ + ब = 10 ब + क = 15 अ + क = 12

अ आणि ब दोघांचे मिळून एक दिवसाचे काम = 1/10 काम

ब आणि क दोघांचे मिळून एक दिवसाचे काम = 1/15 काम

अ आणि क दोघांचे मिळून एक दिवसाचे काम = 1/12 काम

एका दिवसात तिघे मिळुन काम 2(अ+ब+क) = 1/10 + 1/15 + 1/ 12

    2(अ+ब+क) = 1/4

म्हणुन (अ+ब+क) एका दिवसात = 1/8 काम करतात.

म्हणजेच तिघांना मिळुन ते काम करायला 8 दिवस लागतील.

96) रूपेश आणि रितेश यांच्या वयांच्या बेरजेची चौपट ९२ येते. रितेश आणि रमन यांच्या वयांच्या बेरजेची तिप्पट ४२ येते रमनच्या वयाची पाचपट रूपेशच्या वयाच्या दुप्पटी इतकी येते. तर रितेशचे वय काय ?

१५                              2) १२ 

3) १० 4) ८

उत्तर : 4) ८

स्पष्टीकरण :

समजा, रुपेशचे वय 8 वर्ष घेतले तर,

4 (रुपेश + रितेश) = 92 4 (रुपेश + 8) = 92 रुपेश = 15

3 (रितेश + रमन) = 42 3 ( 8 + रमन) = 42 रमन = 6

रमनच्या वयाची पाचपट रूपेशच्या वयाच्या दुप्पटी इतकी येते.

म्हणजेच,

6 X 6 X 6 X 6 X 6 = 30

15 X 15 = 30

म्हणुन रुपेशचे वय 8 वर्ष बरोबर आहे.

97) ४:०० व ५:०० वाजताच्या दरम्यान घड्याळाचे काटे एका सरळ रेषेत किती वाजता एकत्र भेटतात.

4 : 54                          2) 4 : 50 1/2 

3) 4 : 52 3/4 4) 4 : 54 6/11

उत्तर : 4) 4 : 54 6/11

स्पष्टीकरण :

4 वाजता दोन्ही काट्यांमधील अंतर 20 मिनिटांचे असते.

एका सरळ रेषेत येण्यासाठी त्यांना अजुन 30 मिनिटांची गरज आहे.

आता मिनिट काटा 50 मिनिटांवर आला.

म्हणजे 60 मिनिटांत 55 मिनिटे मिळविली.

50 मिनिटे मिळविण्यासाठी 60/55 50 : 4 = 54 6/11 : 4

= म्हणजे 4 वाजुन 54 6/11 मिनिटांनी घड्याळाचे काटे एका सरळ रेषेत एकत्र भेटतील.

98) खाली दिलेल्या विधाने व अनुमानावरून योग्य पर्याय निवडा.

विधाने :

काही फळे, फुले आहेत. 

एकही फुल जहाज नाही. 

सर्व जहाजे नद्या आहेत. 

अनुमान :

काही फळे नद्या आहेत. 

काही नद्या जहाजे आहेत. 

काही नद्या फळे आहेत. 

काही फुले फळे आहेत. 

पर्याय :

फक्त अनुमान I व II सत्य                     २) फक्त अनुमान II व III सत्य 

३) फक्त अनुमान II व IV सत्य ४) एकही अनुमान सत्य नाही.

उत्तर : ३) फक्त अनुमान II व IV सत्य

स्पष्टीकरण :

फळे फुले    जहाज    नद्या

99) रिक्त चौकोन पूर्ण करा.

102         2) 105          3) 84           4) 74 

उत्तर : 4) 74

स्पष्टीकरण :

548 + 75 = 623

341 + 91 = 432

243 – 317 = 74

244 +74 = 317

100) घडाळ्याच्या काटयांच्या स्थितीबद्दल योग्य पर्याय निवडा.

एका दिवसात मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांना २४ वेळा ओलांडतात. 

ब) एका दिवसात मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांना २२ वेळा ओलांडतात.

क) एका दिवसात मिनिट काटा आणि तास काटा यांच्या काटकोन ४४ वेळा होतो.

अ व ब बरोबर                         २)  अ व क बरोबर 

३) ब व क बरोबर ४) अ, ब, क बरोबर

उत्तर : ३) ब व क बरोबर

स्पष्टीकरण :

एका दिवसात मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांना २२ वेळा ओलांडतात. कारण, घड्याळा जेव्हा १२ वजलेले असतात तेव्हा मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांना ओलंडत नाही. तसेच एका दिवसात मिनिट काटा आणि तास काटा यांच्या काटकोन ४४ वेळा होतो. एका तासात मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात २ वेळा काटकोन होतो. या हिशोबाने १२ तासात २२ वेळा आणि २४ तासात ४४ वेळा होतो.

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply