PSI/STI/ASO Combine Test No. 08
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 08
76) भारत व म्यानमार यांच्यामध्ये सीमा निर्धारित करणारी खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे ?
1) खासी, पटकोई आणि अराकान योमा 2) अकाई पर्वतरांग
3) ग्रेट डिव्हायडिंग रेंज 4) वरीलपैकी नाही.
उत्तर : 1) खासी, पटकोई आणि अराकान योमा
स्पष्टीकरण :
ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत. आराकान योमाची सरासरी उंची 1,800 मी. पर्यंत असून मौंट व्हिक्टोरिया या सर्वोच्च शिखराची उंची 3,063 मी. आहे. आराकान योमाच्या उत्तरेस आराकान टेकड्या, चिन टेकड्या, लुशाई, पातकई इ. डोंगराळ भाग आहे. तोही काही लोक आराकन योमाचाच भाग समजतात. पूर्वेस इरावतीचे खोरे असून दक्षिणेस केप नेग्राईस पलीकडे मार्ताबानचे आखात व अंदमान समुद्र आहे. पश्चिमेस ब्रह्मदेशाचा चिंचोळा आराकान विभाग व त्या पलीकडे बंगालचा उपसागर आहे. आराकान योमा उंच उंच डोंगर व त्यांमधील खोल दऱ्या यांनी भरलेला आहे. मध्य पठाराचा हा भाग क्रिटेशसकालीन रेतीखडकांचा व बेताच्या उताराचा असून त्याच्या काठावरून पडणारा मौसमे धबधबा नयनरम्य आहे. चेरा पठारावर छोट्या चुनखडी टेकड्या विखुरलेल्या असून त्यांपैकी काहींत भूमिगत मार्ग व निक्षेप आढळतात. चेरापुंजीच्या दक्षिणेस सहा किमी. नंतर खालच्या मैदानाकडे एकदम तीव्र उतार आहे. खासी टेकड्यांच्या प्रदेशात चुनखडी, थोडा कोळसा व कोरंडम सापडते. खासी-जैंतिया टेकड्या म्हणजे बहुतांशी मेघालय राज्याचा संयुक्त खासी व जैंतिया टेकड्या जिल्हाच होय.
भारताच्या अतिपूर्व भागात म्यानमार सीमेलगत उत्तर व दाक्षिण दिशेने पसरलेल्या अनेक टेकड्या आहेत या तेकडयांना पुर्वाचल असे म्हणतात. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या राज्यात या टेकडयांच्या रांगा पसरलेल्या आहे. या टेकड्या विविध स्थानिक नावांनी ओळखल्या जातात उदाठ पतकोई टेकड्या नागा टेकड्या मणिपूर टेकड्या मिझो टेकड्या नागा टेकडयांमधील सारामती (3826 मी) हे या भागातील सर्वोच्च शिखर आहे.
77) खालीलपैकी कोणत्या संस्थानांसाठी बनविलेली घटना स्वत: गांधीजींनी तयार केली होती ?
1) सातारा संस्थान 2) बडोदा संस्थान
3) औंध संस्थान 4) यापैकी नाही.
उत्तर : 3) औंध संस्थान
स्पष्टीकरण :
औंध संस्थान महाराष्ट्रातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे. औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन 1699 या वर्षी झाली.या संस्थानाची पूर्वीची राजधानी कराड ही होती.
78) हशीश नावाचा ड्रग्ज खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या फुलापासून बनवितात ?
1) लिंब 2) भांग
3) गुलाब 4) तुळस
उत्तर : 2) भांग
स्पष्टीकरण :
भांग पिणे आरोग्यासाठी धोकादायक असले तरी आनंद मिळवण्यासाठी ही उपयोगी वस्तू आहे. परंतू याचे काही औषधी गुणदेखील आहे जे जाणून आपल्यालाही आश्चर्य वाटेल- एकीकडे भांगचे अधिक सेवन केल्याने डोकेदुखी उद्भवतं तसेच डोकेदुखीचा उपचारही याने संभव आहे. होय, भांगेच्या झाडाच्या पानांचा अर्क काढून, त्याचे काही थेंब कानात टाकल्याने डोकेदुखीपासून सुटकारा मिळेल. पचनशक्ती वाढवण्यासाठी भांग फायदेशीर आहे. कोणत्याही प्रकाराची जखम झाल्यावर या झाडाच्या पानांचा लेप बनवून जखमेवर लावावा. अशाने जखम लवकर भरेल. एकीकडे भांगचे अधिक सेवन केल्याने डोकेदुखी उद्भवतं तसेच डोकेदुखीचा उपचारही याने संभव आहे. होय, भांगेच्या झाडाच्या पानांचा अर्क काढून, त्याचे काही थेंब कानात टाकल्याने डोकेदुखीपासून सुटकारा मिळेल. पचनशक्ती वाढवण्यासाठी भांग फायदेशीर आहे. कोणत्याही प्रकाराची जखम झाल्यावर या झाडाच्या पानांचा लेप बनवून जखमेवर लावावा. अशाने जखम लवकर भरेल.
79) A, B, C, D, E, F ही मुले त्याच क्रमाने एका मोजाभोवती वर्तुळाकार बसली आहेत. प्रथम A आणि C यांनी आपापसात जागा बदलल्या व नंतर E व F यांनी परस्परात जागा बदलल्या तर आता D जवळ कोण बसले आहे ?
1) B व F 2) E व A
3) A व F 4) C व F
उत्तर : 3) A व F A C
स्पष्टीकरण :
B F B E
F
C E A
D D
80) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
3 C 2 B 4 A
27 A ? 64 B
9 C 4 A 16 B
1) 8 C 2) 12 B
3) 16 C 4) 18 C
उत्तर : 1) 8 C
स्पष्टीकरण :
3 × 3 = 9 × 3 = 27
4 × 4 = 16 × 4 = 64
2 × 2 = 4 × 2 = 8 म्हणुन, 8 C
81) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार खालीलपैकी कोणते कार्य तलाठी करतो ?
1) गावातील जमीनधारकांची नोंद ठेवणे. 2) गावातील महसूल गोळा करणे.
3) गावातील रेशनकार्ड वितरण करणे. 4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
स्पष्टीकरण :
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनन्दिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते. नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारांस देणे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 154 नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
82) बंधने कमी करून खासगी क्षेत्राला वाव देणारे नियोजन म्हणजे सूचक नियोजन होय. अशा सूचक नियोजनाचा भारताने कोणत्या पंचवार्षिक योजनेत पूर्णत: स्वीकार केला ?
1) आठवी पंचवार्षिक योजना 2) पहिली पंचवार्षिक योजना
3) दुसरी पंचवार्षिक योजना 4) सातवी पंचवार्षिक योजना
उत्तर : 1) आठवी पंचवार्षिक योजना
स्पष्टीकरण :
कालावधी : 1 एप्रिल,1992 ते 31 मार्च, 1997, मुख्यभर : मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास, प्रतिमान : पी.व्ही. राव व मनमोहन सिंग, मुख्यभर : मानवी विकास
योजना खर्च : प्रास्तावित खर्च : 4,34,120 कोटी रु., वास्तविक खर्च : 4,74,121 कोटी रु., अपेक्षित वृद्धी दर – 5.6%, प्रत्यक्ष वृद्धी दर – 6.8%
विभागवार आर्थिक वाटप : 1. ऊर्जा (26%) 2. वाहतूक व दळणवळण (18%) 3. शेती व इतर (12%)
उद्दिष्ट्ये : 1. शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पुरेशा रोजगाराच्या संधि निर्माण करणे. 2. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे. 3. 15 ते 35 वर्ष वायोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे. 4. सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,प्राथमिक आरोग्य सोयी-सुविधा पुरवणे, त्यांना रोगराईपासुन मुक्त करणे इ. 5. कृषि क्षेत्राचा विकास व विविधिकरण करून अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे व निर्मितीसाठी योग्य असा शेतमालाचा आढावा निर्माण करणे. 6. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचनसोई इ सोई-सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देवून भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणे.
विशेष घटनाक्रम : 1. 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 2. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय, 1993-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. 3. 1992 मध्ये (SEBI) ला संवैधानिक दर्जा देण्यात आला. 4. 1992 मध्ये 73 व 74 व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला. 5. 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली. 6. 1996 मध्ये भारतात पहिल्यांदा डीपॉझिटची प्रणालीची सुरवात करण्यात आली.
सुरू करण्यात आलेल्या योजना : 1. राष्ट्रीय महिला कोष – 1992-93 मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला. 2. 2 ऑक्टोंबर 1993 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या
अ. आश्वासीत रोजगार योजना, ब. पंतप्रधान रोजगार योजना, क. महिला समृद्धि योजना – ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृती वाढीस लागणे हे तिचे उद्दीष्ट आहे.
- 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली.
- 15 ऑगस्ट 1995 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या
अ. मध्यान्न आहार योजना, ब. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, क. इंदिरा महिला योजना.
83) विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) विकासकांना सीमाशुल्क व अबकारी करापासून मुक्तता
ब) सेझपासून प्राप्त उत्पन्नावर दहा वर्षांसाठी आयकर मुक्तता
क) भांडवली नफा करापासून मुक्तता
ड) शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
1) ‘ब’ व ‘क’ 2) फक्त ‘ड’
3) ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ 4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
स्पष्टीकरण :
उत्पादन प्रक्रियेमध्ये काही त्रुटी जाणवत होत्या जशा शासकीय नियंत्रणे, दप्तर दिरंगाई, अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा अभाव, अस्थिर शासकीय धोरण या सर्व गोष्टी दूर करण्याच्या तसेच परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) धोरण जाहीर झाले. सेझ निर्मितीमागे ‘कमीत कमी नियंत्रण, आकर्षक सवलती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवून विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) हे आर्थिक वाढीस चालना देणारे प्रमुख अभियंत्र बनावे असा उद्देश आहे. 1 नोव्हेंबर 2000 पासून 9 फेब्रुवारी 2006 पर्यंत विशेष आर्थिक क्षेत्र कार्यप्रणाली ही परकीय व्यापार धोरणानुसार ठरत होती. गुंतवणुकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी, विशेष आर्थिक क्षेत्र धोरणाला बळकटी देण्यासाठी व आर्थिक वाढ आणि रोजगारात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने विशेष आर्थिक क्षेत्र विधेयक तयार करण्यात येऊन मे 2005 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र कायदा संसदेत संमत झाला आणि 23 जून 2005 ला कायद्यास राष्ट्रपतींची संमती मिळाली. विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याला अनुसरून 10 फेब्रुवारी 2006 ला विशेष आर्थिक क्षेत्र नियम लागू करण्यात आले. विशेष आर्थिक क्षेत्रांना शुल्कविरहित अंत:क्षेत्र म्हणतात, विशेष आर्थिक क्षेत्रांना परकीय क्षेत्र म्हणून गणले जाते. विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करणाऱ्याला सेझ विकासक असे म्हणतात, प्रत्येक विशेष आर्थिक क्षेत्र हे प्रक्रिया क्षेत्र आणि प्रक्रियारहित क्षेत्रात विभागले जाते, प्रकिया क्षेत्रात विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्पांना परवानगी दिली जाते आणि प्रकियारहित क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारल्या जातात. विशेष आर्थिक क्षेत्र निर्मितीची खाली उद्दिष्टे आहेत
१) वाढीव आर्थिक कार्य निर्माण करणे. २) वस्तू व सेवांच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. ३) देशी तसेच परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. ४) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ५) पायाभूत सुविधांचा विकास करणे
85) एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन जावता दोन टोल याप्रमाणे तर 24 तासांत एकूण किती टोल पडतील ?
1) 154 2) 156
3) 158 4) 152
उत्तर : 2) 156
स्पष्टीकरण :
घड्याळ 12 तासांचे असते, म्हणुन
= n × (n + 1) / 2
= 12 × (12 + 1) / 2
= 78
पण, आपल्याला 24 तासांत एकूण किती टोल पडतील हे काढायचे आहे. म्हणुन
= 78 × 2
= 156
86)
1) 6 2) 8
3) 10 4) 12
उत्तर : 4) 12
स्पष्टीकरण :
4 × 5 = 20 / 2 = 10
8 × 9 = 72 / 2 = 36
6 × 8 = 48 / 2 = 24
7 × 12 = 84 / 2 = 42
87) जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) विहीर जलसिंचन I) 55%
ब) कालवा जलसिंचन II) 22.5%
क) तलाव जलसिंचन III) 14.5%
ड) उपसा जलसिंचन IV) 8%
अ ब क ड
1) I II III IV
2) II IV I III
3) I III II IV
4) यापैकी नाही
उत्तर : 1) I II III IV
स्पष्टीकरण :
विहीर जलसिंचन महाराष्ट्र्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या 1995 च्या आकडेवारीनुसार 11 लाख 43 हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे 10 लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून 2,54,710 हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता 321810 हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्र्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठयाचा अंदाज पाहता आणखी 11 लाख 82 हजार विहिरी खोदता येतील. तलाव जलसिंचन महाराष्ट्र्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15 टक्के आहे. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणार्या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे 60 टक्के आहे. पाझर तलाव महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात 1972 साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे 1400 आहे, तर 1800 पाझर तलावांची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी 3000 पाझर तलाव तयार होतील. उपसा जलसिंचन विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करुन द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्र्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी 8 टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दक्षिण महाराष्ट्र्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्नागिरी व संधिुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.
88) पुढील विधानांचा विचार करा.
अ) अॅसिड लाव्हामध्ये सिलिकांचे प्रमाण हे अधिक असते. ब) बेसिक लाव्हा हा घट्ट असतो.
क) बेसिक लावहामध्ये सिलिकांचे प्रमाण हे जास्त असते. ड) अॅसिड लाव्हा हा प्रवाही नसतो.
1) ‘अ’ व ‘ब’ बरोबर तर ‘क’ व ‘ड’ चूक 2) ‘अ’ व ‘क’ बरोबर तर ‘ब’ व ‘ड’ चूक
3) ‘अ’ व ‘ड’ चूक तर ‘ब’ व ‘क’ बरोबर 4) ‘ब’ व ‘क’ चूक तर ‘अ’ व ‘ड’ बरोबर
उत्तर : 4) ‘ब’ व ‘क’ चूक तर ‘अ’ व ‘ड’ बरोबर
स्पष्टीकरण :
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात शिलारस, वायू, बाष्प, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन व कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतात. शिलारसात सिलिका, लोह व मॅग्नेशिअम हे पदार्थ असतात. ज्वालामुखीच्या वेळी खडकांच्या लहान कणांपासून मोठय़ा तुकडय़ांपर्यंत सर्व पदार्थ ज्वालामुखी राख या स्वरूपात बाहेर पडतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून वायूबरोबर बाहेर पडणाऱ्या पदार्थाला लाव्हारस म्हणतात.
या लाव्हारसाचे सिलिका या घटकाच्या प्रमाणानुसार दोन प्रकार पडतात.
अॅसिड लाव्हा : ज्या लाव्ह्य़ात सिलिकाचे प्रमाण 70 टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त असते, त्याला अॅसिड लाव्हा असे म्हणतात. हा लाव्हारस अत्यंत घट्ट व रंगाने पिवळसर असतो.
बेसिक लाव्हा : या लाव्हा रसात सिलिकेचे प्रमाण 30 ते 40 टक्के इतके असते. बेसिक लाव्हा काळसर असून तो जास्त प्रभावी असतो.
89) खालील नकाशामध्ये बरोबर जमातीचे स्थान ओळखा.
‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’
1) बंजारा बागरी असुर अहीर
2) असुर अहीर बागरी बंजारा
3) अहीर बागरी असुर बंजारा
4) बागरी अहीर असुर बंजारा
उत्तर : 4) बागरी अहीर असुर बंजारा
स्पष्टीकरण :
भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुघल साम्राज्याच्या काळात आणि ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झाली आहेत असे मानले जाते. ह्या व्यवस्थेला मात देण्यासाठी आजच्या भारतीय समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळ्यांवर आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांपासून बनलेली आहे, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पहाता ह्या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. सध्या अस्तित्वात असलेली जाती व्यवस्था ही मुगल काळाच्या अंताकडे आणि ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला भारतीय समाजामध्ये झालेल्या अनेक स्थित्यंतरातून निर्माण झालेली आहे. मुघल साम्राज्याच्या अंताच्या काळामध्ये अनेक शक्तिशाली व्यक्तीचा आणि गटांचा उदय झाला. त्यांनी स्वतः राजेशाही, धर्ममार्तंड आणि ब्राह्मण यांच्या बरोबरीने उभे राहाण्याची ताकद कमावली होती, ह्या सामाजिक बदलामुळे अनेक जातिबाह्य गटांमध्ये ही जातीय अस्मितांची निर्मिती व्हायला मदत झाली. ब्रिटिश काळात ह्याच सामाजिक स्थित्यंतराचे ब्रिटिशांनी आणलेल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्थिर अश्या जाती घडविण्यामध्ये रूपांतरण झाले. 1860 आणि 1920 दरम्यान, ब्रिटीशांनी भारतीय समाजाला जातीय स्तरावर वेगवेगळे मांडायला सुरूवात केली होती, त्यातूनच प्रशासकीय पदे आणि कामे ही फक्त उच्च जातीय लोकांनाच देण्याचा पायंडा त्यांनी पाडला. ज्याचा परिणाम स्वरूप 1920 साली मोठ्या प्रमाणात समाजातून विरोध निर्माण झाला आणि ब्रिटीशांना त्यांच्या ह्या धोरणामध्ये बदल करावा लागला. आणि त्यापुढे ब्रिटीशांनी सरकारी नोकऱ्यांच्या काही पदांवर आणि एकूण पदातील काही टक्के पदांवर खालच्या जातीच्या लोकांनाही घ्यायला सुरुवात केली आणि आरक्षणाची सुरुवात केली.
90) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1) भारतामध्ये लाल मृदा ही भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या परिघावर आढळते.
2) जांभी मृदा उंच भागापेक्षा सखल भागामध्ये जास्त आम्लीय असते.
3) गाळाच्या मृदेमध्ये पोटॅश व फॉस्फरसची कमतरता असते.
4) काळ्या मृदेमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असते.
उत्तर : 1) भारतामध्ये लाल मृदा ही भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या परिघावर आढळते.
स्पष्टीकरण :
मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा हि एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या परिसंस्थेचा वापर करतो. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते. माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते.
जाडी भरडी मृदा : विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घात माथ्यावर हि मृदा आढळते. उदा. अजंठा, बाळघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते.
काळी मृदा : रेगुर किवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील हि मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. नद्यांच्या खोर्यांमधील गाळाची मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अती काळी मृदा तर पूर्वभागात मध्यम काळी मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.
जांभी मृदा : सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायुशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून हि मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.
किनारपट्टीवरील गाळाची मृदा : कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनार्यावर नद्यांच्या मुखाशी हि मृदा निर्माण झालेली आहे. उदा. धरमतर, पनवेल इत्यादी परिसर.
पिवळसर तपकिरी मृदा : अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. हि मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडार्याचा पूर्वभाग व सह्याद्रीचा पर्वतीय भागात हि मृदा आढळते.
91) खालील नकाशामध्ये दर्शविलेले समुद्रप्रवाह ओळखा.
1) बैंगुला, फॉकलँड
2) कॅनरी, हंबोल्ट
3) अघुल्हास, गिनीया
4) बैंगुला, गिनीया
उत्तर : 4) बैंगुला, गिनीया
स्पष्टीकरण :
बैंगुला प्रवाह हा एक दक्षिण अटलांटिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे. अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः 106.4 दशलक्ष वर्ग-कि.मी. आहे. ह्या महासागराने पृथ्वीवरील जवळ जवळ एक पंचमांश पृष्ठ व्यापले आहे. ‘अटलांटिक’ हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. ऍटलासचा सागर तो अटलांटिक. या नावाचा उल्लेख सर्वप्रथम हेरोडोटस संस्कृतीच्या इतिहासात साधारण इ.पू.450 च्या सुमारास आढळतो. अटलांटिक महासागर इंग्रजी एस (S) आकारात असून, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैरृत्येला पॅसिफिक महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर, आणि दक्षिणेला दक्षिणी महासागर/ दक्षिणी समुद्र यांना मिळतो. विषुववृत्त या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन भागांमध्ये विभागते.
92) “तुमची आई मरण पावलेली नाही, ती झोपलेली आहे, तिला जागवा” असा अर्थपूर्ण संदेश कोणी दिला ?
1) बा. ग. टिळक, स्वदेशी चळवळ स्स 2) अॅनी बेझंट, होमरुल चळवळ
3) लीलाताई पाटील, छोडो भारत चळवळ 4) स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन
उत्तर : 2) अॅनी बेझंट, होमरुल चळवळ
स्पष्टीकरण :
अॅनी बेझंट ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती. भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला. • 1893 मध्ये भारतात आगमन. • 1914 ‘न्यू इंडिया’ वृत्तपत्र काढले. • 1907 ‘जागतिक थिऑसॉफिकल’ सोसायटीची अध्यक्षा. अॅनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. 1917 च्या कलकत्त्याच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी अॅनीची गाठ पडली. त्यांचा ‘सीक्रेट डॉक्ट्रिन’ हा ग्रंथ अॅनीने वाचला. जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अॅनीचा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी १८९३ साली त्या भारतात आल्या. ‘जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू’ असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. लोकमान्य टिळकांप्रमाणेच त्यांनी ‘होमरूल’ आंदोलन उभारले. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्या समाजवादी विचारसरणीच्या होत्या. इ.स. 1875 मध्ये चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा ‘द फ्रुट्स ऑफ फिलॉसॉफी’ हा प्रबंध लिहिला. या लिखाणाबद्दल दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. जे. कृष्णमूर्तींना त्यांनी आपला मानसपुत्र मानले. भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. शिक्षण, समाजसुधारणा, स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी भाग घेतला व 20 सप्टेंबर, 1933 रोजी या जगाचा निरोप घेतला.
93) आर्य महिला समाज काढण्यासाठी मागचा पंडिता रमाबाईंचा कोणता हेतू होता ?
1) स्त्रियांचे ज्ञान वाढवावे.
2) स्त्रियांना कोणत्याही विषयाचा विचार करण्याची व आपले बोलून दाखविण्याची सवय लागावी.
3) नीती, सन्मार्ग व धर्म यांचा सामान्य बोध व्हावा.
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 4) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण :
बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ ची स्थापना केली. स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्ता, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. 1897 मध्ये मध्य प्रदेशात व 1900 मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात 300 हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. तत्पूर्वी 1898 साली रमाबाई जानेवारी ते ऑगस्ट ह्या कालावधीत पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या. त्यांच्या सांगण्यावरून रमाबाई असोसिएशन बंद करण्यात येऊन ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ ही नवी संस्था स्थापन करण्यात आली व ‘शारदा सदन’ ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचे क्षेत्र वाढविले. ‘कृपासदना’ला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदा सदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून निरनिराळ्या गटांचे लोक राहत.
94) जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) 1887 I) अमलग मेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हंट्स ऑफ इंडिया
ब) 1897 II) कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
क) 1910 III) कामगार हितवर्धक सभा
ड) 1910 IV) सोशल सर्व्हिस लीग
अ ब क ड
1) I III IV II
2) III I IV II
3) II I III IV
4) I II IV III
उत्तर : 3) II I III IV
स्पष्टीकरण :
1887 – कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
1897 – अमलग मेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हंट्स ऑफ इंडिया
1910 – कामगार हितवर्धक सभा
1910 – सोशल सर्व्हिस लीग
95) पुढीलपैकी चुकीचा मुद्दा निवडा.
अ) मुळशी धरणाबाबत शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासाठी तात्यासाहेब केळकरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1920 रोजी विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ब) इंग्लिश कंपनी विंडसरने धरणावर जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी शेतकर्यांवर अन्याय केला होता.
1) ‘अ’ व ‘ब’ दोन्ही 2) फक्त ‘अ’
3) फक्त ‘ब’ 4) दोन्ही चूक
उत्तर : 3) फक्त ‘ब’
स्पष्टीकरण :
पुणेकरांच्या मनाला पावसाळ्यात बहर आणणार, हिवाळ्यात गारवा अन् ऊन्हाळ्यात निरव शांतता देणारं, मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. या धरणातील पाणी पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी वापरले जाते. या व्यतिरिक्त येथे अडवलेले पाणी टाटा पॉवर कंपनीच्या भिरा जलविद्युत निर्मिती केंद्रातील सहा 25 मेगावॉट पेल्टन टर्बाइन चालवण्यासाठीही होतो. येथे निर्माण झालेली वीज मुंबई शहरात वापरण्यात येते.
96.
अ) A x B चा अर्थ आहे. A हा B चा भाऊ आहे.
ब) A ÷B चा अर्थ आहे. A हा B चा बहीण आहे.
क) A + B चा अर्थ आहे. A हा B चा वडील आहे.
ड) A – B चा अर्थ आहे. A हा B चा आई आहे.
तर S ही R ची भाची आहे हे कोणत्या विधानातून कळते ?
S x T ÷ J + R 2) R ÷M – S + T
3) R – M ÷S x T 4) T ÷ R x P – S
उत्तर : 4) T ÷ R x P – S
स्पष्टीकरण :
बहीण भाऊ
T R P
आई
भाची
S
97) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येईल ?
1) 1 2) 2 3) 3 4) 4
उत्तर : 2) 2
स्पष्टीकरण :
सर्वप्रथम C हा खाली उजव्या कोपऱ्यात आहे. नंतर तो खाली डाव्या कोपऱ्यात येतो. पण येताना तो त्याचे तोंड खालच्या दिशेला करतो. त्यानंतर तो मधोमध येतो व सोबत S ला घेतो. त्यानंतर क वरच्या बाजुला मधोमध येतो. म्हणुन पर्याय 2 बरोबर आहे.
98) विधाने : सर्व बिल्डिंग खिडकी आहेत.
कोणतेही खेळणे बिल्डिंग नाही.
काही वाघ खेळणे आहेत.
निष्कर्ष :
अ) काही वाघ बिल्डिंग आहेत. ब) काही खिडकी वाघ आहेत.
क) सर्व निष्कर्ष योग्य ड) काही खिडक्या खेळणे आहेत.
1) सर्व निष्कर्ष योग्य 2) सर्व निष्कर्ष अयोग्य
3) केवळ ‘अ’ व ‘ब’ योग्य 4) केवळ ‘क’ व ‘ड’ योग्य
उत्तर : 2) सर्व निष्कर्ष अयोग्य
स्पष्टीकरण :
बिल्डिंग खिडकी खेळणे वाघ
99) मुंबई व धुळे यातील अंतर 220 कि.मी. आहे. एक रेल्वे मुंबईहून धुळ्याला 80 कि.मी. तास वेगाने निघाली. 30 मिनिटांनंतर धुळ्याहून मुंबईला 100 कि.मी. / तास वेगाने दुसरी रेल्वे निघाली तर त्या एकमेकींना मुंबईहून किती कि.मी. अंतरावर भेटतील ?
1) 120 कि.मी. 2) 130 कि.मी.
3) 140 कि.मी. 4) 150 कि.मी.
उत्तर : 1) 120 कि.मी.
स्पष्टीकरण :
मुंबई व धुळे यातील अंतर = 220 कि.मी.
मुंबईहून धुळ्याला = 80 कि.मी. तास वेगाने
30 मिनिटांनंतर धुळ्याहून मुंबईला = 100 कि.मी. / तास वेगाने दुसरी रेल्वे
220 कि.मी.
मुंबई धुळे
x कि.मी. (220 – x) कि.मी.
वेग = अंतर / वेळ वेळ = अंतर / वेग
वेळ1 = x/80 वेळ2 = (220–x) / 100
वेळ1 – वेळ2 = 1/2 x/80 – (220–x) / 100 = ½
100x – 17600 + 80x = 4000 180x = 21600
x = 120 कि.मी.
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download