PSI/STI/ASO Combine Test No. 11

PSI/STI/ASO Combine Test No. 11

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSISTIASO Combine Test No. 11
PSI/STI/ASO Combine Test No. 11

PSI/STI/ASO Combine Test No. 11

  1. खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे या मार्गांचा अवलंब भारतीय कर पद्धतीत बदल घडून आणण्यासाठी कोणत्या समितीने केला ?

1) सुरेश तेंडुलकर समिती 2) विजय केळकर समिती

3) रंगराजन समिती 4) राजा चेलय्या समिती

उत्तर : 2) विजय केळकर समिती

स्पष्टीकरण :

केंद्रीय नियोजन मंडळाने सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला. या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे-

समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे. समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे. नियोजन मंडळाने सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्रय रेषेच्या (356.3 रु. ग्रामीण भागात, व 538.60 रु. शहरी भागात) जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे. या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे. नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.

मात्र या दारिद्रय रेषेवर झालेल्या प्रचंड टिकेमुळे तेंडुलकर समितीच्या पद्धतीचे परीक्षण करण्यासाठी आणि पर्यायी पद्धत सुचविण्यासाठी मे 2012 मध्ये सी. रंजराजन यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ गटाची स्थापना केली. या पॅनेलमध्ये महेंद्र देव, के. सुदरम, महेश व्यास आणि के.दत्ता हे अर्थतज्ज्ञ सदस्य आहेत.

१९९१ साली आपल्या अर्थमंत्रिपदाच्या कारकीर्दीत डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात आर्थिक सुधारणा सुरू केल्या. त्यावेळी त्यांनी हाती घेतलेल्या कर सुधारणांच्या मागे सर्व कल्पना डॉ. चेलय्या यांच्या होत्या. डॉ. चेलय्या यांचा जन्म चेन्नईचा. त्यांनी चेन्नई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील चेन्नई ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आपली करिअर सुरू केली.

  1. 2013 – 2014 मध्ये कर प्रशासन सुधारणा (TARC) स्थापन करण्यात आला त्याबद्दल खालील विधानांचा विचार करा.

अ) CBDT आणि CBEC यांचे एकत्रीकरण करू नये अशी प्रमुख शिफारस आयोगाने केली.

ब) उच्च उत्पन्न शेतकर्‍यांची व्याख्या करून कृषी क्षेत्राला आयकराच्या जाळ्यात आणावे.

वरीलपैकी कोणती शिफारस आयोगाने केली होती ?

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) दोन्ही 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 2) (ब) फक्त

  1. अ) RBI च्या स्थापनेपासूनचे (1935) जमाखर्चाचे वर्ष 1 जुलै ते 30 जून आहे.

ब) RBI च्या पाच प्रशिक्षण संस्थेपैकी दोन संस्था पुणे येथे आहेत.

वरीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही ते निवडा.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 2) (ब) फक्त

स्पष्टीकरण :

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

  1. पोस्टल यंत्रणेचे Post Bank of India मध्ये रूपांतर करण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

1) सुब्रमण्यम समिती 2) केळकर समिती

3) उर्जित पटेल समिती 4) रघुराम राजन समिती

उत्तर : 1) सुब्रमण्यम समिती

स्पष्टीकरण :

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) १००% सरकारी मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे , जी संप्रेषण मंत्रालयाच्या अंतर्गत टपाल खात्यासह कार्यरत आहे.

  1. WTO च्या ज्या परिषदेत अन्न सुरक्षा विधेयकाला मान्यता देण्यात आली ती परिषद केव्हा भरली होती ?

1) 2001 2) 2011

3) 2015 4) 2013

उत्तर : 4) 2013

स्पष्टीकरण :

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला असून देशातील विविध राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशातील जवळपास 81 कोटी जनतेस या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळणार आहे. राज्यातील 11.23 कोटी जनतेपैकी सात कोटी जनतेला या योजनेअंर्तगत हक्काचे धान्य मिळणार आहे. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात आली आहे. या योजनेची माहिती देणारा लेख. गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविता यावी त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने संमत केला आहे. राज्यात या योजनेचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते 31 जानेवारी 2014 रोजी करण्यात आला असून त्यांची अमंलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील जवळपास 7 कोटी 17 लाख जनतेला या कायद्यानुसार सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 55 टक्के तर शहरी भागातील 45 टक्के जनतेला या योजनेंतर्गत हक्काचे धान्य मिळणार आहे.

  1. 1973 च्या औद्योगिक धोरणात खालीलपैकी काय अंतर्भूत नव्हते ?

अ) District Industrial Centres ची स्थापना करण्यात आली.

ब) शासकीय तसेच खाजगी क्षेत्राच्या एकत्र गुंतवणुकीस (Joint sector) परवानगी देण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) दोन्ही 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 1) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

फेब्रुवारी 1973 च्या धोरणात गाभा क्षेत्रातील उद्योगांची संख्या फेब्रुवारी 1970 मध्ये नऊ होती, ती एकोणीसपर्यंत वाढविली असून त्यांच्यात काही अनावश्यक उद्योगांचाही समावेश झाला आहे. याचाच अर्थ मोठ्या उद्योगसमूहांना विकासास अधिक संधी फेब्रुवारी 1973 पासून मिळाली आहे. म्हणूनच परवाना पद्धतीचा औद्योगिक विकासावर नियंत्रण ठेवण्यास फारसा उपयोग होत नसून तीमुळे आपले आश्रित निवडण्याचे एक साधन शासनास उपलब्ध होते, अशी त्यापद्धतीवर टीका करण्यात येते. औद्योगिक विकासाच्या धोरणामुळे रोजगारात वाढ होऊन शेतकीतील अतिरिक्त श्रमिकांना उद्योगधंदे कितपत सामावून घेऊ शकतील; केवळ औद्योगिक नव्हे, तर इतर अनेक क्षेत्रांत विकासाच्या प्रयत्‍नांचीभारतास कशी गरज आहे व भारतीयांच्या समाजसंस्था, चालीरीती व त्यांच्या वृत्ती यांमुळे औद्योगिक विकासाच्या धोरणास कशा मर्यादा पडतात, याचे दिग्दर्शन गन्नार मीर्डालसारख्या तज्ञांनी केले आहे. ते ध्यानी घेऊनच भारताने आपले पुढील औद्योगिक धोरण घडविणे श्रेयस्कर होईल.

  1. खालीलपैकी असत्य विधान कोणते नाही ते निवडा.

अ) 1966 मध्ये रुपयांचे अवमूल्यन केले तेव्हा रुपयाचे मूल्य 4.76 वरुन 7.50 वर गेले.

ब) 1 रु. ची नोट भारत सरकारचे अर्थमंत्रालय छापते व चलनात आणते.

क) RBI Act 1949 नुसार RBI ने छापलेल्या सर्व नोटा कायदेशीर चलन (Legal Tender) असतात.

पर्यायी उत्तरे :

1) विधान (अ) व (क) फक्त 2) विधान (अ), (ब) व (क)

3) विधान (ब) व (क) फक्त 4) विधान (अ) फक्त

उत्तर : 4) विधान (अ) फक्त

स्पष्टीकरण :

एखाद्या चलनाची विदेशी चलनाच्या परिमाणात निर्धारित केलेली चालू किंमत कमी करणे. अवमूल्यन झालेल्या चलनाची अंतर्गत (स्वदेशातील) क्रयशक्ती कमी होत नाही, हे महत्त्वाचे. रु. 4.76 ला एक डॉलर या दराऐवजी रु. 7.50 ला एक डॉलर मिळू लागला, असे धोरण सरकारने जाहीर केले म्हणजे ‘रुपयाचे डॉलर-चलनात अवमूल्यन झाले’, असे म्हणता येईल.आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील मूलभूत असमतोल नाहीसा करण्यासाठी निर्यातीत वाढ व आयातीत घट करणे आवश्यक ठरते. त्यासाठी योजण्यात येणार्या अनेक उपायांपैकी अवमूल्यन हा दीर्घ-परिणाम उपाय मानतात. हा असमतोल तात्पुरता नसून दीर्घकाळ चालू राहिला आणि आयातनिर्यातीमधील तूट भरून काढण्यासाठी परदेशी मदत व कर्जे यांवर बराच काळ विसंबून राहावे लागले, की अवमूल्यनाचा अवलंब केला जातो. चलनवाढही मूलभूत असमतोलास कारणीभूत ठरते. चलनाचे अवमूल्यन झाले म्हणजे आयात महाग होते व निर्यात स्वस्त होते. उदा., एका डॉलरची वस्तू आयात करण्यास पूर्वी रु. 4.76 द्यावे लागत असल्यास, अवमूल्यनानंतर त्यासाठी रु. 7.50 द्यावे लागतात. उलट अमेरिकेतील आयातदारास एका डॉलरमध्ये रु. 4.76 च्या वस्तूऐवजी रु. 7.50 किंमतीच्या वस्तू मिळतात. साहजिकच, भारताची आयात कमी होण्यास व निर्यातीस चालना मिळण्यास मदत होते.

  1. कोठारी पायोनियर या पहिल्या खाजगी म्युच्युअल फंडची स्थापना केव्हा झाली ?

1) 1992 2) 1993

3) 1964 4) 1984

उत्तर : 2) 1993

स्पष्टीकरण :

भारतीय म्युच्युअल फंड्स भारतातील म्युच्युअल फंड उद्योग. भारत सरकारने 1964 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना केली. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अजूनही भारताच्या आघाडीच्या म्युच्युअल फंडांपैकी एक आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास कायदा म्हणजे भारतीय युनिट ट्रस्ट कायदा, 1963. या उद्योगात, 1987 मध्ये, सरकारने बँका आणि विमा कंपन्या उघडल्या. आतापर्यंत government सरकारी बँकांनी त्यांचे म्युच्युअल फंड सुरू केले आहेत आणि त्यांच्या निधीसाठी एलआयसी आणि जीआयसी या दोन विमा कंपन्या देखील सुरू केल्या आहेत. 1993 मध्ये सेबीच्या म्युच्युअल फंड रेग्युलेशन ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अंतर्गत पहिल्यांदाच भारतातील म्युच्युअल फंड उद्योगासाठी सर्वसमावेशक नियामक चौकट तयार केले गेले. त्यानंतर, बरेच खाजगी आणि सरकारी म्युच्युअल फंड स्थापित केले गेले आहेत.

  1. सहकारी तत्वावर विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संघ मर्यादिती (NAFED) ची स्थापना केव्हा झाली ?

1) 26 जानेवारी 1958 2) 2 ऑक्टोबर 1958

3) 15 ऑगस्ट 1968 4) 26 जानेवारी 1968

उत्तर : 2) 2 ऑक्टोबर 1958

स्पष्टीकरण :

नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि. (नाफेड) ची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी गांधी जयंतीला करण्यात आली. नाफेड ही एक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहे. शेती उत्पादनांच्या सहकारी मार्केटिंगच्या विकासासाठी ऑब्जेक्टसह नाफेडची स्थापना करण्यात आली. नाफेडचे प्रमुख सदस्य शेतकरी आहेत. शेतमाल विकण्यासाठी नाफेडची मदत घेतली जाते.

  1. संरक्षणासाठी सर्वाधिक खर्च करण्याचा देशाचा उतरता क्रमक लावा. (2014)

अ) रशिया ब) चीन

क) जपान ड) अमेरिका

पर्यायी उत्तरे :

1) (ब), (अ), (क), (ड) 2) (ड), (अ), (ब), (क)

3) (ड), (ब), (अ), (क) 4) (ब), (अ), (ड), (क)

उत्तर : 3) (ड), (ब), (अ), (क)

  1. गरुडा शक्ती 4 हा युद्ध सराव खालीलपैकी कोणाकोणात पार पाडण्यात आल ?

1) भारत व फ्रान्स 2) भारत व रशिया

3) भारत व इंडोनेशिया 4) भारत व जपान

उत्तर : 3) भारत व इंडोनेशिया

भारत व फ्रान्स = गरुड

भारत व रशिया = इंद्र

भारत व जपान = जिमेक्स

  1. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हिलेज हरीसाल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकार सोबत कोणाचे योगदान आहे ?

1) नोकीया कंपनी 2) टाटा कंपनी

3) मायक्रोसॉफ्ट कंपनी 4) अॅपल कंपनी

उत्तर : 3) मायक्रोसॉफ्ट कंपनी

स्पष्टीकरण :

बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे.

मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम-

एमएसएन शोधयंत्र

मायक्रोसॉफ्ट ऑफिस

मायक्रोसॉफ्ट विंडोज

मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स

मायक्रोसोफ्ट मोबाईल

  1. पुढीलपैकी कोणाला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देण्यात आलेला नाही ?

अ) मदर टेरेसा ब) लता मंगेशकर

क) ह्रदयनाथ मंगेशकर ड) शुभा मुदगल

पर्यायी उत्तरे :

1) (ड) सोडून सर्व 2) (ड), (अ), (ब), (क)

3) (क) फक्त 4) (अ) फक्त

उत्तर : 3) (क) फक्त

स्पष्टीकरण :

हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. 2009 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे नवरात्र महोत्सवातर्फे दिला गेलेला ’महर्षी पुरस्कार” (2014). पुणे-चिंचवड येथील नादब्रह्म परिवारातर्फे नादस्वरब्रह्मश्री पुरस्कार (7 जानेवारी 2017). पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार (9 ऑक्टोबर 2017). 2018 सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार (16 मार्च 2018).

  1. देशातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

1) महाराष्ट्र 2) गुजरात

3) मध्यप्रदेश 4) उत्तरप्रदेश

उत्तर : 2) गुजरात

स्पष्टीकरण :

हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा 19.8% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे. ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओळखला जात असे. त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती. प्रचीन लोथल येथे भारतातील पहिले बंदर उभारले गेले.

  1. अ) केंद्रिय रेल्वेमंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार सूरत हे रेल्वे स्टेशन सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन आहे.

ब) या सर्वेक्षणात 407 स्थानकांचा सर्वे करण्यात आलेला असून त्यापैकि 85 स्थानकांना A – 1 दर्जा देण्यात आला आहे.(2016)

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब)

उत्तर : 1) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

भारतातील 16 झोनमधील एकूण 407 रेल्वे स्थानकांमध्ये सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ स्थानक असून महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाला चौथा क्रमांक मिळाला आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच(2016) केलेल्या सर्व्हेक्षणाबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी माहिती दिली. भारतीय रेल्वे आणि टीएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी देशभरातील 16 झोनमधील “ए-1‘ आणि “ए‘ श्रेणीतील एकूण 407 रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्यापैकी 13 स्थानकांनी 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवून विशिष्ट श्रेणीत स्थान मिळविले तर 92 स्थानकांनी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम श्रेणीत स्थान पटकावले. या सर्व स्थानकांमध्ये सूरत हे सर्वात स्वच्छ स्थानक असल्याचे आढळून आले आहे. तर राजकोट आणि विलासपूर अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ स्थानक ठरले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाचा क्रमांक लागला आहे. तर सोलापूरनंतर मुंबई सेंट्रल, चंडीगड, भुवनेश्‍वर, वडोदरा या स्थानांचा क्रमांक लागला आहे. या सर्व स्थानकांचा अभ्यास करताना प्राथमिक सोयीसुविधांसह वेगवेगळ्या 47 घटकांचा अभ्यास करण्यात आला. तसेच प्रवाशांकडूनही माहिती गोळा घेण्यात आली.

  1. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.

अ) रोम मास्टर्स टेनिस स्पर्धा (महिला दुहेरी) सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांनी जिंकली.

ब) मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत सेरेना विल्यम ने विजेतेपद पटकावले, हे तिचे 70 वे जेतेपद होते.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब).

उत्तर : 3) (अ) व (ब)

स्पष्टीकरण :

ए.टी.पी.( असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स) वर्ल्ड टूर मास्टर्स 1000 ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. 4 ग्रॅंड स्लॅम व ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिसपटूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. 25 अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर 25 वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिसपटू आहेत.

  1. पृथ्वी – 2 बद्दल खालील विधानांचा विचार करा.

अ) याची उंची 8.9 मी. आहे.

ब) हे जमिनीवर हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) योग्य 2) (ब) योग्य

3) (अ) व (ब) अयोग्य 4) (अ) व (ब) योग्य.

उत्तर : 3) (अ) व (ब) अयोग्य

स्पष्टीकरण :

“पृथ्वी” हे भारतीय सैन्याचे “पृष्ठभाग ते पृष्ठभाग” (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. पृथ्वी 2 हे प्रक्षेपास्त्र 250 किलोमीटर च्या वाढीव पल्ल्यासह 1000 किलोचे स्फोटक शीर्ष असलेले क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी 2 हे एकस्तरीय द्रव इंधन वापरणारे क्षेपणास्त्र आहे व त्याची लांबी- 9 मीटर व्यास- 1.10 मीटर, वजन-4000 ते 4600 किलो आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायु दलाच्या प्रार्थमिक वापराकरिता तयार केले गेले. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 27 जानेवारी 1996 रोजी केली गेली व याच्या विकसित आवृत्त्या 2004 मध्ये पूर्ण करण्यात आल्या. सध्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची भारतीय वायु दलातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्याच घेण्यात आलेल्या एका चाचणीत हे क्षेपणास्त्र 350 किलोमीटरच्या वाढीव पल्ल्यासह व सुधारित ‘जडत्व परिभ्रमण सहाय्यता प्राप्त’ सह डागण्यात आले. या प्रक्षेपास्त्रामध्ये प्रक्षेपास्त्र-विरोधी क्षेपणास्त्रांना चकवण्याची वैशिष्ठ्ये आहेत. बातम्यांच्या अनुसार या प्रक्षेपास्त्रच पल्ला आता 350 km पर्यंत वाढवण्यात आला आहे.

  1. IPL – 9 बद्दल अयोग्य विधान निवडा.

अ) विजेता रॉयल चॅलेंजर तीन वेळेस उपविजेता राहिलेला आहे. (IPL मध्ये)

ब) या IPL मध्ये ऑरेंज कॅप विराट कोहली याला तर पर्पल कॅप चेतेश्वर पुजारा याला मिळाली आहे.

क) या IPL मध्ये सर्वाधिक झेल A. B. डिव्हीलीयर्स याने टिपले आहे.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (अ) व (ब)

3) (अ) व (क) 4) (अ), (ब), (क).

उत्तर : 2) (अ) व (ब)

स्पष्टीकरण :

इंडियन प्रीमियल लीगचा, 2016 चा मोसम हा आयपीएल 9 किंवा विवो आयपीएल 2016 म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत 2007 साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा 9 एप्रिल ते 29 मे 2016 दरम्यान खेळवली गेली. 29 मे 2016 रोजी एम. चिन्नास्वामी मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, 2016 चषक जिंकला. सनरायझर्स हैदराबादचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद. अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल 2016 चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

  1. नुकतेच निधन पावलेले एस.एच रझा यांच्या बद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा.

अ) त्यांना फ्रान्सचा कमांडर ऑफ लिजन्ट ऑफ ऑनर हा पुरस्कार 2015 साली मिळाला होता.

ब) त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळालेले आहे.

(पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण). 

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब).

उत्तर : 3) (अ) व (ब)

स्पष्टीकरण :

सईद हैदर “एस. एच.” रझा (२२ फेब्रुवारी, १९२२ – २३ जुलै, २०१६) हे एक भारतीय चित्रकार होते जे मार्च २००५ पासून फ्रान्समध्ये राहत व काम करत होते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता. २०१० मध्ये त्यांच्या “सौराष्ट्र” या चित्राने क्रिस्टीस येथे १६ करोड रुपये मिलवले. पुरस्कार : १९८१ – पद्मश्री, १९९२-९३ – कालिदास सन्मान पुरस्कार, २००७ – पद्मभूषण, २०१३ – पद्मविभूषण.

  1. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही ते ओळखा.

अ) नागपूर विभागातील 2 जिल्ह्यांतील संख्या प्रत्येकी सारखी आहे.

ब) औरंगाबाद विभागात सारखे तालुके (संस्था) असणार्‍या जिल्ह्यांच्या दोन जोड्या आहेत.

क) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1999 रोजी झाली.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) व (क) फक्त 2) (अ) व (ब) फक्त

3) (ब) व (क) फक्त 4) (अ), (ब) व (क).

उत्तर : 2) (अ) व (ब) फक्त

स्पष्टीकरण :

हिंगोली शहर हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचे आणि हिंगोली तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. 1 मे 1999 रोजी हिंगोली येथे मुख्यालय असलेला नवीन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.

  1. अ) शुक नदीच्या मुखावर विजयदुर्गची खाडी आहे.

ब) रत्नागिरीतील दापोली तालुक्यात हर्णे बंदरावर रत्नदुर्ग हा प्रसिद्ध जलदुर्ग आहे.

वरीलपैकी योग्य विधान कोणते आहे ते निवडा.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब).

उत्तर : 1) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

शुक नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे.ही नदी विजयदुर्गाच्या खाडीला येउन मिळते.

  1. वेळ नदी या भीमा नदीच्या उपनदीची लांबी किती आहे ?

1) 64 Km 2) 70 Km

3) 24 Km 4) 54 Km

उत्तर : 1) 64 Km

स्पष्टीकरण :

वेळ नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. आंबेगाव तालूक्यातील सातगाव पठारावर वेळेश्वर या ठीकानी उगम पावते . पेठ गावातून ही नदी पुणे-नाशिक रस्त्यावर येते. तेथून पाबळ धामारी शिक्रापूर येथे वाहत येउन तळेगाव ढमढेरे येथे भीमा नदीस मिळते वेळ नदीची लांबी 68 किलोमीटर आहे या नदीवर पाबळ जवळ थिटेवाडी पाझर तलाव नावाचे लघू धरण आहे.

  1. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

अ) चिंचोली – बीड ब) माचाळ – रत्नागिरी

क) पाल – धुळे ड) भिंगार – बुलढाणा

पर्यायी उत्तरे :

1) फक्त (अ) 2) फक्त (क)

3) फक्त (ड) 4) फक्त (ब).

उत्तर : 2) फक्त (क)

स्पष्टीकरण :

धुळे हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्त्वाचे शहर आहे. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत.

  1. दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्व घाटातील शिखरांचा योग्य क्रम लावा.

अ) नल्लामाला ब) निमगिरी

क) पालकोंडा ड) अन्नईमुडी

पर्यायी उत्तरे :

1) (ब), (अ), (क), (ड) 2) (ड), (क), (अ), (ब)

3) (ड), (अ), (क), (ब) 4) (ब), (क), (अ), (ड)

उत्तर : 2) (ड), (क), (अ), (ब)

स्पष्टीकरण :

अन्नईमुडी = 2,695 m

पालकोंडा = 567 m

नल्लामाला = 520 m

निमगिरी = 400 m

  1. खालील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

अ) झेलम ब) चिनाब

क) रावी क) सतलज

पर्यायी उत्तरे :

1) (अ), (ब), (क), (ड) 2) (ब), (अ), (क), (ड)

3) (क), (अ), (ब), (ड) 4) (ड), (अ), (ब), (क)

उत्तर : 1) (अ), (ब), (क), (ड)

स्पष्टीकरण :

झेलम = 725 km

चिनाब = 960 km

रावी = 720 km

सतलज = 1450 km

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply