PSI/STI/ASO Combine Test No. 15

PSI/STI/ASO Combine Test No. 15

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 15
PSI/STI/ASO Combine Test No. 15

PSI/STI/ASO Combine Test No. 15

51 ) .महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.

(a ) शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग (b ) वन आणि खनिज संपत्ती

(c ) कापड उद्योग (d ) मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A ) फक्त (a ) B ) (a ) आणि (b )

C ) फक्त (d ) D ) (c ) आणि (d )

52 ) .महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार, राज्यातील खालील समाज गटांची ‘प्राचीन आदिवासी गट’ म्हणून गणना केली आहे.

(a ) कातकरी (b ) माडिया गोंड (c ) कोलाम (d ) भील्ल खालीलपैकी एक पर्याय बरोबर आहे.

A ) (a ) , (b ) आणि (c ) B ) फक्त (a ) आणि (b )

C ) फक्त (b ) आणि (c ) D ) फक्त (d )

53 ) .भारतीय रिझर्व्ह बॅंके बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

A ) ती भारताची मध्यवर्ती बँक आहे.

B ) ती 100% भारत सरकारच्या मालकीची आहे.

C ) तिला व्यापारी बँक व्यवसाय करण्याची संमती आहे

D ) तिचा हेतू नफा मिळवणे हा नसतो

54 ) .लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुस-या टप्यामध्ये __

A ) लोकसंख्या वेगाने वाढते B ) कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते

C ) लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो D ) वरीलपैकी कोणतेही नाही

55 ) .भारतीय बॅंकांनी आपल्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी किती टक्के कर्ज पुरवठा अनुक्रमे कृषी क्षेत्र व दुर्बल घटकांना करावा

A ) 18% व 10 % B ) 10% व 18 %

C ) 12% व 14% D ) 14 % व 10 %

56 ) .केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी ‘राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL ) अंमलात आणला?

(a ) उत्तर प्रदेश, पंजाब (b ) कर्नाटक, केरळ

(c ) तामीळनाडू (d ) पश्चिम बंगाल खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे?

A ) फक्त (a ) B ) (a ) , (b ) आणि (c )

C ) फक्त (b ) D ) फक्त (d )

57 ) .नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये (1981 ते 2012 ) सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर __ होता.

A ) 3.5% B ) 5.9%

C ) 5.9% D ) 4.2%

58 ) .’सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न’ यात खालील घटक आहेत .

A ) सार्वत्रिकता B ) बिनशर्तता

C ) प्रतिनिधित्वे (लाभार्थीच्या निवडीचा आदर ) D ) वरीलपैकी सर्व

59 ) .2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा __ .

A ) पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर B ) नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट

C ) सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे D ) वरील सर्व उपाययोजना

60 ) .शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत ?

A ) शेती उत्पादन वाढ B ) रोजगार संधींमध्ये वाढ

C ) ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे D ) वरील सर्व

61 ) .मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बैंक __ वर आपले नियंत्रण ठेवते.

A ) सार्वजनिक खर्च B ) पैशाचा पुरवठा

C ) कर महसूल D ) वरील सर्व

62 ) .प्रत्यक्ष कर कशावर लादले जातात?

1.उत्पन्नावर 2.उत्पादनावर

3.संपत्तीवर 4.भांडवली नफ्यावर

A ) 1 आणि 2 B ) 1 आणि 3

C ) 1,3,आणि 4 D ) 2,3 आणि 4

63 ) .भारतात रस्त्यांच्या वर्गीकरणात कोणत्या प्रकारच्या रस्त्यांचा समावेश होत नाही?

A ) राज्य महामार्ग B ) जिल्हा मार्ग

C ) तालुका मार्ग D ) ग्रामीण मार्ग

64 ) .भारताने…… मध्ये आयातीच्या 100 अब्ज डॉलर्स चा, तर…..मध्ये निर्याती चा 100 अब्ज डॉलर्स चा टप्पा पार केला.

A ) 2002 – 03 आणि 2003 -04 B ) 2003 – 04 आणि 2004 -05

C ) 2004 – 05 आणि 2005 -06 D ) 2005 – 06आणि 2006 -07

65 ) .अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणा-या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

(A ) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.

(B ) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात.

A ) विधाने (A ) आणि (B ) दोन्हीही सत्य आहेत.

B ) विधान (A ) सत्य असून (B ) असत्य आहे.

C ) विधान (A ) असत्य असून (B ) सत्य आहे.

D ) विधाने (A ) व (B ) दोन्हीही असत्य आहेत.

66 ) .जर 0.3A इतकी विद्युतधारा 418Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल?

A ) 240 B ) 540

C ) 418 D ) 60

67 ) .सर्वसाधारण सूत्र अलकाइनसाठी _ हे असते.

A ) CnH2n 2 B ) CnH2n

C ) CnH2n-2 D ) वरीलपैकी कोणतेही नाही

68 ) .इलेक्ट्रॉनचा शोध _ याने लावला.

A ) सर जे.जे. थॉमसन B ) गोल्ड स्टिन

C ) जेम्स चॅडविक D ) रुदरफोर्ड

69 ) .योग्य पर्याय निवडा.प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते?

(a ) UAA, UGA, UGC (b ) UAG, CGA, AGC

(c ) UGA, UAA, UAG (d ) CGA, UAA, UGA

A ) (a ) आणि (b ) B ) फक्त (a )

C ) फक्त (c ) D ) (d ) आणि (c )

70 ) .खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a ) टेनिया सोलीयमला हुक जंत असे म्हटले जाते.

(b ) फॅस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते.

(c ) अॅन्कालोस्टोमा ड्युडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते.

(d ) नेरेस चिल्काएनसीस हे सामान्यत: चिंधी जंत असे म्हणतात.

A ) (c ) फक्त B ) (b ) आणि (d ) फक्त

C ) (a ) फक्त D ) (a ) आणि (c ) फक्त

71 ) .ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात :

A ) पक्ववाशयाच्या सबम्युकोसा B ) पोटाच्या सबम्युकोसा

C ) अन्ननलिकाच्या म्युकोसा D ) इलियमची म्युकोसा

72 ) .वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसुत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात ?

(a ) गुणसुत्रांची संख्या (b ) गुणसुत्रांचे बाह्यरूप

(c ) गुणसुत्रांचा आकार (d ) गुणसुत्रांचे विचलन

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

A ) a ) फक्त B ) (b ) फक्त

C ) (a ) ,(b ) आणि(c ) फक्त D ) (a ) , (b ) , (c ) , (d )

73 ) .खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.

A ) ब्रायोफायटा B ) टेरीडोफायटा

C ) अनावृत्तबीजी D ) आवृत्तबीजी

74 ) .‘लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो” नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे?

A ) फायटोप्थोरा इन्फेस्टन्स B ) पायथीयम स्पीसीज

C ) अल्ब्युगो कॅनडीडा D ) कोलेटोट्रायकम

75 ) .सस्तन प्राण्यांमध्ये, ज्ञानेंद्रिये खालीलपैकी कोणत्या तीन मूलभूत स्वरूपात स्थित असतात?*

A ) न्यूरोएपिथेलीयल संवेदी टोक, एपिथेलीयल संवेदी टोक व न्यूरोनल संवेदी टोक

B ) एपिथेलीयल संवेदी टोक, एन्डोथेलीयल संवेदी टोक व न्यूरॉलॉजीकल संवेदी टोक

C ) मिझोथेलीयल संवेदी टोक, एन्डोथेलीयल संवेदी टोक व एपिथेलीयल संवेदी टोक

D ) न्यूरोनल संवेदी टोक, एपिथेलीयल संवेदी टोक व क्यूटेनीयस संवेदी टोक

51525354555657585960
CACAABBDDD
61626364656667686970
BCCCABCACB
7172737475
ADBAA
Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply