PSI/STI/ASO Combine Test No. 16
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 16
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणा-या संसर्गास/संक्रमणास _ असे संबोधिले जाते.
A ) तीव्र संक्रमण B ) तीव्र संसर्ग
C ) सिस्टिमीक संसर्ग D ) लेटेन्सी संसर्ग
77 ) .दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी _ मध्ये आढळून येतात.
A ) कोक्लिआ (कानाचा अंतर्गत भाग ) B ) त्वचा
C ) बाह्यत्वचा D ) डोळ्यातील पडदा
78 ) .एकमेकांच्या शेजारी ठेवलेले X Y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा.घन X तुमच्या डावीकडे असून घन Y तुमच्या उजवीकडे आहे.X या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे.Y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. दुस-या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी काळी व पांढरी आहे.जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्यासमोर असेल तर X घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणा-या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. *
A ) निश्चितपणे काळा B ) एकतर काळा नाहीतर पांढरा
C ) फक्त पांढरा D ) निश्चित करणे शक्य नाही
79 ) .पालसदृश्य प्राण्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 से.मी. आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेइतकी आहे. शेपटीची लांबी, डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे, यांच्या बेरजेइतकी आहे. पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा.
A ) माहिती अपुरी आहे B ) 63
C ) 56 D ) 42
80 ) .दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
6, 24, 72, 240, 726
A ) 24 B ) 72
C ) 240 D ) 726
81 ) .पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या :हरी, समीर, निलेश, शैलजा, निकीता, लक्ष्मण आणि सुजाता या सात उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या I ते VII पॅनलकडून घेण्यात आली व A, B, C, D, E, F आणि C या सात वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड केली. शाळांची आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. पॅनल IV ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. समीरची मुलाखत पॅनल III ने घेतली पण शाळा C किंवा D साठी नाही. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली पण पॅनल I किंवा II ने घेतली नाही. निकीताची मुलाखत पॅनल VI ने शाळा E साठी घेतली. पॅनल VII ने शाळा F साठी मुलाखत घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल I ने घेतली पण शाळा C साठी नाही, पॅनल II ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. पॅनल V ने कोणाची मुलाखत घेतली ?
A ) हरी B ) शैलजा
C ) लक्ष्मण D ) सुजाता
82 ) . A या शहराकडून B या डोंगरी शहराकडे जाण्याचे सहा मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश P, Q व Rआणि इतर तिघांचा निर्देश 1,2 व 3 असा केला जातो. वादळी हवामानात यातील Q मार्ग बंद ठेवतात. एका नदीच्या पुरामुळे P, 1 व 3 या मार्गावर परिणाम होतो. जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो कारण हे दोन्ही मार्ग हे A पासून निघणाच्या एका मार्गाचे काही अंतरानंतर झालेले दुभाजन आहे, जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणा-या नदीला पूर येतो तेव्हा वाहतूकीसाठी उपलब्ध असलेला/ले मार्ग निवडा.
A ) फक्त Q B ) फक्त P
C ) फक्त 2 D ) R आणि 2 दोन्ही
83 ) .जर p आणि q ची सरासरी 20 आहे, q आणि y ची सरासरी 25 आहे, p, q व y ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?
A ) 24 B ) 19
C ) 29 D ) 25
84 ) .पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिस-या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
86 : 29 : : 98 : ?
A ) 30 B ) 32
C ) 34 D ) 36
85 ) .खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EF : 15: : KL: ?
A ) 23 B ) 36
C ) 46 D ) 66
86 ) .पहिल्या दोन पदांमध्ये जों संबंध आहे, तोच संबंध तिस-या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
122 : 17 : : 290 : ?
A ) 364 B ) 362
C ) 323 D ) 324
87 ) .एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
A ) YLZIW B ) IZLYW
C ) WIZLY D ) (1 ) , (2 ) , (3 ) यापैकी कोणतेही नाही
88 ) .खालील विधानांवर विचार करा :
(a ) कुंदा ही दुपारी 12 ते सं. 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.
(b ) तिची लहान बहीण नयना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यंत घरी असते.
(c ) सर्वात मोठी बहीण ज्योती ही स. 9 ते दु. 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दु. 2 ते सं. 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.
तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी वे किती वाजता एकत्र घरी असतात ?
A ) गुरुवार – दु. 12 वा. वे रविवारी दु. 12 वा. B ) गुरुवार – दु. 12 वा. वे रविवारी दु. 2 वा.
C ) गुरुवार – दु. 2 वा. वे रविवारी दु. 2 वा. D ) गुरुवार – दु. 2 वा. वे रविवारी दु. 12 वा.
89 ) .तीन पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा :A, B, C, D, E आणि F हे सदस्य व दोन जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. c, जी E ची सून आहे, तिला अननस सर्वात जास्त आवडते, B, जो 2 चा अविवाहित मुलगा आहे, तो चिकू विशेष पसंत करतो. F हे A चे नातवंड आहे, ज्याला दुस्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे आणि F ला संत्रे आवडत नाही. A ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. पुढील संचापैकी सत्य नसलेली विधाने निवडा.
विधाने :(a ) D संत्रे विशेष पसंत करतो आणि तो A चा मुलगा नाही.
(b ) E हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे.
(c ) c ने मुलगी दत्तक घेतली आहे.
A ) (a ) खेरीज सर्व B ) (a ) खेरीज एकही नाही
C ) (a ) व (c ) दोन्ही D ) (a ) व (b ) दोन्ही
90 ) .अमोलला एक किलोमीटर अंतर धावायला 44 मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला 5 मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुस-याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?
A ) 200 मीटरची आघाडी बिट्टूला B ) 150 मीटरची आघाडी बिट्टूला
C ) 80 मीटरची आघाडी अमोलला D ) 100 मीटरची आघाडी बिट्टूला
91 ) .खाली दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते शोधा?
A ) 10 B ) 11
C ) 12 D ) 13
92 ) .पुढील संख्या रचना अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाऐवजी पर्याय निवडा?
A ) 18 B ) 17 C ) 12 D ) 11
93 ) .200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणा-या संख्या किती ?
A ) 36 B ) 37
C ) 38 D ) 39
94 ) .मोहन व शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासतात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले. सर्वात कमी निवडलेला विषय कोणता?
A ) इंग्रजी B ) गणित
C ) रसायनशास्त्र D ) भौतिकशास्त्र
95 ) .स्वतंत्र मजूर पक्षाची (1936 ) स्थापना कोणी केली?
A ) कॉम्रेड डांगे B ) सेनापती बापट
C ) एस. एम. जोशी D ) डॉ. बी.आर. आंबेडकर
96 ) .आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहीले?
(a ) इतिहास (b ) शून्यलब्धी (c ) व्याकरण (d ) छंदशास्त्र
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) D ) (c ) आणि (d )
97 ) .भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधीत __ कडून प्रकाशित केली जाते.
A ) वैधानिक विभाग B ) कायदेशीर व्यवहार विभाग
C ) न्याय विभाग D ) राष्ट्रीय न्यायालयीन आयोग
98 ) .खालील विधाने विचारात घ्या.
(a ) सरकारीया आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. (b ) सरकारीया आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) D ) वरीलपैकी नाही
99 ) .राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही ?
A ) राज्य विधान परिषदेत एक शष्टांश सदस्य नामनिर्देशित करणे.
B ) राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे.
C ) जेंव्हा विधान सभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे.
D ) राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणे.
100 ) .माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणा-या ‘बँडविथ’ (Baunctwiclth ) या परीभाषेचा अर्थ काय?
A ) संगणकाची क्षमता B ) संगणकाचा वेग
C ) संगणकाचा वेग व क्षमता D ) नेटवर्कचा वेग व क्षमता
Answerkey:
76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
A | D | B | C | B | A | C | A | B | D |
86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
B | B | B | B | D | D | C | B | B | D |
96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
B | A | C | A | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download