PSI/STI/ASO Combine Test No. 17
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 17
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट अंतरा मेहता………. या जिल्ह्यातील आहे?
A.बुलढाणा B.जालना
C.अमरावती D.नागपूर
2 ) .महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 117 च्या दीक्षांत संचलनात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ‘ स्वार्ड ऑफ ऑनर ‘ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
A ) विनोद पवार B ) संतोष कामटे
C ) विकास आमटे D.अविनाश बोबडे
3 ) .प्रा.एम.एस.स्वामीनाथन आणि……… यांना मुप्पावरापु वेंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
A ) डॉ.जी.मुनीत्नम B ) डॉ.पी.मुनीत्नम
C ) डॉ.आर.मुनीत्नम D ) डॉ.वाय.मुनीत्नम
4 ) .यशोदा माता अंगत-पंगत योजना कोणते राज्य राबवत आहे?
A ) उत्तर प्रदेश B ) हरियाणा
C ) मध्य प्रदेश D ) महाराष्ट्र
5 ) .स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?
A ) लॉर्ड माउंटबॅटन् B ) सी. राजागोपालाचारी
C ) राजेंद्र प्रसाद D ) वॉरन हेसेटिंग्ज
6 ) .खालील विधाने विचारात घ्या :
(a ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही.
(b ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो.
(c ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो.
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) D ) फक्त (c )
7 ) .मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यू नंतर आपना मुंबईमधील फ्लॅट __ दान दिला.
A ) हृदयावरील संशोधनासाठी B ) मूत्रपिंडावरील संशोधनासाठी
C ) मेंदूवरील संशोधनासाठी D ) मधुमेहावरील संशोधनासाठी
8 ) .नोव्हेंबर 2016 मध्ये ‘हॅन्ड इन हॅन्ड 2016’ या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि _ या देशांमध्ये पार पडली.
A ) रशिया B ) अमेरिका
C ) चीन D ) जपान
9 ) .राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ते लिहा.
(a ) देशात सामाजिक – आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत.
(b ) या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत.
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) दोन्हीही D ) (a ) आणि (b ) दोन्हीही नाही
11 ) .मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा.
(a ) तो भारतीय पॅरालिम्पीक उंच उडीपटू आहे.
( रीओ डी जनेरिओ येथे भरलेल्या 2016 च्या समर पॅरालिम्पीक खेम्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
(c ) तो पॅरालिपीक उंच उडींत सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय.
A ) (a ) , (b ) B ) (b ) , (c )
C ) (a ) , (c ) D ) वरील सर्व
12 ) .’ग्लोबल टीचर प्राइझ’ हा शिक्षण क्षेत्रातील नोबल पुरस्काराने महाराष्ट्रातील कोणाला सन्मानित करण्यात आले?
A ) रणजितसिंह डिसले B ) शुवजित पाने
C ) विनिता गर्ग D ) यापैकी नाही
13 ) .’राष्ट्रीय विकास परिषदेत’ पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ?
(a ) पंतप्रधान (b ) अध्यक्ष, वित्त आयोग
(c ) केंद्रीय कॅबीनेट मंत्री (d ) राज्यांचे मुख्यमंत्री
A ) फक्त (b ) आणि (d )
B ) फक्त (b ) आणि (c )
C ) फक्त (a ) आणि (c )
D ) फक्त (a ) , (c ) आणि (d )
14 ) .भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?
A ) राज्यघटनेची उद्देशिका B ) राज्याची मार्गदर्शक तत्वे
C ) मूलभूत कर्तव्ये D ) नववी सूची
15 ) .महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस _ हा आहे.
A ) 25 नोव्हेंबर B ) 10 डिसेंबर
C ) 16 डिसेंबर D ) 25 डिसेंबर
16 ) .कोणत्या भारतीय बँकेला “आसोचाम’ चा SME Lending साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे ?
A ) कॅनरा बँक B ) स्टेट बँक ऑफ इंडिया
C ) विजया बँक D ) बँक ऑफ इंडिया
17 ) .खालील विधाने लक्षात घ्या :
(A ) : देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोघांनाच राज्य सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
(R ) : इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही.
A ) (A ) आणि (R ) ही दोन्ही विधाने योग्य असून (R ) हे (A ) चे योग्य स्पष्टीकरण
B ) (A ) आणि (R ) ही दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र (R ) हे (A ) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C ) (A ) हे बिनचूक विधान आहे मात्र (R ) हे चुकीचे विधान आहे.
D ) (A ) हे चुकीचे विधान असून (R ) हे बिनचूक आहे.
18 ) .खालील विधाने विचारात घ्या :
(a ) “इस्रो” या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला.
(b ) 104 उपग्रहांपैकी फक्त तीन उपग्रह भारताचे आणि उर्वरीत आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते.
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) D ) वरीलपैकी नाही
19 ) .भारताचे महान्यायवादी :
(a ) हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.
(b ) हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात.
(c ) हे लोकसभेत बोलू शकतात.
(d ) हे लोकसभेत मतदान करू शकतात.
A ) फक्त (a ) B ) फक्त (a ) आणि (c )
C ) (b ) आणि (d ) फक्त D ) फक्त (a ) , (b ) आणि (c )
20 ) .खालील विधाने विचारात घ्या .
(a ) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत.
(b ) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट ) संबंधित आहे.
(c ) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.
A ) फक्त (a ) B ) (a ) आणि (b )
C ) (b ) आणि (c ) D ) (a ) , (b ) आणि (c )
21 ) .खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 नोता निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले?
A ) 8 मार्च 2016 B ) 8 ऑक्टोबर 2016
C ) 8 नोव्हेंबर 2016 D ) 8 डिसेंबर 2016
22 ) .भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते?
A ) यासाठी सगळ्या घटकराज्यांची संमती आवश्यक असते.
B ) यासाठी बहुसंख्य घटकराज्यांची संमती आवश्यक असते.
C ) यासाठी या निर्णयाने प्रभावित होणा-या राज्यांची संमती आवश्यक असते.
D ) यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते.
23 ) .भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?
A ) महात्मा ज्योतीबा फुले B ) सरोजिनी नायडू
C ) महात्मा गांधी D ) डॉ. अॅनी बेझंट
24 ) .1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण_ होते.
A ) 1:2 B ) 1:3
C ) 1:4 D ) 1:5
25 ) .टाटा हायड्रोलिक पावर कंपनीची स्थापना कोणी केली ?
A ) दोराबजी टाटा B ) जमशेदजी टाटा
C ) रतन टाटा D ) वीरजित टाटा
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
D | B | A | D | B | C | C | C | D | C |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
D | A | D | B | A | C | A | C | D | B |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
C | D | C | A | A |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download