PSI/STI/ASO Combine Test No. 18

PSI/STI/ASO Combine Test No. 18

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 18
PSI/STI/ASO Combine Test No. 18

PSI/STI/ASO Combine Test No. 18

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

26 ) .1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

A ) बॉम्बे गॅझेट B ) बॉम्बे कुरियर

C ) दर्पण D ) बॉम्बे हेरॉल्ड

27 ) . 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर __ यांचा खून केला.

A ) लॉर्ड मेओ B ) लॉर्ड डलहौसी

C ) लॉर्ड वेलस्ली D ) लॉर्ड लिटन

28 ) .__ यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.

A ) महात्मा गांधी B ) लोकमान्य टिळक

C ) महात्मा फुले D ) दयानंद सरस्वती

29 ) .चौरीचौरा’ घटनेनंतर __ ही चळवळ संपुष्टात आली.

A ) सायमन विरोधी सत्याग्रह B ) सविनय कायदेभंग चळवळ

C ) असहकार चळवळ D ) भारत छोडो चळवळ

30 ) .खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या?

(a ) भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील

(b ) वैकुंठभाई मेहता, डॉ. धनंजय गाडगीळ

(c ) वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहीते

(d ) भाऊसाहेब थोरात, जी.के. देवधर

A ) (a ) , (b ) आणि (c ) फक्त

B ) (b ) , (c ) आणि (d ) फक्त

C ) (a ) आणि (b ) फक्त

D ) (a ) , (b ) , (c ) आणि (d )

31 ) .महर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली?

A ) विधवाश्रम B ) शारदा सदन

C ) निष्काम कर्म मठ D ) महिलाश्रम

32 ) .लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व __ यांनी केले होते.

A ) अवधच्या बेगम B ) बड़ी बेगम

C ) बेगम साहिबा D ) बेगम ताज

33 ) .1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ?

A ) मुंबई B ) पुणे

C ) अमरावती D ) कोल्हापूर

34 ) .1908 च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले ?

A ) युगांतर B ) दर्पण

C ) संध्या D ) वंदेमातरम

35 ) .ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडीया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?

A ) इंडियन कौन्सील अॅक्ट 1909 B ) इंडियन कौन्सील अॅक्ट 1861

C ) गव्हर्नमेंट ऑफ इंडीया अँक्ट 1858 D ) गव्हर्नमेंट ऑफ इंडीया अँक्ट 1935

36 ) .रायरेश्वर शिखराची उंची _ मीटर आहे.

A ) 1173 B ) 1273

C ) 1373 D ) 1473

37 ) .सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?

A ) 3 तास B ) 2 तास

C ) 1 तास D ) 4 तास

38 ) .महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ _ चौ.की.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

A ) 307713, 9.36 B ) 306713, 8.36

C ) 305612, 9.36 D ) 305710, 7.26

39 ) .द. बिहारमधील _ हे सिमेंट, कागद व पुट्टे, प्लायवूड इत्यादि उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.

A ) रांची B ) दालमियानगर

C ) रूरकेला D ) असनसोल

40 ) .चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?

A ) कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

B ) गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

C ) गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

D ) महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

41 ) .खालीलपैकी कोणते/कोणती जलविद्युत केंद्र/केंद्रे रायगड जिल्ह्यात आहे/आहेत ?

(a ) वैतरण(b ) येलदरी(c ) भिरा (d ) भिवपुरी

A ) (a ) B ) (a ) , (b ) . (d )

C ) (b ) , (c ) D ) (c ) , (d )

42 ) .खालील विधाने पहा.

(a ) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.

(b ) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.

(c ) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ म्हणतात.

A ) फक्त विधान (a ) बरोबर आहे.

B ) फक्त विधान (b ) बरोबर आहे

C ) विधाने (a ) आणि (b ) बरोबर आहेत.

D ) विधाने (a ) , (b ) आणि (c ) बरोबर आहेत.

43 ) .मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान __ खिंड आहे.

A ) थळघाट B ) फोंडाघाट

C ) पालघाट D ) कुंभार्लीघाट

44 ) .पहिल्या आधुनिक सुतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये _ यांनी केली.

A ) सेठ सी.एन. लाड B ) डी.जी. पोतदार

C ) सी.एन. दावर D ) टाटा अँड सन्स

45 ) .दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात __ जमातीचे लोक राहतात.

A ) गारो व खाशी B ) वारली व ठाकर

C ) कातकरी व हळवा D ) भिल्ल व गोंड

46 ) .पूर्वं हिमालय प्रदेशात ज्वारीं व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात, कारण :

A ) हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे.

B ) हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे.

C ) हा विभाग उबदार हवामानाचा आहे.

D ) हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे.

47 ) .उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्य/ष्ट्ये बरोबर आहेत ?

(a ) अत्यंत घनदाट जंगले.

(b ) वार्षिक पानगळ होते.

(c ) लाकूड टणक व टिकाऊ असते

(d ) एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते.

A ) (a ) फक्त B ) (a ) , (c ) आणि (d )

C ) (c ) फक्त D ) (b ) आणि (c )

48 ) .राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात __ ही खनिजे सापडतात.

A ) कच्चे लोह, दगडी कोळसा आणि मॅगनिज

B ) बॉक्साईट, अभ्रक आणि तांबे

C ) चुनखडक, जिप्सम आणि मीठ

D ) क्रोमाईट, सिलीका आणि कच्चे लौह

49 ) .जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकुण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्के एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जनमदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनमदरास जबाबदार आहेत ?

(a ) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया (b ) शिक्षणाचा अभाव

(c ) साथीच्या रोगांवरील नियंत्रण (d ) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट

A ) (a ) आणि (b ) B ) (b ) आणि (c )

C ) (a ) आणि (c ) D ) (b ) आणि (d )

50 ) .खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?

A ) कर आकारणी B ) सार्वजनिक कर्ज

C ) खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी-विक्री D ) सार्वजनिक खर्च

Answerkey:

26272829303132333435
DACCDDABBC
36373839404142434445
CBABDDDCCD
4647484950
BBCAC
PSI/STI/ASO Combine Test No. 18
Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply