PSI/STI/ASO Combine Test No. 25, MPSC Combine Test Series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 25
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .2020 मधील विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले?
A ) गीता सेन B ) अनुराधा करंदीकर
C ) अनुराधा पाटील D ) सई परांजपे
2 ) .महाराष्ट्र सरकारने राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय…….. या तारखेपासून सुरू झाला?
A ) 1 फेब्रुवारी 2020 B ) 2 फेब्रुवारी 2020
C ) 28फेब्रुवारी 2020 D ) 29 फेब्रुवारी 2020
3 ) .खालील विधाने लक्षात घ्या.
अ ) कर्नाटकातील श्रीनिवास गौडा याने म्हशीच्या धावण्याच्या स्पर्धेत 13.62 सेकंदात 142.50 मीटर अंतर कापले.
ब ) .तो कर्नाटकच्या पारंपारिक खेळातील सर्वाधिक वेगवान धावपटू ठरला आहे.
चुकीचे विधान/ विधाने ओळखा?
A ) अ B ) ब
C ) अ व ब D ) यापैकी नाही
4 ) .योग्य जोड्या लावा : 2020 – भारताचा क्रमांक
अ ) लोकशाही निर्देशांक 1 ) 51 वा
ब ) हेन्ले निर्देशांक 2 ) 84 वा
क ) बौद्धिक संपदा निर्देशांक 3 ) 40 वा
ड ) प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक 4 ) 72 वा
अ ब क ड
1 2 3 4
4 2 3 1
2 3 4 1
3 4 2 1
5 ) .2013 मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले ?
A ) भुवनेश्वर B ) बंगलुरू
C ) श्रीहरिकोटा D ) हैदराबाद
6 ) .जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो ? A. शनिवारवाडा आणि शिंद्यांची छत्री. B. अजिंठा आणि वेरूळ. C. कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस, D. नांदेड येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वर समाधी.
A ) A आणि B B ) B आणि C
C ) C आणि D D ) A आणि D
7 ) .‘प्लॅनिंग अॅन्ड दि पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
A ) डॉ. वि.म. दांडेकर B ) प्रो. अमर्त्य सेन
C ) डॉ. नरेंद्र जाधव D ) डॉ. बी.एस, मिन्हास
8 ) .झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल ?
A ) त्या भारत-पाक कथा कादंबरीकार’ आहेत.
B ) मॅन बुकर पारितोषिकांच्या अंतिम सहापुस्तकात 2013 मध्ये त्यांच्या पुस्तकाची निवड झाली.
C ) त्यांच्या ‘इंटरप्रिटर’ या कादंबरीला साहित्य-अकादमीचा पुरस्कार मिळाला.
D ) वरीलपैकी सर्व
9 ) .देशातील घन कच-यापासून उर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगर पालिकेने सुरू केला आहे ?
A ) पिंपरी चिंचवड महानगर पालिका
B ) पुणे महानगर पालिका
C ) मुंबई महानगर पालिका
D ) ठाणे महानगर पालिका
10 ) .वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे ?
A ) भंडारा B ) ठाणे
C ) गडचिरोली D ) चंद्रपूर
11 ) .महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सीटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही ?
A ) नागपुर B ) औरंगाबाद
C ) मुंबई D ) पुणे
12 ) .भारतीय घटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A ) न्यायालयीन नियुक्ती B ) सहकार
C ) शिक्षण D ) निवडणूक सुधार
13 ) .डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ?
A ) विचार तर कराल B ) सामाजिक श्रद्धा
C ) तिमीरातुन तेजाकडे D ) ठरलं…डोळस व्हायचच !
14 ) .देशातील राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी “कृषि वसंत 2014” कुठे भरली होती ?
A ) पुणे B ) अकोला
C ) इंदौर D ) नागपुर
15 ) .ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ब. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो.
क. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो.
ड. अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हापरिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. वरील पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) केवळ अ B ) केवळ ब आणि क
C ) केवळ अ, ब आणि क D ) वरील सर्व
16 ) .राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
A ) तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
B ) तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
C ) तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
D ) तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.
17 ) .राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
A ) त्याची नियुक्ती संबंधित घटकराज्याच्या राज्यपालाकडून होते.
B ) त्याच्याकडे सोपविलेल्या बाबी संबंधाने तो राज्यसरकारला कायदेशीर सल्ला देतो.
C ) जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्यविधिमंडळापुढे भाषण करू शकतो.
D ) विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.
18 ) .खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले ?
अ. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनचा वापर.
ब. EVM वर आणि मतपत्रिकेवर ‘NOTA’ (यापैकी कुणीही नाही ) पर्याय.
क. निवडणूक ओळखपत्र.
ड. गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (खासदार ) , राज्य विधिमंडळाचा सदस्य (आमदार ) अपात्र ठरतो/अनर्ह ठरतो.
A ) अ फक्त B ) अ आणि ड
C ) अ, ब, क D ) ब आणि ड
19 ) .भूमि अधिग्रहण, पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा – 2013 मधील खालील तरतुदींचा विचार करा :
अ. भूमि अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे.
ब. अधिग्रहीत केलेली जमीन पाच वर्षांपर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.
क. पुनर्वसनानंतरच भूमि अधिग्रहण करता येईल.
ड. ग्रामीण क्षेत्रात भूमि मालकाला बाजारभावाच्या चार पटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.
वरील विधानापैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) केवळ अ आणि ब B ) केवळ ब आणि क
C ) केवळ क आणि ड D ) ब, क आणि ड
20 ) .खालील विधानांचा विचार करा : अ. डॉ. बी.आर, आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ब. श्री एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
A ) ब बरोबर आहे B ) अ बरोबर आहे
C ) अ व ब दोन्ही बरोबर आहेत D ) अ व ब दोन्ही चूक आहेत
21 ) .ग्रामसभे संबंधीच्या खालील विधानांचा विचार करा : अ. तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठस्तर आहे.
ब. 73व्या राज्यघटना दुरुस्तीने तीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे.
क. ग्रामसभेत, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणा-या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो.
ड. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या चार बैठकाघ्याव्या लागतात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) केवळ अ B ) केवळ ब आणि क
C ) केवळ अ, ब आणि क D ) वरील सर्व
22 ) .पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा :
अ. समाजवादी पक्षाची स्थापना
ब. काँग्रेसचे पाटणा अधिवेशन
क. श्वेतपत्रिका
ड. तिसरी गोलमेज परिषद
A ) क, ब, अ, ड B ) ड, क, ब, अ
C ) अ, ड, क, ब D ) ब, अ, ड, क
23 ) .ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली ?
A ) 1793 चा सनदी कायदा B ) 1813 चा सनदी कायदा
C ) 1773 चा नियमनाचा कायदा D ) 1858 चा भारताच्या सुशासनाचा कायदा
24 ) .1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समिती मध्ये पुढील पैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या ?
A ) दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, अॅडम्स, हॉवर्ड
B ) युल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटॉन, हॉवर्ड
C ) ह्यूम, टिळक, कैंपबेल, ब्राडलॉ, नॉरट्रॉन
D ) युल, ह्यूम, ब्राडलॉ, नॉरटॉन, कैंपबेल
25 ) .खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती ?
अ. प्रांतीय स्वायत्तता
ब. संघराज्याचे न्यायालय
क. केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड. दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
A ) अ आणि ड फक्त B ) अ, क, ड फक्त
C ) अ, ब, क आणि ड D ) ब आणि क फक्त
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
C | D | D | A | C | B | D | B | B | C |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
D | A | B | D | C | D | D | D | D | B |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
D | B | B | B | C |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download