PSI/STI/ASO Combine Test No. 34, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 34
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) .मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते ?
A ) प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण/अपवर्तन
B ) प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण/अपवर्तन
C ) प्रकाश किरणांचे जमीनीवरून परावर्तन
D ) प्रकाश किरणांचे जमीनीवरून वक्रीकरण/अपवर्तन
27 ) .नस्पती तेलाचे क्षपण केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?
A ) मॅगनिज आक्साइड B ) रेनी निकेल
C ) कोबाल्ट D ) झिंक
28 ) .खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
(A ) कमी विद्युतरोधासाठी कमी लांबीची, जाड तार वापरतात.
(B ) जास्त विद्युतरोधासाठी कमी लांबीची, बारीक (thin ) तार वापरतात.
A ) फक्त वाक्य (A ) बरोबर आहे
B ) फक्त वाक्य (B ) बरोबर आहे.
C ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर आहेत.
D ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर नाहीत.
29 ) .खालीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
(A ) जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकाप्टन एल पी जी मध्ये मिसळण्यात येते.
(B ) तो गॅस गळती शोधतो.
A ) फक्त वाक्य (A ) बरोबर आहे.
B ) फक्त वाक्य (B ) बरोबर आहे.
C ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर आहेत.
D ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर नाहीत.
30 ) .पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते?
A ) माध्यमातील कणांच्या कंपनामुळे.
B ) माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे.
C ) माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे.
D ) माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे.
31 ) .ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी ___________ यांनी दिली.
A ) मुंबईचे नागरिक B ) ब्रिटिश सरकार
C ) पुणेकर जनता D ) सातारकर जनता
32 ) .’हॅम्लेट’ या नाटकाचे विकार विलासित’ या नावाने मराठी भाषांतर कोणी केले?
A ) वि.दा. सावरकर B ) गोपाळ गणेश आगरकर
C ) महर्षी धोंडो केशव कर्वे D ) विष्णुशास्त्री पंडित
33 ) .’मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर’ ही घोषणा कोणी दिली ?
A ) सहदरन अय्यपन B ) नारायण गुरू
C ) हृदयनाथ कुंजरू D ) टी.एम. नायर
34 ) .बंगाली साहित्यातील ‘नील दर्पण’ ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
A ) कथा B ) कादंबरी
C ) काव्य D ) नाटक
35 ) .श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
A ) त्यांनी प्रथम मजूर संघटना-बॉम्बे मिल हँडस् असोशिएशन स्थापन केली.
B ) त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C ) त्यांना ” जस्टीस ऑफ पीस” हा पुरस्कार देण्यात आला.
D ) वरील एकही नाही.
36 ) .क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
A ) भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B ) श्रीमंतांकडून कोणत्याही मार्गानी पैसे काढणे .
C ) रेल्वे लाईनस् व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल; की
D ) वरील सर्वाचा त्या कार्यक्रमात सहभाग होता.
37 ) .बापूजी अणे यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांविरूद्ध विरोध दर्शविण्यास काय केले?
A ) त्यांनी मीठ तयार केले व सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले.
B ) त्यांनी मिठाची पाकीटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C ) त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला.
D ) त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.
38 ) .”जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्या मायभूमीस स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाहीं”-हे उद्गार कोणाचे ?
A ) भगतसिंग B ) राजगुरु
C ) कर्तारसिंग D ) स्वातंत्र्यवीर सावरकर
39 ) .भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतर्राष्ट्रीय मजुर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली ?
A ) भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस
B ) अखिल भारतीय लाल ट्रेड युनियन काँग्रेस
C ) अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
D ) अखिल भारतीय किसान सभा
40 ) .शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?
A ) जी.बी. वालंगकर B ) ज्योतिबा फुले
C ) वरील दोघांचाही. D ) वरील कोणाचाही नाही.
41 ) .खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A ) सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरू केले.
B ) यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C ) प्रभात फेया व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D ) वरील एकही नाही.
42 ) .जहाल काळात ‘केसरी’ व ‘मराठा’ जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधितहोते ?
A ) त्यांनी ‘केसरी’ इंग्रजीत व ‘मराठा’ मराठीत 1881 मध्ये सुरू केले.
B ) आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले.
C ) वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D ) वरील एकही विधान बरोबर नाही.
43 ) .कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल?
A ) कोळींनी तीन टप्प्यात उठाव केला 1824, 1839 व सुमारे 1845 मध्ये,
B ) कोळी, साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागले होते.
C ) इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
D ) वरील एकही नाही.
44 ) .उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले ?
A ) उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
B ) शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत होते.
C ) वरील दोन्ही विधाने बरोबर.
D ) वरील कोणतेही बरोबर नाही.
45 ) .‘गावचा विकास कसा साधावा’ हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
A ) संत तुकाराम B ) संत एकनाथ
C ) राष्ट्र संत तुकडोजी महाराज D ) संत नामदेव
46 ) .मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला ‘गॅस चेंबर’ असे म्हटले जाते ?
A ) दादर B ) चेंबूर
C ) भायखळा D ) परेल
47 ) .कोणता त्रिभूजप्रदेश हरित त्रिभूजप्रदेश म्हणून ओळखला जातो?
A ) महानदी त्रिभूजप्रदेश B ) गोदावरी त्रिभूजप्रदेश
C ) कृष्णा त्रिभूजप्रदेश D ) गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभूजप्रदेश
48 ) .पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82° 30′ पूर्व रेखावृत्त ) येथे किती वाजताऐकायला येईल?
A ) रात्री 8.30 वाजता B ) सकाळी 9.30 वाजता
C ) सकाळी 7.30 वाजता D ) सकाळी 8.30 वाजता
49 ) .कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता ?
A ) यवतमाळ B ) अमरावती
C ) पुणे D ) जळगाव
50 ) .नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?
A ) सातपुडा महादेव B ) सातपुडा-मैकल
C ) फक्त मैकल D ) फक्त महादेव
Answerkey:
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 |
A | B | A | C | A | A | B | B | D | D |
36 | 37 | 38 | 39 | 40 | 41 | 42 | 43 | 44 | 45 |
D | C | C | A | C | D | D | D | C | C |
46 | 47 | 48 | 49 | 50 | |||||
B | D | D | C | C |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download