PSI/STI/ASO Combine Test No. 12
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.

PSI/STI/ASO Combine Test No. 12
- खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
1) उषाकोठी – ओडिशा
2) बंकटवा – उत्तरप्रदेश
3) तुन्दाह – हरियाणा
4) कवाल – तेलंगणा
उत्तर : 1) उषाकोठी – ओडिशा
स्पष्टीकरण :
उषाकोठी हे एक ओडिसा मधील प्रसिद्ध अभयारण्य आहे. याची निर्मिती सन 1962 मध्ये झाली. ओड़िशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात.
- अ) रामगुंडम औष्णिक वीज प्रकल्प तामिळनाडू मध्ये सुरू करण्यात आला आहे.
ब) ओडिशातील मंदाकिनी बी या खाणीतून या प्रकल्पाला कोळसा पुरवला जाईल.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) व (ब) योग्य 2) फक्त (अ) योग्य
3) (अ) व (ब) अयोग्य 4) फक्त (ब) योग्य.
उत्तर : 4) फक्त (ब) योग्य
स्पष्टीकरण :
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (इंग्रजी: Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. जनित्र फिरले की वीज निर्मिती होते.
- खालील विधाने काळजीपूर्वक वाचा.
अ) महाराष्ट्र शासनाचा शेतकरी दिन 29 सप्टेंबर (डॉ. विठ्ठलराव विखे पाटील) यांच्या जन्मदिवस 2015 पर्यंत साजरा केला जात होता.
ब) 2016 पासून शेतकरी दिन 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
वरीलपैकी अयोग्य विधान कोणते नाही ?
पर्यायी उत्तरे :
1) (अ) फक्त 2) (अ) व (ब)
3) (ब) फक्त 4) ना (अ) ना (ब)
उत्तर : 4) ना (अ) ना (ब)
स्पष्टीकरण :
महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन हा २९ ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे.
महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
- लोह खनिज उत्पादक क्षेत्र (India)
वरील दिलेल्या नकाशात लोह खनिजाचे उत्पादक क्षेत्र ओळखा.
1) चंदपूर, मयूरभंज, दुर्ग, बैलादिला 2) मयूरभंज, चंदपूर, बैलादिला, दुर्ग
3) चंदपूर, मयूरभंज, बैलादिला, दुर्ग 4) दुर्ग, चंदपूर, मयूरभंज, बैलादिला
उत्तर : 4) दुर्ग, चंदपूर, मयूरभंज, बैलादिला
स्पष्टीकरण :
भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी 20 टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात. पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
- सन 2011 च्या शिरगणतीनुसार खालीलपैकी कोणते विधान / ने सत्य आहेत ?
अ) बाल लिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे.
ब) देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाटा उत्तरप्रदेशचा आहे.
क) महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.
ड) संपूर्ण देशात ग्रामीण लोकसंख्या 68.8 आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (अ) आणि (ब) 2) फक्त (अ), (ब) आणि (ड)
3) फक्त (ब) आणि (क) 4) फक्त (अ), (क) आणि (ड)
उत्तर : 2) फक्त (अ), (ब) आणि (ड)
स्पष्टीकरण :
2011 ची गणना सलग 15 वी आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी. पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोने केली. 1881 पासून नियमितपणे गणना. भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली. जनगणना कायदा 1948. जनगणना आयुक्त गृहमंत्रालयाअंतर्गत जनगणनेचे कामकाज पार पडतात. (2011 – डॉ. सी. चंद्रमौली) 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य- ‘आपली जनगणना आपले भविष्य’ 2011 च्या जनगणणेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली आहे.
- खालीलपैकी अचूक विधाने निवडा.
अ) चिल्का हे उडीसामधील खारकच्छ आहे.
ब) केरळमधील बेंबनाड हे प्रसिद्ध खाजण सरोवर आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) व (ब) 2) फक्त (ब)
3) फक्त (अ) 4) ना (अ) ना (ब)
उत्तर : 1) (अ) व (ब)
स्पष्टीकरण :
चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी व या सरोवरातील वनस्पती आणि जनावरांच्या अनेक प्रजातींसाठी हे ओळखले जाते. वेंबनाड हे भारतामधील सर्वाधिक लांबीचे सरोवर आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागात अरबी समुद्राला समांतर असलेले वेंबनाड सरोवर केरळच्या पर्यटनाचे मोठे आकर्षण मानले जाते. कोचीच्या दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर अलप्पुळा शहरापर्यंत पसरले आहे व एर्नाकुलम जिल्हा, अलप्पुळा जिल्हा व कोट्टायम जिल्ह्यांच्या अखत्यारीत येते.
- भारतात जगाच्या तुलनेत विचार केल्यास सरासरी किती टक्के भाताचे उत्पादन होते ?
1) 30% 2) 19%
3) 15% 4) 25%
उत्तर : 2) 19%
स्पष्टीकरण :
भात हे तृणधान्य मूळचे आग्नेय आशियातील असावे असे मानतात. दक्षिण भारतातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात भाताची (ओरिझा सटायव्हा) उत्पत्ती होऊन नंतर त्याचा पूर्वेकडे चीनमध्ये व पश्चिमेकडे इराण व ईजिप्तमध्ये प्रवेश झाला असावा. कारण तेथील भौगोलिक परिस्थिती (दलदलीचे प्रदेश, डोंगराळ प्रदेश व अधून मधून येणारे मोठे पूर) भाताच्या वाढीस अनुकूल आहे. शिवाय भारतात भाताच्या जंगली जाती पुष्कळ आहेत आणि जंगली जाती व लागवडीतील जाती यांच्या मधले प्रकार (मध्यस्थ) पुष्कळ आहेत. भारतातील भाताचे लागवडीतील प्रकार (सु. 6,000) जगातील कोणत्याही देशातील प्रकारांपेक्षा संख्येने अधिक आहेत. फिलिपीन्समधील इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 30,000 प्रकार जमविण्यात आलेले आहेत. तथापि त्यांपैकी फारच थोडे मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहेत.
जग : भात हे उष्ण कटिबंधातील पीक आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते परंतु सध्या ते अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत लागवडीत आहे.जगातील लगावडीखालील तृणधान्यांत गव्हानंतर भाताच्या पिकाचे क्षेत्र आहे. 1978 च्या आकडेवारीप्रमाणे जगातील भाताचे एकूण क्षेत्र 14.51 कोटी हेक्टर होते. त्यापैकी सु. 90% क्षेत्र आशिया खंडात असून चीन व भारत या दोन देशांत मिळून ते 48%होते. जगात भाताचे सर्वांत जास्त क्षेत्र (25%) भारतात व त्याखालोखाल ते चीनमध्ये (23%) होते. क्षेत्राच्या बाबतीत जरी भारताचा प्रथम क्रमांक असली, तरी हेक्टरी उत्पादनात त्याचा क्रमांक बराच खाली आहे. चीनमध्ये 99% भाताचे क्षेत्र सिंचाई खाली आहे, तर भारतात ते फक्त 30% आहे.
- खालील अचूक विधान ओळखा.
अ) स्टेप्स हा गवताळ प्रदेश प्रेअरी या गवताळ प्रदेशाच्या पश्चिमेला आहे.
ब) पंपास हा गवताळ प्रदेश द. अमेरिका खंडात उत्तरेकडे पसरलेला आहे.
क) डाऊन्स हा गवताळ प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणार्या खंडात आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) व (ब) फक्त 2) (अ), (ब), (क)
3) (ब) व (क) फक्त 4) यापैकी नाही.
उत्तर : 4) यापैकी नाही
स्पष्टीकरण :
पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी 24% भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत. एकूण गवताळ क्षेत्रापैकी 71% क्षेत्र उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाने व्यापले आहे. 6% क्षेत्र पर्वतीय गवताळ प्रदेशाचे आहे. उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश सॅव्हाना (आफ्रिका), लानोज व कँपोज (द. अमेरिका) या नावांनी, तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश प्रेअरी (उ. अमेरिका), पँपास (द. अमेरिका), व्हेल्ड (आफ्रिका), स्टेप (यूरेशिया), डाऊन्स (ऑस्ट्रेलिया) व कॅटनबरी (न्यूझीलंड) या नावांनी ओळखले जातात. प्रत्येक गवताळ प्रदेशातील वनस्पतिजीवन व प्राणिजीवन आणि त्यांच्या आंतरक्रिया भिन्न असल्याने प्रत्येक गवताळ प्रदेश ही स्वतंत्र गवताळ भूमी परिसंस्था म्हणून ओळखली जाते.
- खालील विधानांचा काळजीपूर्वक विचार करून अचूक विधान निवडा.
अ) आफ्रिका खंडाचा विस्तार चारही गोलार्धात आहे. (पूर्व – पश्चिम – उत्तर – दक्षिण)
ब) अंटार्क्टिका खंडाचा विस्तार सर्व रेखावृत्तात आहे.
क) अंटार्क्टिका 82.8°S 135° E 0 रेखावृत्तावर आहे.
ड) अंटार्क्टिका खंडावर मॉसन हे न्यूझिलँडचे स्थायी तळ आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ), (ब), (ड) 2) (ब), (क), (ड)
3) (अ), (ब), (क) 4) (अ), (ब), (क), (ड)
उत्तर : 3) (अ), (ब), (क)
स्पष्टीकरण :
अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. 1,44,25,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा 98 टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या 20.4 टक्के जमीन या खंडात येते. इ. स. 2009 मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या 14.72 टक्के एवढी होती.
- 2011 नुसार महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तरानुसार खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. (0 ते 6 वर्षे)
अ) भंडारा ब) नंदुरबार
क) चंद्रपुर ड) जळगाव
पर्यायी उत्तरे :
1) (ड), (ब), (अ), (क) 2) (अ), (ब), (क), (ड)
3) (ड), (ब), (क), (अ) 4) (ब), (अ), (क), (ड)
उत्तर : 3) (ड), (ब), (अ), (क)
स्पष्टीकरण :
राज्यातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण 2001 मधील 913 वरून 19 ने कमी होऊन 2011 मध्ये 894 झाले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2011 मध्ये हे प्रमाण सर्वात कमी 807 असून वर्ष 2001 ते 2011 या कालावधीमध्ये 86 गुणांची मोठी घसरण नोंदविली आहे. सन 2001 ते 2011 या कालावधीत कोल्हापूर (863), सातारा (895), सांगली (867) आणि चंद्रपूर (953) जिल्ह्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.
- मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये खालीलपैकी कुठला स्थलांतरीत शेतीप्रकार आढळतो ?
अ) बेवार ब) पेंडा
क) माशा ड) पोडू
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (अ) 2) (अ) व (ब)
3) (अ), (ब), (ड) 4) (अ), (ब), (क)
उत्तर : 4) (अ), (ब), (क)
स्पष्टीकरण :
या पद्धतीनुसार जंगलाचा काही भाग झाडे तोडून व जाळून साफ करतात आणि त्या जमिनीवर मिश्र पीक पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेण्यात येतात. दोन अथवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते. भारतात शेतीची ही पद्धत विशेषेकरून ईशान्य भागातील आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश आणि मिझोराम तसेच ओरिसा व आंध्र प्रदेश इत्यादींमध्ये विस्तृत प्रमाणावर आढळून येते. या भागात सु. 5 लक्ष आदिवासी कुटुंबे या शेतीवर निर्वाह करतात. या शेतीच्या पद्धतीने जंगलाचे सु. 27 लक्ष हे. क्षेत्र व्यापले असून एकावेळी सु. 4.5 लक्ष हे. जमीन प्रत्यक्ष शेतीखाली असते. अशा भागातील विशिष्ट भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती तसेच वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि त्यांतून उद्भवणारी अलगपणाची भावना या गोष्टी फिरत्या शेतीच्या अस्तित्वास कारणीभूत आहेत. अशा प्रकारच्या शेतीला भारताच्या निरनिराळ्या भागांत ‘झूम’खेरीज पुढील नावे प्रचलित आहेत : हिमालयात ‘खील’, मध्य प्रदेशात ‘दाही’, पश्चिम घाटाच्या काही भागांत ‘कुमरी’ किंवा ‘पोडू’ बेवार, दिप्पा, एर्का, जारा, प्रेंडा, दाही किंवा पर्का ही नावे स्थानपरत्वे आढळून येतात.
- खालीलपैकी अयोग्य विधान कोणते नाही ते ओळखा.
अ) 2011 नुसार महाराष्ट्रातील घनतेचा विचार केल्यास फक्त विदर्भात नागपूरची घनता सर्वाधिक असून त्या खालोखाल अमरावतीचा क्रमांक लागतो.
ब) 2011 नुसार कर्नाटक सीमेशी संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या घनतेचा विचार केल्यास कोल्हापूरची घनता सर्वाधिक असून त्यानंतर मराठवाड्यातील एका जिल्ह्याचा क्रमक लागतो.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (अ) 2) फक्त (ब)
3) (अ) व (ब) 4) ना (अ) ना (ब).
उत्तर : 2) फक्त (ब)
स्पष्टीकरण :
महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण 1.8 कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार 1,18,809 चौरस मैल (3,07,710 चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे.
हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व 1973 मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले. कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ 1,91,976 चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5.83% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले 8 वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात 9 वा क्रमांक आहे.
- कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 6, 7 आणि 9 या क्रमांमधून 5 ने भाग जाईल अशा किती तीन अंकी संख्या तयार करता येतील ?
1) 5 2) 10
3) 15 4) 20
उत्तर : 4) 20
स्पष्टीकरण :
235, 265, 275, 295, 325, 365, 375, 395, 625, 635, 675, 695, 725, 735, 765, 795, 925, 935, 965, 975
- A, B आणि C एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तिघांनीही एकत्र काम चालू केले आहे. 4 दिवसांनंतर A काम सोडून देतो त्यानंतर तेच काम पूर्ण करण्यास B आणि C ला 10 दिवस जास्त लागतात तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
1) 15 दिवस 2) 16 दिवस
3) 25 दिवस 4) 50 दिवस
उत्तर : 3) 25 दिवस
स्पष्टीकरण :
(A+B+C) एक काम 10 दिवसात पूर्ण करतात.
म्हणुन, 1 दिवसाचे काम = 1/10, तिघांनीही 4 दिवस एकत्र काम केले म्हणुन, 4 दिवस = 4/10 = 2/5
उर्वरित काम = 1 – 2/5 = 3/5
B आणि C ला 3/5 काम करण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. म्हणुन, (B+C) चे एक दिवसाचे काम = 3/50
आता, A चे एक दिवसाचे काम = (A+B+C) चे एक दिवसाचे काम – (B+C) चे एक दिवसाचे काम = 1/10 – 3/50 = 1/25
A चे एक दिवसाचे काम = 1/25
म्हणजेच, A एकटा तेच काम 25 दिवसात पूर्ण करेल.
- 8 फेब्रुवारी 2005 ला मंगळवार होता, तर 8 फेब्रुवारी 2004 ला कोणता वार होता ?
1) मंगळवार 2) रविवार
3) सोमवार 4) बुधवार
उत्तर : 2) रविवार
स्पष्टीकरण :
लीप वर्षात 2 दिवस जास्त असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 2 दिवसाने पुढे जातो.
इथे दिल्याप्रमाणे 2 दिवस मागे जावे लागेल.
- तीन संख्यांची बेरीज 264 आहे तर पहिली संख्या दुसर्या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या एक तृतीयांश असेल तर दुसरी संख्या कोणती ?
1) 48 2) 54
3) 72 4) 84
उत्तर : 3) 72
स्पष्टीकरण :
तीन संख्यांची बेरीज 2X + X + 2X/3 = 264
11X/3 = 264 11X = 792
X = 792/3 X = 72
- सहा व्यक्ती आहेत A, B, C, D, E आणि F
A कडे C पेक्षा 3 वस्तु अधिक आहेत.
D कडे B पेक्षा 4 वस्तु कमी आहेत.
E कडे F पेक्षा 6 वस्तू कमी आहेत.
C कडे E पेक्षा 2 वस्तू अधिक आहेत.
F कडे D पेक्षा 3 वस्तू अधिक आहेत.
खालील कोणत्या संख्येमध्ये सहा व्यक्तींकडे असलेल्या वस्तूंमध्ये एकूण समान संख्या असू शकत नाही ?
1) 41 2) 47
3) 53 4) 58
उत्तर : 4) 58
स्पष्टीकरण :
A = C + 3 D = B – 4 E = F – 6 C = E + 2 F = D + 3
सर्वांची बेरीज केल्यावर, A = B – 2
एकूण वस्तूची संख्या = A + B + C + D + E + F
= A + (A + 2) + (A – 3) + (A – 2) + (A – 5) + (A + 1)
= 6A – 7
जर A = 8 घेतले तर, एकूण वस्तूची संख्या = 8 × 6 – 7 = 41
जर A = 9 घेतले तर, एकूण वस्तूची संख्या = 9 × 6 – 7 = 47
जर A = 10 घेतले तर, एकूण वस्तूची संख्या = 10 × 6 – 7 = 53
जर A = 11 घेतले तर, एकूण वस्तूची संख्या = 11 × 6 – 7 = 59 ≠ 58
- चौकोनाचे निरीक्षण करा. 13 या संख्येच्या उजवीकडील संख्येच्या वरच्या संख्येच्या दहांचा अंक एकंस्थानी व 12 या संख्येच्या डावीकडील संख्येच्या खालच्या संख्येचा एकचा अंक दहंस्थानी कल्पून नवीन तयार झालेली संख्या ?
11 23 22 16
25 12 24 17
21 26 13 19
15 20 18 14
1) 72 2) 11
3) 57 4) 75
उत्तर : 2) 11
स्पष्टीकरण :
13 या संख्येच्या उजवीकडील संख्येच्या वरची संख्या = 17, त्या संख्येचा दहांचा अंक एकंस्थानी = 1
12 या संख्येच्या डावीकडील संख्येच्या खालची संख्या = 21, त्या संख्येचा एकचा अंक दहंस्थानी = 1
नवीन तयार झालेली संख्या = 11
- तीन विवाहित जोडप्यांमध्ये 2 डॉक्टर आहेत. 2 इंजिनियर असून 2 वकील आहेत. त्यामध्ये श्री व श्रीमती सिंग, श्री व श्रीमती राजन, श्री व श्रीमती नयक आहेत. पती आणि पत्नीचे व्यवसाय भिन्न आहेत. त्यांमध्ये कोणतीही स्त्री इंजिनियर नाही. श्री. राजन वकील आहेत.
खालील दिलेल्या विधानांत कोणते विधान सत्य आहे ?
अ) श्रीमती राजन डॉक्टर आहेत.
ब) श्रीमती नायक आणि श्रीमती सिंग यांचा व्यवसाय सारखाच आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (अ) 2) दोन्ही (अ) आणि (ब)
3) फक्त (ब) 4) दोन्हीही नाही.
उत्तर : 1) फक्त (अ)
स्पष्टीकरण :
श्री सिंग = इंजिनियर
श्रीमती सिंग = डॉक्टर
श्री राजन = वकील
श्रीमती राजन = वकील
श्री नायक = इंजिनियर
श्रीमती नायक = डॉक्टर
- खालील मालिका पूर्ण करा.
AEF, 112, BGH, 177, CIJ, 244, ……… , ………..
1) DHK, 312 2) DKL, 313
3) EJK 4) EKJ, 312
उत्तर : 2) DKL, 313
स्पष्टीकरण :
A + 4 = E + 1 = F
B + 4 = G + 1 = H
C + 4 = I + 1 = J
म्हणुन,
D + 4 = K + 1 = L
- प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?
1) 24 2) 48
3) 96 4) 15
उत्तर : 2) 48
- चिन्हांच्या जागी अचूक अक्षर आणि कंस असलेला पर्याय कोणता ?
E H K N *
7 10 13 16 *
1) P/18 2) R/20
3) T/22 4) Q/19
उत्तर : 4) Q/19
स्पष्टीकरण :
E + 3 = H + 3 = K + 3 = N + 3 = Q
7 + 3 = 10 + 3 = 13 + 3 = 16 + 3 = 19 म्हणुन, Q/19
- एका कुटुंबात A चा B शी जो संबंध आहे तोच B चा A शी आहे तर A आणि B हे ……………. आहेत.
1) भाऊ बहीण 2) पती व पत्नी
3) वडील व मुलगा 4) भाऊ व भाऊ
उत्तर : 4) भाऊ व भाऊ
स्पष्टीकरण :
समजा पर्याय 1) भाऊ बहीण घेतला तर,
भाऊ बहीण
भावाचा बहीणीशी संबंध भाऊ येतो पण, बहीणीचा भावाशी संबंध भाऊ येत नाही तर बाहीण येतो.
समजा पर्याय ) भाऊ व भाऊ घेतला तर,
भाऊ भाऊ
भावाचा भावाशी संबंध भाऊ येतो तसेच दुसऱ्या भावाचा पहिल्या भावाशी संबंध भाऊ येतो.
- विधान : काही चादरी बिछाना आहेत, काही उशा चादरी आहेत, सर्व बिछाने उशा आहेत.
निष्कर्ष : I काही चादरी उशा आहेत.
II काही उशा बिछाना आहेत.
III काही बिछाने चादरी आहेत. 1) फक्त निष्कर्ष I किंवा II निघतात. 2) फक्त I आणि II किंवा III निघतात.
3) फक्त III आणि I किंवा II निघतात. 4) फक्त I, II आणि III निघतात.
उत्तर : 4) फक्त I, II आणि III निघतात.
स्पष्टीकरण :
चादरी उशा बिछाना- खाली दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ?
उत्तर : (3)
| Combine Test No. 01 | Download |
| Combine Test No. 02 | Download |
| Combine Test No. 03 | Download |
| Combine Test No. 04 | Download |
| Combine Test No. 05 | Download |
| Combine Test No. 06 | Download |
| Combine Test No. 07 | Download |
| Combine Test No. 08 | Download |
| Combine Test No. 09 | Download |
| Combine Test No. 10 | Download |
| Combine Test No. 11 | Download |
| Combine Test No. 12 | Download |
| Combine Test No. 13 | Download |
| Combine Test No. 14 | Download |
| Combine Test No. 15 | Download |
| Combine Test No. 16 | Download |
| Combine Test No. 17 | Download |
| Combine Test No. 18 | Download |
| Combine Test No. 19 | Download |
| Combine Test No. 20 | Download |
| Combine Test No. 21 | Download |
| Combine Test No. 22 | Download |
| Combine Test No. 23 | Download |
| Combine Test No. 24 | Download |
| Combine Test No. 25 | Download |
| Combine Test No. 26 | Download |
| Combine Test No. 27 | Download |
| Combine Test No. 28 | Download |
| Combine Test No. 29 | Download |
| Combine Test No. 30 | Download |
| Combine Test No. 31 | Download |
| Combine Test No. 32 | Download |
| Combine Test No. 33 | Download |
| Combine Test No. 34 | Download |
| Combine Test No. 35 | Download |
| Combine Test No. 36 | Download |
| Combine Test No. 37 | Download |
| Combine Test No. 38 | Download |
| Combine Test No. 39 | Download |
| Combine Test No. 40 | Download |
Serch Your Dream Jobs