PSI/STI/ASO Combine Test No. 13
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 13
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
(1 ) .’प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ ) वंदना’ योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a ) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.
(b ) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते.
(c ) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
A ) विधाने (a ) , (b ) , (c ) बरोबर आहेत B ) विधाने (b ) , (c ) बरोबर आहेत
C ) केवळ विधान (a ) बरोबर आहे D ) केवळ विधान (c ) बरोबर आहे
2 ) .’दि कोएलिशन ईअर्स’ (‘The Coalition Years ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A ) प्रणव मुखर्जी B ) पी. चिदंबरम्
C ) डॉ. मनमोहन सिंग D ) कपिल सिब्बल
3 ) .वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या IPS अधिकाऱ्यांची नोंद झाली?
A ) कृष्ण प्रकाश B ) विश्वास नांगरे पाटील
C ) विश्वास मुंडे D ) किरण मुंडे
4 ) .2021 मध्ये खालीलपैकी कोणता क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार नाही?
A ) विजय हजारे स्पर्धा B ) रणजी करंडक स्पर्धा
C ) मुश्ताफ अली स्पर्धा D ) इराणी करंडक
5 ) .CPTPP या संघटनेत एकूण किती देश आहेत?
A ) 10 B ) 11
C ) 12 D ) 13
6 ) .कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
(a ) या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारा केले जाते. (b ) यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गानी होते एक मार्ग लिपुलेखा खिंड (उत्तरांचल ) आणि दुसरा मार्ग नथुला खिंड (सिक्कीम ) .
(c ) या यात्रेसाठी परकीय/परदेशी व्यक्ती पात्र नाहीत.
(d ) यात्रेकरुंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत/आर्थिक सहाय्य देत नाही.
A ) (a ) , (b ) , (c ) , (d ) B ) (a ) , (b ) , (c )
C ) (b ) , (c ) D ) (a ) , (b )
7 ) .अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे?
A ) 5,000 – 5,500 कि.मी. B ) 3,500 कि.मी.
C ) 7,500 कि.मी. D ) 10,000 कि.मी.
8 ) .महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे __ हे महत्वाचे कार्य आढळते.
(a ) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे
(b ) संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे
(c ) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे
(d ) वरीलपैकी नाही
A ) फक्त (a ) B ) (a ) आणि (b )
C ) (b ) आणि (c ) D ) फक्त (d )
9 ) .अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?
A ) मिग – 21 बायसन B ) मिग – 27 बायसन
C ) सुखोई D ) सु – 57
10 ) .दारिद्रयरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?
A ) दिन दयाल वयोश्री योजना B ) राष्ट्रीय वयोश्री योजना
C ) प्रधानमंत्री वयोश्री योजना D ) अटल वयोश्री योजना
11 ) .’न्यू वल्र्ड वेल्थ’ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?
A ) शिकागो B ) टोरांटो
C ) फ्रैंकफर्ट D ) शांघाय
12 ) .कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर. किट योजना सुरू केली आहे ?
A ) तेलंगाणा B ) केरळ
C ) हरियाणा D ) आसाम
13 ) ………. या वर्षाच्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये ब्रेकडान्स चा समावेश करण्यात आला?
A ) 2020 B ) 2022
C ) 2024 D ) 2028
14 ) .SEBI ला सल्ला देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली?
A ) रघुराम राजन B ) भालचंद्र मुणगेकर
C ) उषा थोरात D ) प्रकाश थोरात
15 ) .जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली?
A ) जपान B ) चीन
C ) भारत D ) रशिया
16 ) .खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत ?
(a ) विज (b ) विवाह आणि घटस्फोट, दत्तक
(c ) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना (d ) कामगार संघटना
A ) (a ) B ) (a ) आणि (c )
C ) (a ) , (b ) आणि (d ) D ) वरील सर्व
17 ) .पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा :
(a ) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
(b ) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो.
(c ) ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमधे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही.
(d ) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
A ) (a ) , (b ) , (c ) B ) (b ) , (d )
C ) (c ) , (d ) D ) (b ) ,(c )
18 ) .खालील विधाने विचारात घ्या : (उच्च न्यायालयाच्या संदर्भात )
(a ) उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे.
(b ) जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो.
(c ) अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राह शकत नाही.वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?*
A ) (a ) फक्त B ) (c ) फक्त
C ) (a ) आणि (b ) D ) a ) , (b ) आणि (c )
19 ) .खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर [अनुच्छेद – 19 (1 ) (a ) ] वाजवी बंधने घालू शकते ?
(a ) न्यायालयाचा अवमान (b ) अल्पसंख्यांकाचे संरक्षण
(c ) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध (d ) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व
(e ) सभ्यता अथवा नितीमत्ता
A ) (a ) , (b ) , (c ) , (e ) B ) (b ) , (c ) , (d )
C ) (a ) , (c ) , (d ) , (e ) D ) वरील सर्व
20 ) .महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
A ) विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही.
B ) विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.
C ) जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.
D ) यापैकी एकही नाही
21 ) .महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :
(a ) या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
(b ) या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते.वरीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहे?*
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) दोन्ही D ) वरीलपैकी एकही नाही
22 ) .कालानुक्रमे रचना करा :
(a ) दुसरी गोलमेज परिषद (b ) नेहरू अहवाल
(c ) गांधी-आयर्विन करार (d ) जातीय निवाडा
A ) (a ) , (c ) , (d ) , (b ) B ) (b ) , (c ) , (d ) , (a )
C ) (b ) , (c ) , (a ) , (d ) D ) (b ) , (a ) , (c ) , (d )
23 ) .इ.स. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती ?
(a ) भोपाळ (b ) महू (c ) इंदौर (d ) महिदसी
A ) (a ) आणि (b ) फक्त B ) (b ) आणि (c ) फक्त
C ) (c ) आणि (d ) फक्त D ) (a ) , (c ) , (d ) फक्त
24 ) .इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून _ याची नेमणूक करण्यात आली.
A ) एडविन माँटेग्यू B ) सर विल्यम मेयर
C ) सिडने रौलट D ) लॉर्ड चेम्सफोर्ड
25 ) .1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतक-यांनी शेतक-यांची संघटना स्थापन केली होती ?
A ) राजमहल B ) मुर्शिदाबाद
C ) भागलपूर D ) पबना
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
D | A | A | B | B | A | A | B | A | B |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
B | A | C | C | C | C | B | C | C | C |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
D | C | B | B | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download