PSI/STI/ASO Combine Test No. 21, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 21
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .भारतात………. या वर्षी जी-20 गटाची परिषद पार पडणार आहे?
A ) 2021 B ) 2022
C ) 2023 D ) 2024
2 ) .Social Entrepreneur of the year Award – India -2020 ………. या महिलेस मिळाला.
A ) अशरफ पटेल B ) अशरफ गोविंद
C ) लताकुमार शर्मा D ) विजया वर्मा
3 ) .WEF च्या स्मार्ट सिटी आराखड्यात भारतातली किती शहरांचा समावेश आहे?
A ) चार B ) पाच
C ) सहा D ) सात
4 ) .गांजा ड्रग्स नव्हे तर औषध हा ऐतिहासिक निर्णय कधी देण्यात आला?
A ) 2 डिसेंबर 2019 B ) 2 डिसेंबर 2020
C ) 2 डिसेंबर 2021 D ) .5 जानेवारी 2021
5 ) .भूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासानी बाबतच्या पुढील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
A ) बालकलाकार म्हणून राजकपूरच्या 1955 मधील ‘श्री 420’ चित्रपटात भूमिका केली.
B ) भारतातील पहिला सिंधी भाषिक चित्रपट ‘अबाना’ मध्ये भूमिका.
C ) साधना कट केशरचनेमुळे प्रसिद्ध झाली.
D ) प्रसिद्ध गीत “झुमका गिरा रे बरेली के बझार में तिच्या रहस्यमय रोमांचक चित्रपट वह कौन थी’ मधील आहे.
6 ) .बराक-8′ या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य कोणते ?
अ. ते जमीनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्याचे क्षेपणास्त्र आहे.
ब. भारत आणि इस्राईलने संयुक्तरीत्या विकसित केले.क. मारा करण्याचा पल्ला 70 किलोमीटर आहे.ड. ‘बहूकार्यात्मक पाळत’ प्रणाली वर आधारित आहे आणि रडारच्या कक्षेत येत नाही.
A ) वरीलपैकी कोणतेही नाही B ) फक्त ब
C ) फक्त क D ) वरीलपैकी सर्व
7 ) .कोपा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशीप/स्पर्धेबाबत योग्य विधाने ओळखा: अ. अॅलेक्सिस सांचेझ ही गोल्डन बॉल विजेता आहे.ब. एडुआर्डी व्हॅर्गास ही गोल्डन बुट विजेता आहे.क. चार्ल्स अँरण्गुइझ हा गोल्डन ग्लोव्हज विजेता आहे.
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त अ आणि क
C ) फक्त ब आणि क D ) वरीलपैकी कोणतेही नाही
8 ) .खालील विधाने विचारात घ्या :
अ. अरब लीगची स्थापना 22 मार्च, 1945 रोजी झाली.
ब. इराक हा अरब लीग चा संस्थापक सदस्य आहे.
क. नोव्हेंबर, 2011 पासून अरब लीगमधून सिरीयाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? *
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त ब आणि क
C ) फक्त अ आणि क D ) अ, ब आणि क
9 ) .टाईम हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी अॅकींग’ च्या सर्वेक्षणातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाबतच्या विधानांचा विचार करा :
अ. जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत 601 वे स्थान.
ब. अध्यापनाच्या दर्जाबाबत जगात 191 वे स्थान,
क. अध्यापन दर्जामध्ये भारतात 2रे स्थान.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ B ) फक्त ब आणि क
C ) फक्त अ आणि ब D ) वरीलपैकी सर्व
10 ) .’बलुतं’ या आत्मकथनाबाबतच्या विधानांचा विचार करा :
अ. दया पवार यांनी ते मराठीत लिहिले आहे.
ब. ते 1978 मध्ये ग्रंथाली प्रकाशना’ तर्फे प्रकाशित करण्यात आले होते.
क. हिन्दीमध्ये ‘अच्छत’ या नावाने अनुवादित करण्यात आले.
ड. ते कन्नड, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा अनुवादित करण्यात आले आणि आता जेरी पिंटो यांनी इंग्रजीतअनुवादित केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त ब आणि क
C ) फक्त अ, ब आणि ड D ) वरीलपैकी सर्व
11 ) .योग्य विधान/विधाने ओळखा :
अ. अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी 1 जून, 2015 पासून सुरू झाली.
ब. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अंमलबजावणी 1 ऑगस्ट, 2015 पासून सुरू झाली.
A ) विधान अ बरोबर आहे B ) विधान में बरोबर आहे
C ) दोन्ही विधाने अ आणि ब बरोबर आहेत D ) दोन्ही विधाने अ आणि ब चुकीचे आहेत
12 ) .माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती आहे?
A ) 8844 मीटर B ) 8848मीटर
C ) 8645मीटर D ) 8848.86मीटर
13 ) .महाराष्ट्रातील पहिले गिधाड प्रजनन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले?
A ) नाशिक B ) सोलापूर
C ) भंडारा D ) गोंदिया
14 ) …….. या देशात प्रथमच आठव्या जागतिक रंगभूमी ऑलिम्पिक चे आयोजन करण्यात आले होते?
A ) ग्रीस B ) भारत
C ) रशिया D.जपान
15 ) .खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पडली.
ब. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
क. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अफक्त अ आणि ब B ) फक्त अ आणि ब
C ) फक्त ब आणि क D ) फक्त अ
16 ) .घटक राज्याच्या ‘महाधिवक्ता’ पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
A ) कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे.
B ) त्याच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितले नाही.
C ) भारताच्या राष्ट्रपतीनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते व सवलती मिळतात.
D ) राज्य विधानमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार उपभोगता येतात.
17 ) .भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे ?
A ) कलम 21-सी B ) कलम 21-ए
C ) कलम 51-ए D ) कलम 25-सी
18 ) .भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
ब. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरूस्ती करता येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?*
A ) फक्त अ B ) अ आणि ब
C ) फक्त ब D ) वरीलपैकी कोणतेही नाही
19 ) .भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ?
A ) स्वातंत्र्य B ) समता
C ) बंधुता D ) न्याय
20 ) .भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?
A ) समान नागरी कायदा B ) पंचायत राज
C ) समान कामासाठी समान वेतन D ) महिला सबलीकरण
21 ) .मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती.
ब. 1976 मध्ये 42 व्या घटनादुरूस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
क. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे अकरावे कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले.वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त ब आणि क
C ) फक्त अ आणि क D ) अ, ब आणि क
22 ) .’भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा’ (आय.एन.टी.यु.सी. ) बाबतच्या विधानांचा विचार करा :
अ. तिची स्थापना 1947 मध्ये झाली.
ब. तिची बांधिलकी काँग्रेस (आय ) पक्षाशी आहे.
क. कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मागाँनी सोडवावे अशी तिची धारणा आहे.वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?*
A ) फक्त अ B ) फक्त अ आणि ब
C ) फक्त अ आणि क D ) अ, ब आणि क
23 ) .माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रिय माहिती आयोगास __ च्या सारखे अधिकार आहेत.
A ) सर्वोच्च न्यायालय B ) उच्च न्यायालय
C ) फौजदारी न्यायालय D ) दिवाणी न्यायालय
24 ) .भारतीय राज्य घटनेच्या कलम_ मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तिची मजूरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, व शिक्षेस पात्र असेल.
A ) 21 B ) 22
C ) 23 D ) 24
25 ) .कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचा खालील कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात :
A ) 6 B ) 7
C ) 8 D ) 9
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
C | A | A | B | D | D | A | D | D | D |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
A | D | A | B | D | C | B | A | D | B |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
D | D | D | C | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download