PSI/STI/ASO Combine Test No. 30, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 30
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) .फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले.
A ) लोकमान्य टिळक B ) गोपाळ गणेश आगरकर
C ) गोपाळ कृष्ण गोखले D ) विष्णुशास्त्री चिपळूणकर
27 ) .गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही ?
A ) गांधीजींना धक्का बसला. त्यांनी चळवळ थांबविली.
B ) आम जनता व काँग्रेस पुढान्यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला.
C ) इंग्रजांनी गांधीजींना शासन विरोधी कारवायास्तव अटक केली.
D ) वरीलपैकी एकही नाही.
28 ) .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा.
(a ) दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
(b ) त्यांनी म्हटले होते ”जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही”.
(c ) ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.वरील कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) (a ) आणि (b ) B ) (b ) आणि (c )
C ) (a ) आणि (c ) D ) (a ) , (b ) आणि (c )
29 ) .खालील दोन विधानांचा विचार करा.
(a ) सेवाग्राम आश्रमचे प्रोफेसर भनसाली दि. 1 नोव्हेम्बर 1942 रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणेंना भेटले.
(b ) त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता.आता सांगा की –
A ) दोन्ही विधाने खरी आहेत व (b ) हे (a ) चे कारण आहे.
B ) दोन्ही विधाने खरी आहेत परंतु (b ) हे (a ) चे कारण नाही.
C ) विधान (a ) बरोबर आहे परंतु (b ) नाही.
D ) दोन्हीतील कोणतेच विधान बरोबर नाही.
30 ) .भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल?
A ) मवाळांच्या आवेदनांबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यावयाचे व बहुतांशी नाकारावयाचे अशी नीती होती.
B ) मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्च पदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतीमत्तेच्या दृष्टीकोणातून अयोग्य होती.
C ) ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनआधार नव्हता.
D ) वरील एकही विधान अयोग्य नाही.
31 ) .’हरित लेखाप्रणाली ‘(green accounting ) म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना……… चा विचार करणे होय.
A ) देशातील एकूण वनक्षेत्र B ) देशातील वनाच्छादनाचा विनाश
C ) प्रदूषण व पर्यावरणीय हानी D ) लागवडीखाली आणलेल्या पडीक जमिनीचे क्षेत्र
32 ) .खालील जोड्या लावा व योग्य पर्याय निवडा?
अ ) पहिली योजना 1 ) पीसी महालनोबीस
ब ) दुसरी योजना 2 ) हेरॉड – डोमर
क ) तिसरी योजना 3 ) एस.चक्रवर्ती
ड ) चौथी योजना 4 ) धनंजयराव गाडगीळ
A ) अ – 4 ,ब – 1,क – 3 ,ड – 2 B ) अ – 4 ,ब – 3,क – 1 ,ड – 2
C ) अ – 2 ,ब – 1,क – 3 ,ड – 4 D ) अ – 2 ,ब – 3,क – 1 ,ड – 4
33 ) .खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दीष्ट्ये आहेत? (a ) महत्तम उत्पादन (b ) संतुलित विकास (c ) देश आत्मनिर्भर (d ) आर्थिक उदारीकरण
A ) (a ) , (b ) , (c ) B ) फक्त (a ) व (b )
C ) फक्त (b ) व (c ) D ) (a ) , (b ) , (c ) , (d )
34 ) .महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला :
(a ) सार्वजनिक क्षेत्र (b ) मूलभूत उद्योग क्षेत्र
(c ) आयात-प्रतिस्थापन उद्योग (d ) लघु व कुटीर उद्योग
A ) (a ) , (c ) B ) (b ) , (d )
C ) (c ) , (d ) D ) (a ) , (b ) , (c ) , (d )
35 ) .खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(A ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.
(B ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.
A ) फक्त (A ) बरोबर B ) फक्त (B ) बरोबर
C ) दोन्ही (A ) आणि (B ) बरोबर D ) दोन्ही (A ) आणि (B ) बरोबर नाहीत
36 ) .12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017.
(b ) नियोजनाचे दोन मसुदे, 9 % विकास दर आणि 9.5% विकास दर विचारात घेवून ठरविले आहेत.
(c ) औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9%.
(d ) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0% आणि 5.5%.
A ) फक्त (a ) आणि (b ) B ) फक्त (c ) आणि (d )
C ) वरील सर्व D ) फक्त (a ) , (b ) , (c )
37 ) .खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दीष्ट्ये समजता येतील?
(a ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (G.D.P. ) 9% पर्यंत नेणे.
(b ) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.
(c ) सकल देशी उत्पादन (G.D.P ) 8% पर्यंत नेणे.
(d ) दरडोई सकल देशी उत्पादनात (G.D.P. ) वार्षिक वृद्धी 7.6, व्हावी.
A ) (a ) , (b ) , (c ) B ) (a ) , (d )
C ) (b ) , (c ) D ) (a ) , (b ) , (c ) , (d )
38 ) .वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडल्या पासून किती दिवसांच्या आत संसदेने ते संमत करून राष्ट्रपतींची संमती मिळणे आवश्यक असते?
A ) 14 B ) 35
C ) 75 D ) 60
39 ) .अप्रत्यक्ष कराचा आघात कोणावर पडत नाही?
A ) ग्राहक B ) उत्पादक
C ) घाऊक व्यापारी D ) किरकोळ व्यापारी
40 ) .पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ ) चलनवाढी मुळे चलनाची खरेदीशक्ति कमी होते तर चलन घटीमुळे चलनाची खरेदीशक्ति वाढते.
ब ) चलनवाढी च्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते, तर
चलनघटीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढते
A ) दोन्ही विधाने बरोबर B ) .दोन्ही विधाने चूक
C ) अ बरोबर ब चूक D ) अ चूक ब बरोबर
41 ) .भारतातील रेल्वेचे जाळे आशिया खंडातील…… क्रमांकाचे, तर जगातील…… क्रमांकाचे जाळे आहे.
A ) 1,2 B ) 2,3
C ) 2,4 D ) 3,4
42 ) .1977 मध्ये ऑल इंडिया रेडिओ च्या…… स्टेशनने देशातील पहिली FM सेवा सुरू केली.
A ) मुंबई B ) दिल्ली
C ) कलकत्ता D ) मद्रास
43 ) .रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणा मार्फत छापल्या जात असत?
A ) इंपिरिअल बँक B ) बँक ऑफ बंगाल
C ) बँक ऑफ दिल्ली D ) ब्रिटिश भारत सरकार
44 ) .भारतात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कोणते निकष वापरले जातात?
अ ) दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग ब ) दरडोई प्रतिमाह उत्पन्न
क ) दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च
A ) अ आणि ब बरोबर B ) ब आणि क बरोबर
C ) अ आणि क बरोबर D ) अ ब आणि क बरोबर
45 ) .अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ____________ आहे.
A ) हिमाचल प्रदेश B ) महाराष्ट्र
C ) गुजरात D ) राजस्थान
46 ) .जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत् प्रकल्प _______ या नदीवर आहे.
A ) रावी B ) बियास
C ) चिनाब D ) व्यास
47 ) .भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य ___________ आहे .
A ) कर्नाटक B ) झारखंड
C ) आंध्रप्रदेश D ) उत्तर प्रदेश
48 ) .संकल्पित जैतापूर अणु-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान __________ या जिल्ह्यात आहे.
A ) रत्नागिरी B ) सिंधुदुर्ग
C ) कोल्हापूर D ) सोलापूर
49 ) .कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा, ___________ या ठिकाणी आहे.
A ) आडवली B ) करबूडे
C ) दिवा D ) चिपळूण
50 ) .खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तु बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
A ) सिंधुदुर्ग B ) रत्नागिरी
C ) सातारा D ) कोल्हापूर
Answerkey:
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 |
B | D | D | A | D | C | C | A | B | A |
36 | 37 | 38 | 39 | 40 | 41 | 42 | 43 | 44 | 45 |
D | B | C | A | A | C | D | D | C | B |
46 | 47 | 48 | 49 | 50 | |||||
C | B | A | B | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download